Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra APMC Election LIVE Updates today : मनमाड बाजार समिती निवडणुकीत हाईवोल्टेज ड्रामा

Maharashtra APMC Election Live Updates : बाजार समित्या निवडणूक निकालात मविआची सरशी...145 पैकी 69 समित्या मविआकडे तर भाजप-शिंदे गटाकडे 39 बाजार समित्या...आज 100 हून अधिक बाजार समित्यांसाठी मतदान..

Maharashtra APMC Election LIVE Updates today :  मनमाड बाजार समिती निवडणुकीत हाईवोल्टेज ड्रामा
LIVE Blog

Maharashtra APMC Election Live Updates : नाशिकच्या नांदगाव बाजार समितीवर विजयाचा गुलाल कोण उधाळणार याचा निकाल आज संध्याकाळी लागणार आहे.. नांदगावसाठी 98.50 टक्के मतदान झालंय.. विद्यमान आमदार सुहास कांदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांनी कांदेंसमोर आव्हान उभं केल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.

30 April 2023
30 April 2023 12:09 PM

Maharashtra APMC Election LIVE Updates today : बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुमीचे घमासान पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मतदान प्रक्रिया सुरू आहे, यावेळी रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथील सरपंच राहुल डोंगरे या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदानाचे महत्व पटवून दिले. मतदानाचा हक्क बजावत असतांना यावेळी नवरदेव राहुल डोंगरे यांनी आधी लगीन कोढाण्याचं मग लगीन रायबाचं असं मत व्यक्त केलं.

30 April 2023 10:20 AM

APMC Election Live Updates : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 41 उमेदवार रिंगणात असून 787 मतदार आहेत. मनमाड - येवला रोडवरील ' संत झेवियर हायस्कूल ' मध्ये मुख्य मतदान केंद्र आहे. शिवसेना (शिंदे गट) विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरुद्ध तालुक्यातील पाच माजी आमदार, महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे. 

30 April 2023 10:17 AM

APMC Election Live Updates : नागपूर जिल्ह्यातील मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान होणार असून 35 उमेदवार रिंगणात आहेत. मौदा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाने हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक आक्रमक होणार आहे. 

30 April 2023 08:52 AM

Maharashtra APMC Election LIVE Updates today : मनमाड बाजार समिती निवडणुकीत हाईवोल्टेज ड्रामा

मनमाड बाजार समितीची निवडणूक आज पार पाडत असून आपलं मतदान दुसरीकडे जाऊ नये म्हणून शिर्डीतील विविध हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे 400 मतदार मुक्कामी थांबले आहेत. शिर्डीच्या हॉटेल थ्रि जी येथेही महाविकास आघाडीचे उमेदवार आणि 160 मतदार थांबले होते. मात्र शनिवारी रात्री 11च्या सुमारास मनमाड पोलिसांचे पथक या हॉटेलवर पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी उमेदवारांना हॉटेलच्या रूममधून बाहेर काढत त्यांची चौकशी केली. यावेळी सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केला आहे. या गोंधळानंतर पोलिसांचा हॉटेलमधून काढता पाय घेतला. मनमाड बाजार समितीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची लढत होत आहे.

30 April 2023 08:37 AM

APMC Election Live Updates : आज अमरावती जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्याच्या 6 बाजार समितीची निवडणूक होत आहे. धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, वरुड, दर्यापूर,अचलपूर आणि धारणीचा ही निवडणूक होणार आहे. चांदुर बाजार आणि अचलपूर बाजार समितीमध्ये आमदार बच्चू कडू यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही ठिकाणाहून बच्चू कडू यांनी स्वतःच पॅनल उभं केलं आहे. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी पॅनल उभं केलं आहे. वरुडमध्ये भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे आणि धामणगाव रेल्वेमध्ये भाजप आमदार प्रताप अडसड यांची प्रतिष्ठा पणाला आहे. 

30 April 2023 08:30 AM

Maharashtra APMC Election Live Updates : यवतमाळमध्ये दारव्हा एपीएमसीमध्ये मतदार डांबल्याच्या आरोपातून दोन गटात राडा झाला...महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते आमनेसामने आलेत..निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर काही मतदारांना भक्तनिवासात डांबल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलंय..

30 April 2023 08:29 AM

Maharashtra APMC Election Live Updates : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीसाठी 7 जागा आधीच बिनविरोध झाल्या असून 11 जागांसाठी मतमोजणी केली जाणार आहे. कोल्हापुरात दुरंगी लढत पाहायला मिळतेय.. सध्याचे सत्ताधारी हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सतेज पाटील याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर त्यांना विरोधी शिवशाही शेतकरी विकास परिवर्तन आघाडीनं आव्हान दिलंय. या आघाडीत भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा समावेश आहे.. 

Read More