Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Live Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु

Todays Breaking News Live Updates : क्रिकेटच्या मैदानापासून ते अगदी राजकारणाच्या आखाड्यापर्यंत राज्यात कुठे काय घडतंय... पाहा एका क्लिकवर   

Live Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु
LIVE Blog

Todays Breaking News Live Updates : एकिकडे राज्याच्या राजकारणात काही जुनी समीकरणं भूतकाळात जात असून काही नवी समीकरणं उदयास येत आहेत. तर, दुसरीकडे हुंडाबळी आणि तत्सम घटनांनी राज्य हादरत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं राज्यापुढं नव्यानं संकट उभं केलं आहे, तर पावसाच्या विश्रांतीनं बळीराजाची चिंताही वाढवली आहे. अशा अनेक क्षेत्रातील आणि मुद्द्यांवरील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर. 

04 June 2025
04 June 2025 20:45 PM

पुतण्याला काकाची काळजी, अजितकाका पक्षात एकटे पडल्याचा रोहित पवारांचा आरोप

अजितदादांवर तुफान टीका करणाऱ्या रोहित पवार यांना आता मात्र त्यांची खूपच काळजी वाटू लागली आहे. त्याच काळजीपोटी अजितदादा पक्षात कसे एकटे पडलेत हे आता रोहित पवार सांगू लागले आहेत. काय म्हणाले रोहित पवार? जाणून घ्या सविस्तर 

04 June 2025 20:44 PM

मैदानाबाहेर चेंगराचेंगरीत 11 मृत्यू होऊनही विराट कोहलीचं खेळाडूंसह सुरु होतं सेलिब्रेशन, IPL चेअरमन म्हणाले 'त्यांना साधी...'

04 June 2025 20:17 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. 

04 June 2025 19:22 PM

 मुंबई गोवा महामार्गावर अपघात; एक ठार, तिघे जखमी

 

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. विवेक साबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. काशेणे गावाजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कारमधील तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

04 June 2025 18:10 PM

RCB च्या विजयाला गालबोट, मैदानाबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 25 हून अधिक जखमी

04 June 2025 17:56 PM

Big Breaking: निलेश चव्हाण पिस्तुल प्रकरणात महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव समोर आल्याने खळबळ! पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असताना थेट मंत्रालयातूनच...

 

04 June 2025 17:51 PM

बंगळुरुमध्ये RCBच्या विजय मिरवणुकीत चेगंराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू झाल्याचा भीती

आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली आहे.  चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. तर 25 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याच समजते. 

 

04 June 2025 17:11 PM

जनगणना 1 मार्च 2027 साली होणार

जनगणना 1 मार्च 2027 साली होणार आहे.  दोन टप्प्यात जनगणना होणार आहे. सूत्रांची झी 24 तासला माहिती. मात्र, चार राज्यांसाठी 10 ऑक्टोबर 2026 साली जनगणना होणार असल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केंद्रशासित प्रदेशात 2026 साली जनगणना होणार असल्याची माहिती आहे.
 

04 June 2025 16:12 PM

IPL Final: 'अम्पायर त्याला कधीच....', विराट कोहलीच्या गंभीर चुकीकडे दुर्लक्ष केल्याने गावसकर संतापले; म्हणाले 'इतकं धोकादायक...' 

04 June 2025 16:10 PM

'तू इतक्या धापा का टाकत आहेस?,' सासूबाईंचा 'तो' फोन कॉल ठरला शेवटचा; हनिमूनला गेलेलं जोडपं बेपत्ता अन् पुढच्या क्षणी...

04 June 2025 15:51 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरत गोगावले यांची बैठक होणार आहे. पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सेनेचे मंत्री व आमदार हे राष्ट्वदी म्हणजेच अजित दादावर आधीच नाराज आहेत. त्यामुळे रायगड पालकमंत्री पदावरून नाराज गोगावले यांच्या मागणी बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

04 June 2025 14:05 PM

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान; महत्त्वाच्या विधेयकांवर होणार चर्चा

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या काळात महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे, आणि विविध धोरणात्मक विषयांवर संसदेत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

04 June 2025 14:01 PM

पत्रकार परिषद सुरु असतानाच उद्धव ठाकरेंचा फोन, तडकाफडकी सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

04 June 2025 13:58 PM
04 June 2025 12:52 PM

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राखून ठेवलेला व्हिसेरा रिपोर्ट लवकरच येण्याची शक्यता

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबांनी केला होता त्यामुळे हा व्हिसेरा राखून ठेवला होता. हा व्हिसेरा मुंबई मधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. या रिपोर्ट मुळे अनेक बाबी समोर येण्याची शक्यता. 
व्हिसेरा म्हणजे मृत व्यक्तीच्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे (उदा., यकृत, पोट, आतडी, हृदय, फुफ्फुसे इ.) तुकडे, जे शवविच्छेदनादरम्यान तपासणीसाठी काढले जातात आणि विशिष्ट परिस्थितींमध्ये पुढील रासायनिक किंवा तपासणीसाठी राखून ठेवले जातात.

04 June 2025 12:35 PM
04 June 2025 12:34 PM

कल्याण डोंबिवली जोरदार पावसाला सुरुवात, ठाण्यात वंदना परिसर जलमय

कल्याण डोंबिवली दोन दिवसांपासून ऊन तर कल्याण डोंबिवली सकाळ पासून ढगाळ वातावरण तर मध्येच ऊन अचानक पासून आल्याने नागरिकांची ताराबाळ उडाली काही वेळा पाऊस कल्याण डोंबिवलीचा आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाची हजेरी लावल्याने हवेत गारवा पसरला आहे. ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात. ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात. ठाण्यातील वंदना बस डेपो जलमय. येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर पाणी साचल्याने वाहन चालकांची, पादचाऱ्यांची दमछाक. 

 

04 June 2025 12:31 PM

मी कधी ठाकरेंना फोन केला नाही, गिरीश महाजनांकडून राऊतांना प्रत्युत्तर  

'माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यारही मी कधी ठाकरेंना फोन केला नाही.' म्हणत लग्नात नाचल्यावर त्यांना काय म्हणायचं? लग्नामध्ये तुमच्याकडून कोणकोण नाचलं माझ्याकडे क्लिप आहे..... अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी 'सामना'तील संदर्भावरून संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत नैराश्यातून बोलत असल्याचं खळ बळजनक वक्तव्य 

 

04 June 2025 12:08 PM

सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; राज्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू तर 24 तासांत 86 नव्या रुग्णांची नोंद

04 June 2025 12:05 PM

पळून जाऊन लग्न, पहिली मुलगी झाली म्हणून कार, पैसांसाठी सासरकडून छळ; पोरकी झालेल्या 3 वर्षांच्या वैष्णवीचा काय दोष? 

04 June 2025 12:01 PM

सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कृतीमुळे कारवाई

सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी 
पक्षविरोधी कृतीमुळे बडगुजर यांच्यावर कारवाई 
बडगुजरांनी जाहीररित्या नाराजी बोलून दाखवली

04 June 2025 11:32 AM

संजय शिरसाट यांच्या अडचणीत भर, दावा केलेले 5 पार्टनर कुठे गेले? काय आहे प्रकरण?

हॉटेल खरेदीत गोत्यात आलेले संजय शिरसाठ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत संजय शिरसाठ यांनी हॉटेल खरेदीत 5 भागीदार  असल्याचं सांगितलं होतं मात्र प्रत्यक्षात सिद्धांत शिरसाठ यांनी लिलाव साठी जो अर्ज केला होता त्यामध्ये भागीदार म्हणून फक्त सिद्धांत शिरसाठ आणि संजय शिरसाठ यांची पत्नी विजया शिरसाठ या दोघांचेच नाव आहे त्यामुळे संजय शिरसाठ यांनी केलेल्या दाव्या नुसार ते 5 पार्टनर गेले कुठं पेपर वर तर दिसत नाहीय असा प्रश्न निर्माण होतोय...त्यात काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आरोप केलेला त्यानुसार यात कुठलेही भागीदार नाही तर फक्त कुटुंबातील लोक असल्याचं सांगितलं होतं तूर्तास पेपर वर मात्र अंबादास यांच्या आरोपानुसार कुटुंबातील 2 जण या कंपनीचे मालक असल्याचं दिसतंय,   संजय शिरसाठ  यांनी मात्र आता या आरोपाबाबत हाथ वर केलेय,  हा विषय माझ्या साठी संपला आहे मला यावर आता काही बोलायचं नाही... कुणाला काय खोदायच ते खोदु द्या असे सांगत त्यांनी यावर पुढं बोलायला नकार दिलाय.

 

04 June 2025 11:04 AM

गुजरातच्या किनारपट्टीवर भारतीय वायुदलाचा मोठा युद्धसराव

भारतीय वायुसेना ४ जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर मोठा युद्धसराव करणार आहे. या सरावासाठी भारत सरकारने पाकिस्तानच्या पश्चिम सीमेजवळील दक्षिण भागात एक दिवसासाठी हवाई क्षेत्र राखून ठेवले आहे. सरावाचे ठिकाण अरबी समुद्रातील क्षेत्र असून, राजकोटजवळ हे ऑपरेशन होणार आहे. नागरी विमान वाहतुकीसाठी सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे आणि यासाठी NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आला आहे.

04 June 2025 10:00 AM

विपश्यनेनंतर धनंजय मुंडेंचं धार्मिक कार्य 

धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर, धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत केली होती विपश्यना. धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल. संध्याकाळी सिन्नर मध्ये एका लग्न सोहळ्याला देखील लावणार हजेरी.

04 June 2025 09:56 AM

कोल्हापुरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून

कोल्हापुरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीचा धारदार चाकूने भोकसून खून करण्यात आलाय. कोल्हापूर शहरातील सरनोबतवाडी इथं ही घटना घडली आहे. कसबा बावडा इथं राहणाऱ्या समीक्षा भरत नरसिंगे असं मृत 23 वर्षीय तरुणीचे नाव आहे. समीक्षा भरत नरसिंगे आणि कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणारा सतीश यादव हे दोघेजण एकाच ठिकाणी काम करत होते. हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून सरनोबतवाडी इथं लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. गेल्या आठ दिवसांपासून या दोघांमध्ये लग्नावरून वाद सुरू होता.सतीश यादव याने समीक्षा भरत नरसिंगे हिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र समीक्षाने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सतीशने समीक्षाची हत्या केलीय.. 

04 June 2025 09:29 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसांत वाजणार 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसांत वाजणार. मुंबईत भाजप मोठा भाऊ शिवसेना लहान भाऊ असणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असणार. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार. 

04 June 2025 09:03 AM

अंजली दमानिया धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे एसीबीला देणार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे एसीबीला देणार आहेत. थोड्यावेळापूर्वीच अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेतली.  मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या अंजली दमानिया यांना आपलं म्हणण मांडण्यासाठी एसीबीनं नोटीस पाठवलीय. भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी असलेले सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याची नोटीस दमानिया यांना पाठवण्यात आली. या नोटीशीनंतर दमानिया आज एसीबी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यावेळी दमानिया मुंडेंविरोधातील पुरावे एसीबीला देणार आहेत.

 

04 June 2025 09:02 AM

आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल आहेत. महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. डोंबिवलीत पलावा पुलासाठी मनसेसोबत शिवसेना UBTच्या नेत्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकल्याचं सांगण्यात येतंय. ठाकरेंची शिवसेना जर अनुकूल असेल तर मनसेही फारसे आढेवेढे घेणार नाही असं दिसू लागलंय.

 

04 June 2025 08:47 AM

विशाळगडावरील दर्गा परिसरात कुर्बानीस परवानगी

विशाळगडावरील दर्गा परिसरात बकरी ईद, उरूसनिमित्त कुर्बानीस परवानगी, उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश यंदाही कायम. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील संरक्षित क्षेत्र असलेल्या दर्ग्याजवळ बकरी ईद आणि उरूसनिमित्त कुर्बानी देण्याला उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. ही परवानगी केवळ दर्गा ट्रस्टलाच नाही तर धार्मिक उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांनाही लागू आहे, असेही न्यायालयाने या कुर्बानीला परवानगी देताना प्रमुख्याने स्पष्ट केले.

04 June 2025 08:46 AM

एमएचटी सीईटीत 40 प्रश्न चुकले, पूर्ण गुण मिळणार

इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेत एकूण 40 प्रश्न चुकीचे आले होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे पूर्ण गुण देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.
विद्यार्थ्यांनी 1.414 हरकती नोंदविल्या होत्या. सर्वाधिक हरकती गणित विषयाच्या होत्या. सीईटी सेलच्या तपासणीत 40 प्रश्न चुकीचे आढळून आले होते. त्यामुळे सीईटी सेलने या चुकीच्या प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नामागे त्या बॅचेसमधील प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेतला आहे

 

04 June 2025 08:34 AM

आम्हाला घर धारावीतच हवे तेही 500 फुटांचे; धारावीकरांचा पुनरुच्चार

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून रान उठले असून, समर्थक व विरोधकांमधील शीतयुद्ध शमण्याची चिन्हे नाहीत. त्यात आता धारावीसाठी कुर्ला येथील जमिनीलाही मान्यता मिळाली असतानाच विरोधकांनी मात्र धारावी सोडणार नसल्याचा चंग बांधला आहे. पुनर्विकास करायचा असेल तर धारावीतच करा आणि 500 फुटांचे घर धारावीतच द्या, या मागणीचा धारावीकरांनी पुनरुच्चार केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. यावर धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक अॅड. राजेंद्र कोरडे यांनी सांगितले की, धारावीकरांची एकच मागणी आहे ती म्हणजे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. मात्र, सरकार कुर्ला किंवा इतर जमिनी धारावीच्या नावाखाली अदानीला देत आहे.

 

04 June 2025 08:33 AM

मुंबई विमानतळावर 5 किलो कोकेन जप्त

परदेशातून मुंबईत दाखल झालेल्या एका परदेशी नागरिकाला मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडे एकूण पाच किलो 194 ग्रॅम कोकेन आढळून आले असून, या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 51 कोटी 94 लाख रुपये इतकी आहे.

 

04 June 2025 08:31 AM
04 June 2025 08:17 AM

घनसोलीमधील NMMT च्या  डेपोत मोठी आग

घनसोलीमधील NMMT च्या  डेपोत मोठी आग. आगीमध्ये चार बस जळून खाक झाल्या आहेत. दुसऱ्या बसना आग लागण्याची शक्यता. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

04 June 2025 08:01 AM

मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रॅव्हल्स अपघात

मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रॅव्हल्स अपघात. दोन प्रवाशांचा मृत्यू. तर 15 ते 20 जण जखमी. अपघातात 1 जन अडकलेला आहे बाहेर काढण्यासाठी  प्रयत्न सुरू. ट्रक आणि ट्रॅव्हल्स झाला हा अपघात. राष्ट्रीय महामार्गावरील घटना. घटनेने मोठी खळबळ उडाली, नागरिकांची मोठी गर्दी. घटनास्थळी पोलीस व नागरिकांची मदतकार्यासाठी धान, जखमींना रुग्णालयात हलवलं. 

04 June 2025 07:36 AM

1 जूनपासून पुण्यात पीएमपी तिकीट दरात बदल; रविवारी विक्रमी उत्पन्न 

एक जूनपासून तिकीट दराढ केल्यानंतर PMPLच्या उत्पन्नात मोठी वाढ झालीय. रविवारच्या एका दिवसात PMPL प्रशासनाला दोन कोटींचं उत्पन्न मिळालंय. सुट्टीच्या दिवशी 10 लाख पुणेकरांनी शहर बसने प्रवास केलाय. या आधी पीएमपीएलचं सर्वाधिक उत्पन्न 1 कोटी 42 लाख इतकं होतं.

 

04 June 2025 07:33 AM

'हिंदमाता, गांधी मार्केटमध्ये फ्लो मीटर बसवा'

हिंदमाता आणि गांधी मार्केटमध्ये फ्लो मीटर बसवा असे निर्देश मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. हिंदमाता, गांधी मार्केट या ठिकाणी आवश्यक पाणी उपसा यंत्रणा न उभारल्याने तसेच ती कार्यान्वित न केल्याने पहिल्याच मुसळधार पावसात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे आता अधिक मनुष्यबळ नेमून पाणीउपसा यंत्रणा प्रभावी करावी, तिथे फ्लो मीटर बसवावेत असे निर्देश गगराणी यांनी दिलेत. तसंच पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना गगराणी यांनी दिल्यात. गगराणी यांनी हिंदमाता आणि चेंबूरच्या गांधी मार्केट परिसराचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी अधिका-यांना याबाबत सूचना दिल्यात.

 

04 June 2025 07:25 AM
04 June 2025 07:24 AM

वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी घटनेनंतर पुण्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक

पुण्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक बोलावण्यात आलीये.. वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी घटनेनंतर आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी व प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलीये. या बैठकीसाठी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आलंय..  दुपारी 03 वाजता शिवाजीनगर येथील जंगली महाराज रस्ता इथल्या सेंट्रल पार्क हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलीये.

 

04 June 2025 07:24 AM

आणखी किती वैष्णवींचा बळी ? 

आणखी किती वैष्णवींचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय... कारण पुण्यानंतर आता सोलापुरात  तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेत आत्महत्या केलीय. सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल घेतल्याचं समोर येतंय. आशाराणी भोसले असं या महिलेचं नाव असून तिने आत्महत्या नव्हे तर सासरच्या लोकांनी तीची हत्या केल्याचा नातेवाईकांनी गंभीर आरोप केलाय. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 

04 June 2025 07:23 AM

आरसीबीचा 'विराट' विजय, IPL ट्रॉफीवर कोरलं नाव 

आयपीएल 2025 चा फायनल सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पार पडला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवून आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. यासह आरसीबीने त्यांचा आयपीएलमधील 18 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीने पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवला. 

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayIpl final 2025Virat Kohlianushka sharmaweather updatesBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More