Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 11: मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
वसई-विरारमध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना आता राज्य सरकारकडून मोठा दणका बसणारेय. गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरांच्या नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही, इतकेच नव्हे तर त्यांच्या इतर मालमत्तांवरही बोजा चढवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. भाजपच्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत वसई-विरारमधील बिल्डरांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आणले होते. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात यावर उत्तर देताना फसवणूक केलेल्या बिल्डरांना आता धडा शिकवला जाईल असं उत्तर दिलंय.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयसिस पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणात वॉंटेड असलेला आणखी एक प्रमुख कट रचणाऱ्याला अटक केली आहे. रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मोला हा या प्रकरणात अटक झालेला 11 वा आरोपी आहे आणि त्याला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस होते. एनआयएच्या विशेष न्यायालयाने रिझवानविरुद्ध स्थायी अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) देखील जारी केले होते. जो नियुक्त परदेशी दहशतवादी संघटना, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) च्या दहशतवादी कारवायांना चिथावणी देण्यात सक्रियपणे सहभागी होता.
जिल्हा परिषदेच्या शाळेत जपानी, जर्मन भाषेचे धडे...अंदरसुलच्या मुली बोलतात जपानी आणि जर्मन भाषा..छगन भुजबळांनीही केलं शाळेचं कौतुक
खंडाळा मंकीहिल येथे मालगाडी रुळावरून घसरली होती. मात्र, तातडीनं दुरुस्ती करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मुंबईकडे येणाऱ्या ज्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या त्या रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्ववत झाल्या आहेत.
पैशांच्या कथित बॅगचा तो व्हिडिओ घरात आलेल्या जवळच्या व्यक्तीनं काढल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केलाय. 'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हा आरोप केलाय. थेट बेडरुममध्ये आलेल्या व्यक्तीनंच घात केल्याचा संशय संजय शिरसाटांनी व्यक्त केलाय. त्यामुळं पुढच्या काळात घराच्या बेडरुमपर्यंत कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा की नाही याबाबत विचार करावा लागेल असंही शिरसाट म्हणालेत. शिरसाटांशी गद्दारी करणारा तो जवळचा माणूस कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.
पाकिस्तानी अभिनेत्रीचा 20 दिवस नव्हे तर 9 महिन्यांपूर्वीच झाला मृत्यू; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा#humairaasghar #entertainmentnews #entertainmentnewshttps://t.co/28IaRSZdm0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2025
'भारतात झालेल्या नुकसानाचा...', ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत अजित डोवाल यांचं जाहीर आव्हान, 'पाकिस्तानने...'https://t.co/Q0GK11xq1V#AjitDoval #OperationSindoor
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2025
'मी कपडे काढून, बेडवर...', संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' बेडरुम व्हिडीओमागचं सत्य; 'कपाटात पैसे...'https://t.co/ssEtt4GF1X#Shivsena #EknathShinde #SanjaySirsat #SanjayRaut
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2025
'आधी केस कापून यायचं...,' बारावीच्या 2 विद्यार्थ्यांनी थेट मुख्याध्यापकांनाच संपवलंhttps://t.co/U5ySkD2PD0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2025
विधानभवनात दुधातील भेसळीचा डेमो दाखवत पंचनामा केला. दूध भेसळीविरोधात कडक कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तर भेसळ थांबून, शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
अंतराळात होणार महाभयंकर स्फोट; NASA च्या Hubble दुर्बिणीत दिसलं अविश्वसनीय दृश्य https://t.co/CXvzQfT6GZ
नासाच्या दुर्बिणीमुळं समोर आलीय हैराण करणारी बाब. दुर्बिणीत टीपलेल्या दृश्यात नेमकं काय दिसलं? #nasa #space #news— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2025
जळगावच्या न्यायालयात साक्ष सुरू असतानाच आरोपीच्या डोक्यात पडला पंखा https://t.co/G9JI95jv2Z
— ZEE २४ तास (zee24taasnews) July 11, 2025
अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच रखडलेले काम तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे. काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच ठेकेदार हे काम सोडून जात असल्याने या महामार्गाचा प्रश्न सुटलेला नाही. दरम्यान यावर्षी या महामार्गाची नव्याने निविदा काढून महामार्गाच्या प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश काढून अडीच महिने उलटले आहेत तरी देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. त्यासाठी मंदिर कमिटी या संदर्भातील विचार करतेय. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालण्यावर बंदी घातली जाणार आहे. संस्कृती जपणारे कपडे घाला या संदर्भातील देखिल निर्णय़ लवकर अपेक्षित आहे. दरवर्षी लाखो भाविक गणपतीपुळ्यात गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवळात ड्रेसकोड लागू झालाय. आता या देवळा प्रमाणे आता गणपतीपुळे मंदिराची सुद्धा यात भर पडणार आहे. काल गणपतीपुळे मंदिर कमिटीची सायंकाळी बैठक झाली. यात ड्रेस कोडचा निर्णय अपेक्षित होता. मात्र या कमिटीच्या बैठकित याबाबतचा निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे कमिटी या संदर्भात निर्णय़ घेण्यासाठी लवकरच आणखी एक बैठक घेणार आहे. ड्रेसकोड बाबात गणपती आधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे.
दिवसो न दिवस डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे त्यातच संभाजी नगरच्या एक वृद्ध दाम्पत्याला अटकेची भीती दाखवत 78 लाख 60 हजारांचा गंडा घातलाय धक्कादायक म्हणजे या वृद्धास एकाने विश्वास नांगरे पाटील बोलतोय मी तुम्हाला मदत करेल असे सांगून विश्वास संपादन करून गंडा घातला.
अहमदाबाद विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपासात आतापर्यंत बोईंग 787 ड्रीमलायनर विमानात कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नाही. वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात असा दावा केला आहे.
नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहातून 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहे. जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कुटुंब राहत या कुटुंबातील सोळा वर्षाच्या मुलीला एका तरुणाने 16 जूनला फूस लावून पळून नेण्याची घटना घडली होती.
संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार आली तर कारवाई करण्यात येईल असे योगेश कदम म्हणाले. अजून तक्रार आलेली नाही. फिर्यादी कोणी नसल्याने कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले.
खासदार संदीपान भुमरे यांना विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाने मिळाले. सकाळी अर्ज केला, दुपारी बैठक झाली आणि संध्याकाळी पुढली सारी प्रोसेस अतिशय सुपर-डुपर फास्ट पार पडली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी आज विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार भुमरेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली.
ठाकरे बंधूंच्या संभांव्य युतीचे दिल्लीत पडसाद; अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेचा तपशील समोर https://t.co/bnh4FiBaWp
CM फडणवीस इथं लोकार्पणाच्या कार्यक्रमांना हजर असतानाच
शिंदे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं? #news…— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2025
शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चॉकलेट व बिस्किटामध्ये आळ्या आढळल्याचा संतजनक प्रकार धाराशिव मध्ये पुढे आला आहे. एक ना दोन तब्बल पाच शाळांमध्ये पोषण आहारामध्ये आळ्या आढळल्या आहेत. उमरगा तालुक्यातील चार तर धाराशिव तालुक्यातील एका शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आल्या निघाल्याचं समोर आलं आहे.
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव येथे ट्रक आणि बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. पहाटे सहा वाजताच्या सुमारासगोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला बेस्ट बसने मागून जोरदार धडक दिली. बोरिवली कडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बसने ट्रकला वनराई पोलीस स्टेशन समोरच मागून जोरात धडक दिली.या अपघातात बस मधील 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओसाठी व्हॉट्सअॅप क्रमांकावर 26 दिवसांत 95 तक्रारी आल्या. सर्वाधिक तक्रारी जादा भाडे आकारण्याच्या आहेत. प्राधिकरणासाठी प्रवासी (आरटीओ विभाग प्रवासी मदत कक्ष) टोल फ्री क्रमांक 1800-220-110 प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे 16 जूनपासून 24 तासांसाठी सुरू करण्यात आला आहे.
राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १९०० पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करायचा म्हटले तर चालक सातत्याने भाडे नाकारतात. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला होता. मात्र मुंबईत चार आरटीओ कार्यालये असल्याने प्रवाशांचा गोंधळ होत होता. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर प्रदेशासाठी सुरू केलेल्या एकाच टोल फ्री क्रमांकामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्राधिकरणासाठी प्रवासी (आरटीओ विभाग प्रवासी मदत कक्ष) टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे १६ जूनपासून २४ तासांसाठी सुरू करण्यात आला आहे.
चित्रपटांच्या ऑनलाइन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून सेवा कर किंवा सुविधा शुल्क आकारण्यास प्रतिबंध करणारे राज्य सरकारचे 2013 व 2014मधील दोन निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे चित्रपटांचे ऑनलाइन तिकीट महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनवर कामात कसूर केल्याने चार तिकीट विक्री कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकात प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या तिकीट विक्रेत्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये गैरव्यवहार केल्यास कठोर कारवाई होणार आहे. शासकीय गैरव्यवहारांमध्ये सामील असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन विशिष्ट कार्य प्रणाली तयार करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
इंधनाच्या किमती वधारत असल्या तरी केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळालाय. स्वस्त गॅस देण्यासाठी तेल कंपन्यांनी कोट्यवधींचा तोटा सहन केला त्या कंपन्यांना मिळणार 35 हजार कोटी मिळणार आहेत.
ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर? तिसऱ्या मॅचमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स https://t.co/E8Yp98UXl5
— ZEE २४ तास (zee24taasnews) July 11, 2025
मनसेप्रमुख राज ठाकरे 18जुलैला मीरा-भाईंदरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मराठी माणसाचे कौतुक आणि आभार व्यक्त करणार आहेत. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देणारा मनसेचा मोर्चा यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातो.मोर्चानंतर बुधवारी मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि अन्य नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आंदोलनाची माहिती दिली होती.
शासनाने आज दरवर्षी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा बहाल करताच इकडे पुण्यात जल्लोष साजरा झाला.या निर्णयाबद्दल पुण्यातील गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीची आरतीही केली आणि नंतर फटाके वाजून एकमेकांना पेडेही भरवले.
मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. मुंबई शहर व लगतच्या परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरे बांधून देण्यात येईल असा निर्णय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
पोलादपुर ते महाबळेश्वर रस्ता पुढील 5 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतलाय. पोलादपुर तालुक्यात पायटा येथे मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.सध्या जेसीबी आणि इतर यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
मनसेकडून फेरीवाल्यांसाठी विशेष मराठी पाठशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे. बोरिवलीत मनसेची उत्तर भारतीय फेरीवाल्यांसोबत व्यवसायिकांसोबत बैठक पार पडली.यावेळी मनसे पदाधिका-यांनी ही घोषणा केली. यावेळी मुंबईतील भाषीक संघर्ष टाळण्याकरता मनसेची भूमीका काय हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या गैरवापरामुळे तरुण पिढीचे आरोग्य आणि समाजव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक विधानसभेत सादर केले आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.