Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Loksabha Election 2024 Live Updates : इंडिया आघाडीने आता तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केलं आहे - नरेंद मोदी

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत. 

Loksabha Election 2024 Live Updates : इंडिया आघाडीने आता तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केलं आहे - नरेंद मोदी
LIVE Blog

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहिला मिळत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता 7 मे 2024 ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बहुचर्चेत बारामतीचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यासोबत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिधुदुर्ग उस्मानाबाद आणि लातूरसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 

27 April 2024
27 April 2024 19:41 PM

मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघमधील महाविकास आघाडीचे मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रश्मी ठाकरे यांच्याहस्ते होत आहे ....परळ भागात या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय ...उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे या विभागातून निवडणूक लढवत आहेत .

27 April 2024 18:28 PM

नरेंद्र मोदींची कोल्हापुरात मराठीतून भाषणाला सुरुवात 

मी आज करवीर काशीत आलोय. कोल्हापूर हे फूटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. आता आम्ही २-० ने आघाडीवर आहे. इंडिया आघाडीने सेल्फ गोल सेट केला आहे.

कोल्हापूरकर असा गोल करा की येणारे चार राऊंडही इंडिया आघाडी चितपट होईल

जगात भारी..कोल्हापुरी

इंडिया आघाडीने आता तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केलंय

काश्मीरमध्ये ३७० कलम परत आणण्याचा काँग्रेसचा विचार सुरू आहे. सीएए कायदा रद्द करण्याचाही त्यांचा विचार आहे. तीन अंकी जागा लढण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. 

एक वर्षात एक पंतप्रधान होईल त्यांचा...म्हणजे पाच वर्षात पाच पीएम होतील. कर्नाटकात तेच सुरू आहे. असं करणा-यांना देश सहन  करणार नाही

कर्नाटक व तामिळनाडूत ते दक्षिण भारत तोडण्याची भाषा करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी हे स्विकारेल का..त्यांना उत्तर दिले पाहिजे

27 April 2024 18:03 PM

धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला...शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. आता बाळासाहेबांचा मुलगा पंजाला मतदान करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

27 April 2024 16:37 PM

आता केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले नाही तर येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत एकत्र न लढता वेगवेगळे लढतील. - प्रकाश आंबेडकर

27 April 2024 12:06 PM

Loksabha Election 2024 Live Updates : नसीम खान यांच्या काँग्रेसच्या स्टार प्रचार पदाचा राजीनामा

राज्यात मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे नसीम खान नाराज असून त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलंय. नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचार पदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांना एमआयएमकडून ऑफरबद्दल भाष्य करण्यास नकार दिलाय. 

27 April 2024 11:42 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  सांगलीत बंडखोर नगरसेवकांमध्ये खंडाजंगी

सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील आणि मिरजेतील भाजपाचे बंडखोर नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपलीय...दोन वेळा संधी दिलेल्या बाजार बुणग्यांना आता ठेचायची वेळ आलीय...तसेच उद्याच्या राजकारणात त्यांना  घरी बसल्याशिवाय स्वस्थ बसणार  नाही...असा इशारा खासदार संजयकाका पाटलांनी दिलाय...तर कुठला नेता आला आणि आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणार नाही...असं आव्हान  बंडखोर माजी नगरसेवक सुरेश आवटींनी दिलंय..

 

27 April 2024 11:41 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  शिवरायांच्या गादीविरोधात मोदी प्रचार - राऊत 

मोदींच्या कोल्हापूर दौ-यावरुन संजय राऊतांनी निशाणा साधलाय.. शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येतायत, शिवरायांच्या गादीविरोधात मोदी प्रचार करायला येतायत.. असा घणाघात संजय राऊतांनी केलाय.. शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं ही इच्छा होती असंही राऊतांनी म्हटलंय.. 

 

27 April 2024 08:39 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या अडचणीत वाढ

जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रक्षा खडसेंनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्जामध्ये त्यांनी अवैध गौण खनीज उत्खनन प्रकरणातील खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप, रावेरचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी केलाय. मात्र कागदपत्र वेळेत न दिल्यानं निवडणूक निर्णय अधिका-यांनी हा आक्षेप फेटाळलाय. त्यामुळे कांडेलकर उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. 

 

27 April 2024 08:14 AM

Loksabha Election 2024 Live Updates : पुण्यात मोदींचा 29 एप्रिलला भव्य रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिलला पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत...त्यांच्या सभेसाठी 2 लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय...त्याचबरोबर मोदींचा भव्य रोड शो होईल आणि ते पुण्यातील राजभवनमध्ये मुक्काम करतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीये.... 

 

27 April 2024 08:13 AM

Loksabha Election 2024 Live Updates : राहुल गांधींची पुण्यात 3 मे रोजी सभा 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे. 3 मे रोजी राहुल यांची पुण्यात सभा होईल. महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ते प्रचार सभा घेणार आहेत. पुण्यातील SSPMS मैदानावर 3 मे रोजी राहुल यांची सभा असणार आहे. 

 

27 April 2024 08:12 AM

Loksabha Election 2024 Live Updates : प्रियंका गांधी शिवाजी काळगेंसाठी प्रचार मैदानात

उदगीरमध्ये आज प्रियंका गांधींचा दौरा आहे. दुपारी दोन वाजता त्या जाहीर सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगेंसाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्यात

 

27 April 2024 08:03 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या 2 सभा

शरद पवार आज सातारा दौ-यावर आहेत.. सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या दोन सभा आहेत.. दहीवडी इथे माढा उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटलांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता पवारांची सभा होतेय.. तर 3 वाजता पाटण इथे लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार सभा घेणार आहेत.. 

 

27 April 2024 08:02 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत सभा 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत सभा घेणार आहेत. सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 2 वाजता कडेगाव इथे ही सभा होणार आहे. संजयकाका पाटील यांची लढत मविआचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्याशी होणार आहे...त्यामुळे संजयकाका पाटलांसाठी फडणवीस मैदानात उतरलेयत...

 

27 April 2024 08:02 AM

Loksabha Election 2024 Live Updates :  कोल्हापुरात आज पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार

पंतप्रधान मोदींची तब्बल 10 वर्षांनंतर कोल्हापुरात तपोवन मैदानावर सभा होतेय.. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 5 वाजता ही सभा होतेय.. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभेमुळे महायुतीच्या प्रचारात रंगत येणार आहे.. मोदी विरुद्ध गादी अशा पद्धतीनं कोल्हापुरात प्रचार सुरु आहे. भाजपचा एकही खासदार आणि आमदार नसलेल्या जिल्ह्यात पंतप्रधान सभा घेत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढलाय.. 

 

Read More