Maharashtra HSC 12th Result 2023 LIVE: फेब्रुवारी महिन्याअखेरीपासून मार्च महिन्यापर्यंत सुरु असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (HSC and SSC) मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षांचे निकाल (12th Result Today) गुरुवारी (आज) जाहीर होणार आहेत. बुधवारीच शिक्षण मंडळाकडून यासंदर्भातील माहिती देत 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आणि त्या क्षणापासून परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची धाकधूक वाढली.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल 0 टक्के लागला असून यंदाच्या वर्षी निकालाचा टक्का घसरल्याची बाब लक्षात येत आहे.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीच्या परीक्षेला 2023 या वर्षात 6113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ज्यातून 5673 दीव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावी परीक्षांमध्ये घेण्यात आलेल्या 154 विषयांच्या परिक्षेत 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: यंदाच्या वर्षी राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा निकाल दोन टक्क्यांनी घटला. जिथं एकूण 14 हजार 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 120 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: निकाल पाहण्यासाठी Follow करा या सोप्या Steps
- सर्वप्रथम शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर होमपेजवर Maharashtra HSC Result 2023 वर किंवा त्या लिंकवर क्लिक करा.
- नव्यानं सुरु झालेल्या टॅबमध्ये आवश्य माहितीचा तपशील भरा. जिथं हॉलतिकिट क्रमांक, जन्मतारीख विचारली जाईल.
- आता Submit या पर्यायावर क्लिक करा. जिथून पुढे तुम्हाला बारावीच्या निकालाचीच स्क्रीन दिसेल.
- आता हा निकाल Download करून त्याची Print काढा.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे
- पुणे - 93.34 %
- कोकण 96.01 %
- मुबंई 88.13 %
- अमरावती 92.75 %
- नागपूर 90.35 %
- लातूर 90.37 %
- नाशिक 91.66 %
- छत्रपती संभाजीनगर 91.85 %
-कोल्हापूर 93.28 %
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: राज्यातून 9 विभागांपैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, या निकालाची टक्केवारी 96.01 टक्के इतकी आहे. तर, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. मुंबई विभागाचा निकाल अवघा 88.13 टक्के इतकाच लागला.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: यंदाच्या वर्षी बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी. मुलींचा एकूण निकाल 93.73 टक्के लागला असून, मुलांची टक्केवारी 89.14 टक्के इतकी आहे.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये झालेल्या या परीक्षेत 9 विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण या शाखांतील एकूण 14 लाखांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी 12 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: यंदाची बारावीची परीक्षा 154 विषयांसाठी घेण्यात आली. यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण या प्रमुख शाखा होत्या. मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी अशा भाषांमध्ये ही परीक्षा पार पडल्याचं शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या दोन परीक्षेत श्रेणी सुधाराची संधीही मिळेल. ज्यासाठी 29 मे पासून अर्ज भरता येईल.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी विद्यार्थ्यांनी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करणं अपेक्षित असेल.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 14 जून असून, विद्यार्थ्यांना 5 जूननंतर महाविद्यालयांमध्ये Marksheet घेता येणार आहे.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 26 मे पासून अर्ज करता येणार आहे. 5 जूनपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक किंवा त्यांच्या ओळखीतील कोणीही व्यक्ती mahresult.nic.in
http://hsc.mahresult.org.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in या संकेतस्थळांना भेट देऊ शकते.
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यावी लागणार आहे. जिथं त्यांना प्रत्येक विषयाचे गुण पाहता येतील. या माहितीची प्रिंटही त्यांना घेता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा, अर्थात बारावीचा निकाल उद्या म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार. #HSCResult #Maharashtra @msbshse @DDNewslive pic.twitter.com/LNnxe9nmrL
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 24, 2023
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी निकाल काही दिवस आधीच लागत असल्यामुळं विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि त्यांच्या मनातील भीतीनं परमोच्च शिखर गाठलं आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.