Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Breaking News LIVE : मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पाहुया एका क्लिकवर 

Breaking News LIVE : मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE: भाजपचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झालेत.. आज मालवणमध्ये जाऊन शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत. पुतळा अपघात प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी महायुतीवर टीका केलीये.आज सकाळी मविआचे नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढून शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्याचा निषेध करणार आहे.. सकाळी 11 वाजता मालवण तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार आहेत.

28 August 2024
28 August 2024 20:51 PM

चंपाई सोरेन 30 ऑगस्टला भाजपमध्ये करणार प्रवेश

चंपाई सोरेन यांचा झामुमोच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

30 ऑगस्टला भाजपमध्ये करणार प्रवेश

28 August 2024 19:47 PM

मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

आप्पा बळवंत चौक परिसरात ऐन संध्याकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित

फरासखाना, विश्राम बाग पोलीस स्टेशन अंधारात

पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी आले असतानाच वीज गायब

वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

28 August 2024 18:51 PM

अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ

मराठा तरुणांचा एकच गोंधळ, मोठी घोषणाबाजी

कार्यकर्ते आणि पोलिसांची झटपट

मागील 7 मिनिटांपासून घोषणाबाजी सुरू

पोलीस आणि कार्यकर्ते आमने सामने

स्टेजवर जाण्यासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक

28 August 2024 17:48 PM

- मुंबईतील भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर येत्या २ ते ३ दिवसांत शिक्कामोर्तब होणार

- भाजपातील सूत्रांची माहिती

- विधानसभेच्या दृष्टीने भाजपात वेगवान हालचाली

- ३० तारखेला मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक

- महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बैठकीला उपस्थित राहणार

28 August 2024 16:37 PM

आदिवासी विकास मंत्र्यांसोबत पेसा आंदोलकांची झालेली बैठक निष्फळ 

- ३० तारखेला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री शिंदेंसोबत आंदोलकांची होणार भेट 
- पेसा भरतीवरून सुरू असलेले आंदोलन सुरूच राहणार 
- सरकारवर आमचा विश्वास नाही, सरकार फसवत असल्याचा जे पी गवितांचा आरोप

 

28 August 2024 15:41 PM

महाराष्ट्रातील दिघी पोर्टला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

6 हजार 56 एकर परिसरांत पोर्ट उभे राहणार

5 हजार 469 कोटी रूपये प्रकल्पाला खर्च येईल

38 हजार कोटींची गुंतवणूक असेल

1 लाख 14 हजार 183 रोजगार निर्माण होणार

महामार्ग रेल्वे पोर्टल जोडले जाईल

28 August 2024 14:55 PM

पुणे जमीन प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

कालच राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केल प्रतिज्ञापत्र

राज्य सरकारच्या युक्तिवादाने कोर्टाच समाधान नाही

राज्य सरकारने या प्रकरणी तत्काळ लक्ष घालून याला प्राथमिकता द्यावी, राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाही ही सध्याची परिस्थिती आहे. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो. कोर्टाकडून राज्य सरकारच्या वकिलांची कानउघाडणी

28 August 2024 12:37 PM

अकोल्यात डायना माईटसदृश वस्तू आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड या गावात एका पोतडीत "विस्फोटक" डायना माईट सदृश वस्तू आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालीय...पोपटखेड या गावालगत संपूर्ण जंगल परिसर आहे. पोपटखेड येथील पोस्ट ऑफिसजवळ हे विस्फोटक मिळून आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प मधील अतिदुर्गम भागात काही गावांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे, त्याच जंगलाचे प्रवेशद्वार असलेल्या पोपटखेड गावात इतक्या प्रमाणात जिवंत विस्फोटक सापडणे ही गंभीर बाब आहे.या प्रकरणात आता अकोट ग्रामीण पोलिस "विस्फोटके" नेमकी कशासाठी आणि कुणी याठिकाणी आणून टाकली याचा तपास करीत आहे.

28 August 2024 12:35 PM

महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू

केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी ''एकीकृत निवृत्तिवेतन योजना'' (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ''सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना'' ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे अनुषंगाने महाराष्ट्रात लागू करण्याकरिता "वित्त विभागास” प्राधिकृत करण्यात येत आहे.

28 August 2024 12:34 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी संभाजी नगरात काँग्रेसचे आंदोलन

मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी छत्रपती संभाजी नगरात काँग्रेसचे पदाधिका-यांनी आंदोलन केले. शहरातील क्रांती चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केंद्रासह राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय.

28 August 2024 12:32 PM

एचपी गॅस टँकरमधून गॅस चोरी

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकर मधून स्वयंपाकाच्या गॅसची जीवघेण्या पद्धतीने चोरी केल्या जात आहे. झी 24 तास च्या प्रतिनिधींनी ही गॅस चोरी उजेडात आणली आहे. यवतमाळहुन जाणाऱ्या नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर दहेगाव जवळ राजरोसपणे हा काळा बाजार सातत्याने चालतो. रोज 200 हुन अधिक व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये टँकर मधील गॅस एका वेळी पाच सिलेंडर मध्ये नोझल कनेक्टर द्वारे भरला जातो. त्यानंतर या सिलेंडरची अवैध विक्री धाबा आणि हॉटेलमध्ये व्यवसायिकांना केली जाते. राष्ट्रीय महामार्गावर वडकी पोलीस स्टेशन सह महामार्ग पोलिसांची सतत गस्त सुरू असताना देखील चोरीचा हा प्रकार कसा काय चालतो शिवाय अन्न व नागरी पुरवठा विभाग या गोरखधंद्याबाबत अनभिज्ञ कसा? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

28 August 2024 10:59 AM

युती-आघाडीच्या राजकारणात नवा प्रयोगाची नांदी, थोड्याच वेळात महत्वाची बैठक 

युती-आघाडीच्या राजकारणात नवा प्रयोगाची नांदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतलाय. आघाडीच्या दृष्टीने आज मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

28 August 2024 10:04 AM

मुंबईतील 36 जागांसाठी काँग्रेसकडे 200 पेक्षा जास्त अर्ज 

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झालीय. त्याच वेळी योग्य उमेदवार कोण असेल याचीही चाचपणी काँग्रेसने सुरु केलीय. विशेष म्हणजे मुंबईतील 36 जागांसाठी काँग्रेसकडे 200 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची याची चाचपणी आज मधुसूदन मिस्त्री टिळक भवन मध्ये करणार आहेत. मिस्त्री दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आसल्याने या उमेदवाराशी चर्चा करुन त्याचा अहवाल हाय कमांडला देणार आहेत.

28 August 2024 10:03 AM

पोर्शे कार अपघातातील आरोपीला प्रौढ ठरवण्याबाबतच्या अर्जावर आज सुनावणी

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला प्रौढ ठरवण्याबाबतच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मद्यपान करून सुसाट वेगाने कार चालवत असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला तीन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन प्रौढ ठरवण्यात यावं यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळात अर्ज दाखल केलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधातील दोषारोपपत्र आधीच दाखल केलेल आहे.  अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन मिळालेला आहे. तर त्याचे आई-वडिलांनी ससून मधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

28 August 2024 10:01 AM

मविआच्या आजच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

बदलापूर घटनेसह राज्यात वाढते बाल लैंगिक अत्याचार,पुण्यात पोलिसांवर कोयता गँगचा हल्ला,मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळणे यासह बिघडलेली कायदा सुव्यवस्था,यामुळं राज्य सरकारविरोधात जनतेत पसरलेला असंतोष. यावर मविआ सरकारविरोधात आक्रमक होण्यासंदर्भात रणनिती ठरवली जाईल. मुंबईतील जागावाटप काही जागांवरून अडले आहे.यावर मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होवून मार्ग काढला जाईल.विधानसभा निवडणुकीचे राज्यातील जागावाटप चर्चेला विलंब होतोय.ते लवकर होण्यासाठी रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

28 August 2024 08:44 AM

दहीहंडी फोडताना तब्बल 238 गोविंदा जखमी 

दहीहंडी फोडताना तब्बल 238 गोविंदा जखमी झालेत.. ठाण्यातही 19 गोविंदांना दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय.. जखमी गोविंदांवर सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.. दोन गोविंदांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय..  कुणाल पाटील याच्या पाठीच्या मणक्याला तर मनू खारवी  याच्या डोक्याला मार लागला आहे.राज्यात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला असला तरीही जखमी झालेल्या गोविंदांची संख्या पाहिल्यास उत्सहाला गालबोट लागल्याचं दिसतंय.

28 August 2024 08:43 AM

महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज  'मातोश्री' निवासस्थानी 

महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज  'मातोश्री' निवासस्थानी होणारेय. . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणारेत. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडी यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असून महाविकास आघाडीची पुढची रणनीती आणि दिशा ठरवली जाणारेय.

28 August 2024 08:43 AM

मला लोकसभेत पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतली- नवनीत राणा 

बच्चू कडू हे सुपारीबाज नेते असल्याचा घणाघात नवणीत राणा यांनी केलाय.. मला लोकसभेत पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतली असल्याचा घाणाघातही त्यांनी केलाय.. ते ढोंगी आणि तोडी बाहदर असल्याचा आऱोपही त्यांनी केलाय.पुढील  निवडणुकीत त्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे आता पुन्हा राणा विरुद्ध कडू असा वाद अमरावतीत रंगण्याची चिन्ह आहेत.

28 August 2024 08:41 AM

अजित दादांच्या कट्टर समर्थकाने शरद पवार गटांकडून मागितली उमेदवारी 

अजित पवारांचे कट्टर समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंविरोधात शरद पवार गटांकडून साकी गायकवाड यांनी उमेदवारी मागितलीय.साकी गायकवाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. साकी गायकवाड यांनी आपला कार्य अहवाल शरद पवारांना देऊन मतदार संघाची रचना आणि जिंकण्याची संधी याबद्दल चर्चा केली. अण्णा बनसोडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची संधी साकी गायकवाड यांनी शरद पवारांकडे मागितली.

28 August 2024 08:40 AM

पुण्यातील शाळांमध्ये तक्रार पेटीसह सखी समिती होणार स्थापन 

पुण्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तक्रार पेटीसह सखी समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिलेत.. शाळेचे मुख्याध्यापक या सखी समितीचा आढावा घेतील.. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.. शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी तसंच निकोप वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

28 August 2024 08:35 AM

पुण्यातील शिवाजीनगर ते स्वागरगेट भुयारी मेट्रो रखडली

पुण्यातील शिवाजीनगर ते स्वागरगेट भुयारी मेट्रो रखडलीये.. या मेट्रोचं 95 टक्के काम पूर्ण झालंय.. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी ही मेट्रो पुणेकरांसाठी सुरु होईल असा दावा पुणे मेट्रोकडून करण्यात आला होता.. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीअभावी भुयारी मेट्रो लटकलीये.. अद्याप या मेट्रोलो सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळालेली नाहीये.. तपासणीनंतरच मेट्रोला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोसाठी पुणेकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

28 August 2024 08:34 AM

 राज ठाकरे आज बदलापुरात जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बदलापुरात जाणारेत. बदलापूर अत्याचार पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असणारेय. या वेळी ते चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणा-या बदलापूरकरांची भेट घेणारेत, त्यानंतर राज ठाकरे साने वाडीतल्या अदिती बँक्वेट हॉलमध्ये पालक , आंदोलक बदलापूरकरांशी संवाद साधणारेत... त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय...

28 August 2024 08:34 AM

नारायण राणे  पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला देणार भेट 

भाजपचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झालेत.. आज मालवणमध्ये जाणार आहेत.. शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत.. त्यानंतर मालवणमध्ये ते दुपारी 12च्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.. या पत्रकार परिषदेतून राणे काय बोलणार याकडे  सा-यांचं लक्ष लागलंय..

28 August 2024 08:33 AM

बदलापूर घटनेवरुन शिंदेंच्या आमदाराचा विचित्र युक्तीवाद  

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलीय. "मी काल आंदोलन पाहिलं. सगळे पक्ष त्याच्यावर (बदलापूर घटनेवर) थयथयाट करुन राहिले होते. ही प्रवृत्ती असते. या हरा*खोर नराधमांना मुलीचं वय समजत नाही आणि ते त्यांच्यावर अत्याचार करतात. आता हे सगळे लोक सरकार... सरकार... सरकारने केलं. अरे आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये जाऊन पाहरा देणार का? की पोलीस निरिक्षक त्याच्या घरी जाऊन बसणार आहे? की आरोपी फोन करुन सांगतो की, मी बलात्कार करतोय, ये तू मला पकडायला ये... असं सांगतात का ते?" असा विचित्र युक्तीवाद प्रसारमाध्यमांसमोर केला. "घटना घडल्यानंतर यंत्रणा काम करत असते. पोलीस तपास करतात. त्यांना नाही जमलं तर सीबीआय आहे. सीबीआय नाही झाले एसआयटीवाले करतात. पण आरोपीला सोडत नाहीत. सरकार कारवाई करत नसेल, कोणाला पाठीशी घालत असेल तर रस्त्यावर उतरा," असं संजय गायकवाड म्हणाले.

28 August 2024 08:33 AM

बदलापूर घटनेवरुन शिंदेंच्या आमदाराचा विचित्र युक्तीवाद  

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलीय. "मी काल आंदोलन पाहिलं. सगळे पक्ष त्याच्यावर (बदलापूर घटनेवर) थयथयाट करुन राहिले होते. ही प्रवृत्ती असते. या हरा*खोर नराधमांना मुलीचं वय समजत नाही आणि ते त्यांच्यावर अत्याचार करतात. आता हे सगळे लोक सरकार... सरकार... सरकारने केलं. अरे आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये जाऊन पाहरा देणार का? की पोलीस निरिक्षक त्याच्या घरी जाऊन बसणार आहे? की आरोपी फोन करुन सांगतो की, मी बलात्कार करतोय, ये तू मला पकडायला ये... असं सांगतात का ते?" असा विचित्र युक्तीवाद प्रसारमाध्यमांसमोर केला. "घटना घडल्यानंतर यंत्रणा काम करत असते. पोलीस तपास करतात. त्यांना नाही जमलं तर सीबीआय आहे. सीबीआय नाही झाले एसआयटीवाले करतात. पण आरोपीला सोडत नाहीत. सरकार कारवाई करत नसेल, कोणाला पाठीशी घालत असेल तर रस्त्यावर उतरा," असं संजय गायकवाड म्हणाले.

28 August 2024 08:29 AM

मोदी ज्याला हात लावतात ते कोसळतंय, ठाकरे गटाची टिका 

सामनाच्या अग्रलेखातून महायुतीवर टीकेची झोड उठवलीये.. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात ते सर्व कोसळताना दिसतंय. शिवरायांचा पुतळाही कोसळला.. जनतेनं संकेत समजून घ्यावेत.. लाडक्या ठेकेदाराला दिलेलं काम आणि त्यात झालेल्या खाऊबाजीमुळे पुतळा कोसळल्याची टीका सामनातून करण्यात आलीये.

Read More