ड्रोन अॅक्टीव्हीटी आणि हवाई संरक्षण गोळीबाराच्या पहिल्या लाटेनंतर आता सांबा येथे गेल्या 15 मिनिटांत कोणत्याही ड्रोन अॅक्टीव्हीटी दिसल्या नाहीत.
दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होणार नाही, तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही - मोदी
पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवादावर होईल , चर्चा होईल तर पीओके संदर्भातच होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पाकिस्तानला वाचायच असेल तर त्यांना देशातील दहशवाद संपवावाच लागेल. याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याया नाही. टेरर आणि ट्रेड एकसाथ चालणार नाहीत. पाणी आणि रक्त एकावेळी वाहू शकणार नाही.
आता भारताने पाकिस्तानच्या सैनिकी ठिकाणांवरील कारवाई आता केवळ स्थगिती केली आहे, थांबवलेली नाही,असे पंतप्रधान म्हणाले.
शाळा, मंदिर,गुरुद्वार,सामान्य नागरिकांच्या घरांना निशाणा बनवलं. पण यात पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला. पाकिस्तानचे ड्रोन, मिसाइल भारतासमोर विखुरले. भारताच्या सशक्त वायु दलाने त्यांना आकाशातच निकामी केलं. भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताच्या ड्रोन, मिसाइल्सने अचूक वार केला. पाकिस्तानचे एअरबेस उद्धस्त केले. भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी फिरत होता.
भारताच्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांना मृत्यूच्या दारात टाकलंय. दहशतवाद्याचा आका पाकिस्तानात फिरायचे. ते भारताविरोधात कारवाई करायचे, त्यांना भारताने एका झटक्यात संपवलं. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान निराश, हताश झाला. भारताला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला केला.
भारताच्या ड्रोननी दहशतवाद्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांचा आत्मविश्वासही डळमळला. जगात कुठेही मोठे हल्ले झालेयत त्या सर्वाचे कनेक्शन या दहशतवादी ठिकाणांशी जोडले गेले आहेत. भारताने दहशतवादाचे हेडक्वार्टर उधळले.
आमच्या आई-बहिणींच्या माथ्यावरील सिंदूर हटवण्याचे परिणाम दहशतवाद्यांना कळालाय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर देशाच्या माता-भगिनींना समर्पित असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील 4-5 दिवस वादळासह पावसाची शक्यता आहे. दिवसा मध्यम ते जास्त तापमान व जास्त आर्द्रतेमुळे दुपारी/संध्याकाळी वादळाचे ढग तयार होऊन वीज व गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात पुढील 5 दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आलाय.
भाजपा उद्या देशभरात तिरंगा यात्रा काढणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल ही तिरंगा यात्रा काढली जाणार आहे.
तो आमचा विषय, आम्ही सोडवू; त्यात इतरांनी नाक खूपसण्याचे कारण काय? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. भारत-पाकिस्तान तणाव स्थितीवरही ते यावेळी बोलले. विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. अनेक संरक्षणाशी संबंधित माहिती देता येत नाही. त्यामुळे त्या गोपनीय ठेवाव्या लागतात. सेशन बोलवायचे असेल तर बोलवा. त्यापेक्षा सर्व पक्षिय नेत्यांची बैठक बोलवून माहिती दिली गेली पाहीजे.सिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती गांधी यांच्यात झाला. त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू.पंतप्रधानाचे भाषण तुम्हीही ऐका मीही ऐकतो, असेही ते पुढे म्हणाले.
केरळमधील कोची येथे एका व्यक्तीला कोची नौदल तळाला फोन करून भारतीय नौदलाचे विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या स्थानाची माहिती मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने नौदल तळावर संपर्क साधून संवेदनशील माहिती मागितली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कता बाळगावी लागली. संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रेझ्युमे करा अपडेट! महाराष्ट्रात होतेय सर्वात मोठी एसटी कर्मचारी भरती; परिवहन मंत्र्यांची घोषणा#STBharti #MaharashtraJob https://t.co/m0ubiY3iZN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
'तुला द्यायला माझ्याकडे...' विराट कोहलीच्या निवृत्तीवर क्रिकेटचा देव झाला भावूक, पोस्ट वाचून डोळे पाणावतील!
'तुला द्यायला माझ्याकडे...' विराट कोहलीच्या निवृत्तीवर क्रिकेटचा देव झाला भावूक, पोस्ट वाचून डोळे पाणावतील!#ViratKohli #SachinTendulkarhttps://t.co/Jv6NY0GbPg
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना पंतप्रधान देशाला काय संबोधित करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
'आमचा लढा दहशतवादाविरोधात होता, पण पाकिस्तान लष्कराने....', एअर मार्शल एके भारतींनी जगासमोर आणलं सत्यhttps://t.co/fscjdC4pI6#Pahalgam #PahalgamAttack #OperationSindoor #OperationSindoor2 #IndiaPakistanConflict #IndiaPakistanWar
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
राज्यात अवकाळी पावसामुळे 22,361 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये झालंय. 10 हजार 636 हेक्टरवर पिके भुईसपाट झाली. दुसऱ्या क्रमांकावर जळगाव जिल्हा असून 454 हेक्टरवर नुकसानानाची नोंद झाली. तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा 3500 हेक्टर नुकसान झालंय. कांदा पिकासह उडीद मूग डाळी, ज्वारी, मका भुईमुगच मोठे नुकसान झालंय.
ऑपरेशन सिंदूर सदर्भात भारताच्या तिन्ही सशत्र दलांची पत्रकार परिषद होतेय. आमचं युद्ध पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या कुटुंबाला केलेल्या ट्रोलबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने व्यक्त केली नाराजी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला निषेध. विक्रम मिस्री यांच्या कुटुंबाविरुद्ध, विशेषतः त्यांच्या मुलीविरुद्ध केलेल्या निंदनीय ऑनलाइन गैरवापराचा आयोगाने केला निषेध. "परराष्ट्र सचिवांच्या मुलीचे वैयक्तिक संपर्क तपशील शेअर करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे. हे गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात येते. मिस्रींसारख्या देशातील सर्वात वरिष्ठ नागरी सेवकांच्या कुटुंबातील सदस्यांवर असे वैयक्तिक हल्ले केवळ अस्वीकार्यच नाहीत तर नैतिकदृष्ट्याही अक्षम्य" म्हणत सर्वांना सभ्यता आणि संयमाने वागण्याचे आवाहन महिला आयोगाचे आवाहन.
भारत- पाकिस्तान डीजीएमओ यांच्यातील हॉटलाईनवरील चर्चा तब्बल पाच तास पुढे ढकलली. सायंकाळी 5 वाजता चर्चेची संभाव्य वेळ.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजप आणि शिंदे गटांमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. आमदार सतेज पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसच्या 34 माजी नगरसेवकांनी हजेरी लावत आपण काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांना स्पष्ट केल आहे...पण महानगरपालिकेतील गटनेता आणि काँग्रेसचे नेते माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. शारंगधर देशमुख हे काही दिवसातच शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातंय.
हिंदू शेरनी हनुमान चालीसां पढने वाली थोडे दिन की मेहमान, जल्दी उडाने है वाले है अशी धमकी नवनीत राणा यांना आली आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून धमक्या येत असल्याची माहिती. राणांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल. अमरावती पोलिसांकडून फोनचा तपास सुरू.
मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी Celebi NAS ही कंपनी तुर्कीशी निगडित आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. आमदार मुर्जी पटेल, मंगेश कुडाळकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवार 12 मे 2025 रोजी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होईल.
विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त...
Virat Kohli ने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती; भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठा धक्काhttps://t.co/Z1c0bAuW6g < येथे वाचा सविस्तर वृत्त#ViratKohli #ViratKohli #ViratKohliretirement #retirement #IndiaCricket #Cricket
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
राज्य सहकारी बँकेकडून आज वाय बी चव्हाण सेंटर मधे दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमाला शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही पवार एकत्रित येणार या चर्चा होत असताना दोन्ही पवार कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार त्यामुळे दोन्ही पवार राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या संदर्भात काही भाष्य होणार का हे पाहणं महत्वाच ठरेल.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर कराचीमध्ये आज दहशतवाद्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत हाफिज सईदचा निकटवर्तीय सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं समजतंय. भारताच्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय.
जळगाव रेल्वे स्थानकाजवळ उभे असलेल्या कारमधून टिकटिक आवाज येत असल्याने भीतीचे वातावरण. गेल्या दोन दिवसांपासून लोहमार्ग पोलीस स्थानकाच्या समोर उभे असल्याची प्राथमिक माहिती. MH 12 SF 1680 असा उभ्या असलेल्या कार चा क्रमांक आहे. अचानक टिक टिक असा आवाज येत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोहमार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिस दाखल. खबरदारी म्हणून आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला असून गाडीची माहिती घेण्याचे काम सुरू. तर घटनास्थळी बॉम्ब शोध पथक दाखल झाले असून कार ची कसून तपासणी सुरू.
धोनी न बोलताच खूप काही बोलून गेला... अनोख्या पद्धतीने दिला भारतीय सैन्याला पाठिंबा, Video Viral
धोनी न बोलताच खूप काही बोलून गेला... अनोख्या पद्धतीने दिला भारतीय सैन्याला पाठिंबा, Video Viralhttps://t.co/vhfXguBqWs#indvspakwar #indiaVsPakistan #MSDhoni #viralvideoシ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. 'आमच्यामध्ये काही तणाव नाही. आमच्या पक्षाचे पंतप्रधान सक्षम असून त्यांचे आदेश आम्ही पाळतो. आता संघर्ष परत सुरू राहील असं वाटलं होतं. पण, दुर्दैवानं फडणवीसांनी पवारांविषयी काय अपमानास्पद वक्तव्य केलं याची खंत वाटते. सहकार्याची भाषा केली नसती. पवारांनी संघर्ष संपवला असं वाटत नाही. पण, त्यांचं आणि आमचं राजकारण वेगळं आहे. आम्ही सत्तेची पर्वा करत नाही. आमच्या संस्था टिकाव्यात म्हणून आमचं राजकारण नाहीय. आमचं राजकारण हे गरिबांचं राजकारण आहे. आलात तर तुमच्याबरोबर किंवा तुमच्याशिवाय... संजय राऊतांचा एल्गार! आमचा संघर्ष देशातल्या हुकुमशाहीविरोधात आहे. मराठी अस्मितेविरोधात जाणाऱ्यांसह आमचा संघर्ष सुरू आहे.
बघा आम्ही मविआमध्ये एकत्र आहोत आणि राहू. संघर्ष करणं येड्यागबाळ्याचं काम नाही. संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला. आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत फडणवीस, मोदी आणि शाहांमध्ये नाही. काय करतील, तुरुंगात टाकतील? आम्ही घाबरत नाही.'
भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत रिचलेंड कंपाऊंड परिसरात भीषण आग. आगीत पाच मोठे कंपनी व मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग. या आगीत या कंपन्यांचे 22 गोदाम जळून खाक.
1) केके इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा . लि.
2) कॅनन इंडिया प्रा . लि. कंपनी ,
3) ब्राईट लाईफकेअर प्रा . लि. कंपनी ,
4) होलीसोल प्रा . लि. कंपनी ,
5) एबॉट हेल्थकेअर प्रा . लि. कंपनी,
6) डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम ,
या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर , कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या भिवंडी कल्याण येथील चार गाड्या दाखल
बीडमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; खुनाचा प्रयत्न, दरोडा प्रकरणी कराडमागोमाग आणखी एका टोळीवर मकोका https://t.co/0V2mD7uQKd
बीडमधून आणखी एक खळबळजनक वृत्त समोर... आता कोणत्या टोळीनं घातला हैदोस? #news #beed #maharashtra #crimenews— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने फडणवीस सरकार अलर्ट मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा बोलाविली नागरी सुरक्षेच्या संदर्भात बैठक. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठकीचे आयोजन. लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अशी एकत्रित बैठक होणार. लष्कर, नौदल, वायुदल, कोस्टगार्ड प्रतिनिधी उपस्थित असणार.
जुलैमध्ये म्हाडाकडून 4 हजार घरांसाठी लॉटरी; 'या' प्राइम लोकेशनवर असतील 1173 घरेhttps://t.co/AuiJZnG9b0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
राज्य शासनाने ऑनलाइन प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाइन प्रमाणपत्र काढताना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ही दरवाढ केली असली तरी प्रत्यक्षात सेतू किंवा आपले सरकार केंद्रावर गेल्यानंतरच लागणारे प्रमाणपत्र नागरिकांना मिळणार आहे.शासनाने 27 मार्चच्या निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे, तसेच सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवांच्या घरपोच दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, आपले सरकार सेवा केंद्रातून (सेतू) मिळणाऱ्या विविध दाखल्यांसाठी आता दुप्पट ते सव्वादोन पट आकार द्यावा लागत आहे. नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार महा ई-सेवा केंद्रातून घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
रायगडच्या महसूल विभागाने वाळू माफियांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. महाडच्या सावित्री नदीपात्रात बिनबोभाट वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलीय. महसूल विभागाच्या पथकाने रात्री उशिरा टाकलेल्या धाडीत 130 ब्रास वाळू साठा जप्त करत 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. महसूल विभागाच्या कारवाईने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या नवीन वाळू धोरणाची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नसताना वाळू माफियांनी सावित्री पात्रातून वाळू काढण्याचा सपाटा लावला होता. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता.
भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमध्ये भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर जम्मू-कश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागांत शांतता पाहायला मिळाली असून, दोन्ही देशांमध्ये कोणत्याही संघर्षाची कोणतीही घटना घडली नाही अशी माहिती भारतीय सैन्यदलानं दिली आहे.
'या' तारखेपासून पुन्हा सुरू होणार IPL 2025, BCCI करणार नवीन वेळापत्रक जाहीर करणारhttps://t.co/76ONGf3L5B#BCCI #ipl2025update #IndiaPakistanWar #CeaseFire
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
लाडकी बहीण योजने’मध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देते. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करावयाचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता ‘लाडकी बहीण योजने’तून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.
An earthquake with a magnitude of 5.7 on the Richter Scale hit Tibet at 02.41 am (IST) today: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/NiHQVlTWWi
— ANI (@ANI) May 11, 2025
माहिती देताना एनसीएसने सांगितले की, ते या भागातील भूगर्भीय हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्याच वेळी, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे 2.41 वाजता (भारतीय वेळेनुसार) तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी होती. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र तिबेट प्रदेशात होते. तथापि, अद्यापपर्यंत कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानाची माहिती मिळालेली नाही. भूकंपाचा परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही जाणवला.
ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने दिली सविस्तर माहिती,जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले होते. आज ऑपररेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यप्त जम्मू आणि काश्मीर येथील 9 दहशतवादी तळांवरील 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती डीजीएमओकडून देण्यात आली.
आज भारत आणि पाकिस्तानचे DGMO एकमेकांशी चर्चा करणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचे DGMO एकमेकांशी चर्चा करणार आहेत. दुपारी 12 वाजता या दोन्ही देशांच्या अधिका-यांची चर्चा होणार आहे. पाकिस्तानसोबत सिंधू करार आणि व्यापार स्थगितच राहणार आहे. या चर्चेत पाकिस्तानशी दहशतवादाशिवाय इतर कोणत्याची विषयावर चर्चा होणार नाहीये. दुपारी बारा वाजता दोन्ही देशाच्या डीजीएमओ एकमेकांशी चर्चा करणार.
Maharashtra 10th SSC Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय#SSC #maharashtrahttps://t.co/TEW0kpk94H
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2025
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने काय साध्य केले?
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने काय साध्य केले?#OperationSindoorhttps://t.co/ULmAbYVsRk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 11, 2025
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे.
कोथरूडमध्यॆ एका भरधाव थार गाडी चालकाने रस्त्यावर पार्क केलेल्या दूचाकी उडवल्यात हा सर्व प्रकार सीसीटीवीत कैद झालाय.या गाडीचा मालक चांदणी चौकातील एका मोठ्या हॉटेलचा मालक आहे. कोथरूड मध्ये पार्किंग केलेल्या 4 दुचाकी उडवल्या, अद्याप तरीही कारचालक ताब्यात नाही.
दोन्ही राष्ट्रवादी मनोमिलनावरून पवारांच्या पक्षातले पुरोगामी कार्यकर्ते अस्वस्थ पाहायला मिळाले. पक्ष प्रवक्ते विकास लवांडे यांनी संभ्रमावस्थेबद्दल प्रथमच मांडली जाहीर भूमिका मांडली. पवार कुटुंबांतील नेत्यांनी भाजपसोबत जायचं की नाही? याबाबत गोलगोल उत्तर देण्याऐवजी स्पष्ट भूमिका मांडावी, तुम्ही भाजपसोबत गेला तर मग आमच्यासारख्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी नेमकं जायचं कुठे? असा परखड सवाल त्यांनी केला.
करुणेचे मूर्त स्वरूप असणाऱ्या भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसा, प्रेम आणि दयाभावाचा अमर संदेश मानवजातीच्या कल्याणाचा मूलभूत मंत्र आहे. त्यांचे आदर्श समता, सुसंवाद आणि सामाजिक न्याय या शाश्वत मूल्यांवर आपला विश्वास बळकट करतात. त्यांची शिकवण आपल्याला नैतिकतेवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा देते.आपण आपल्या जीवनात भगवान बुद्धांच्या आदर्शांचा स्वीकार करुया तसेच शांततापूर्ण, सुसंवादी आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देऊया, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.