Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आजपासून जोर धरणार आहे. मुंबईसहीत सर्वच उपनगरांमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार असल्याने आता पुढील काही दिवस राज्याच्या राजधानीमधील राजकारण ढवळून निघाणार असल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधानांपासून ते राज्याबरोबरच देशातील प्रमुख नेते मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण या लाइव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील ठळक घडामोडी पाहणार आहोत.
रोहित पवार हा बालिश व्यक्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय...राष्ट्रवादीचा चिन्ह निवडणुकीनंतर गोठवल्या जाणार असल्याची स्वप्न रोहित पवार पाहत असून तुतारीच गाजर कसं झालं याकडे रोहित पवारांनी पहावं असल्याचं ही मिटकरी म्हणाले.
पालघरमध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचाराला जोरदार शक्ती प्रदर्शन करून सुरुवात केली आहे. पालघर मधील प्रस्तावित वाढवण बंदराला महविकास आघाडीचा विरोध असून वाढवण बंदर होऊ देणार नाही असा नारा देत आपण जनतेच्या बाजूंनी असल्याचं सांगत महविकास आपलाच विजय निश्चित आहे असा विश्र्वास आघाडीचे उमेदवार भारती काम डी यांनी व्यक्त केलंय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिरा भाईंदर मध्ये आगमन. भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानात हेलिपॅड वर आगमन. हेलिपॅड वरून भाईंदर पूर्वेला जाहीर सभेसाठी रवाना. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या जाहीर सभेला संबोधित करणार
पायाखालची वाळू सरकली तशी मोदी वारंवार महाराष्ट्रात प्रचार सभा घेतायत- प्रकाश आंबेडकर
वंचीत बहुजन आघाडीचे कल्याण मतदारसंघातील उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची उल्हासनगर मध्ये सभा
पालघर-डहाणू येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेसाठी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
पदवीधर आणि शिक्षक निवडणुक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली
पुण्यातील आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील मतदानाच्या एक दिवशी आधी म्हणजेच 12 मे रोजी रात्री धंगेकर यांनी सहकार नगर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. महायुतीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसेवाटप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी धंगेकर आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस स्टेशनसमोर मोठा राडा झाला होता. आंदोलनादरम्यान महायुतीचे कार्यकर्ते देखील पोलीस स्टेशनसमोर गोळा झाले होते. त्यामुळे दोन गटात वादावादी होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशी टीका केल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. हा पोरकटपणा आहे अशा शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. वाराणसीमधून पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. या ठिकाणी 1 मे रोजी मतदान होणार आहे. आज सकाळी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले. त्याच्याबरोबर भाजपाचे नेतेही उपस्थित होते. मात्र मोदींनी अर्ज दाखल केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. वाराणसीमधून पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. या ठिकाणी 1 मे रोजी मतदान होणार आहे. आज सकाळी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले. त्याच्याबरोबर भाजपाचे नेतेही उपस्थित होते. मात्र मोदींनी अर्ज दाखल केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. येथे क्लिक करुन वाचा राऊत नेमकं काय म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीमधून सलग तिसऱ्यांदा लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, "हा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा अशी लोक उपस्थित राहतात. त्यांचीही निरोपाची यात्रा आहे. त्या यात्रेत त्यांची लोकं उपस्थित राहणार. हे त्यांचे फेअरवेल आहे. फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी असला तर राजकीय दृष्ट्या चांगला मोक्ष मिळतो," असा टोला लगावला.
वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज भरला. तिसऱ्यांदा मोदी या मतदारसंघातून लढत आहेत. या ठिकाणी 1 मे रोजी मतदान होणार आहे. काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले. त्याच्याबरोबर भाजपाचे नेतेही उपस्थित होते.
'राज्यात 2000 कोटी रुपये मतदारांना देण्यासाठी वापरण्यात आले आहेत. महायुतीच्या बाजूने पोलीस असतील तर पुरावे कसे मिळणार? हेलिकॉप्टर, टँकर, रुग्णवाहिका, वाय सिक्युरिटी असलेल्या गाड्यांमधून पैसे वाटले जात आहेत,' असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
उद्या पंतप्रधान मोदींची नाशिकमध्ये सभा आहे. यासाठी मोठी तयारी सुरू आहे. मी देखील आढावा घ्यायला जाणार आहे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये 800 कोटींच्या प्रकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात नेमका घोटाळा काय आहे हे सांगतानाच, मुख्यमंत्री शिंदेंची तक्रार करण्यात आली आहे. शिंदे घोटाळेबाजांना पाठीशी घालत असून सदर प्रकरणाची एसआयटी, ईडी, सीबीआय, एसीबीमार्फतही चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केली आहे. राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र जसेच्या तसे वाचा येथे क्लिक करुन...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिल्याच शरद पवार यांच्या पक्षाचं याचिकेत म्हटलं आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीमध्ये कोर्टाने अजित पवार यांना हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते. निवडणुका सुरु असताना आज होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काही नवी निर्देश देतं का हे पाहणं महत्वाचं आहे.
पालघरमध्ये आज दोन मोठ्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी वसईमधील माणिकपुर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तर महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू येथे सायंकाळी जाहीर सभा पार पडणार आहे.
नंदुरबार - 67.12 टक्के
जळगाव - 53.65 टक्के
रावेर – 61.36 टक्के
जालना – 68.30 टक्के
औरंगाबाद - 60.73 टक्के
मावळ – 52.90 टक्के
पुणे – 51.25 टक्के
शिरूर - 51.46 टक्के
अहमदनगर - 62.76 टक्के
शिर्डी – 61.13 टक्के
बीड - 69.74 टक्के
चौथ्या टप्प्यातील 96 जागांवर अंदाजे 67.71 टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.44 टक्के मतदान झाले. त्या खालोखाल आंध प्रदेशात 78.25 टक्के मतदान झाले आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये सर्वात कमी 37.98 टक्के मतदान झाले. मध्य प्रदेश, ओडिशामध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 59.64 टक्के मतदान झालं आहे.
पालघरमध्ये महविकास आघाडीतील प्रचारात मित्र पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विरोधकाकडून केला जात आहे. शिवाय महाविकास आघाडीतील आमदार आमच्या मुलांसारखे असून ते आम्हाला मदत करतील असे वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसरा आणि माकपचे आमदार विनोद निकोले यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही आलबेल असल्याचं सांगत विरोधकांना महविकास आघाडीचे भीती वाटत असल्याने ते संभ्रम निर्माण करीत असल्याचा दावा केला.
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्ये मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघांचा समावेश आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.