Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Loksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानं वळवल्या नजरा.   

Loksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
LIVE Blog

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता अनेक राजकीय पक्षांचं लक्ष्य चौथ्या टप्प्यातील मतदानाकडे लागलं आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी देशातील बडे नेते राज्यातील बऱ्याच मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेताना दिसत आगेत. त्यात इथं भाजप आणि ठाकरे गटातील वाद अधिक विकोपास गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता हल्लाबोल केला. शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केलं होतं. त्यावर फडणवीस आणि शिंदेंनीही उद्धव ठाकरेंचाही पक्ष विलीन होणार असल्याचं भाकित बोलून दाखवलं होतं. त्यावरच उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय.

09 May 2024
09 May 2024 18:17 PM

Loksabha Election 2024 Live Updates: नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत रस्सीखेच

महायुतीत एकत्र असूनही भुजबळ विरुद्ध कांदे वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.  त्यांच्या या वादामुळं दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

09 May 2024 17:59 PM

Loksabha Election 2024 Live Updates: खासदार संजय राऊत उद्या नाशिक दौऱ्यावर

 जुने नाशिक परिसरात राजाभाऊ वाजेंसाठी संजय राऊत यांची जाहीर सभा. विजय करंजकरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र आणि बडगुजरांना तडीपारीची नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा दौरा महत्वाचा

 

 

09 May 2024 17:45 PM

रूपाली चाकणकर यांनी भावनेच्या भरात मतदान यंत्रांची पूजा केली. पण ते कृत्य चुकीचेच. त्यावर योग्य ती कारवाई होईल: सुनील तटकरे

09 May 2024 16:54 PM

कल्याण लोकसभेत शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरूच; संपूर्ण 27 गाव संघर्ष समिती शिवसेना शिंदे गटात विलीन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठे यश. संघर्ष समितीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट तसेच काँग्रेससह सर्वपक्षीय सदस्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

09 May 2024 16:47 PM

Loksabha Election 2024 Live Updates:  कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

बीडची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना पंकजा मुंडे यांची एक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.  त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली यावर पंकजा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या व्यक्तीसोबत ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यांची माझी ओळख नाही, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मी एका कार्यकर्त्यांच्या फोनवरून बोलली आहे. त्या ऑडिओ क्लिप मध्ये असं काहीही असंवेधानिक आणि अक्षपार्ह नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

09 May 2024 16:12 PM

Loksabha Election 2024 Live Updates: शरद पवार काँग्रेसमध्ये जाणारच आणि ठाकरेंना पण घेऊन जाणारः फडणवीस

सर्व प्रादेशिक पक्ष विलीन होणार आहेत असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यांना माहीत आहे आता आपल्या पक्षाचं काय होणार. शरद पवार काँग्रेसमध्ये जाणारच आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील घेऊन जाणार आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

09 May 2024 14:51 PM

रस्त्याच्या बाजूला फेकलेल्या शेकडो मतदान कार्डाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

रस्त्याच्या बाजूला फेकलेल्या शेकडो मतदान कार्ड प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल.रस्त्याच्या बाजूला फेकलेले मतदान कार्ड 2008-09 वर्षातील आहेत

09 May 2024 14:39 PM

शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार संजीव नाईक यांची देखील रोड शोला हजेरी.

09 May 2024 14:37 PM

Loksabha Election 2024 Live Updates : जालना लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जाहीर केला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहिर केला आहे. कल्याण काळे यांना जाहीर केला पाठिंबा

09 May 2024 12:29 PM

Loksabha Election 2024 Live Updates : पक्ष विलिनीकरणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले... 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र होतील असं मी म्हणालो नव्हतो. हे दोन्ही पक्ष 2001 पासून जवळपास एकत्र काम करत आहेत असं मीह म्हणालो होतो. काँग्रेस मध्ये गांधी,नेहरू यांची विचारधारणा आहे आणि त्यांच्या विचारधारणेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत. पक्षातील अनेक जण भाजप मध्ये जाण्यासाठी इच्छुक होते, असं शरद पवार सातार येथील पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्टच बोलले. 

09 May 2024 12:06 PM

Loksabha Election 2024 Live Updates : बारामतीतील मतदानाविषयी अजित पवार नाराज 

बारामती मध्ये अपेक्षित मतदान झालं नसल्याबद्दल देखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुती च्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी पुण्यात बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी निवडणुकीदरम्यान प्रचारामध्ये राहिलेल्या त्रुटी किंबहुना झालेल्या चुकांचा पाढा वाचल्याची चर्चा आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधानांनी शरद पवार यांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. याविषयी देखील अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांसंबंधी केलेल्या विधानाबाबत अमित शहा यांच्याशी बोलणार असल्याचं अजित पवार या बैठकीत म्हणाले. 

09 May 2024 11:59 AM

Loksabha Election 2024 Live Updates : शेकडो मतदान कार्ड अज्ञाताने दिले फेकून

जालना लोकसभा निवडणूकीला अवघे 4 दिवस बाकी असताना जालना शहरात एक धक्कादायक प्रकार समोर या आला आहे.शहरातील नूतन वसाहत भागात रस्त्याच्या बाजूलाच शेकडो मतदान कार्ड अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडालीय.फेकून देण्यात आलेले मतदान कार्ड जालना शहरातील नूतन वसाहत भागातीलच असल्याचं समजतंय.या प्रकरणी या भागातील नागरिकाने कदिम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मतदान कार्ड जप्त केले आहेत.चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 

09 May 2024 11:17 AM

Loksabha Election 2024 Live Updates : पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत प्रचारसभांची गर्दी 

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असून मुंबईत प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे. शहरातील प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 17 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

09 May 2024 11:12 AM

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत रविवार आणि सोमवारी दोन भागात प्रकाशित होणार आहे. नरेंद्र मोदी अमित शहा यांचे होणारे महाराष्ट्र दौरे,त्यांच्या महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटावर होणाऱ्या टीका, महाराष्ट्रातील महायुतीतील नेत्यांकडून होणारी वक्तव्ये याला उत्तर या मुलाखतीतून उद्धव ठाकरे देणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे शिवसेना ठाकरे गटाची भूमिका या मुलाखतीतून उद्धव ठाकरे मांडताना दिसतील. 

 

09 May 2024 10:44 AM

Loksabha Election 2024 Live Updates : नेतेमंडळींच्या भेटीगाठी आणि चर्चा... का पुढे आलं फडणवीसांचं नाव? 

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख संभाजीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते त्याच हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत सुद्धा मुक्कामी होते या तिघांमध्ये भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती, उदय सामान यांनी याबाबत थेट न बोलता उत्तर देणे टाळले तर अनिल देशमुख यांनी मात्र आमची कुठलीही भेट झाली नाही आणि ते शक्य नाही अशा पद्धतीने खुलासा केला इतकच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना मी कधीच भेटू शकत नाही माझी भेटण्याची इच्छा नाही असेही ते म्हणाले आणि रात्री झालेल्या भेटींच्या चर्चांवर त्यांनी पूर्णविराम दिला. 4 जूनला महाराष्ट्रात चमत्कार दिसेल आमचा मोठा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर शरद पवार काल केलेले विधान करण्याबाबत जे म्हणाले ते छोट्या छोट्या गटांबाबत म्हणाले त्यांच्या पक्षाबाबत नाही नाहीतर त्यांनी स्पष्टपणे राष्ट्रवादीबाबत भूमिका मांडली असती असेही अनिल देशमुख म्हणाले. 

09 May 2024 09:58 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी 

मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी होती पैसे देऊन लोकांना आणलेलं होत असा गंभीर आरोपचंद्रकांत खैरें यांनी केलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बजाजनगर येथे झालेल्या जाहीर सभेला भाडोत्री गर्दी होती. पैसे देऊन लोकांना आणण्यात आले होते असा पैसे देऊन लोकांना आणण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे ते म्हणाले. 

09 May 2024 08:02 AM

Loksabha Election 2024 Live Updates : वर्सोव्यात महायुतीचं शक्तीप्रदर्शन 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने जोर लावला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी देखील आज वर्सोव्यात बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.या बाईक रॅली ला मनसे नेत्या शालिनी ठाकरे, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी देखील हजेरी लावली. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे ही कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं.

09 May 2024 07:59 AM

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्र्यांचं मिशन ठाणे

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार. दिवसभर या दोन्ही मतदार संघातील नाराज लोकांची समजूत काढणार आहेत. या कमी  दिवसात कशा प्रकारे प्रचार करायचा ,कशा प्रकारे बांधणी करायची या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नव्हे तर ते महायुतीतील बाकीच्या पक्षतील नेते व पदाधिकारी यांच्या बैठकाही घेणार आहेत. 

09 May 2024 07:33 AM

Loksabha Election 2024 Live Updates : प्रियंका चतुर्वेदी यांचे वादग्रस्त विधान प्रियंका चतुर्वेदी यांचे वादग्रस्त विधान 

बुधवारी मुंबईच्या घाटकोपर येथे महाविकास आघाडीतर्फे संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचाराची सभा पार पडली. यात प्रियांका चतुर्वेदी आणि नितीन बानगुडे पाटील यांची भाषणे झाली. यावेळी प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलं , सिनेमा चा दाखला देत श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असे लिहिलं प नरेंद्र मोदी जेव्हा अशा प्रकारचा आरोप करतात तेव्हा त्यांना माहिती आहे की काळा पैसा कसा घ्यायचा अशाच प्रकारे टेम्पो मधून काळा पैसा घेतला आहे जर अदानी आणि अंबानी यांनी काळा पैसा दिला व त्यांच्यावर ईडीची रेड का नाही टाकत असा सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी सभेत विचारला तर प्रियंका चतुर्वेदी यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं लिहिलं आहे अशा प्रकारचा आरोप देखील केला आहे.

09 May 2024 07:29 AM

Loksabha Election 2024 Live Updates : ...तर मी राजकारण सोडेन

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत मविआच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं. उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेंनी ठाकरेंना दिलंय. जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपस्थितीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडला. त्यावेळी दानवेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय.

 

09 May 2024 07:17 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत...

उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत.... ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत. मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलंय. त्यामुळे  त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये. असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलंय. 

 

Read More