Maharashtra APMC Election Live Updates : राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ( APMC Elections News)
चाळीसगाव मतदान केंद्राबाहेर दोन गटात राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार
Maharashtra APMC Election 2023 Updates : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर दोन गटात राडा झाला. दोन गटात वाद निर्माण झाल्याने मतदान केंद्राबाहेर नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मतदान केंद्रात मतदारांना सोडण्याच्या कारणावरुन दोन पॅनलमध्ये वाद झाल्याने राडा झाला.
Maharashtra APMC Election 2023 Updates : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात पहिल्या दोन तासांमध्ये 18.44 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असून पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदानाबाबत ऐनवेळी जीआर बदलल्याने मतदारांमध्ये संभ्रम
Maharashtra APMC Election 2023 Updates : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, एक विद्यमान आमदार तर दोन माजी आमदारांनी ताकद लावली आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील आठ बाजार समितीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. भाजप-शिंदे शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. मतदानाबाबत ऐनवेळी जीआर बदलल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे.
शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप
Maharashtra APMC Election 2023 Updates : जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याची आरोप करण्यात आला आहे. यानंतर जळगावात जोरदार राडा पाहायला मिळाला. जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याने तणाव वाढला आहे. या ठिणाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Maharashtra APMC Election 2023 Updates : जालना जिल्ह्यातल्या दोन बाजार समितींची निवडणूक होत असून परतूर आणि घनसावंगी बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात झाली. घनसावंगीत टोपेंविरोधात भाजप आणि उद्धव ठाकरेंचा गट तर घनसावंगीत एकूण 18 जागांसाठी मतदान तर परतूरमध्ये 7 जागांसाठी मतदान होत असून मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Maharashtra APMC Election 2023 Updates : आज यवतमाळ जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकपदासाठी 100 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत 637 उमेदवार आपले भाग्य आजमावित आहे. यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभूळगाव, वणी, पुसद, महागाव येथे दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत पालकमंत्री संजय राठोड यांना महाविकास आघाडीचे संजय देशमुख व माणिकराव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. राळेगाव मध्ये भाजपचे माजी मंत्री अशोक उईके व काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पुसद मध्ये नाईक परिवारात राष्ट्रवादीचेआमदार इंद्रनील नाईक व भाजपचे आमदार निलय नाईक तर यवतमाळमध्ये माजी मंत्री मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Maharashtra APMC Election 2023 Updates :मराठवाड्यातील महत्त्वाचे असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदानाला सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये अमित देशमुख विरुद्ध रमेश कराड यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदान केंद्रावर गोंधळ
Maharashtra APMC Election 2023 Updates : पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावर मतदारांचा गोंधळ घालत राडा केला. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बोगस मतदान होत असल्याचा उमेदवारांच्या तक्रारी आल्यानंतर काही उमेदवारांनी मतदान थांबवले. अनेक उमेदवारांचं मतदान मतदान केंद्रावर येण्याआधीच झाल्याचं उघड झाल्याने एकच गोंधळ उडाला.
Maharashtra APMC Election 2023 Updates : धुळे जिल्ह्यात चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. आज धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान..
धुळे -भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत
यापूर्वी भाजपाची एक जागा बिनविरोध
-महाविकास आघाडीची एक जागा बिनविरोध
-खासदार सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलमध्ये लढत
दोंडाईचा-आमदार जयकुमार रावल यांच्या पॅनलच्या विरोधात महाविकास आघाडीचे पॅनल
-भाजपच्या पॅनलच्या दोन जागा बिनविरोध निवड
-भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी नुकताच राजीनामा दिला असून त्यांचादेखील महाविकास आघाडीचा पहिला पाठिंबा
नंदूरबार जिल्ह्यातील सहा बाजार समितीच्या निवडणुका
1) नंदूरबार :- भाजप - शिंदे गट
मंत्री डॉ. विजयकुमार गावित vs शिवसेना संपर्क प्रमुख शिंदे गट चंद्रकांत रघुवंशी
2) शहादा :- भाजप - भाजप
डॉ. गावित vs भाजपाचे स्थानिक नेते
3) नवापूर :- काँग्रेस - भाजप
काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक vs जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित
4) अक्कलकुवा :- ठाकरे गट - काँग्रेस
ठाकरे गटाचे आमदार आमाशय पाडवी vs माजी मंत्री तथा आमदार के. सी. पाडवी
5) तळोदा :- बिनविरोध भाजप
6) धडगाव :- बिनविरोध शिंदे गट 7 काँग्रेस 7 भाजप 7
रायगड - अलिबाग तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तालुक्यात पहिल्यांदाच बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान घेण्याची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
एकूण 17 पैकी 5 जागांसाठी होणार मतदान
12 जागांवर शेकापचे उमेदवार बिनविरोध
5 जागांसाठी शेकाप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत
Maharashtra APMC Election Updates : राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ( APMC Elections News) राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. पालकमंत्री दादा भुसे विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे अशी अटीतटीची लढत असणार आहे. या निवडणुकीच अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नाशिकमध्ये मोठी चूरस
नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांसाठी आज सार्वत्रिक मतदान होत आहे. मालेगाव आणि नांदगाव बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी आहे. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे आणि महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत आहे. तर नांदगाव बाजारसमितीत विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे पाच माजी आमदार एकवटलेत. ही लढत लक्षवेधी मानली जातेय. देवळात यापूर्वीच 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर 10 जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी पॅनल मध्ये मोठी चुरस पाहायला मिळणारे. पंचवार्षिक संचालक मंडळाच्या 14 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मविआ विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. पुण्यातील जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीने पक्षातून हकालपट्टी केल्यानं अनेकजण इतर पक्षांतून निवडणूक लढवतायत.. मात्र फक्त आपल्यावरच कारवाई का असा प्रश्न दांगट यांनी उपस्थित केलाय.
रायगड जिल्ह्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध
रायगड जिल्ह्यातील 9 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, त्यांच्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या 99 पैकी 88 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. जिल्ह्यात उर्वरित चार बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. यवतमाळमध्ये आज 7 APMC साठी मतदान होणार आहे. तर उर्वरित 8 APMCसाठी 30 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत 637 उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची 2 टप्प्यांत निवडणूक होणार आहे. अमरावती, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, अंजनगाव सुर्जी आणि मोर्शी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होईल. धुळे जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडत असून, मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वाटप पूर्ण झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्यात. आज धुळे आणि दोंडाईचासाठी तर रविवारी शिरपूर आणि साक्री बाजार समितीसाठी मतदान होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 6 बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत. यापैकी 3 बिनविरोध झाल्यात. तर नंदुरबार, शहादा आणि नवापूर बाजारसमितीच्या मतदान प्रक्रियेसाठी साहित्य वाटप करण्यात आलंय. 108 जागांसाठी 10 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.