Loksabha Election 2024 Live update : मावळमध्ये अर्ज भरण्याआधी श्रीरंग बारणेंचं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. तरदुसरीकडे हिना गावित, सदाशिव लोखंडे, सुजय विखेंचीही अर्ज भरण्याची लगबग दिसून आली. खैरेंचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे संभाजीनगरात असणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. पाच दिवसांत सहा मतदारसंघात सभांचा धडाका असणार आहे.
आपली बंडखोरी कायम ठेवून सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षातर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.. जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आलंय. त्यासोबतच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचंही जाहीरनाम्यात म्हटलंय. कृषी, वीज आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठीही घोषणा करण्यात आल्या आहेत... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्याचं वाचन केलं..
राज्यात बहुसंख्य जागा मविआला मिळणार, असा विश्वास शरद पवार यांनी झी24 तासला दिलेल्या Exclusive मुलाखात व्यक्ती केलाय.
सोलापुरातून मोठी बातमी समोर येतेय.. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. तेव्हा राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
एमआयएमनं कोल्हापुरात मविआ उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना समर्थन दिलंय. शाहू महाराजांनी आम्हाला फोन केला नाही, समर्थन मागितलं नाही मात्र ते मोठे आहेत म्हणून आम्ही समर्थन देत असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय.
भ्रष्टाचार करा आणि भाजपात या.. हीच मोदी गॅरंटी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलीय.. तर अमरावतीत नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक झाल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय. अमरावतीतल्या मविआच्या प्रचारसभेत ठाकरे-पवार एकाच मंचावर आले होते, त्यावेळी त्यांनी मोदी-भाजपवर जोरदार प्रहार केले..
माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला....मुंबईतील गरवारे क्लब मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला...मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातला प्रवेश हा निवडणुकीच्या तोंडावर मविआला धक्का मानला जातोय
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...उमेदवारी अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते...ही निवडणूक गावकी, भावकीची नसून, देशहिताची निवडणूक आहे...सलग तिस-यांचा विजय होणारच असा विश्वास बारणेंनी व्यक्त केलाय...मावळमध्ये बारणेंची लढत ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंशी होणार आहे...
संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत रंगतेय...आज संभाजीनगरातून मविआचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.अर्ज भरण्याआधी खैरेंच्या 92 वर्षांच्या आईनं त्यांना ओवाळलं आणि विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिले होते. खैरेंचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते. चंद्रकांत खैरेंची लढत शिंदेंच्या शिवसेनेच्या संदीपान भुमरेंशी आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याशी होतेय...2019 च्या लढतीत जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता...त्याच पराभवानाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा खैरेंना मिळालीय...त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे 4 जूनला ठरेलच...मात्र, मुख्य लढत ही खैरे विरुद्ध भुमरेंमध्ये असल्याचं बोललं जातंय...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तसंच या दोन्ही नेत्यांची एकत्र पहिली सभा अमरावतीत पार पडली. बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली. पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली शरद पवार दिली.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.