Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Live Update: शक्तिपीठमुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका: सतेज पाटील

Maharashtra Breaking News Today: दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून  

Maharashtra Breaking News Live Update: शक्तिपीठमुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका:  सतेज पाटील
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today: राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं  राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स व ठळक घडामोडी जाणून घेऊयात एका क्लिकवर 

 

12 July 2025
12 July 2025 20:43 PM

Maharashtra Breaking News Live Update: रोहितला शांत करण्याचा हा उपाय नाहीः जितेंद्र आव्हाड

आश्चर्याची बाब आहे. महाराष्ट्रातील 97 लोकांवर eow कारवाई केली आहे ..त्या सर्व केसेस बंद करून चौकशी अंती कोर्टाला क्लोजर रिपोट सादर आहे..त्या मध्ये कुठेही रोहित पवार याचे नाव नाही... पण त्याच fir चा आधार घेऊन ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये 97 लोकांना सोडून रोहित पवार यांना धरलं. आमचा कोर्ट आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाची लढाई लढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.रोहितला हा शांत करण्याचा उपाय नाही.. रोहित शांत बसणाऱ्यापैकी नाही.लढणारच पवार साहेबांच रक्त आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे

12 July 2025 19:57 PM

पुण्याहून नवी मुंबई विमानतळ अवघ्या सव्वा तासांत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नवीन मार्ग कधी सेवेत येणार?

मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 94 टक्के पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

12 July 2025 19:56 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मुंडेंची एन्ट्री! कोण आहेत यशश्री मुंडे?

भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. पंकजा, प्रीतमपाठोपाठ आता यशश्री मुंडेंनी राजकारणात एन्ट्री केली आहे. परळीतील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमदेवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा रंगली आहे. सहकार क्षेत्रातून यशश्री यांचे राजकारणातील हे पहिले पाऊल मानलं जात आहे.

12 July 2025 18:21 PM

Maharashtra Breaking News Live Update: संजय शिरसाट यांना अब्रू असेल तर नुकसानीचा दावा करावा, लाचारांना अब्रू असते का, ही कमरेखाली वाकलेली लोकं आहेत, असा टोला शिवसेना युबीटी खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. यांना अब्रू असती तर सुरत, गुवाहाटी, गोव्याला पळाले नसते. अब्रू नसल्यामुळेच हे लोक पळत सुटले आहेत, असेही सावंत म्हणाले आहे

12 July 2025 18:02 PM

Maharashtra Breaking News Live Update: शक्तिपीठमुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका: सतेज पाटील

शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका होऊ शकतो... कोल्हापूर शहरातील 25 वॉर्डमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल अशी भीती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलीय...तसेच सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणीही त्यांनी केलाय... सोबतच शक्तिपीठविरोधात आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय...  

12 July 2025 16:52 PM

Maharashtra Breaking News Live Update: नांदेडमध्ये बस आणि दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, 3 वर्षाची चिमुकली बचावली

12 July 2025 15:39 PM

Maharashtra Breaking News Live Update: नांदेडमध्ये बॅरिकेट ओलांडून धबधब्यावर पर्यंटक युवकांची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी

12 July 2025 15:21 PM

Maharashtra Breaking News Live Update: अंदरसुल येथील नागेश्वर मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला , चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

12 July 2025 14:51 PM

Maharashtra Breaking News Live Update: महायुतीत नाराजी? अजित पवारांनी दिलं स्पष्ट उत्तर

महायुतीत नाराजी हे तुमच्याकडून कळलं. आमच्यात नाराजी नाही. आम्ही एकत्र बसतो जेवतो हसत खेळत असतो हे फक्त बाहेर तुम्हाला तसं दिसतं अजिबात कुठे नाराज नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

12 July 2025 14:33 PM

Maharashtra Breaking News: प्राडा'चे शिष्टमंडळ महाराष्ट्रात येणार

इटलीतील 'प्राडा' या कंपनीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात राज्यात चर्चेसाठी येणार आहे... तशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.  या भेटीदरम्यान विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट घेतली जाणार आहे.  'प्राडा'ची चप्पल राज्यातील प्रेरित असल्याचे मान्य करत मेक इन इंडिया-कोल्हापूर मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्याबाबत इटलीतील या फॅशन नाममुद्रेने उत्सुकता दर्शवली आहे. 'प्राडा' आणि भारतीय शिष्टमंडळ PRADA प्रतिष्ठित हस्तनिर्मित कोल्हापुरी चपलेपासून यांच्यात शुक्रवारी पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्र चेंबरने सांस्कृतिक आदान-प्रदान, नाममुद्रा विकास, न्याय व्यापार यावर आधारित मुद्द्यांवर चर्चा केली.

12 July 2025 13:26 PM

Maharashtra Breaking News Live Update: मित्राच्या वाढदिवसासाठी फटाके नसल्यानं थेट बंदुकीतून फायरिंग

मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत वाढदिवस साजरा केलाय... पुण्याच्या बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथे ही घटना घडली आहे.... दोन राउंड फायर करत मित्रांचा वाढदिवस साजरा केला आहे...बावधनमध्ये कुमार खळदकर याचा वाढदिवस साजरा होत होता, त्यावेळी त्याचा मित्र दिनेश सिंग ज्या ठिकाणी वाढदिवस सुरू होता त्या ठिकाणी आला. त्यानंतर दिनेश सिंग याला या वाढदिवसाला फटाके नसल्याचे समजले, आरोपी दिनेश सिंगने तत्काळ आपली बंदुक काढली आणि त्यातून दोन राउंड फायर करत वाढदिवस साजरा केला.... या प्रकरणी दिनेश सिंग याला बावधन पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे

12 July 2025 13:25 PM

Maharashtra Breaking News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवी मुंबई विमानतळाची पाहणी

12 July 2025 13:23 PM

Maharashtra Breaking News: .युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्टः अजित पवार

युनोस्कोच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांचा सहभाग घेतला आहे.. यावर यापूर्वी अनेक सरकार आली गेली मात्र दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात हे महाराष्ट्राने अनेकदा बघितला आहे. आम्ही त्याच्यातील नाही आहोत .महाराष्ट्रातील युती सरकारने लक्ष घालून यंदा गडकिल्ल्यांकरता निधीची देखील तरतूद केली आहे .डीपीसीडी याला देखील हेड खोलले आहे त्यातूनही निधी खर्च करता येतो. स्वतः मुख्यमंत्र्यांचे आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे पाठवले होते. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अभिमानाची ही गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून आजपर्यंत 395 वर्षे होऊन गेली आहेत. पुढच्या पिढीसाठी हे टिकले पाहिजे म्हणून हा निर्णय अत्यंत योग्य झाला आहे. पुढील कारवाई नियमाप्रमाणे होईल.

12 July 2025 12:49 PM

Maharashtra Breaking News Live Update Today: जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील (Jayant 

12 July 2025 12:13 PM

Maharashtra Breaking News: आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल

12 July 2025 09:52 AM

साताऱ्यात टोळक्याकडून हॉटेलची तोडफोड 

साताऱ्यात टोळक्याकडून हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. बिलावरून झालेल्या वादातून ही तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत ४ जण जखमी झाली आहेत. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपी अद्याप फरार आहेत. 

12 July 2025 09:26 AM

पीएमपीकडून दीड हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई

दोन महिन्यांत कामात हलगर्जीपणा करणारे रडारवर; फुकट्या प्रवाशांनासुद्धा ठोकला दंड. फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई तर होणारच. त्याचबरोबर बस डेपोसह संचलन मार्गावर प्रवाशांसी गैरवर्तणूक आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मागील दोन महिन्यांत (मे आणि जून 2025) जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

12 July 2025 09:12 AM

तब्बल 13 वर्षांनी संपला येवलेवाडीचा वनवास...

महापालिकेत 2012 मध्ये समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावाच्या विकास आराखड्यास (डीपी) अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ही अंतिम मंजुरी मिळण्यासाठी तब्बल 13 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या विलंबामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली असून, अनेक सरकारी जागा अतिक्रमणाच्या कचाट्यात आल्या आहेत. मात्र, या आराखड्यात 9 मीटर रुंदीचे तीन रस्ते 15 मीटर रुंद होणार असल्याने या भागातील रस्त्यांचे जाळे विकसित होणार आहे.

12 July 2025 08:57 AM

काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसचा हात सोडला. 16 तारखेला ते भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. हा प्रवेश सोहळा सासवडला होण्याची शक्यता आहे.

12 July 2025 08:46 AM

राज्यातील पावसाचा जोर ओसरला‌

विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्हे वगळता इतर ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील.

12 July 2025 08:38 AM

सोनोग्राफीच्या नावाखाली तरुणीसोबत अश्लील चाळे

भंडारामधील साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टरने सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

12 July 2025 08:23 AM

मध्य-पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, प्रवाशांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

12 July 2025 08:15 AM

12 किल्ले अन् 'ते' 7 जण... फडणवीसांनी सांगितला शिवरायांच्या किल्ल्यांचा UNESCO World Heritage यादीपर्यंतचा प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर कोणत्या सात जणांचे आभार मानलेत. ते नेमकं काय म्हणालेत? जाणून घ्या येथे क्लिक करुन.

12 July 2025 07:36 AM

मुंबई पुणे रेल्वे सेवा ठप्प, कर्जत-पळसधरी दरम्यान मालगाडीच्या बोगीची चाके निखळली

 

12 July 2025 07:33 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर....

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.अजित पवारांनी बारामती शहरातील विविध ठिकाणच्या विकास कामांची आज सकाळपासून पाहणी केली आहे. यानंतर बारामतीतील काही खाजगी कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार आहेत. तर काही खाजगी रुग्णालयाची उद्घाटन ही अजित पवारांच्या हस्ते पार पाडणार आहेत.

12 July 2025 06:30 AM

 सांगली एसटी आगारासाठी 200 बसेसची मागणी, मात्र आल्या केवळ 65 बसेस,एसटी सेवेवर पडतोय ताण.. 

सांगली जिल्ह्यातल्या एसटी आगाराला एसटी बसेसची मोठी कमतरता जाणवू लागली आहे.जिल्ह्यातल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसेस उपलब्ध आहेत.यापैकी 109 एसटी बसेस डिसेंबर अखेर कालबाह्य होऊन भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे 200 एसटी बसेसची मागणी एसटी प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती.यापैकी राज्य सरकारने केवळ 65 बसेस सांगली आगारासाठी दिल्या आहेत,एका बाजूला गेल्या काही वर्षात राज्य सरकारने विविध सवलती,त्याच बरोबर महिलांसाठी अर्धे तिकीट,यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे.मात्र तुलनेने एसटी बसेस उपलब्ध नसल्याने एसटी प्रशासनाला एसटी सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे,अनेक मार्गांवर एसटी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची देखील मोठी गैरसोई होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने सांगली एसटी आगारासाठी नव्या बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी होत आहे.

12 July 2025 06:29 AM

विटयाच्या हिवरे येथे 28 लाखांचा गुटखा जप्त ,एकास अटक

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे विटा पोलिसांनी तब्बल 28 लाखांचा गुटखा पकडला आहे.या प्रकरणी सातारा येथील एकास अटक करण्यात आली आहे.हिवरे येथील विजापूर - गुहागर महामार्गावरून अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली होती,त्यानूसार एक संशयीत पिकअप गाडी आडवून तपासणी केली असता,त्यामध्ये 57 पोत्यात गुटखा व सुंगंधी तंबाखूचे 19 लाखांचा गुटखा आढळुन आला.विटा पोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक करत 19 लाखांच्या गुटख्यासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

12 July 2025 06:27 AM

कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीतील परिसरात भीषण आग

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात मध्य रात्री दोन च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते. त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे एक तास युद्धपातळीवर काम करत या आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

12 July 2025 19:26 PM

Maharashtra Breaking News Today:  शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह अन्य व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालीय.कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

12 July 2025 19:26 PM

Maharashtra Breaking News Today:  'बेडरुममधील व्हिडिओ जवळच्या व्यक्तीनं काढला'

पैशांच्या कथित बॅगचा तो व्हिडिओ घरात आलेल्या जवळच्या व्यक्तीनं काढल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हा आरोप केलाय. थेट बेडरुममध्ये आलेल्या व्यक्तीनंच घात केल्याचा संशय संजय शिरसाटांनी व्यक्त केलाय. त्यामुळं पुढच्या काळात घराच्या बेडरुमपर्यंत कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा की नाही याबाबत विचार करावा लागेल असंही शिरसाट म्हणालेत. शिरसाटांशी गद्दारी करणारा तो जवळचा माणूस कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.

Read More