Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये सत्ताराकरणाची सुरू असणारी समीकरणं पाहता सधत्या त्याचीच चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी आता आणखी कोणता नवा खुलासा होणार याकडेही सर्वांचच लक्ष असून याशिवाय राज्यात आणखी काय घडणार त्याबाबतच्या सर्व Live अपडेट्स एका क्लिकवर
RCB vs PBKS : IPL 2025 फायनल पावसामुळे रद्द झाली तर कोणता संघ ठरणार विजेता? जाणून घ्या नियम RCBvsPBKS IPL2025 cricket MarathiNews IPL2025Final https://t.co/ScqycETh0k
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
IPL 2025 फायनल दरम्यान पावसाचं सावट, RCB vs PBKS मॅचवेळी कसं असणार हवामान? पाहा Weather Reporthttps://t.co/JkhWD8UZWa IPL2025 IPL2025Final RCBvsPBKS marathinews
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो -1 चा दरवाज उघडा राहिला असल्याचं मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आलं..डीएन नगर ते वर्सोवा प्रवासादरम्यान मेट्रोचा दरवाजा अंशतः उघडा राहिला असल्याचं मेट्रोकडून सांगण्यात आलंय.. बिघाड लक्षात येताच मेट्रो तत्काळ थांबून ते मेट्रो सेवेतून थांबवण्यात आल्याचं मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आलंय. दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे, डीएन नगर ते वर्सोवा (१ स्टेशन) प्रवासादरम्यान दरवाजा अंशतः उघडा राहिला. बिघाड लक्षात येताच, ट्रेन तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलंय.
उद्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.रायगड पालकमंत्रीपद, निधी वाटप, महामंडळ पद वाटप, आणि इतर राजकिय मुद्द्यावर एकनाथ शिंदे सहकारी आमदारांसोबत चर्चा करणार आहेत.
पेंग्विनच्या नामकरणावरून वाद, पेग्विंनच्या पिल्लांना मराठी नावं द्या भाजपची मागणी marathinews mumbainews zee24taas penguinhttps://t.co/3nk27ca5P4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
RCB संघाचा खरा मालक कोण? एका मॅचमधून किती पैसे कमावतात? आकडा ऐकून थक्क व्हाल RCBVSPBKS RCB IPL2025 iplfinal2025 ViratKohli https://t.co/HXJ9d9kxzh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
मायलेकीच्या आक्रोशाने रेल्वे स्थानक हादरलं पण घरचा कर्ता जगात नव्हता..बायकोशी भांडण आणि पुढच्या क्षणात...#GondiaSucidehttps://t.co/NkrBszTXyz
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
देशामध्ये घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाल्यामुळे एटीएसने पडला जवळील बोरिवली येथील साकिब नाचणच्या घरावर छापा टाकला. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत तलवार, सुरा आणि मोबाईल जप्त करण्यात आला. दहशतवादाला प्रेरणा देणाऱ्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील सायबर फसवणूक प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित तुषार वाजंत्री याला पनवेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉड्रिंगप्रकरणी अटक होईल, अशी भीती दाखवून 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केली. वाजंत्री हा बांधकाम व्यावसायिक असून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा निकटवर्तीय आहे. त्याची पत्नी पक्षाची कार्यकर्ती आणि गावची सरपंच आहे.
ब्लॅकमेल करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपीला अशी शिक्षा सुनावली की...'#RapeCase https://t.co/U4ciTuqQ36
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
मॅक्सवेल पाठोपाठ 'या' दिग्गज क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती henrichklassen MarathiNews Cricket https://t.co/KAYe30bzqs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
क्वालिफायर 2 मधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सवर भडकले रोहितचे फॅन्स, ट्रोल होतोय हार्दिक पंड्या HardikPandya IPL2025 Cricket MumbaiIndians RohitSharma https://t.co/y6E301LA97
— ZEE २४ तास (zee24taasnews) June 2, 2025
'खुर्ची' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दिग्दर्शकावर अन्याय झाल्याचा आरोप स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप करत संतोष हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप केला.
पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याला पुणे गुन्हे शाखेचे पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपासाठी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती.या आधी त्याला 2 जून पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. मात्र आज पुन्हा झालेल्या सुनावणीत आणखीन दोन दिवस म्हणजे 4 जून पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आलंय. रुग्णालय उद्घाटन प्रसंगी उपनेते सुधाकर बडगुजर भेटायला भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संजय राऊत मानहानीप्रकरणी नितेश राणेंना दिलासा; अटी शर्तींसह जामीन मंजूर. माझगाव कोर्टाकडून नितेश राणेंना जामीन. पुढील सुनावणी 26 जूनला होणार. संजय राऊत यांनी नितेश राणे विरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मत्स्य विकास मंत्री नितेश राणे विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. राणे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. तथापि, मागील सुनावणीच्या वेळी राणे हे न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे, माझगाव न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढले होते.
आयआयटी कानपूरने जेईई अॅडव्हान्स २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आज २ जून रोजी निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. रजित गुप्ताने अखिल भारतीय प्रथम क्रमांक मिळवून देशभरातील जेईई अॅडव्हान्स परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे.
कोण आहे रजित गुप्ता? JEE Mains मध्ये 100 परसेट्स अन् ऍडव्हान्समध्ये टॉपhttps://t.co/KI0BJJQZs3#RajitGupta #jeeadvanced #JEEAdvance
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
वैष्णवी हगवणे घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगलीतल्या मराठा समाजाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.यापुढे हुंडा आणि लग्नातल्या अनिष्ट प्रकार मोडीत काढण्याचा निर्धार मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.मराठा समाजाने लग्नासाठी हुंडा देणे किंवा घेणे,ही प्रथा बंद करण्याबरोबर लग्न सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मराठा समाजाची बैठक सांगलीमध्ये पार पडली या बैठकीमध्ये हगवणे कुटुंबांचा निषेध नोंदवत मराठा समाजाने आता लग्न,अंतेष्टविधी आणि वास्तूशांती मोजक्या लोकांमध्ये आणि कमी खर्चात करण्याचा आवाहन मराठा समाजाला करण्यात आला आहे,त्याचबरोबर सांगली मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून या गोष्टीची सुरुवात करण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
सोन्याचे दर आज पुन्हा वाढले, चांदीची चमकही वाढली; वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव#goldrate https://t.co/SuHWhb6Rhr
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
मोठी बातमी! रायगडावरील उत्खननात सापडलं गूढ यंत्र; उलगडणार अनेक शिवकालीन रहस्यंhttps://t.co/tVroamkQSU < येथे वाचा सविस्तर वृत्त...#maharashtra #raigad #raigadfort #fort #maharashtra #MaharashtraNews #shivaji #shivajimaharaj
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
Chandrapur Tiger Fear | कधी थांबणार मानव-वन्यजीवन संघर्ष? विदर्भात वाघांची 'दहशत'; झी 24 तास रिपोर्ट#chandrapur #tiger #tigerfear #Zee24Taas #marathinews pic.twitter.com/uErL9aZQxe
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
रात्रीच्या वेळी रस्त्यात स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकले म्हणून बारामतीत एका पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.या घटनेत बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गंभीर जखमी झाला आहे. संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ही दखल करण्यात आला आहे.जखमी पोलीस हवालदार कांबळे यांना बारामती मधील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचार कमी दाखल करण्यात आणि असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान कडे जाणाऱ्या रस्त्यावर 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सध्या राजच्यात लूट सुरू आहे असं म्हणत महापालिका लुटल्या जात आहेत असा जळजळीत आरोप केला. 3 वर्षांपासून निवडणुका तुम्ही घेत नाही ही कसली लोकशाही? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी लाडकी बहीण योजनेमध्ये नावात बदल करून, माहितीचा तपशील बदलून कोट्यवधी रुपये लुटले गेल्याची बाब समोर आणत अर्थ खात्यातुन हे पैसे गेल्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.
बापरे! मोठाले वृक्ष हेलकावे खाणार; ताशी 70 किमी वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा मारा; 'ही' 20 राज्यं धोक्यात https://t.co/SDpaWXd6AJ
बापरे! मोठाले वृक्ष हेलकावे खाणार; ताशी 70 किमी वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा मारा; 'ही' 20 राज्यं धोक्यात #news #weather #india— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
मोठी बातमी! पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी, अनेक अर्जदार अपात्र ठरणार!https://t.co/CHCsPZfkBa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. 75 वर्षीय संबंधित महिलेवर गेल्या चार दिवसापासून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार सुरू होते... नव्याने सुरू झालेला कोरोनाचा कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.. संबंधित महिलेला कोरोनाचे लक्षण दिसू लागल्याने छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले होते.
अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य. सीबीएसई संलग्न शाळांचा 5 जूनऐवजी 11, 16 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय. सीबीएसईशी संलग्न शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस त्यांच्या सोयीने ठरविला आहे. एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत.तर काही शाळांनी त्यांचा निर्णय बदलला असून, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्राण्यांची तस्करी होत असल्याचे पुढे येत आहे.अश्याच एका प्रकरणात सीमा शुल्क विभागाने. 44 इंडोनेशिया पिट वायपर सापांसह कासवं जप्त केलीत.सीमा शुल्क विभागाला खबऱ्याकडू. माहिती मिळाली होती त्या आधारे आपला रचून ही कारवाही केली. 44 इंडोनेशियन पिट वायपर, ५ आशियाई लिफ् टर्टल जातीची कासव आणि 3 स्पायडर टेल्ड हॉर्नड वायपर विमानतळावरून जप्त करण्यात आलेत.
दीड वर्षाचं प्लानिंग करत युक्रेनचा रशियावर भेदक ड्रोन हल्ला; चित्रपटातील वॉर सिक्वेन्सप्रमाणं Operation Spider Ukraineचा व्हिडीओ समोर https://t.co/xfgK9uwaMU
युक्रेनच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यानं रशियात हाहाकार; 117 ड्रोन अन् दीड वर्षाचं प्लानिंग, कोणी रचला हल्ल्याचा कट?…— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील मुख्य आंबेडकर चौकातील मार्गावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार दुकानांचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही दुकानांमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाली असूनही चोरटे अद्याप मोकाट असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला व वरठी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. अखेर डॉग स्कॉट बोलवून तपास सुरू करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.
करमाळयात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतोय म्हणून गाडीवर अतुल खूपसे यांनी लिहिला वेगळा मजकूर.
'तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा, अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलय' गाडीवर हा मजकूर लिहिला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न्स, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन?https://t.co/i2FF2lMZRA#Maharashtra #Corona #CoronaVirus
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
भिवंडीत -पडघामध्य़े एटीएस पथकाने मोठी कारवाई केलीय. 22 जणांच्या पथकाची कारवाई. दहशतवाद्यांसंदर्भात एटीएसने छापे टाकलेत. एटीएसनं काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती. साकीब नाचनच्या घरावर छापा.
तुळजाभवानी मंदीरात अनधिकृतपणे पुजेचे साहीत्य विक्री करताना 21 पुजेचे ताट व फळांचे कॅरेट जप्त केले आहे.तुळजाभवानी मंदीरात भाविकांच्या श्रध्देचा फायदा घेत काही अनाधिकृत विक्रेते मंदीर परीसरात नियमबाह्य पध्दतीने पुजेसाठी लागणारे ओटीचे साहीत्य विक्री करत असताना मंदीर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने छापा टाकत कारवाई केलीय.मंदीर संस्थानच्या वतीने अचानक केलेल्या कारवाईमुळे मंदीरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावले टाकण्यास राज्य निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली असून, राज्य सरकारकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन मे महिन्यात 16.4 टक्क्यांनी वाढून 2.01 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. रविवारी जाहीर सरकारी आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली. यापूर्वी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 2.37 लाख कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचले होते.
देशांतर्गत व्यवहारांमधून एकूण जीएसटी उत्पन्न 13.7 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.50 लाख कोटी रुपये झाले, तर आयातीमधून जीएसटी संकलन 25.2 टक्क्यांनी वाढून 51266 कोटी रुपये झाले.
मान्सून मोठ्या सुट्टीवर; कोकणापासून विदर्भापर्यंत कसं असेल हवामान? शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी महत्त्वाचा इशारा https://t.co/97blMR75rN
दणक्यात एंट्री करणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीच्या वाटेत अडथळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त... #Maharashtra #weathernews #news— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2025
संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या श्रींची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पायी वारीसाठी रवाना होत आहे. या 56 व्या वर्षी आयोजित पायी वारीत लाखो भाविक, संत गजानन महाराज आणि पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई यांच्या भक्तीने भारावून शेगाव ते पंढरपूर असा पवित्र प्रवास करणार आहेत. आज, 2 जून 2025 रोजी श्रींची पालखी शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. शेगाव येथून सुरू होणारी ही पालखी विविध गावांमध्ये मुक्काम करत 4 जुलै 2025 रोजी पंढरपूर येथे पोहोचेल. 4 जुलै ते 9 जुलै 2025 दरम्यान पालखी पंढरपूर येथे मुक्काम करेल, जिथे भाविक विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाचा लाभ घेतील. संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांनी वारीसाठी काटेकोर नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी निवास, भोजन, आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील गावकऱ्यांचा उत्साह आणि स्वागत या वारीला आणखी रंगत आणतात.
मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त गोगावले समर्थकांनी खासदार सुनील तटकरे यांना डिवचले. खासदार तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती. त्याच मैदानावर कार्यक्रम घेऊन नॅपकिनचे वाटप करून सुनील तटकरे यांना उत्तर दिलंय. यावर सकाळी सुनिल तटकरे किंवा आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया मिळवा.
नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास आता 5 जूनपासून करणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथील सोहळ्यात लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने 701 किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला झाला आहे. उर्वरित शेवटचा टप्पा आता 5 जूनला सुरू होणार आहे.
आगामी निवडणुकीत रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही, तर भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवू, असं विधान शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय. त्यामुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुनील तटकरेंना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. कुणाच्या अंगावर जायचं नाही. कुणी अंगावर आलं की सोडायचं नाही, असा रायगडच्या मातीचा स्वभाव आहे. असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलंय.. त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झालीये.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.