Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित?

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर बरेच उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रात आज होणाऱ्या सभांमध्ये अगदी केंद्रीय नेत्यांपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही सभा होणार आहेत. यावरच नजर टाकूयात... 

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी  जाधव यांचं नाव निश्चित?
LIVE Blog

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीसाठीचा पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीला अधिक रंग चढू लागला आहे. आज महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि रो शो होणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अकोल्यातील सभेचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभा आज होणार आहेत. जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडी...

23 April 2024
23 April 2024 20:11 PM

निवडणुकीनंतर ते पुन्हा पवार साहेबांकडे येतील आणि पाया पडतील, चूक झालं म्हणतील. अशी टीका जयंत पाटील हे सुनील तटकरे यांच्यावर करत असताना शरद पवार यांनी हात हलवत नकार दिला.

23 April 2024 19:45 PM

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून भायखळा विधान सभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झालंय.काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला पसंती दिली.

23 April 2024 19:21 PM

शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचार

 

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधील भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचार पत्रकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्यानं शिवसैनिक नाराज झालेत... त्यांनी राणेंचा प्रचार थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... आधीच हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानं शिवसेना शिंदे गटात नाराजी आहे. त्यात प्रचार साहित्यातून बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंचा फोटो नसल्यानं नाराजीत भर पडलीय... दरम्यान, शिवसैनिकांनी अजिबात प्रचार थांबवलेला नाही, असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 April 2024 19:12 PM

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव  नाका बंदीवर हिंगोली लोकसभा क्षेत्राचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा याने पोलिसांसोबत सोबत हुज्जत घालत शिवीगाळ केली आहे. नाक्यावर गाडी का थांबविली? या कारणावरून ही शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी उमरखेड पोलिसात तक्रार करण्यात आली असून कृष्णा आष्टेकर विरोधात 353 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 April 2024 18:36 PM
23 April 2024 18:19 PM

Loksabha Election 2024 Live Updates: अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभा घेतली. आपल्या भाषणात अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विरोधकांनी राम मंदिर बनण्यापासू अडकून ठेवलं होतं. पण नरेंद्र मोदी दोनवेळा पंतप्रधान झाले आणि त्यांनी अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची कावड यात्रा घेऊन निघाले आहेत. पंतप्रधान मोदींनी भारतातून आतंकवात संपवला, तर काँग्रेसने केवळे मताचं राजकारण केल्याचा आरोप अमित शाहंनी केलाय.

23 April 2024 17:01 PM

बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटलांचं बंड लोकसभेपुरतं शमलं असलं तरी त्यांचा इंदापूर विधानसभेवरील दावा कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून तसा शब्द मिळालेला असल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी म्हटलंय.

23 April 2024 16:37 PM

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर बसला लागली आग..बस मध्ये एकूण 35 ते 40 प्रवाशी होते...बस पेटल्याने प्रवाशांनी तातडीने गाडीतून पडले बाहेर 

23 April 2024 16:35 PM

उद्धव ठाकरेंच्या मुलाने दिलेली शिवी मला नसून शेतकऱ्याला शिवी आहे. मराठा समाजाला शिवी आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

23 April 2024 16:08 PM

शिरुरचे उमेदवार शिवाजी अढळराव पाटील हे २५ तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील.यासाठी महायुतीने प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर डेक्कनजवळच्या नदी पात्रात मोकळ्या जागेवर सभा देखील होणार- आनंद परांजपे 

23 April 2024 16:05 PM

एकाच दिवशी बच्चू कडू आणि नवनीत राणांची सभा..अमरावतीत सायन्स स्कोर मैदानात आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी अडवलं. पोलीस आणि बच्चू कडुंमध्ये बाचाबाची...

23 April 2024 16:04 PM

अहमदनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज..महाविकास आघाडीमध्ये पक्ष सामील असतानाही उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अर्ज भरल्यामुळे चर्चांना उधाण...

23 April 2024 16:01 PM

रोहित पवार-युगेंद्र पवार यांना अतिरिक्त सुरक्षा द्या'; सुळेंची मागणी

23 April 2024 15:59 PM

'फडणवीसांना 'माधव' फॉर्म्युल्याचा विसर'; भुजबळांच्या माघारीने माळी समाज आक्रमक

23 April 2024 15:09 PM

100 स्मार्ट सिटी कुठे बनवल्या? आदित्य ठाकरेंचा सवाल

भाजपा 10 वर्षांचं काम सांगत नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर निशाणा साधला आहे. 100 स्मार्ट सिटी कुठे बनवल्या? असा सवाल अदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रातील स्थितीबद्दल बोलताना, "राज्यातले उद्योग बाहेर गेले," असंही आदित्य ठाकरे म्हणाले. "अबकी बार, भाजपा तडीपार," अशी घोषणा अदित्य ठाकरेंनी दिली. फक्त विरोधकांवर टीका करणं एवढंच सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

23 April 2024 15:03 PM

Political Report On Bhiwandi | आगरी, कुणबी मत कुणाच्या पारड्यात?  भिवंडीचं राजकीय गणित नेमकं काय?

23 April 2024 14:02 PM

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्याशी नारायण राणे यांची लढत आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोघांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांनी स्वत:ची माहिती दिली. दरम्यान नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये सर्वात जास्त कोण शिकलंय? सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे आहे? येथे क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर...

23 April 2024 13:15 PM

अंतुलेंच्या गावात गीतेंचं जोरदार स्वागत

मुश्ताक अंतुलेंच्या आंबेत गावात शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अनंत गीतेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं.  इथल्या मुस्लिम समाजाच्या खास विनंतीवरून गीतेंनी आंबेत गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली. मतदारांनी गीतेंना पाठिंबा देत त्यांच्या मागे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

23 April 2024 12:26 PM

विशाल पाटलांविरोधात कारवाई करणार काँग्रेस

सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यानंतर नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिला आहे. विशाल पाटलांना कुणीतरी फुस लावतंय असा आरोप करत 25 तारखेला पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं पटोलेंनी म्हटलं आहे. सांगलीतून विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेसकडून कारवाई केली जाणार आहे.

23 April 2024 12:23 PM

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. सिंधुदुर्गात येऊन फडणवीसांबद्दल अपशब्द बोलून दाखव मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो, असा एकेरी उल्लेख करत राणेंनी केला. 'लाज सोडलेला माणूस' अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. सत्ता गेल्याने आणि 40 आमदार शिवसेना सोडून गेल्याने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोपही राणेंनी केला आहे.

दिवसभरातील सर्व राजकीय घडामोडी पाहा येथे क्लिक करुन.

23 April 2024 12:06 PM

रात्री उशीरा शिंदेंच्या निवासस्थानी बैठक

आमदार रवींद्र वायकरांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र वायकर इच्छुक नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून त्याची मनधरणी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

23 April 2024 12:02 PM

Suresh Jain यांच्या फोटोवरून वाद! संजय सावंतांची महाजनांवर टीका

सर्व लाइव्ह अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

23 April 2024 11:29 AM

दक्षिण मुंबईतून अगदी वेगळाच चेहरा?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाचे यशवंत जाधव इच्छुक आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दक्षिण मुंबई जागेवर भाजप लढणार की शिवसेना हा तिढा कायम आहे. अशातच यामीनी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

23 April 2024 10:52 AM

विनोद पाटलांचं बंड शमवण्यात शिंदेंना यश येणार का?

विनोद पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कालच उदय सामंतांनी विनोद पाटलांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी महायुतीने संभाजीनगरचा उमेदवार बदलावा अशी मागणी पाटलांनी केली होती. आज मुख्यमंत्रीही विनोद पाटलांची भेट घेणार आहेत..त्यामुळे विनोद पाटलांचं बंड शमवण्यात शिंदेंना यश येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

23 April 2024 10:08 AM

भुजबळांनी माघार घेतल्यानंतर समता परिषद आक्रमक

नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता भुजबळ फार्मवर ही बैठक होणार आहे. यावेळी निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. नाशिकमधून निवडणूक न लढण्याचा निर्णय भुजबळांनी घेतल्यानंतर समता परिषद आक्रमक झाली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

23 April 2024 09:54 AM

दोन दिवसांमध्ये जाहीर करणार नाशिकचा उमेदवार

नाशिकचा महायुतीमधील तिढा अजूनही सुटलेला नाही. कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता अजून कायम आहे. नाशिकमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आणि अजय बोरस्तेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दोन दिवसांत नाशिकचा उमेदवार जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा हेमंत गोडसेंनी केला आहे.

23 April 2024 09:52 AM

संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज

उद्धव ठाकरे गटाचे पिंपरीमधील उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, रोहित पवार, शेकापचे जयंत पाटील, सचिन आहेर आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वाघेरेमध्ये महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. पिंपरीमधून खंडोबा माळ चौक ते आकुर्डी निवडणूक कार्यालय अशी पदयात्रा निघणार आहे.

23 April 2024 09:08 AM

सुप्रिया सुळेंसाठी अदित्य ठाकरेंची सभा

राष्ट्रवादीच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. मुळशी येथे आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

23 April 2024 09:07 AM

अकोल्यात शाहांची सभा; 30 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था

अकोल्यात गृहमंत्री अमित शाहांची आज सभा होणार आहे. भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा होत आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित असतील. भाजपकडून 30 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था इथं करण्यात आली आहे.

23 April 2024 09:06 AM

अमरावतीत फडणवीसांच्या दोन सभा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात त्यांच्या दोन ठिकाणी सभा होणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी फडणवीस प्रचार सभा घेणार आहेत. दुपारी 3 वाजता धारणी इथे भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ फडणवीस सभा घेणार आहेत.

23 April 2024 09:04 AM

खामगावमध्ये जाहीर सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज खामगावमध्ये सभा घेणार आहेत.  महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी खामगावमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

23 April 2024 09:02 AM

शिंदेंची जानकरांसाठी रॅली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारासाठी परभणीत सभा घेणार आहेत.  पाथरी इथे आज दुपारी 2 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. सभेपूर्वी भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

23 April 2024 09:01 AM

शरद पवार स्वत: तटकरेंविरोधात मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: सुनील तटकरेंविरोधात मैदानात उतरलेत. आज शरद पवारांची रायगडमधल्या माणगावच्या मोरबामध्ये सभा होणार आहे. मविआचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता सभा होणार आहे. सुनील तटकरेंची कोंडी करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असेल.

23 April 2024 08:58 AM

अनंत गिते काय म्हणाले होते?

खेडमधल्या सभेतून अनंत गीतेंनी कदमांवर टीका केली होती. भविष्यात रामदास कदमांच्या घरातून कुणी निवडणुकीला उभा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असं अनंत गीतेंनी म्हटलं होतं यावरुन योगेश कदमांनी गितेंवर निशाणा साधला आहे.

23 April 2024 08:57 AM

परभणीत महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन

परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितत आज सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील हे या सभेला उपस्थित असणार आहेत. परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये संध्याकाळी 5 वाजता या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय.

23 April 2024 08:57 AM

कदम विरुद्ध गीतेंमध्ये कलगीतुरा

रायगडमध्ये योगेश कदम आणि अनंत गीतेंमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आमच्या पैशांच्या जोरावर 2014 ची निवडणूक गीते जिंकले, तेव्हा आमचा पैसा पापाचा नव्हता का? असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. गीते कदम घराणे संपवायची भाषा करतात. त्यांना लोकसभा सोडा, यापुढे एखादी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा जिंकून येऊ शकत नाहीत. असं खुलं चॅलेंज योगेश कदम यांनी दिलं आहे. लवकरच जाहीर सभेतून गीतेंना उत्तर देऊ असा इशाराही योगेश कदम यांनी दिला.

Read More