Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Breaking News Live Updates : पावसामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे पाण्याखाली

Breaking News Live Updates : राजकारणापासून क्रिकेटपर्यंत प्रत्येक क्षेत्रामधील घडामोडींवर असणार राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष.   

Breaking News Live Updates : पावसामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे पाण्याखाली
LIVE Blog

Breaking News Live Updates : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरेंची मागणी, याप्रकरणी न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तिथं मनसेच इगतपुरीत शिबिर, येत्या 14,15,16 जुलै रोजी मनसेकडून पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडेल. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर. याव्यतिरिक्तसुद्धा विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी विशेष लक्ष वेधणार आहे. 

14 July 2025
14 July 2025 20:47 PM

 पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे पाण्याखाली 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे खालील दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवे बाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे बंद असल्यामुळे वाहन चालक गोखले पुलाचा वापर करावी असा सूचना दिला जात आहे...

14 July 2025 19:12 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मंत्री संजय शिरसाठ यांची कानउघाडणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मंत्री संजय शिरसाठ यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. मंत्री पदावर असताना हे वर्तन शोभणारे नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांना खडे बोल सुनावले आहेत. 

14 July 2025 18:49 PM

 एका विमानानं कार्गो ट्रकला दिली धडक

 एका विमानानं कार्गो ट्रकला धडक दिली आहे. मुंबई विमानतळावरती ही दुर्घटना घडली आहे. आकासा एअरलाईन्सच्या विमानानं कार्गो ट्रकला धडक दिली.  या प्रकरणी विमान कंपनीकडून अपघाताची चौकशी सुरु आहे. 

14 July 2025 18:40 PM

दादर येथील स्वातंत्र्यवीर स्वारकर स्मारक या ठिकाणी आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित..

आज संध्याकाळी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत

 येत्या दिवसात शिवसेना पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक होणार असून या निवडणुकीबद्दल देणार माहिती

 तर आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील करणार संबोधित..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री आठ वाजता  येणार पत्रकार परिषद..

14 July 2025 18:38 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवली भाजपच्या आमदारांची बैठक

- मराठवाड्यातील २२ आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक

- संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी आमदारांना बोलावणं

 

14 July 2025 18:35 PM

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी

मराठीच्या मुद्द्यावर एरत्र येण्याचं ठरलं होतं
मात्र राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही
मनसेतील वरिष्ठ सूत्रांची झी 24 तासला माहिती

14 July 2025 14:31 PM

संभाजी ब्रिगेड नेते प्रवीण गायकवाड यांचा पोलिस संरक्षण घेण्यास नकार

अकलूज पोलिसांनी पोलिस सुरक्षा आणि पायलट वाहन देण्याबाबत सांगितले असता , आपण सामान्य कार्यकर्ता आहे. मला याची गरज नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी आपला अशा गोष्टीत वेळ वाया घालवू नये. सरकारने मला मारायचे ठरवले असेल तर कसेही मारतील तुम्ही कसे वाचवणार असा सवाल देखील केला आहे.  क्कलकोट मध्ये रचलेला कट पोलिसांना माहिती होता. तिथे संरक्षणाची गरज होती. योजना बनवताना पोलिस स्टेशन मध्ये चर्चा झाली. गुन्हेगारांना त्यांनी दूध पाजले. पोलिसांची मला मदत नको मी लेखी देतो. 

14 July 2025 14:29 PM

नाशिकच्या इगतपुरीमधील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मनसेचं ३ दिवसीय शिबीर

मनसेचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी रिसॉर्टमध्ये शिबिरासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. मनसे युवासेनेचे अमित ठाकरे मनसे नेते अविनाश जाधव अभ्यंकर शिबिराच्या ठिकाणी पोहचले आहे.  नेते राज ठाकरे पोहचताच मनसे शिबिरातील मंथन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

14 July 2025 14:28 PM

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 24 या रिक्त असलेल्या जागांवर या 12 नवीन आहेस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. 

पदोन्नती मिळालेल्या आयएएस अधिकाऱ्यांची नावे -

विजयसिंह देशमुख
विजय भाकरे
त्रिगुण कुलकर्णी
गजानन पाटील
महेश पाटील
पंकज देवरे
मंजिरी मनोलकर
आशा पठाण
राजलक्ष्मी शहा
सोनाली मुळे
गजेंद्र बावणे
प्रतिभा इंगळे

14 July 2025 13:46 PM
14 July 2025 13:45 PM

सर्वोच्च न्यायालयात ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी 

सर्वोच्च न्यायालयात येत्या ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेमध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

आज ही याचिका न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने तात्पुरत्या दिलास्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. तथापि, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सूचित केलं की, या प्रकरणावर अंतिम निर्णय घेणं हेच अधिक योग्य ठरेल. त्यामुळे, ही याचिका आता ऑगस्ट महिन्यात मुख्य सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे.

14 July 2025 13:29 PM

'मी तर कोल्हापुरात...', मराठी-हिंदी वादावर आर माधवन स्पष्टच बोलला; म्हणाला 'तुम्हाला जर अडचण...'

14 July 2025 13:28 PM

'प्रदीप काटेला हवी ती...,' शाई हल्ल्यानंतर बावनकुळेंचा पोलीस ठाण्यात फोन; गायकवाडांचा गौप्यस्फोट, 'दोन दिवसांत...'

14 July 2025 13:27 PM

'आता हे अर्ज करणं बंद करा,' शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितलं, 'आम्हाला आता....'

14 July 2025 13:19 PM

पुण्यात एमएसईबीच्या डीपीला लागून दोन तरुणांचा मृ्त्यू

पुण्यातील औंधमधील ब्रेमेन चौकाजवळील धक्कादायक घटनेत एमएसईबीच्या डीपीला लागून दोन तरुणांचा विद्युत शॉकने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक रिक्षाचालक तर दुसरा नोकरदार आहे.

14 July 2025 12:25 PM

कोकणात शिवसेना UBT ला मोठा धक्का 

मालवण नगरपालिका शिवसेना-उबाठा गटातील खालील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश 

1. मंदार केणी - माजी नगराध्यक्ष
2. माजी नगरसेवक यतीन खोत - बांधकाम सभापती 
3. माजी नगरसेविका दर्शना कासवकर - आरोग्य सभापती 
4. भाई कासवकर - शाखा प्रमुख 
5. नंदा सारंग - उपशहर प्रमुख 
6. नितीन पवार - शाखा प्रमुख 
7. सई वाघ - शाखा प्रमुख 
8. अमन घोडावले - उपशाखा प्रमुख 
9. संजय कासवकर - शाखा प्रमुख 
10. सेजल परब - नगरसेविका  माजी 

14 July 2025 12:14 PM

जागतिक वारसा जपणं हे आपल्या सर्वांचच आव्हान- CM फडणवीस 

गडकोटांना मिळालेला जागतिक वारसा हा बहुमान टीकवण्यासाठीचं आवाहन आपल्यापुढे असून यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील निवेदनादरम्यान केला. यावेळी युनेस्को यादीत राज्यातील 12 किल्ले युनेस्को यादीत समाविष्ट केल्याबद्दल निवेदन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आणि विधान परिषदेत छत्रपती शिवरायांचा जयघोष नेतेमंडळींनी केला. 

 

14 July 2025 11:58 AM

<blockquote class="twitter-tweet"><p lang="mr" dir="ltr"><a href="https://t.co/vWw998aZ0n">https://t.co/vWw998aZ0n</a><br>महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नावावर या राज्यातील शेतकऱ्यांनी खतावर मारला डल्ला<a href="https://twitter.com/hashtag/news?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#news</a> <a href="https://twitter.com/hashtag/maharashtra?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#maharashtra</a> <a href="https://twitter.com/hashtag/scam?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#scam</a></p>&mdash; ZEE २४ तास (@zee24taasnews) <a href="https://twitter.com/zee24taasnews/status/1944644840379367746?ref_src=tws...">July 14, 2025</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

14 July 2025 11:56 AM

अधिवेशन संपताच रायगडला पालकमंत्री मिळणार

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशना नंतर होईल, अशी अपेक्षा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही सातत्याने पक्ष नेतृत्वाकडे पाठपुरावा करीत आहोत. भरत गोगावले हेच पालकमंत्री होतील, असं सांगतानाच पालकमंत्री नसल्याने विकास कामात अडथळा येत असल्याचं ते म्हणाले. 

14 July 2025 11:21 AM

सातारा जिल्ह्याचे 'राजधानी सातारा' असे नामकरण?

सातारा:छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याचे नामकरण 'राजधानी सातारा' असे करावे या मागणीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी भेट घेऊन या मागणीबाबत सकारात्मक विचार करावा अशी विनंती यावी रणजीतसिंह भोसले यांनी केली आहे. 

 

14 July 2025 11:08 AM
14 July 2025 10:54 AM

विधानभवनाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांचा जल्लोष

शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या यादीत आल्याने विधानभवनाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांचा जल्लोष. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेही सहभागी

 

14 July 2025 10:45 AM

दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याखाली जाऊन उलटली, तीन प्रवाशी जखमी

दुकाची चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून एसटी बस रस्त्याखाली उलटली. या अपघातात तीन प्रवाशी जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात हा अपघात घडला. चिकना फाट्यावर आज सकाळीं साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धर्माबादहून प्रवासी घेउन एसटीबस बिलोलीकडे निघाली होती. या बस मध्ये एकूण आठ प्रवासी होते. चिकना फाटा जवळ एसटी समोरून एक भरधाव कार येत होती. त्याच्यावेळी एक दुचाकी बससमोर होती. त्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून एसटी बस शेतात जाऊन उलटली. शेतात मातीत जाऊन ही बस उलटल्याने आणि प्रवासी जास्त नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तीन प्रवाशी जखमी झाले असून जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

14 July 2025 10:18 AM

हल्ला व्यक्तीगत नसून विचारांवर- प्रविण गायकवाड 

हल्ला व्यक्तीगत नसून विचारांवर. प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप. ही विचारांची नाही, विकृतीची लढाई आहे. संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गायकवाड म्हणाले. 

14 July 2025 10:07 AM

प्रविण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय- अमोल कोल्हे 

अक्कलकोट मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिलीये. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे नाव समोर येत असून, भाजपाने यावर स्पष्टीकरण द्यावे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणीही कोल्हेंनी केलीये. 

 

14 July 2025 09:43 AM

प्रिस्क्रिप्शन न दिल्याचा सूड; दिव्यांग मेडिकल कर्मचाऱ्यावर मध्यरात्री हल्ला

ठाण्यात वर्तक नगर परिसरातील ''''24/7 मेडिकल'''' मध्ये मध्यरात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकलमध्ये कार्यरत असलेल्या एका दिव्यांग अनिकेत चौबे नावाच्या कर्मचाऱ्याला दोन तरुणांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटना मध्यरात्री घडली, जेव्हा दोन तरुण औषध विक्री केंद्रात आले आणि त्यांनी प्रिस्क्रिप्शन शिवाय वायग्रा गोळी मागितली. नियमांनुसार, दिव्यांग कर्मचाऱ्याने ही गोळी देण्यास नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी कर्मचाऱ्याला कोल्ड्रिंक घेण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले आणि त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. या धक्कादायक प्रकाराची कल्पना मिळताच मेडिकलमधील सीनियर असिस्टंट तात्काळ बाहेर आला आणि त्याने मारहाण थांबवली. घटनेनंतर सकाळी मेडिकल असोसिएशनने वर्तक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या घटनेची तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो – "मध्यरात्री ड्युटीवर असलेल्या मेडिकल कर्मचाऱ्यांचा जीव सुरक्षित आहे का?"

 

14 July 2025 09:41 AM

मजुरांच्या खात्यात कोट्यावधी रुपये प्रकरणी आमदार राजू तोडसाम यांचे गंभीर आरोप

यवतमाळ च्या पांढरकवडा तालुक्यातील काही गावांमध्ये रोज मजुरी करणाऱ्या मजुरांचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते उघडून त्यात तीन महिन्यांत शेकडो कोटींची उलाढाल झाली आहे. या प्रकरणात बँकेचे अधिकारी व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असून हा पैसा सट्टा बाजारातील असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केला आहे. झी 24 तास याबाबत वृत्त प्रसारित केले होते. याप्रकरणी आता विधिमंडळात आवाज उठवल्या जाणार असल्याचेही राजू तोडसाम यांनी सांगितले. पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झालेली ही उलाढाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाल्याचा त्यांचा आरोप आहे. 

 

14 July 2025 08:54 AM

मुंबईतील रेल्वे, मेट्रोच्या एकत्रीकरणासाठी हालचाली केंद्रीय मंडळाच्या मुंबई महामंडळाला सूचना

मुंबईतील शहरी एकात्मिक वाहतूक, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांचा योग्य वापर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंडळाच्या कार्यक्षमता आणि संशोधन विभागाचे कार्यकारी संचालक संजीव कुमार यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला एका पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.

14 July 2025 08:34 AM

कडब्याच्या गंजित टाकून महिलेचा मृतदेह

मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील धक्कादायक घटना. विवाहित महिलेला जीवे मारून तिचा मृतदेह कडब्याच्या गंजित टाकून जाळला, किरण सावंत असे विवाहित महिलेचे नाव, 4 वर्षापूर्वी झाले होते लग्न. 

 

14 July 2025 08:25 AM

पुणेकरांच्या सेवेत लवकरच चार नवीन वंदे भारत येणार

पुणेकरांच्या सेवेत लवकरच चार नवीन वंदे भारत येणार. त्यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या वंदे भारतची संख्या सहा इतकी होईल. सध्या पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारत धावत आहेत. मुंबईप्रमाणाचे पुण्यातही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. पुण्यातून प्रवास करणाऱ्यांची क्षमता पाहता रेल्वेकडून चार नवीन वंदे भारत सुरू करण्यात येणार आहे

14 July 2025 07:59 AM

रेल्वेची फेस रेकग्निशन प्रणाली रखडली; पश्चिम रेल्वे मात्र सज्ज 

लोकल रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा आता आणखी सक्षम करण्यात येत असून, ठिकठिकाणी प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी फेस रेकग्निशन प्रणाली बसवण्यात येत आहे. यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर ही प्रणाली बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असली तरी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मात्र ते अजूनही अपूर्णावस्थेत आहे. भारतीय बनावटीचे कॅमेरे उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या प्रणालीमध्ये चिनी बनावटीच्या कॅमेऱ्यांवर बंदी घालण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेस्थानकांवर होणाऱ्या चोरी, छेडछाडी आणि अन्य गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता फेस रेकग्निशन प्रणाली आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या साहाय्याने संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. गर्दीच्या वेळेस किंवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रणालीची मोलाची मदत मिळणार आहे.

 

14 July 2025 07:49 AM

पुण्यातील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

पुण्यातील प्रसिद्ध  गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात करण्यात आला आहे. बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार आहे. 

 

14 July 2025 07:29 AM

देशभरात मतदारयादी फेरतपासणी मोहीम?

निवडणूक आयोग पुढील महिन्यापासून संपूर्ण देशभर बिहारप्रमाणेच मतदारयादी फेरतपासणीचा विशेष कार्यक्रम राबवण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेला सक्रिय करण्यात आले असून निवडणूक आयोग याबाबत 28 जुलैनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात 'एसआयआर'ला घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवून बिहारमध्ये हा कार्यक्रम सुरू ठेवण्याची मुभा दिली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरच हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात पावले उचलल्याचे समजते. 

 

14 July 2025 07:27 AM

प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असता काळं फासण्यात आलं.
 शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसलं प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झालेत.

 

14 July 2025 07:26 AM

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आज बंद 

आज राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहेत.. महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारने अन्यायकारक करवाढ लादल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील 20 हजाराहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहतील.  या अन्यायकारक कारवाढीमुळे सुमारे दीड लाख कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग संकटात सापडण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट मत आहार संघटनेकडून व्यक्त करण्यात आलं. 

 

14 July 2025 07:25 AM

आज सुनावणीचा दिवस, राजकीय वर्तुळाचं लक्ष इथंच... 

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात केली आहे. या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पक्ष कोर्टात ही मागणी करणार आहे.

 

TAGS

Latest Marathi BatmyaShivsena party symbol verdict at supreme courthotels and bar closedWimbledonLords Testind vs engmaharashtra weatherRAIN UPDATESmonsoonpolitical updatesLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील
Read More