Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Loksabha Election 2024 Live Updates: देश कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मैदानात उतरले आहेत. 

Loksabha Election 2024 Live Updates: देश कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे - देवेंद्र फडणवीस
LIVE Blog

Loksabha Election 2024 Live Updates : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा राज्यातील विविध जिल्ह्यात होत आहेत. 

 

02 May 2024
02 May 2024 20:57 PM

ठाण्यात देखील भाजपा पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने नवी मुंबई नंतर ठाण्यात देखील भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षाच्या पदाचा राजीनामा, ओबीसी मोर्चा सरचिटणीस शरद बिराजदार, बेटी बचाव बेटी पढाव समन्वयक मिलिंद नैबागकर यांनी दिला पदाचा राजीनामा, नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला ठाण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध,भाजप च्या जिल्हा आढावा बैठकीत करण्यात आला म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध

02 May 2024 19:56 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेतील मुद्दे

देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील ,देश कसा प्रगती करू शकेल, देश कोणाच्या हातात देण्याकरता ही निवडणूक होत आहे..

एका बाजूला नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वात एनडीए आघाडी काम करत आहे,

दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 26 पक्षांची खिचडी आहे.

या त्यांच्यासोबत वेगवेगळे आहेत, दिन,दलित गरीब यांना सगळ्यांना ट्रेनमध्ये जागा आहे,नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ट्रेन पुढे जात आहे.

तिकडे सगळे इंजिन आहे,पण बोगीच नाही,सगळेजण इंजिन समजत आहेत,

आपल्या सर्वांचं इकडे विकास आहे.

तिकडे त्यांच्या इंजिनची अवस्था अवघड आहे,एक इंजिन दिल्ली कडे ओढत आहे,एक इंजिन  बारामतीकडे ओढत आहे,एक मुंबई कडे ओढत आहेत..

 मोदींनी देशातला भ्रष्टाचार बंद केला 

मोदीजींनी दहा वर्षांमध्ये वीस कोटी लोकांना झोपडी मधून पक्क्या घरात आणले

पाच वर्षात पाच कोटी घरांमध्ये चुलीऐवजी गॅस दिला.  पुढील पाच वर्षात नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना मोफत रेशन धान्य देतील.

 80 लाख लोकांना बचत गटाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी कर्ज दिलं

एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवले,आता 3 कोटी दीदींना लखपती बनवण्यात येणार

 

जयंत पाटील यांच्यावर टीका - 

मला आश्चर्य वाटते तो पैसा द्यायला ज्यांना  निवडून देतो. 

त्यांच्या काळात का पैसे येत नाही.ज्यांना सत्ता मिळवायचे असते त्यांना सत्ता राबवायचे असते,ते हा विचार करत नाहीत.

 

02 May 2024 18:20 PM

मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील व बावनकुळे यांची बंद दरवाजाआड चर्चा सुरू

रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरुन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज

बावनकुळे हे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आहेत 

जवळपास अर्धा तास त्यांची चर्चा बंद दरवाजाआड सुरू आहे

02 May 2024 16:37 PM

सांगली लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सांगलीमध्ये दाखल

सांगली दाखल होताच उद्धव ठाकरे यांनी गणपती मंदिरात जाऊन आधी गणरायाचे घेतले दर्शन

तेजस ठाकरे यांच्यासह सह उमेदवार चंद्रहार पाटील यांनी देखील घेतले दर्शन

सायंकाळी 5 वाजता सांगली शहरातील कल्पद्रुम क्रीडांगणावर चंद्रहार पाटील यांच्या सभेसाठी उद्धव ठाकरे राहणार उपस्थित.

02 May 2024 16:22 PM

नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी साधला संवाद-

ऑन नवी मुंबई गणेश नाईक भेट

- गणेश नाईक यांना भेटण्यासाठी रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत गेलो होतो 
- गणेश नाईक यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो 
- गणेश नाईक यांना भेटलो संदीप नाईक यांना भेटलो सागर नाईक यांना  भेटलो 
- कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटीगाठी झालेला नाहीये गणेश नाही त्यांना भेटलो त्यांना बुके दिला आणि आलो 
- कार्यकर्त्यांची कुठे बैठक आहे हे मला माहित नाही 

ऑन गणेश नाईक भेट चर्चा

- मी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली 
- गणेश नाईक यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो
- मी लहानपणापासून विद्यार्थी सेनेचे काम करत असल्यापासून गणेश नाईक यांचा आवडता कार्यकर्ता म्हणून काम केलेला आहे 
- ज्या ज्या वेळी मी गणेश नाईक यांना भेटत होतो त्यावेळी त्यांनी कौतुक केले कार्यकर्त्यांच्या बैठकीत देखील त्यांनी कौतुक केलेला आहे 
- गणेश नाईक यांनी मला आशीर्वाद दिला काही चिंता करायची गरज नाही नवी मुंबईतून जबरदस्त लीड मिळेल सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे

02 May 2024 12:24 PM

Loksabha Election 2024 Live Updates:  भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

 

02 May 2024 11:13 AM

हिंगोलीः निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदान केंद्राध्यक्षावर गुन्हा दाखल 

हिंगोली लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कळमनुरी मतदार संघात सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस जी तळणीकर हे केंद्राध्यक्ष होते,पण निवडणूक काळात ते निवडणूक कर्तव्यावर आले नाहीत, याबाबत निवडणूक विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावली होती

02 May 2024 11:08 AM

Loksabha Election 2024 Live Updates: डोंबिवलीत शिवसैनिकांची गर्दी, श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी भरण्यासाठी मुख्यमंत्री येणार

शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरतांना शिवसेना मोठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहे

02 May 2024 09:11 AM

Loksabha Election 2024 Live Updates: अहमदनगर शहरात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची तारीख पुढे ढकलली

6 मे रोजी होणारी सभा आता 7 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणार. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली माहिती.

02 May 2024 09:04 AM

Loksabha Election 2024 Live Updates:  शरद पवार, उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आज सांगली जिल्ह्यात पार पडणार सभा

सांगली जिल्ह्यात आज शरद पवार ,उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोफा धडाडणार आहेत.हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत.

02 May 2024 08:13 AM

फडणवीस बोलतात ते कपोकल्पित असतं: पवार

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला होता. त्यावर आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी ज्या सांगतात त्या कपोकल्पित असतात, असा टोला पवारांनी लगावला आहे.

02 May 2024 08:11 AM

Loksabha Election 2024 Live Updates:  लेकीसाठी शरद पवार मैदानात, सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभांचा धडाका

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातील करंजेपुलगावात संध्याकाळी 5 वाजता व माळेगावला 7 वाजता जाहीर सभा

02 May 2024 08:10 AM

Loksabha Election 2024 Live Updates:  उज्वल निकम घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार

02 May 2024 06:55 AM

Loksabha Election 2024 Live Updates:  कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार.अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, महायुतीचे नेते देखील उपस्थित रहाणार.

02 May 2024 06:52 AM

Loksabha Election 2024 Live Updates: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे हे दोघे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे अर्ज भरण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत तसंच गिरीश महाजन आणि छगन भुजबळ ही या रॅलीमध्ये सहभागी होतील.

02 May 2024 06:51 AM

Loksabha Election 2024 Live Updates : माविआचे उमेदवार अमोल किर्तीकर आज अर्ज भरणार

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार अमोल किर्तीकर आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुन नंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रॅलीद्वारे बांद्रा कलेक्टर ऑफिसात अर्ज भरणार. आदित्य ठाकरेही सहभागी होणार.

Read More