Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
वैष्णवी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचं अजित पवार म्हणालेत तसेच आरोपींना कठोर शिक्षा करू अशी ग्वाही अजित पवारांनी दिलीय. अजित पवारांनी कस्पटे कुटुंबीयांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते...
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त शिवाजी गायकवाड कस्पटे यांच्या घरी दाखल झाले आहेत. वैष्णवी मृत्यूप्रकरणी कोणीही वकीलपत्र न घेण्याबाबत विनंती अर्ज कस्पटे कुटुंबानं पुणे बार असोसिएशनला केलाय. एका पत्राद्वारे ही मागणी करण्यात आलीय. 16 मे रोजी झालेली घटना अत्यंत दुखद व महाराष्ट्राला कालिमा फासणारी आहे तशीच आपणास नम्र विनंती अर्ज करतो की आपण कोणीही या आरोपीचे वकील पत्र घेऊ नये असे पत्र कस्पटे कुटुंबीयांनी लिहिलं आहे.
मुलाचा ताबा घेण्यावरुन वैष्णवीच्या कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण कोण आहे? लॅपटॉपमधील DATA पाहून हादरलेली पत्नीhttps://t.co/yIdbZ1Bwpi#VaishnaviHagawane #vaishnavihagawanecase #RajendraHagawane #nileshchavan #NCP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
पालकांनो सावधान! 10 वर्षाच्या बाळाने गिळला धातूचा तुकडा, अन्ननलिकेत अडकला; पुढे जे झालं..
पालकांनो सावधान! 10 वर्षाच्या बाळाने गिळला धातूचा तुकडा, अन्ननलिकेत अडकला; पुढे जे झालं..#HealthNews https://t.co/Ms2ttxWoLD
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्राला पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना पोलीस ठाण्यातून मागच्या दारानं कोर्टात नेण्यात आले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी नराधम हगवणे पिता-पुत्रावर टोमॅटो फेकत त्यांचा निषेध केला. न्यायदंडाधिकारी एन एस बारी कोर्टात दोघांची सुनावणी झाली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोर्ट आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसांनी 7 पेक्षा अधिक दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. या गुन्ह्याचा एकत्रित तपास पोलिसांना करायचा आहे. या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे याचाही तापस केला जाणार आहे. राजेंद्र हगवणे पळून गेल्यानंतर जी वाहनं त्यांनी वापरली ती पोलिसांना रिकव्हर करायची आहेत. या मुद्द्यांच्या आधारे पोलीस युक्तिवाद करण्यात आला. आरोपी पिता पुत्राला 28 मे पर्ंयं पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोण आहे Sonam Chhabra? 'कान्स'च्या रेड कार्पेटवरुन ड्रेसच्या माध्यमातून पाकिस्तानवर साधला निशाणा#SonamChhabra #cannes2025 #entertainmentnewshttps://t.co/2ypjkJBgIg
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
'आई मी वेफर चोरले नाहीत, ते दुकानदार काका..,' 12 वर्षीय मुलाने आईला लिहिलं शेवटचं पत्र, 'मला माफ कर, पण मी...'https://t.co/k32RZK9aWn
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
IPL 2025: 'ऋषभ पंतला 5 मिनिटात ठीक करेन...', युवराज सिंहच्या वडिलांचं पंतबाबत मोठं वक्तव्य#IPL2025 #Cricket #MarathiNews #YograjSingh #RishabhPant #LSG https://t.co/gv8M11FVHh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय? https://t.co/Ar77YrOWoT
अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय? #news #maharashtra #monsoon #kerala— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय? https://t.co/Ar77YrOWoT
अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय? #news #maharashtra #monsoon #kerala— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
घाबरू नका! आता 'ही' चूक असेल तरी, तुमचा PF क्लेम रिजेक्ट होणार नाही; EPFO च्या नियमात मोठा बदल https://t.co/l01pOdgvks
आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून अनेकजण पीएफच्या खात्यातील जमा रकमेचा आधार घेतात. त्याचसंदर्भातील हा नवा बदल... #EPFO #pfnews #news— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
राजेंद्र आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई केलीय. यापुढेही ते योग्य कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलीय. इतकंच नाही तर नियमात बसलं तर मकोका लावणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 21व्या शतकात मुली आणि सुनांमध्ये फरक करणं चूक असून सुनेला आशा प्रकारची वागणूक देणं दुर्दैवी असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय.
Indigo Emergency Landing: वीज कोसळलेल्या 'त्या' Indigo विमानाच्या पायलटनं मदतीसाठी पाकिस्तानशी केला होता संपर्क; पण... https://t.co/Kd09HA8CW9
Indigo विमान वादळाच्या तडाख्यात सापडताच पायलटला दिसली पाकिस्तानची वाट; संपर्कही साधला पण...#Pakistan #indiapakistan #Indigo…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2025
वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मयुरी जगतापांकडून तक्रार मिळाली आहे. बावधन पोलिसांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला आयोगानं कारवाई करण्याच्या सुनचा दिल्या आहेत. तर घटनेआधी वैष्णवीसंदर्भात कुठलीही तक्रार नव्हती. महिला आयोगाकडे आलेल्या बहुतांश केसे निकाली लागल्या आहेत. हुंडा देणं आणि घेणं गुन्हा आहे. हुंड्याची मागणी झाल्यास पोलिसात तक्रार करा, असं आवाहन रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महिलांना केलं आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राऊतांना सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच राज्यातील पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय.
वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या बाळाला ताप आला असून उपचारासाठी बाळाला रुग्णालयात नेलं त्यावेळी त्यांच्या आजीसोबत त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. बाळाचं सतत सात दिवस रुटीन चेकअप होणार आहे. बाळाच्या शरीरीतील पाणी कमी झालं आहे का हे तपासणार आहेत. गेले काही दिवस दुसरीकडे असल्याने त्याच्यावर दडपण आहे का याची तपासणी करणार.
वैष्णवी हगवणे प्रकरणावर अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की 'मी फक्त लग्न समारंभात उपस्थित होतो. त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. काही संबंध नसताना माझ्या नावाची बदनामी होते. नवे-जुने सगळे कायदा पाहता जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाले पाहिजे. ज्या मुलीसोबत ही घटना घडली तिच्या वडिलांशी माझं बोलणं झालं आहे आणि आता कोल्हापूर दौऱ्यानंतर मी कस्पटे कुटुंबाला पुण्यात भेटणार आहे. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तरी सुद्धा त्या मुलीनं जर मला एकदा सांगितलं असतं की माझ्यासोबत असं असं होतंय तर मी लगेच त्यावर काही अॅक्शन घेतली असती. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.'
'कबीर सिंग' फेम अभिनेत्री निकिता दत्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत कोरोना पॉजिटिव्ह असल्याची बातमी दिली आहे. 'कोविड मला आणि माझ्या आईला नमस्कार करायला आला आहे. आशा आहे की आमंत्रण न देता आलेला हा पाहुणा खूप काळ राहणार नाही. आता एका छोट्या क्वारन्टाईननंतर भेटू. सगळे सुरक्षित राहा.'
राज्यातील 5 हजार 373 शाळांमध्ये वीज नसून 5 हजार 127 शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. आगामी शैक्षणिक वर्षीच्या कार्य नियोजन अहवालात या भौतिक सुविधा पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा अहवाल प्रकल्प मंजुरी मंडळाकडे नुकताच सादर करण्यात आला आहे. या अहवालासंदर्भात झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंग देओल यांची उपस्थिती होती. मात्र, प्रगतिशील राज्याला ही बाब भूषणवाह नसल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. एकूण 65 हजार 157 सरकारी शाळांपैकी 5 हजार 373 शाळांमध्ये विजेचा अभाव आहे तर 5 हजार 127 शाळा शौचालयाविना असल्याचं समोर आलंय.
इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठीची पहिली फेरी येत्या सोमवारी 26 मे पासून सुरु होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं अकरावीची प्रवेश प्रक्रिया 26 मे पासून राबवली जाणार आहे. याआधी 21 मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, 21 आणि 22 मे रोजी सुद्धा अकरावीत प्रवेश प्रक्रिया सुरू करणं शक्य झाले नाही. त्यानंतर आता अकरावीसाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल, असं शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज पहाटे 4.30 वाजता दोघांना पोलिसांनी अटक केली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते, अटक कशी करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून थोड्याच वेळात माहिती सांगितली जाण्याची शक्यता आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र आणि सुशील हगवणे याला अटक करण्यात आलीये.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.