Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Board 10th SSC Result LIVE: दहावीचा निकाल जाहीर; Result ची एकूण टक्केवारी पाहा एका क्लिकवर

 महाराष्ट्र बोर्ड एसएससी रिझल्ट लाइव्ह अपडेट (Maharashtra Board 10th SSC Result Live Updates): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे निकाल थोड्याच वेळात...   

Maharashtra Board 10th SSC Result LIVE: दहावीचा निकाल जाहीर; Result ची एकूण टक्केवारी पाहा एका क्लिकवर
LIVE Blog

 महाराष्ट्र बोर्ड एसएससी 10th रिझल्ट लाइव्ह अपडेट, Maharashtra Board 10th SSC Result Live Updates: शालेय जीवनातील टप्पा पूर्ण करून महाविद्यालयीन जीवनाच्या दिशेनं जाणाऱ्यासाठीची पहिली पायरी, अर्थात इयत्ता दहावीचा निकाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला आहे. 

निकाल पाहण्यासाठीची संकेतस्थळं खालीलप्रमाणे...

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

13 May 2025
13 May 2025 14:39 PM

दहावी नापास ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते; नागराज मंजुळेंची मार्कशिट पाहिलीत का?

13 May 2025 13:52 PM

दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर 

बोर्डाच्या वतीनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून आता ऑनलाईन पद्धतीनंसुद्धा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बैठक क्रमांक आणि आईचं नाव असा तपशील भरून अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येऊ शकतो. 

 

13 May 2025 13:38 PM
13 May 2025 13:08 PM

मुलींनी मारली बाजी 

यंदाच्या दहावी निकालात मुलींनीच बाजी मारली असून, परीक्षेतील उत्तीर्ण मुलींची टक्केवारी  96.14, तर मुलांची 92.31 टक्के इतकी आहे. यंदा राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले. तर, संपूर्ण राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के इतके गुण मिळाले. 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना 75 टक्के आणि त्याहून जास्त गुण मिळाले. 

 

13 May 2025 13:05 PM

यंदाही राज्यात लातूर पॅटर्न...

100 टक्के मिळालेले विद्यार्थी 211
 पुणे -13
नागपूर-3
संभाजीनगर-40
मुंबई-8
कोल्हापूर-12
अमरावती-11
नाशिक-2
लातूर-113
कोकण-9

 

13 May 2025 12:17 PM

दहावीच्या परीक्षेतील एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या... 

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

वरीलपैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

13 May 2025 12:09 PM

49 शाळांमध्ये शून्य टक्के निकाल 

पुणे -7
नागपूर-8
संभाजीनगर-9
मुंबई-
कोल्हापूर-1
अमरावती-4
नाशिक-4
लातूर-10
कोकण

13 May 2025 12:08 PM

7924 शाळांमध्ये 100 टक्के निकाल 

पुणे -1311
नागपूर-736
संभाजीनगर-678
मुंबई-1579
कोल्हापूर-1114
अमरावती-789
नाशिक-776
लातूर-446
कोकण-486

13 May 2025 11:58 AM

SSC Result 2025 Latest Updates : दहावीचा निकाल 10 मुद्द्यांमध्ये; कुठे आणि कसे पाहाल गुण? एका क्लिकवर सर्व महत्त्वाची माहिती 

13 May 2025 11:40 AM

दहावीचा निकाल जाहीर; Result ची एकूण टक्केवारी पाहा... 

दहावीचा एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर. यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला असून कोकण विभागानं मारली बाजी. कोकण विभागाचा एकूण निकाल 98.82 टक्के. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी. 

13 May 2025 11:28 AM

यंदा 200 हून अधिक विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क 

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून एकूण 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के पडलेले गुण मिळाले. 

13 May 2025 11:24 AM

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण... 

fallbacks

13 May 2025 11:19 AM

दहावीचा निकाल विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे

मागील वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 1.71 टक्क्यांनी घटली असं सांगत बोर्डाच्या अध्यक्षांकडून विभागनिहाय टक्केवारी जाहीर 

नागपूर विभाग सर्वात कमी 90.78 टक्के
पुणे विभाग 94.81 टक्के
छ. संभाजीनगर 92.82
मुंबई 95.84 टक्के
कोल्हापूर 96.87
अमरावती 92.95
नाशिक 93.04
लातूर 92.77

13 May 2025 11:08 AM

गुणपत्रिकेची प्रत विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार? 

13 मे 2025 रोजी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन निकालाची प्रिंट काढता येणार आहे. ज्यानंतर प्रत्यक्ष गुणपत्रिका विद्यार्थ्यांना शाळांमधूनच देण्यात येतील. येत्या काही दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल.

 

13 May 2025 10:59 AM

कटऑफ वाढणार? अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस 

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांना चिंता असते ती म्हणजे महाविद्यालयीन प्रवेशाची. मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास कटऑफची आकडेवारी 93 ते 94 टक्क्यांवर पोहोचल्यानं चांगले गुण मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यामुळं यंदाही हीच स्थिती असल्याच महाविद्यावलयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते. 

 

13 May 2025 10:45 AM

दहावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहावा? पाहा सोप्या स्टेप्स 

- सर्वप्रथम दहावीच्या निकालासाठी  mahresult.nic.in, sscresult.mkcl.org किंवा sscresult.mahahsscboard.in अशा कोणत्याही संकेतस्थळाला भेट द्या. 
- तिथं  ‘Maharashtra SSC 10th Result 2025’ वर क्लिक करा. 
- आता समोर दिसणाऱ्या रकान्यांमध्ये बैठक क्रमांक, आईचं नाव असा तपशील भरा. 
- सेवटी सबमिट या बटणावर क्लिक करा आणि पाहा तुमचा दहावीचा निकाल. 

13 May 2025 10:42 AM

मागील पाच वर्षांमधीय दहावीच्या निकालाचा आढावा 

गेल्या पाच वर्षांमध्ये कसा होता इयत्ता दहावीचा निकाल? पाहा वर्ष आणि टक्केवारी 

2024: 95.81
2023: 93.83
2022: 96.94
2021: 99.95
2020: 95.3

13 May 2025 10:15 AM

कोणकोणत्या शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा?

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी- मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी यंदा, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कोकण अशा शिक्षण मंडळांतून जवळपास 16 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ज्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. 

 

13 May 2025 08:55 AM

निकालाच्या पुनर्मुल्यांकनासाठीची प्रक्रिया काय? 

निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मुल्यांकनासाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार असून,तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळवणं अनिवार्य असेल. फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा पुनर्मुल्यांकनासाठीचा अर्ज निकालानंतरच्या पाच कार्यालयीन दिवसांच्या आत निर्धारित शुल्कासह पाठवावा. 

 

13 May 2025 08:21 AM

नागपूर विभागातून किती विद्यार्थ्यांनी दिली होती दहावीची परीक्षा? 

नागपूर विभागात 679 केंद्रावर एक लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये सर्वाधिक 58 हजार 495 विद्यार्थ्यांनी नागपूर जिल्ह्यातून परीक्षा दिली. तर भंडारा  जिल्ह्यातून 15 हजार 463 , चंद्रपूर 28 हजार 120, वर्धा 16 हजार 177, गडचिरोली 14 हजार 532, गोंदिया 18 हजार 592 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

13 May 2025 08:19 AM

इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी

एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पञकार परिषद घेऊन हा निकाल जाहिर करतील. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना हा निकाल पाहता येईल. 

 

13 May 2025 08:04 AM

दहावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येणार?

- mahahsscboard.in
-mahresult.nic.in

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 
 

13 May 2025 08:03 AM

किती वाजता जाहीर होणार निकाल? 

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बोर्डाची परिक्षा होणार असून, दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यांचे गुण पाहता येणार आहेत. 

 

Read More