Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्राबरोबरच देश आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा तुम्हाला या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.
विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला
विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला असेल. मात्र त्रिभाषा सूत्र कायम राहणार. भाषा शिकवण्याबाबत केंद्र सरकारची जबरदस्ती नाही. केंद्र सरकारने त्रिभाषी सूत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तीन पैकी दोन भाषा भारतीय असाव्यात यावर केंद्र सरकार ठाम आहे. डीएमके खासदार व्ही एम माथेश्वरम यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर जयंत चौधरी यांनी उत्तर दिले. आठव्या वर्षी पर्यंत पहिली भाषा मातृभाषा विद्यार्थ्यांनी शिकावी अकराव्या वर्षा पर्यंत दुसरी भाषा शिकावी. तिसरी भाषा १४ व्या वर्षा पर्यंत वेगळी असावी.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळ सीएनजी पंपावर गॅस गळती झालीय. सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवरील सिलेंडरमध्ये गॅस भरताना ही घटना घडलीय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सीएनजी गॅसचे सिलेंडर घेऊन ट्रक इगतपुरी येथे जाणार होता, मात्र अचानकपणे नोझल मधून गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती ट्रक चालकाने दिलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सॉफिटेल होटल भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. यावर आदित्य ठाकरे बोलले आहेत. मी वेगळ्या कार्यक्रमात होतो ते वेगळ्या कार्यक्रमात होते. आम्ही काय कोल्डप्लेच्या कार्यक्रमासारखे पकडलो गेलो नाही, अशी मिश्किल टीपण्णी त्यांनी केली.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करा या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला मनोज जरांगे पाटील परळीत दाखल झाले आहेत.
ईडीचा कथित राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. सरन्यायाधीशांनी ईडीला वकिलांना पाठवलेल्या नोटिसांवरून खडे बोल सुनावले. आता आणखी एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी ईडीला फैलावर घेतलं आहे.
जालन्यात गजानन महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी पकडून कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजांची दिंडी परतीच्या मार्गावर असून आज या पालखीचं जालना शहरात नूतन वसाहत परिसरात आगमन झालं. यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करा या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला मनोज जरांगे पाटील परळीत दाखल झाले आहेत.
अनिल परबांकडून माझ्या आईची बदनामी करण्यात आली. त्यांचे आरोप खोटे असून त्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचे योगेश कदम म्हणाले.
नारायण राणेंना याचिका मागे घेण्यसाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंनी त्यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. 2021 मध्ये रायगड आणि पुणे इथं राणेंविरोधात एफआयआर दाखल झाले होते. पोलिसांनी क्लीन चीट दिल्यानंतर राणेंनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली होती. राणेंनी परवागनगी मागितल्यानंतर कोर्टानं परवानगी देऊन याचिका निकाली काढली.
मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लवकरच सुटका होणार आहे. नाशिक कारागृहात बॉम्ब स्फोटातील दोन आरोपींचा मुक्काम आहे. दोन आरोपी इंजिनियर तर एक जण आता वकिलीचे शिक्षण घेतोय.मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी आणि मुजम्मील अत्ताउर रेहमान शेख अशी आरोपींची नावे आहेत. अन्सारी सध्या पत्नीच्या आजारपणामुळे पॅरोलवर तर शेख नाशिक कारागृहात आहे.
जस्टिस यशवंत वर्मा यांना हटवण्यासाठी लोकसभा सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे निवेदन सादर केलं आहे. या निवेदनावर एकूण 145 लोकसभा सदस्यांनी सही केली असून जस्टिस वर्मा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 124, 217 आणि 218 अंतर्गत काँग्रेस, तेलुगू देसम, जेडीयू, जेडीएस, जनसेना, एजीपी, शिवसेना (शिंदे गट), एलजेपी (रामविलास), एसकेपी, सीपीएम आदी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर सही केली आहे.
जस्टिस यशवंत वर्मा यांना हटवण्यासाठी लोकसभा सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे निवेदन सादर केलं आहे. या निवेदनावर एकूण 145 लोकसभा सदस्यांनी सही केली असून जस्टिस वर्मा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 124, 217 आणि 218 अंतर्गत काँग्रेस, तेलुगू देसम, जेडीयू, जेडीएस, जनसेना, एजीपी, शिवसेना (शिंदे गट), एलजेपी (रामविलास), एसकेपी, सीपीएम आदी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर सही केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे विजय घाडगें यांच्या भेटीसाठी लातूरकडे रवाना झाले आहेत जरांगे अंकुशनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून लातूरकडे रवाना झाले संध्याकाळपर्यत जरांगे हे लातूरला पोचतील लातूरला जाताना जरांगे परळीत ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे विजय घाडगें यांच्या भेटीसाठी लातूरकडे रवाना झाले आहेत जरांगे अंकुशनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून लातूरकडे रवाना झाले संध्याकाळपर्यत जरांगे हे लातूरला पोचतील लातूरला जाताना जरांगे परळीत ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार आहेत.
मुंबई - मुलाच्या अंगावर सोडला पिटबुल, मुलाचे लचके तोडत असताना लोक हसत होते; अंगावर काटा आणणारा Videohttps://t.co/SHfdhoaSHa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2025
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ सुरू आहे. या विरोधात अमरावतीमध्येही प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांचे नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते फेकून आंदोलन करण्यात आले. कृषी मंत्रांचा निषेध करत त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे चपला देखील आंदोलकांनी मारल्या. विधानभवनातून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्या फायद्याचे निर्णय होतील अशी अपेक्षा असताना मंत्री मात्र पत्ते खेळण्यात आणी मारामाऱ्या करण्यात व्यस्त आहेत. अशा मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आले.
शिरुर बसस्थानकात बसमध्ये सोबत असलेल्या मालासह बसण्याच्या वादातून प्रवासी व वाहक यांच्यात बाचाबाची झाली. बसमध्ये गर्दी असल्याने याच वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन बाप लेक आणि साथीदार अशा तिघांनी मिळून चालक-वाहकाला कॉलरला धरून ओढत नेले आणि मारहाण केली. या धक्कादायक घटनेत वाहकाच्या जवळील २१ हजार रुपये गहाळ झाल्याची माहिती असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण बैनाडे,चंदुलाल बैनाडे आणि एक अनोळखी व्यक्ती अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
7/11 मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटप्रकणात पोलिसांची बाजू समोर; 19 वर्षांनंतर सगळंच स्पष्ट झालं https://t.co/cMWH7CVbvK
मुंबई उच्च न्यायालयानं आरोपींना निर्दोष ठरवलं असलं तरीही या संपूर्ण तपास प्रक्रियेदरम्यान नेमकी पोलिसांची काय कामगिरी अन् भूमिका होती? माजी ACP स्पष्ट…— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2025
मुंबई विमानतळ धावपट्टीवर विमान घसरलं. वैमानिकानं कसंबसं विमानावर नियंत्रण मिळवल्याची प्राथमिक माहिती. मुसळधार पावसामुळं विमान घसरल्याची प्राथमिक माहिती...
ठाकरे सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर! राऊतांचा दावा; म्हणाले, 'मी सगळे Video पाहिलेत, फडणवीस..'https://t.co/po2teuNDDz < येथे वाचा सविस्तर वृत्त...#SanjayRaut #maharashtra #maharashtraassembly #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MaharashtraCM #MaharashtraPolice…
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2025
Mumbai Local Train Blast Case: 7/11 साखळी बॉम्ब प्रकरणात आरोपींनी कोर्टाला असं काय सांगितलं की ते निर्दोष ठरले?https://t.co/NDSUFbCvtu
7/11 साखळी बॉम्ब प्रकरणात हायकोर्टात काय युक्तिवाद झाला? आरोपींकडून दबावाखाली गुन्हा कबुल?#news #mumbailocal #7/11terroristattack— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2025
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार. आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाद मागणार
धाराशिवमध्ये सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा असणार. तुळजापुरात आरसीपीची (दंगल नियंत्रण पथक ) टीम , मंदिर प्रशासनाचे सुरक्षारक्षक, तसेच तुळजापूर पोलिसांची टीम अलर्ट , 50 ते 60 जणांचा बंदोबस्त. तर तुळजापूरहून धाराशिवच्या कार्यक्रमस्थळी असणाऱ्या मार्गावर धाराशिव शहर पोलिसांकडून 20 ते 25 पोलिसांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणार
धाराशिवमध्ये परिमल मंगल कार्यालय येथे सुनील तटकरे यांची पदाधिकारी आढावा बैठक होणार. धाराशिव मधील आनंदनगर पोलीस स्टेशन आणि आरसीपीची टीम असा 50 ते 60 पोलिसांचा बंदोबस्त असणार. लातूर येथील कार्यक्रमात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस अलर्ट. सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार
5 पैकी 4 आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करत सर्वांना तातडीनं कारागृहातून सोडण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केले आहेत. या निकालाला कोर्टानं कोणतीही स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे या आदेशांची पूर्तता करण्यास राज्य सरकार बांधील आहे. हायकोर्टाचा हा निकाल अनपेक्षित असल्यानं निकालाची प्रत हाती येताच या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत विचार करू, असं विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केलं.
छावाच्या कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन घेऊन आल्यानंतर मी ते स्वीकारलं. जे घडलं ते अत्यंत चुकीच आहे... अशी प्रतिक्रिया दिली.
Mumbai Local Train Blast Case: मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट 2006 प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तताhttps://t.co/lSV9vcuMrC#MumbaiHighCourt #Mumbailocalblast #Mumbai #BombayHighCourt
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2025
जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, जालना शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयावर दगडफेक. जालन्याच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न. काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर जालन्यात छावा संघटना आक्रमक झाली असून थेट अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयावर काल रात्री बारा वाजेच्या सुमारास छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून आग लावण्याचा प्रयत्न केलाय.
मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट 2006 प्रकरण; 12 आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. 5 जणांची फाशी, 7 जणांची जन्मठेप रद्द
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने संरचना परीक्षणात 96 इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमारतींमध्ये जवळपास 2400 कुटुंबे वास्तव्यास आहेत, पण रहिवाशांच्या निवासासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने सदनिका रिकामी केल्यास 20 हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक 96 इमारतींत 2400 रहिवासी वास्तव्यास आहेत. या इमारतीतील रहिवाशांना पर्यायी निवास व्यवस्था म्हणून देण्यासाठी पुरेशा संक्रमण सदनिका उपलब्ध नाहीत. त्यामुळे अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नियमानुसार भाडे दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना म्हाडाच्या वॉर्ड कार्यालयात घराचे पुरावे द्यावे लागणार आहेत. तसेच कागदपत्रे तपासणीनंतर पात्र ठरणाऱ्या रहिवाशांना दर महिन्याला भाडे दिले जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी घराचे पुरावे सादर करावे असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांना पक्षाच्या स्थानिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय केरळमधील काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे. हा निर्णय तिरुअनंतपुरम जिल्हा काँग्रेस समितीच्या (डीसीसी) बैठकीत घेण्यात आला, ज्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या निर्णयामागे थरूर यांनी नुकत्याच झालेल्या तिरुअनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना अपेक्षित पाठिंबा न दिल्याचा आरोप आहे.
Exclusive : राजमाता जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था; पाचाडमधील राजवाडा मोजतोय शेवटची घटका https://t.co/Kat8W8SldF
राजमाता जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था #raigadnews #news #maharashtra— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2025
महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, प्रमुख रेल्वे स्थानकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान (Facial Recognition System) लागू करण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा उद्देश लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा मागोवा घेणे आणि रेल्वे स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेला बळकटी देणे हा आहे.
शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याचे अन्य कोणी पात्र वारसदार नसताना आणि त्याच्यावर अवलंबून असणारे वयोवृद्ध पालक असताना, अनुकंपा तत्त्वावरील शासकीय नोकरीसाठी अर्ज करण्याचा हक्क त्याच्या विवाहित बहिणीलाही आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. नाशिक जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून सेवेत असलेल्या वैभवचे 17 जुलै 2014 रोजी निधन झाले. त्यानंतर आई-वडिलांचा सांभाळ करणारे कोणी नसल्याचे लक्षात घेऊन वैभवची बहीण मोनालीने अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, 'राज्य सरकारच्या 17 नोव्हेंबर 2016 रोजीच्या शासन निर्णयात (जीआर) नमूद केलेल्या प्रवगांमध्ये अर्जदार त्यामुळ विवाहित बहीण बसत नाही. त्यामुळे तिचा अर्ज मंजूर करता येणार नाही', असे कारण देत मोनालीचा अर्ज जिल्हा परिषदेने 8 सप्टेंबर 2021 रोजी फेटाळला. त्यामुळे मोनालीने अॅड. भाविक मानेक यांच्यामार्फत रिट याचिका करून त्या निर्णयाला आव्हान दिले होते.
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन 21 जुलै ते 21 ॲागस्ट पर्यंत चालणार आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. दरम्यान काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला चहुबाजूंनी घेरण्याची रणनीती आखली आहे. शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात संसदेत आवाज उठवणार आहे.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख यांच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप करत बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन रविवारीही सुरू होते. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची सोमवारी चौकशी करण्यात येणार आहे. निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने बालरोग निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी या विभागातील एका निवासी डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना केवळ एक अपवाद नसून, दीर्घकाळ चालत आलेला मानसिक छळ आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांना झेड सुरक्षा यंत्रणा असतानाही त्यांच्या सुरक्षेत मोठा हलगर्जी पणा उघड झाला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुंबई ते कोल्हापूर प्रवासात पोलिसांची सुरक्षा पायलट कार आणि एसपीयू कार नाही.उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर याआधी तीन वेळा जीवघेणा हल्ला झाला असतानाही सुरक्षा यंत्रणेत पोलिसांकडून मोठी चूक दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या निमंत्रणावरून 23 ते 24 जुलै 2025 दरम्यान युनायटेड किंग्डमला अधिकृत भेट देतील. पंतप्रधान मोदींचा हा युनायटेड किंग्डमचा चौथा दौरा असेल.पंतप्रधान मोदी किंग चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो 3 च्या बोगद्यात मजुरांवर भटके श्वान किंवा वन्य हिंस्र प्राण्यांकडून हल्ल्या करण्यात येत असलेली माहिती धादांत खोटी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची प्रतिमा मलिन करणारी आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये! असे आवाहन करण्यात येत असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मेट्रोने म्हटलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई एमएमआर भागातील प्रमुख पदाधिकारी व सर्व आमदारांना बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं. मुंबई महापालिका निवडणुका दृष्टीने देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.