Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: मनसेकडून मुंबईत मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी आता नवा उपक्रम

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 10:   मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं  राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.      

Maharashtra Breaking News LIVE: मनसेकडून मुंबईत मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी आता नवा उपक्रम
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरु असून, संजय गायकवाड यांनी कँटीनमध्ये केलेल्या मारहाणीनंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. दरम्यान आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. दुसरीकडे गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीसह राज्यातील सर्व तीर्थस्थळी भाविकांनी गर्दी केली आहे. यादरम्यान मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. राज्यासह देशभरात नेमकं काय सुरु आहे या सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या. 

 

10 July 2025
10 July 2025 22:22 PM

अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईसाठी ‘मकोका’ कायद्यात सुधारणा – गृहराज्यमंत्री योगेश कदम

राज्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या गैरवापरामुळे तरुण पिढीचे आरोग्य आणि समाजव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी हे विधेयक सभागृहात सविस्तरपणे मांडले व त्यामागची भूमिका स्पष्ट केली.

10 July 2025 21:14 PM

मनसेकडून मुंबईत मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी आता नवा उपक्रम 

मुंबईत मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी आता मनसेकडून नवा उपक्रम राबवला जाणार आहे. मनसेकडून फेरीवाल्यांसाठी विशेष मराठी पाठशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे. बोरिवलीत आज मनसेची उत्तर भारतीय फेरीवाल्यांसोबत  व्यवसायिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी मनसे पदाधिका-यांनी ही घोषणा केली. यावेळी मुंबईतील भाषीक संघर्ष टाळण्याकरता; मनसेची भूमीका काय हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली.  

10 July 2025 20:08 PM

डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित

पडघा सब स्टेशनहून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती मिळत असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महावितरणाने दिली आहे. 

10 July 2025 19:11 PM

मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली.
राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियोजन सुरू केल आहे. एकूण मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे दिले.

10 July 2025 18:50 PM

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा बहाल केल्याबद्दल पुण्यात जल्लोष

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. याबाबत ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर जल्लोष करण्यात आला.  

10 July 2025 18:49 PM

जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलेलं जनसुरक्षा विधेयक हे सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं. 

10 July 2025 17:51 PM

गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट मधील संशोधन रद्द करण्याच्या मागणीसाठी शिख बांधव मुंबईकडे रवाना

गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट कलम 11 मधील संशोधन रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेड येथिल शीख बांधव मुंबईकडे रवाना झाले. उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर हे शीख बांधव धरणे आंदोलन सुरु करणार आहेत. नांदेड येथिल सचखंड गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 च्या कलम 11 मध्ये 2015 साली सरकारने संशोधन केले होते. या संशोधनानुसार बोर्डाचा अध्यक्ष निवडण्याचे अधिकार सरकारकडे घेण्यात आले होते. या निर्णयाला नांदेडच्या शीख बांधवाचा सुरुवातीपासून विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच अध्यक्ष निवडीचे अधिकार सदस्यांकडे ठेवण्यात यावे अशी मगणी आहे. या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. आता याच मागणीसाठी उद्या 11 तारखेपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. 

10 July 2025 17:20 PM

ग्रामीण भागातील रस्त्यांची पोलखोल, डांबर रस्ते हाताने उखरले जात असल्याचे व्हिडिओ जिल्ह्यात व्हायरल

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हा डांबर रस्ता महिनाभरपूर्वीच करण्यात आलाय. दुगाव ते डोंगरगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता दोन कोटी रुपये खर्चून करण्यात आलाय. पण गुत्तेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसत आहे. ह्या रस्त्यात डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आलाय. एका ग्रामस्थाने चक्क हाताने हा डांबर रस्ता उखरून या निकृष्ट रस्त्याची पोलखोल केली

10 July 2025 17:01 PM

आदिवासी विकास भवन समोर ठिय्या आंदोलन

आदिवासी विकास विभागातील वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास भवन समोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलकांनी आदिवासी विकास विभाग कार्यालय बाहेर ठिय्या मांडला. आदिवासी विकास भवनमध्ये प्रवेश द्यावा अशी आंदोलकांची मागणी आहे. आदिवासी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या ईदगाह मैदान येथे आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन. यामुळे आदिवासी विकास भवनाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. 

10 July 2025 16:39 PM

TIME100 Creators यादीत झळकली, यूट्यूबवरुन महिन्याला कमावते 40 लाख; मराठमोळ्या तरुणीचा तुम्हालाही वाटेल अभिमान!

10 July 2025 16:21 PM
10 July 2025 16:11 PM

आर्थिक फ्रॉड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात उत्तर 

आर्थिक फ्रॉड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. ते म्हणाले की, बँकेने एसओपी फॉलो केली नसेल तर भरपाई वसूल केली जाईल. आर्थिक फ्रॉड झाल्यावर रक्कम फ्रीज होते त्याबद्दल आम्ही आरबीआयसोबत बोललोय, अकाउंट फ्रीज करू नयेत अशी विनंती केली आहे. केंद्राच्या यंत्रणा आता आपल्यासोबत आहेत. आर्थिक फ्रॉड झाल्यानंतर उशिरा तक्रार केल्यावर तपासात अडचणी येतात. याबाबत जनजागृती केली जात आहे. 

10 July 2025 16:09 PM

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

293 प्रस्तावावरील चर्चेत विरोधी आमदार आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्यात खडाजंगी झाली. इमारती आणि रस्ते बांधून विकास होत नाही - उबाठा आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. तर विरोधकांना विकास आणि शेतकऱ्यांबाबत किती प्रेम आहे हे राज्याला माहिती आहे असं म्हणत राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जैस्वाल यांच्या विधानावर विरोधी आमदारांचा गदारोळ झाला. जैस्वाल यांचे विधान रेकॉर्डवरून काढण्याची मागणी करण्यात आली. 

10 July 2025 15:35 PM

शासकीय घरकुल योजनांची माहिती मिळणार एका क्लिकवर

महाआवास अँप नावाचे नवे app निर्माण केले जाणार असून यामाध्यमातून शासकीय घरकुल योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचा नवा उपक्रम असून या माध्यमातून राज्यातील सर्व अनुदानित गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती सुलभतेने मिळणार आहे. 
मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात माहिती दिली. 

10 July 2025 14:57 PM

माजी पोलिस आयुक्त परमबीर  सिंग यांना CBI कडून क्लीन चिट

महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग आणि इतर पोलिस अधिकारी यांच्यावर ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोपरी आणि  बाजारपेठ पोलिस ठाण्यात परमबीर यांच्यावर २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान ही प्रकरण पुढील तपासासाठी CBI कडे वर्ग करण्यात आले होती. मात्र तक्रारीच्या अनुषंगाने तपासात तथ्य न आढळल्याने CBI ने न्यायालयात दोन्ही गुन्ह्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. 

10 July 2025 14:35 PM

महाराष्ट्राचं कोण आहे इथे? तरुण पुढे येऊन म्हणाला 'मी नाशिक....'; त्यानंतर पुढे काय झालं पाहा; हरियाणातील VIDEO तुफान व्हायरल

10 July 2025 14:34 PM

VIDEO: 'तू गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो,' सभागृहात अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जोरदार बाचाबाची

10 July 2025 14:32 PM

राज ठाकरे 18 जुलैला मिरा रोडला जाणार 

18 जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मिरा रोडला जाणार आहेत. मिरा रोड येथे झालेल्या मनसे मोर्चानंतर आता मनसे प्रमुख मीरा रोड दौरा करणार आहेत. 

10 July 2025 13:31 PM

समरजित घाटगेना परतीचे वेध? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट 

समरजित घाटगे यांच्याकडून पक्षांतरासाठी चाचपणी ? 

समरजित घाटगे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 

सोबतच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती 

समरजित घाटगेंकडून मुंबईत गाठीभेटींचा सिलसिला 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील घाटगे भेटल्याची सूत्रांची माहिती

10 July 2025 12:45 PM

मोठी बातमी! गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित होणार

10 July 2025 12:42 PM

व्हॉट्सअॅप ग्रुपवर ज्युनियर्सना त्रास दिला तर रॅगिंगच, यूजीसीचा नवीन नियम काय?

 

10 July 2025 12:33 PM

'....याचा अर्थ आता थांबावं'; मोहन भागवतांचं वयाच्या पंच्च्याहत्तरीचा दाखला देत सूचक विधान, 'आता बाजूला व्हा आणि...'

10 July 2025 12:32 PM

'...असं म्हणण्याचं धाडस मोदी दाखवतील का?', 'सामना'मधून ठाकरेंच्या शिवसेनेची विचारणा, 'पुणे जिल्ह्यातील...'

10 July 2025 11:51 AM
10 July 2025 11:27 AM

एकनाथ शिंदे दिल्लीत?

एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्याची चर्चा रंगली आहे. दिल्लीत  मोठ्या नेत्याला भेटण्याची चर्चा आहे. सिंदूर पूल उद्घाटनाला शिंदे गैरहजर राहिले. काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. अमित शाह ,राजनाथ सिंग व नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

10 July 2025 11:14 AM

मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार! फडणवीसांच्या हस्ते सिंदूर पुलाचं उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्नाक पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या पुलाला सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे. 

10 July 2025 10:36 AM

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला चांदीचा दरवाजा 

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केली आहे‌

विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे. अत्यंत सुरेख अशी कलाकुसर केलेला केलेला दरवाजा राजस्थानातील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे.

10 July 2025 09:52 AM

नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर दोन गटात राडा 

भरदिवसा हातात तलवार आणि चाकू घेऊन राडा

घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील दोन संशयित यांना घेतले ताब्यात

संशयितांकडून चोपर आणि तलवार जप्त बाकीच्या संशयित यांचा शोध सुरू

घटनेचा सीसीटीव्ही आला समोर

दिवसाढवळ्या टोल नाक्यावर घडलेल्या घटनेनं एकच खळबळ

10 July 2025 09:12 AM

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 7 ते 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते. 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेची भूकंप होता. 

10 July 2025 09:05 AM

मनपाच्या मैदानावर गणेशोत्सव ढोल वादन करण्यास मनाई

गणेशोत्सव ढोल वादन करणाऱ्या पथकांना पालिकेनं मनपाच्या मैदानावर सराव करण्यास यावेळी परवानगी नाकारली आहे. पालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाकडे हे सर्व प्रस्ताव आले होते. गणेशोत्सव थेट ऑगस्ट महिन्यात असतानाच ही ढोल पथकं आत्तापासूनच रोज सायंकाळी 7 ते 10 असा सराव करून परिसर दणाणून सोडतात या आवाजाबाबत स्थानिक रहिवाशांकडून अनेक तक्रारीही येतात कदाचित त्यामुळेच पालिका अधिकाऱ्यांनी या पथकांबाबत निगेटिव्ह अभिप्राय दिला आहे. 

10 July 2025 08:37 AM

हिंजवडीतील आय टी पार्कच्या वाहतूक कोंडीवर फडवणीस घेणार बैठक, सुप्रिया सुळेंना मात्र निमंत्रण नाही

हिंजवडीतील राजीव गांधी आय टी पार्कच्या वाहतूक कोंडीवर उद्या सीएम देवेंद्र फडणवीस घेणार बैठक 

अजित पवारांचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर याना अजून बैठकीचे निरोप नाही 

सुप्रिया सुळे यांना या बैठकीच अजून निमंत्रण नाही 

सुप्रिया सुळे यांनी उदय सामंत यांच्यासोबत केली होती हिंजवडीची पाहणी 

उद्या पावणे दोन वाजता बैठकीच आयोजन करण्यात आला आहे 

आयटी युनियनलाही बैठकीचं निमंत्रण नाही त्यावरून आयटी वाल्यांची नाराजी आहे

10 July 2025 07:38 AM

सायबर गुन्हे संबंधित 1881 प्रकरणांची नोंद; नेटकऱ्यांना काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कोठडीची हवा खावी लागेल. त्यासाठी अशा पोस्ट टाकणारे, फॉरवर्ड करणारे आणि त्या लाईक करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गेल्या पाच महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित १८४१ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी ३९३ गुन्ह्यांची उकल करत ३६३ जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांत धार्मिक पोस्ट संबंधित ६ गुन्हे नोंद असून, त्यामध्ये ३ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्यासह व्हायरल करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

येथे करा तक्रार...
कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सअॅप किंवा अन्य समाजमाध्यमांवर पसरवू नयेत तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.

काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती www.cybercrime. gov.in वर पाठवावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी नियमावली

नियमावलीनुसार सदस्यांनी व्हॉट्सअॅप समूहात अफया, चुकीची माहिती किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत पाठवू नये. त्यासोबत खात्री नसलेले साहित्यही समूहावर पोस्ट करणे टाळावे.

10 July 2025 07:36 AM

मोडक सागर भरून वाहू लागला

मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी आणखी एक मोडक सागर जलाशय बुधवारी सकाळी ६:२७च्या सुमारास ओसंडून वाहू लागला. या तलावाचा एक दरवाजा १ फूट उघडण्यात आला असून, प्रतिसेकंद १,०२२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा ७२.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

पाणीसाठ्याची स्थिती (दशलक्ष लीटरमध्ये)

अप्पर वैतरणा - ७३.१८
मोडक सागर - ९९.९९
तानसा - ७७.६०
मध्य वैतरणा - ९३.१५
भातसा - ६२.१७
विहार - ४७.९७
तुळशी - ४८.५३

वैतरणा धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून सोडण्यात येणारे पाणी मोडक सागर (निम्न वैतरणा) जलाशयात साठविले जाते.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भरले

मोडक सागर धरणाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर) इतकी आहे. हे धरण दरवर्षी जुलैच्या अखेरीस भरते. यंदा हे धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ओसंडून वाहू लागले आहे.

10 July 2025 07:34 AM

Live Updates: प्रारूप प्रभाग रचनेचे काम 24 जुलैपर्यंत पूर्ण होणार

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या 23 किंवा 24 जुलैला हे काम पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. शहरात 165 नगरसेवक असणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा कालबद्ध कार्यक्रम नगरविकास विभागाने जाहीर केला आहे.

‘महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून सध्या प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या २३ किंवा २४ जुलैपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहाणी करण्यात येईल. त्यानंतर ही प्रारूप रचना महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेली रचना ४ ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल,’ असेही काटकर यांनी सांगितले.

10 July 2025 07:33 AM

Live Updates: पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

 पूर्व विदर्भात तुफान पाऊस कोसळत असला, तरी उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी आहे. आज (ता. १०) पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात तुफान पाऊस कोसळत असला, तरी उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी आहे. आज (ता. १०) पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह, कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यापासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून, चंडीगड, नजीबाबाद, शहाजहानपूर, कानपूर, दाल्तोंगंज कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

10 July 2025 07:31 AM

मुंबईत गुरूवारपासून पाऊस ओसरणार; हवामान विभागाने दर्शवला अंदाज

प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाचे बुधवारी पुन्हा एकदा हसे झाले. विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात दिवसभर शहर आणि उपनगरातही रिमझिम पाऊस पडला. हवामान विभागाने मात्र न झालेला मुसळधार पाऊस गुरूवारपासून ओसरण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुसळधार पावसाला तोंड देण्याच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांना दिवसभर पावसाची प्रतिक्षा करावी लागली. शहर आणि उपनगराच्या तुरळक भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही भागांत दिवसभरात अधुनमधून हलकी सर बरसली. त्यामुळे शाळा, कार्यालये वेळेत सुरु राहिली.

गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाऊस पडत आहे. मुंबईत मात्र अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुसळधार पावसाचा इशारा असताना प्रत्यक्षात हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ३ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १ मिमी पावसाची नोंद झाली.

10 July 2025 07:29 AM

जेवणाच्या वेळांमध्ये बदल करू नका! मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी

मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा 800 पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकलमधील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यासाठी राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही या पत्रात केली आहे. कार्यालयाच्या वेळेत बदल करा; मात्र दुपारच्या जेवणाच्या वेळेत शक्य तो बदल करू नये, अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांकडून करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

साखळी विस्कळित होण्याची भीती

कार्यालयाच्या वेळा बदलायच्या असल्यास निश्चित बदला; पण कार्यालयामधील जेवणाच्या वेळा बदलू नका. कार्यालयांमध्ये जेवणाच्या विविध वेळा झाल्यास डबेवाल्यांना त्या वेळा पाळणे शक्य होणार नाही. डबेवाल्यांची पुरवठा साखळी विस्कळित होईल.

जेवण्याच्या वेळेत बदल झाल्यास तुटपुंज्या उत्पन्नासाठी जीवाचे रान करणाऱ्या डबेवाल्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. वेळेचे नियोजन न जमल्याने काही ग्राहक कमी होतील, काही कमी करावे लागतील. त्यामुळे मासिक उत्पन्नामध्येदेखील घट होऊ शकते, अशी भीतीही काही डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे

10 July 2025 07:27 AM

अभिनेता सोनू सूदची पवार दाम्पत्यास मदत

सोशल मीडियावर हडोळती येथील शेतकरी पवार दाम्पत्याची व्यथा जाणून अभिनेता सोनू सूदने फेसबुकच्या माध्यमातून मदत जाहीर केली होती. दिलेला शब्द पाळत सोनू सूदने पवार कुटुंबीयांच्या बँक खात्यावर 45 हजार रुपये जमा केले.

अंबादास पवार औत ओढत असल्याचे व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर हा विषय चर्चेला आला होता. आमदार अमित देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पवार यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. 
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवार यांचे 41 हजार रुपयांचे कर्ज फेडत त्यांचा सातबारा कोरा करून दिला. नाम फाउंडेशनने 21 हजारांची मदत करून त्यांच्या नातवांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, किती रक्कम दिली याबाबत सोनू सूद यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला नसल्याने त्यांची निःस्वार्थ भावना दिसून आली.

Read More