Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: मनोरमा खेडकरला जमीन मंजूर

NEET पेपरफुटीशी प्रकरणातील सर्वच याचिकांवर आज सुनावणी होणारेय. पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताय...पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात उपस्थितीत राहणार आहेत. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंच्या विरोधात पुणे न्यायालयाने वॉरंट जाहीर केलं होत. राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्सवर नजर टाकूया.

Maharashtra Breaking News LIVE: मनोरमा खेडकरला जमीन मंजूर
LIVE Blog

Maharashtra Breaking News: NEET पेपरफुटीशी प्रकरणातील सर्वच याचिकांवर आज सुनावणी होणारेय. पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताय...पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात उपस्थितीत राहणार आहेत. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंच्या विरोधात पुणे न्यायालयाने वॉरंट जाहीर केलं होत. राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्सवर नजर टाकूया.

02 August 2024
02 August 2024 19:58 PM

पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मनोरमा खेडकरला जामीन मंजूर 

 IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना काही अटी पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.  तपास पूर्ण होईपर्यंत पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही. तक्रारदार तसेच साक्षीदारांशी संपर्क करायचा नाही. त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. गरज असेल तेव्हा तसेच पोलिसांकडून बोलावले जाईल, तेव्हा तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागणार. अशावेळी पौड पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई नाही. पोलिस तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुणे जिल्ह्या बाहेर जाता येणार नाही.

02 August 2024 19:46 PM

ST कर्मचाऱ्यांना दिलासा, यंदा वेळेवर होणार पगार

ST महामंडळाला जुनचे सवलत मूल्य प्रतिपूर्तीपोटी निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार येत्या 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत. 

02 August 2024 19:24 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा 4 तारखेपासून सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात राज ठाकरे यांचं 12 तारखेला आगमन होणार आहे. 12 आणि 13 तारखेला पक्षाच्या प्रत्येक विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरे घेणार आहेत. 

02 August 2024 17:58 PM

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस, सोयाबीन,कपाशीचे मोठं नुकसान

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झालाय. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने सोयाबीन,कपाशी मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

02 August 2024 17:42 PM

'लाडकी बहीण योजना' कायमस्वरूपी : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिल्लोड दौऱ्यावर आहेत. 'लाडकी बहीण योजना' ही कायमस्वरुपी योजना आहे. दर महिन्याला माहेरच्या बहिणीला 1500 रुपये रक्कम मिळणार आहे. सरकारची लाडकी बहीण योजना ही समान्यांसाठी आहे. या योजनेसाठी एक वर्षापासून नियोजन करतोय. 1 वर्षापूर्वी निवडणुका होत्या का? निवडणुकीसाठी ही योजना आणलेली नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

02 August 2024 17:36 PM

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना जमीन मंजूर

मुळशी येथे शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आत्ता मुळशी येथील शेतकऱ्यांच्या बंदुकीच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

02 August 2024 15:41 PM

राज्यात मलेरियाचे 9025 रुग्ण, 6 जणांचा मृत्यू 

महाराष्ट्रात, पावसाळी रोगांपैकी मलेरिया सर्वात प्राणघातक ठरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जुलै महिन्यापर्यंत राज्यात मलेरियाचे एकूण 9025 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये यंदा तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोलीत सर्वाधिक 3745, चंद्रपूरमध्ये 397, मुंबईत 2852 आणि नवी मुंबईत 546 रुग्ण आढळले आहेत.

02 August 2024 14:00 PM

इंदापुरात अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवारांकडून 'या' नेत्याला विधानसभेसाठी शब्द 

पुण्याच्या इंदापूर मधून मोठी बातमी आहे.पुण्याच्या इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.राष्ट्रवादीमध्ये असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि राजकारणातील युवा नेतृत्व प्रवीण माने हे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होते आणि विधानसभेचा शब्द शरद पवारांनी माने  कुटुंबाला दिला असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती असून यानंतरच हा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.

02 August 2024 13:49 PM

लवकरच राणीच्या बागेत पुन्हा काळवीटांचे दर्शन होणार

लवकरच राणीच्या बागेत पुन्हा काळवीटांचे दर्शन होणार आहे. 2016-17 च्या वार्षिक अहवालानुसार प्राणिसंग्रहालयात काळवीटांची संख्या 33 इतकी होती. मात्र २०१६-१७ या कालावधीत ३१ काळवीटांचा मृत्यू झाला ज्यात नर आणि 27 माद्यांचा समावेश होता. त्यापैकी 25 माद्या आणि 6 नर काळवीटांच्या मृत्यूची नोंद अहवालामध्ये करण्यात आली होती आणि उर्वरीत दोन माद्यांना प्राणिसंग्रहालयातील चितळांच्या पिंजऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. मात्र मागील काही वर्षांत उरलेल्या दोन काळवीटांचादेखील वृद्धपकाळाने मृत्यू झाला. दरम्यान पिंजऱ्याचे काम र्पू्ण झाले असून पुणे येथील प्राणिसंग्रहालयाकडे काळवीटांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच त्यांना राणीच्या बागेत आणले जाणार आहे.

02 August 2024 13:10 PM

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास 

आज संभाजी नगर शहर पोलिसांची भरती होती मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने ती वेळेवर रद्द करत पुढे ढकलण्यात  आली आहे  त्यामुळं आलेल्या 2 हजारांवर मुलांना नाहक त्रास  सहन करावा झालाय.बंदोबस्तात जास्त पोलीस गुंतल्याने भरती साठी कर्मचारी उपस्थित नाही म्हणून आजची भरती पूढे ढकलली.

02 August 2024 13:08 PM

लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपूरतीच

लाडक्या बहीण योजनेवरून राऊतांनी सरकारवर टीका केलीय...लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपूरतीच आहे...दोन महिने बहिणींच्या खात्यात पैसे टाकून पळून जातील...मात्र, लाडक्या बहिणीची काळजी मविआ सरकार आल्यावर घेईल असं राऊतांनी म्हटलंय...तर माझी बदनामी सुरू असून, लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत हे धादांत खोटं असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय.

02 August 2024 12:11 PM

येवल्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत

विधानसभा निवडणुकीत येवल्यात छगन भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत...दत्ता आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केलीय...दत्ता आव्हाड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष आहेत...त्यामुळे दत्ता आव्हाड यांना उमेदवारी मिळाल्यास येवल्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

02 August 2024 11:51 AM

मिटकरींची गाडी तोडफोड प्रकरणी मनसेच्या सरचिटणीसांना अटक होण्याची शक्यता 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिटकरींच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांना अटक होण्याची शक्यताय...अकोला पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...कर्णबाळा दुनबळे यांच्यासह 13 मनसैनिकांवर अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते...या प्रकरणातील आतापर्यंत नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती...अमोल मिटकरींनी काल कर्णबाळा दूनबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं होतं...यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध मोर्चा ही काढला होता...त्यामुळे दुनबळेंच्या अटकेची शक्यता आहे.

02 August 2024 11:14 AM

मोठी बातमी! ...तर मी राजकारणातून संन्यास घेणार- अजित पवाारांनी स्पष्टच सांगितले 

वेषांतराच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेयत...नाव बदलून कधीही प्रवास केलेला नाही...लपून छपून मी प्रवास करत नाही, उथळमाथ्यानं प्रवास करतो.नाव बदलून प्रवास केला हे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन.नाहीतर आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणा-यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं आव्हान अजित पवारांनी दिलंय...संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांवर आरोप केले होते...त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय...

02 August 2024 11:06 AM

खासदार नरेश म्हस्केंनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट

खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मुलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे याबाबत  खासदार नरेश म्हस्के यांनी  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या.

02 August 2024 10:33 AM

फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर येणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख एकाच मंचावर येण्याची शक्यताय. अनिल देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर येण्याची शक्यताय. नागपूर जिल्हा परिषदेनं 3 आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रांचा व्हर्चुअल उद्घाटन सोहळा आयोजित केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचं उद्घाटन करतील. यापैकी 2 प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यामुळे या कार्यक्रमात फडणवीसांसह अनिल देशमुख उपस्थित राहतील की काटोलला असतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

02 August 2024 10:30 AM

पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताय...पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय...दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं हा निर्णय दिला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर हिला अटक होऊ शकते. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात फ्रॉडचा गुन्हा नोंदवण्यात आलाय...पूजाचा IAS दर्जाच रद्द करण्याचा निर्णय UPSCनं काल घेतला.. तर पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय.. एवढंच नव्हे तर ओबीसी आणि अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी कुणी सवलती लाटल्यात, याची चौकशी करण्याचे आदेशही न्या. देवेंद्र कुमार जंगाला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलेत.

02 August 2024 09:32 AM

पूजा खेडकरने स्वतःचं पूर्ण नाव लिहितानासुद्धा केला 7 वेळा फेरफार 

पूजा खेडकर ने अनेक वेळा यूपीएससी परीक्षा दिल्या खऱ्या मात्र तब्बल सात वेळा त्यांनी त्यांच्या नावात फेरफार केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. पूजा ने स्वतःचं पूर्ण नाव लिहिताना सुद्धा 7 वेळा फेरफार केल्याचं उघडकीस झालं आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर ने तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं आता समोर आला आहे.   यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीत मोठी वाढ देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

02 August 2024 08:36 AM

भारताची शटलर पी.व्ही. सिंधूला मोठा धक्का

भारताची शटलर पी.व्ही. सिंधूला मोठा धक्का बसलाय. चीनच्या हि बिंग जियाओनं टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवाचा बदला 2-0 नं घेतला. त्यामुळे पी.व्ही. सिंधूची ऑलिम्पिक पदकाची हॅट्ट्रिक हुकलीय. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेली चीनची हि बिंग जियाओनं महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 29 वर्षीय सिंधू सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरली आणि 56 मिनिटं चाललेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात तिला बिंग जियाओनं 21-19, 21-14 अशा फरकानं पराभूत केलं. भारताला सिंधूकडून इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक आशा होती. मात्र पी.व्ही.सिंधूला पराभवाचा सामना करावा लागलाय. 

02 August 2024 08:35 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस सोलापूर दौऱ्यावर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांचा सोलापूर दौरा करणारेत.या दौ-यादरम्यान ते  11 विधानसभा मतदारसंघाचा आढावा   घेणारेत... 4 आणि 5 ऑगस्टला राज ठाकरेंचा हा सोलापूर दौऱा असणार आहे. 4 ऑगस्टला सोलापूर शासकीय विश्रामगृहात मुक्काम असणारेय तर 5 ऑगस्टला 11 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी  संवाद साधणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिलीय. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोलापूरच्या बैठकीनंतर राज ठाकरे तुळजापूरकडे  रवाना होणारेत.

02 August 2024 08:33 AM

नरेश म्हस्केंनी खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप, हायकोर्टात याचिका 

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय. या प्रकरणी राजन विचारे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यांच्या याचिकेवर खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टानं समन्स बजावलंय. 
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाला विरोध करत याचिका दाखल केलीय. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं खासदार नरेश मस्के यांना समन्स बजावलं. नरेश मस्के यांना कनिष्ठ न्यायालयानं एका प्रकरणात दोषी ठरवल्याची बाब त्यांनी प्रतिज्ञापत्रकात लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. त्यामुळे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय. मुंबई हायकोर्टात 4 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणारेय.

02 August 2024 07:38 AM

मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात उपस्थितीत राहणार 

मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात उपस्थितीत राहणार आहेत नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंच्या विरोधात पुणे न्यायालयाने वॉरंट जाहीर केलं होतं. दरम्यान वॉरंट इश्यू करू नये म्हणून आज हजर होऊ असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळी 11 नंतर मनोज जरांगे पाटील पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत.

02 August 2024 07:35 AM

अब्दुल सत्तार यांनी वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप 

संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वडिलोपार्जित जमीन बळकावली, असा आरोप करत सिल्लोडच्या पठाण कुटुंबीयांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडमध्ये येत आहेत. त्यांचा जिथे कार्यक्रम होत आहे त्याच जागेचा सत्तार यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून बळजबरीने ताबा मिळवून बेकायदेशीर बांधकाम केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे अशा जागेवरील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी येणे टाळावे, अशी मागणीही केली आहे. सर्व्हे नंबर 377 जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. पालकमंत्र्यांनी त्या जागेवर नियमबाह्य बांधकाम केले. त्यांच्याकडे बांधकामाच्या कायदेशीर परवानग्या नाहीत, असा आरोप आहे.

02 August 2024 07:33 AM

लाडकी बहीण, लाडका भाऊ नोंदणीसाठी कसा मिळतोय प्रतिसाद?

पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ आणि नव मतदार नाव नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून या तीन दिवसीय कँम्प मध्ये मोठ्या संख्येने महिला आणि नव मतदार आपलं नाव नोंदणीसाठी गर्दी करत आहेत, सध्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना सर्व डाऊन मुळे महिलांना अनेक अडचणी येत असल्याने या ठिकाणी महिलांकडून अर्ज भरण्याचं काम केलं जात असून शेवटच्या घटकापर्यंतचा लाभ मिळावा यासाठी शिवसेनेकडून हे प्रयत्न केले जात आहे याला मोठ्या संख्येने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय.

02 August 2024 07:30 AM

खिशातल्या खिशात मोबाईल पेटला, निवृत्त शिक्षकासोबत धक्कादायक प्रकार 

मोबाईल धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. रस्त्याने चालत असतांना पँटच्या खिशातील मोबाईल पेटल्याची घटना घडलीय, हिंगोलीच्या कळमनुरी शहरात ओप्पो कंपनीच्या मोबाईलने खिशातल्या खिशात पेट घेतलाय, कळमनुरी येथील महात्मा फुले विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक सुदाम मोगले यांच्या सोबत हा प्रकार घडला,खिशातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मोगले सरांनी सावधगिरी बाळगत खिशातून मोबाईल काढून बाहेर फेकला,त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय, घटना वेळीच लक्षात आली नसती त्यांना इजा होऊ शकली असती, त्यामुळे मोबाईल धारकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

02 August 2024 07:28 AM

मावळ मधील पवना धरणातून 1800 क्युसेकने विसर्ग सुरु

पवना धरणातून 1800 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना धरणाचा पाणीसाठा 91 टक्के झाला असून व पावसाचा जोर कायम असल्याने विद्युत गुहाद्वारे 1400 क्यूसेक व सांडव्यावरून 1800 क्यूसेक असा एकूण 3200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग कमी- जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

02 August 2024 07:27 AM

 

भात शेतात उतरून भात लावणी करत विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे

मावळ तालुका हा भाताचं आगार म्हणून ओळखला जातो. सध्या भात लागवडीसाठी देखील पोषक पाऊस झाला असून मावळ तालुक्यातील भात लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्याची लगबग शेतकरी वर्गात दिसून येत आहे. मावळ मधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना भात लागवडीचे धडे देण्यात आले. आपण दररोज जो भात खातो त्याच्यामागे शेतकरी किती कष्ट घेतो याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हा भात लागवडी चा उपक्रम घेण्यात आला. वर्गात बसून पुस्तकातील धडे हे विद्यार्थी रोज गिरवत असतात. परंतु विद्यार्थ्यांना देखील व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शाळेने थेट विद्यार्थ्यांना भात शेतातील गुडघाभर चिखलात उतरवून भात लागवडीचे धडे दिले. यामुळे विद्यार्थ्यांना ते खात असलेल्या भात तयार होण्यामागे किती कष्ट घेतले जातात हे समजले. मात्र ही भात लागवड करत असताना विद्यार्थ्यांचा उत्साह मोठा होता.

 

02 August 2024 07:23 AM

भाजप खासदार अनुराग ठाकूर, कंगना राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

भाजप खासदार अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांनी काँगेस नेते राहुल गांधी यांच्या बाबत बेताल वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव शहरातील टॉवर चौकात काँग्रेस तर्फे भाजप खासदार अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांच्या प्रतिमेला काँग्रेस तर्फे जोडो मरो याप्रसंगी निषेध व्यक्त करण्यात आला.

02 August 2024 07:21 AM

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना चित्रातून श्रद्धांजली

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा 2 ऑगस्ट हा प्रथम स्मृतिदिन आहे. या  कलाकाराला बदलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी त्यांचं चित्र साकारून श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन देसाई यांच्या कुटुंबियांनी सचिन जुवाटकर यांना नितीनजिंच चित्र रेखाटण्यासाठी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीचा मान राखून सचिनजींनी नितीन देसाई यांचं सुंदर चित्र रेखाटला आहे.या चित्रात रंगांशिवाय सोनं ,मोती अष्टगंध , इत्यादी गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. आज नितीनजींच्या स्मृतीदिनी हे चित्र नितीनजींच्या कुटुंबीयांना सुपूर्द करणार आहेत.

02 August 2024 07:19 AM

पूजा खेडकरला कोणत्याही क्षण अटक होण्याची शक्यता

 

Pooja Khedkar : पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताय...पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय...दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं हा निर्णय दिला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर हिला अटक होऊ शकते. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात फ्रॉडचा गुन्हा नोंदवण्यात आलाय...पूजाचा IAS दर्जाच रद्द करण्याचा निर्णय UPSCनं काल घेतला.. तर पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय.. एवढंच नव्हे तर ओबीसी आणि अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी कुणी सवलती लाटल्यात, याची चौकशी करण्याचे आदेशही न्या. देवेंद्र कुमार जंगाला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलेत.

Read More