Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वढू येथे आले होते. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ' छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल, तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल'.
गडचिरोली पोलिसांनी एकूण 76 लाखांच्या जप्त दारूची विल्हेवाट लावली आहे. देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 520 गुन्ह्यातील 61 लाख 77 हजारांचा माल रोडरोलरखाली केला नष्ट केला तर गडचिरोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 87 गुन्ह्यांमधील 15 लाख 60 हजारांचा माल नष्ट करून जमिनीत पुरण्यात आला. गडचिरोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 87 गुन्ह्यांमधील 15 लाख 60 हजारांचा माल नष्ट करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 च्या हिंसाचाराप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. कोणताही पुरावा नसताना राज ठाकरे यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदवले आहे.
महाराष्ट्राचे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि त्यांचे सहबंधू भगवत खोडके यांचे आज तेलंगणातील श्रीशैलम, नागरकुरनूल येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही दुःखद घटना शनिवारी घडली असून, नागरकुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड (IPS) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 2 च्या सुमारास वनव्यात लागलेल्या आगीत सहा मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. भिवपुरी रेल्वे स्थानक हे नेरळ आणि कर्जत च्या मध्यावर असल्याने बार्डी ते कडाव या आजुबाजूच्या गावातील चाकरमानी हे स्टेशन लगत आपल्या गाड्या पार्क करतात. ही पार्किंगची जागा माळराणा शेजारी आहे. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली या आगीत पार्क केलेल्या मोटरसायकल जळून खाक झाल्यात या आगीची तीव्रता एवढी होती की यात गाडीचे लोखंडही वितळे, गाड्यांमध्ये असलेल्या पेट्रोलमुळे आगिने मोठा पेट घेतला.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या आरोपांविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार नोंदवलीये.. प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का? असा सवाल अतूल लोंढेंनी उपस्थित केला होता
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात गोळीबारात शहीद झालेले मुंबई पोलिसातील उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Breaking News Live Updates: धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याबाबत करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी झाली. यावेळी धनंजय आणि करुणा मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. करुणा मुंडे ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकीलांनी केलाय. इतकंच नाही तर करुणा मुंडे यांचं धनंजय मुंडेंसोबत लग्न झालं याचे काय पुरावे आहेत असा सवाल न्यायालयाने करुणा मुंडेंच्या वकिलाला केला. त्यावर करुणा मुंडेंच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर करू आम्हाला वेळ द्या असं सांगितलं..त्यामुळे कोर्टाने 5 एप्रिलला पुढची सुनावणी घेण्याचं जाहीर केलं असून पुढच्या तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा असे आदेश दिलेत.
Maharashtra Breaking News Live Updates: वाशिम जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेचं काम निधीअभावी रखडलं, अशी कबुली वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलीय. पाणीपुरवठा योजनेसाठी शंभर टक्के निधीचा तुटवडा होता, त्यामुळे ह्या योजनेचे काम रखडलं, असं त्यांनी म्हटलंय. आढावा बैठकीत त्यांनी ही कबुली दिली.
छत्तीसगडमधील सुकमा-दंतेवाडा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्या झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. सुकमा-दंतेवाडा सीमेवर चकमक सुरु झाली असून यात 16 नक्षलवादी ठार झाले. उपमपल्ली-केरलापालच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
हर्षवर्धन सपकाळांचा अजित पवारांवर हल्लाबोल. 31 मार्चपूर्वी कर्ज भरण्याच्या वक्तव्यावर टीका. सत्ताधारी राक्षसाप्रमाणे वागू लागले असल्याचा टोला दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया
डिजिटल अरेस्टला घाबरून बेळगाव जिल्ह्यातील बिडी इथे एका वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली आहे. डायगो संतान नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लेविया डायगो नाझरेथ असं या वृद्ध व्यक्तींचे नाव आहे..डायगो नाझरेथ हे महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयातून निवृत्त झाले होते.
साडेतीन वर्षांतील कामांची होणार चौकशी. नागरिकांच्या तक्रारीची महसूलमंत्र्यांकडून दखल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्याच्या अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांना चौकशीचे आदेश. चौकशीच्या आदेशाने भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांचे धाबे दणाणले
नवी मुंबईत हिट अँड रनची घटना घडलीये. महापे इथं बुधवारी पहाटे जॉगिंगला गेलेल्या एका 14 वर्षाच्या मुलाल अज्ञात वाहनानं धडक दिली.. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणात धडक देणा-या वाहनचालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबानं केलीये.
धुळ्यात 300 किलो बनावट पनीर जप्त. धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबई, इंदूरला पाठवलं जात होतं पनीर. धुळे MIDCमधून बनावट पनीर जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह
Maharashtra Breaking News Live Updates : ST महामंडळाने उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावाकडे जाणा-या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केलंय. या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 764 गाड्यांच्या अतिरिक्त फे-या सोडण्यात येणारेय. तर या गाड्यांसाठी आरक्षणालाही सुरूवात झालीय...
Maharashtra Breaking News Live Updates : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाची सुरुवात. जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती. निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होणार
Maharashtra Breaking News Live Updates : जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी चंद्रपुरात विविध योजनांच्या कामांचा आढावा घेतलाय. अल्पसंख्याक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्यांक शाळांची बैठक घ्यावी. तसेच अल्पसंख्यांक कल्याण समितीची स्थापना करावी, असे आदेश ललित गांधी यांनी प्रशासनाला दिलेत.
वांद्रे पश्चिम येथील खारदांडा, बाजार आणि डॉ. आंबेडकर मार्ग परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात येणारेय. मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी 3 एप्रिलला कामे हाती घेतली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होणारेय. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केलंय.
मुंबई महापालिकेत बऱ्याच काळानंतर मोठ्या प्रमाणावर पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. सात उपायुक्तांसह एकूण बारा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यात. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्यात. काही सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली. तर लोकसेवा आयोगाकडून उपलब्ध झालेल्या आणखी चार उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ते सहाय्यक
आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्यात.
शाळेत विद्यार्थिनींशी लगट करून त्यांचा विनयभंग करणा-या शिक्षकाला रोहा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अनिल कुंभार असे या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक वर्गात शिकवायला आला असताना त्याने वर्गातील 5 - 6 मुलींना स्पर्श करून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पालकांना समजताच त्यांनी रोहा पोलिस ठाण्यात तक्रार देऊन पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पूर्वीदेखील या शिक्षकाने अनेकदा असा प्रयत्न केल्याची या मुलींची तक्रार आहे. या प्रकारानंतर पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे.
म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचा कहर...शक्तिशाली भूकंपात १४४ जणांचा बळी आणि ७३० जण जखमी .३० लाख नागरिक विस्थापित झाल्याची माहिती
महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ. महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर
महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाचे वीज दर निश्चितीचे आदेश. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार
Maharashtra Breaking News Live Updates : नमो शेतकरी महासन्मान निधीचं आजपासून वितरण. 93 लाख 26 हजार शेतक-यांना निधीचं हस्तांतरण होणार.. शेतक-यांच्या खात्यात 2 हजार 169 कोटींची रक्कम जमा होणार.
Maharashtra Breaking News Live Updates : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाची सुरुवात. जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती. निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होणार
Maharashtra Breaking News Live Updates : भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार. 62 हजार कोटी रूपयांमध्ये खरेदी करणार भारतीय बनावटीची 156 हेलिकॉप्टर्स. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करणार.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.