Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Breaking News LIVE Updates: आरक्षण दिले नाही तर सर्व उमेदवार पाडू, जरांगेंचा शिष्टमंडळाला इशारा

Breaking News LIVE Updates :  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) एका क्लिकवर.

Breaking News LIVE Updates: आरक्षण दिले नाही तर सर्व उमेदवार पाडू, जरांगेंचा शिष्टमंडळाला इशारा
LIVE Blog
03 August 2024
03 August 2024 18:13 PM

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, चर्चांणा उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बैठक. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण. बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्राची माहिती. 

03 August 2024 16:18 PM

परभणी जिल्ह्यात पावसाने पिकांच नुकसान, रत्नाकर गुट्टेंकडून पिकांची पाहणी

परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील काही भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आज पिंपरी, मसला,नरळद, इरळद, गोपा रोकडेवाडी या भागात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. 

03 August 2024 14:21 PM

Maharashtra Breaking News : मी ढेकणाला आव्हान देत नाही - उद्धव ठाकरे 

पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. मी ढेकणाला आव्हान देत नाही. माझ्या नादाला लागण्याच्या कुवती नाही, या शब्दात टीका केली. 

बातमी सविस्तर वाचा - फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'

 

03 August 2024 13:28 PM

Manu Bhaker चं हॅट्रिकचं स्वप्न भंगलं

Manu Bhaker : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचं स्वप्न भंगलं. पॅरिस ऑलिम्पिक महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात भारतीय नेमबाज मनू भाकरचं पदक हुकलं. 25 मीटर पिस्तुल प्रकारात मनु चौथ्या क्रमांकावर राहिली. ऑलिम्पिकमध्ये तीन पदक जिंकणारी ती पहिलच भारतीय ठरली असती. यापूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. 

03 August 2024 12:09 PM

Maharashtra Breaking News : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

 

03 August 2024 12:08 PM

Maharashtra Breaking News : वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा 

वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय...भाजप सचिन वाझेचा वापर करतंय...खून, दहशतवादातील आरोपी असलेला वाजे हा भाजपचा प्रवक्ता आहे...देशमुखांना तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो...असा घणाघात राऊतांनी केलाय...तर भाजपच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी त्यांनी केलीय. 

 

03 August 2024 12:08 PM

Maharashtra Breaking News : वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा 

वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय...भाजप सचिन वाझेचा वापर करतंय...खून, दहशतवादातील आरोपी असलेला वाजे हा भाजपचा प्रवक्ता आहे...देशमुखांना तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो...असा घणाघात राऊतांनी केलाय...तर भाजपच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी त्यांनी केलीय. 

 

03 August 2024 12:07 PM

Maharashtra Breaking News : स्वत:ला वाचवण्यासाठी अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करतायेत - महाजन

दरम्यान स्वत:ला वाचवण्यासाठी अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करत असल्याची टीका गिरीश महाजनांनी केलीये... या प्रकरणात जयंत पाटलांचं नाव घेतलं असेल तर त्याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीये... तर फडणवीसांचं नाव घेणारे जेलमधील 10 लोकं उभे करु असा दावा संजय राऊतांनी केलाय..  

 

03 August 2024 12:06 PM

Maharashtra Breaking News : वाझेंच्या आरोपानंतर रावसाहेब दानवेंचा इशारा 

वाझेंच्या आरोपानंतर रावसाहेब दानवेंनी इशारा दिलाय...अजून अनेक लेटरबॉम्ब आमच्याकडे आहेत ते लवकरच बाहेर येतील असा दावा दानवेंनी केलाय...देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई होऊन पैसे सापडले नाहीत. तर ते पैसे पुढे कुठे गेले याचा शोध घेतला पाहिजे...या पैशांचा कर्ता धर्ता कोण यांचा शोध घ्या...सगळ्या महाराष्ट्राला कोण कर्ता धर्ता आहे हे माहीत आहे असं म्हणत नाव न घेता पवारांना टोला लगावलाय...

 

03 August 2024 12:05 PM

Maharashtra Breaking News : वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक 

वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेयत..सचिन वाझे मविआच्या जावई आहे, त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केलीय...तर सचिन वाझेंची नार्कोटेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं परिणय फुकेंनी म्हटलंय...

03 August 2024 10:42 AM

Maharashtra Breaking News : राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार

Raj Thackeray will meet CM Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत...महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदेंची भेट घेणार आहेत...यासोबत मुंबईमधील वरळीतील नागरिकांच्या समस्या तसंच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात दोघांत यावेळी चर्चा होण्याचीही शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे वरळी हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. तो काबिज करण्यासाठी मनसेनंही कंबर कसलीय...त्यामुळे वरळीतील नागरी समस्यांबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय...

03 August 2024 10:36 AM

Maharashtra Breaking News : सचिन वाझेंचा गंभीर आरोपाला अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे वसुली करायचे, असा खळबळजनक आरोप सचिन वाझेने केला होता. यासंदर्भातील पुरावे आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार असल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान अनिल देशमुखांनी सचिन वाझेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. 

बातमी सविस्तर वाचा - 'गुन्हेगार सचिन वाझेला हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस....', अनिल देशमुखांनी दिलं प्रत्युत्तर

03 August 2024 08:25 AM

Maharashtra Breaking News :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा

पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. येत्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढण्याचं ठरलं असताना घटक पक्षांमधील जागावाटप त्याचप्रमाणे निवडणुकीतील मुद्द्यांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे हल्ला चढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी ते काय बोलतात याबद्दल उत्सुकता आहे. शिवसेनेचे राज्यभरातील पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित असणार आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षनेत्या सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत यांच्या तोफा देखील आज धडाडणार आहेत. पक्ष फुटीनंतर सुरू असलेली न्यायालय लढाईवर देखील या मेळाव्यात विचार मंथन अपेक्षित आहे.

03 August 2024 08:23 AM

Maharashtra Breaking News :  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी 

लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत....मराठीतील अर्ज नामंजूर होणार नसून, कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरेंनी दिलीय...त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळालाय...

03 August 2024 08:22 AM

Maharashtra Breaking News :  कोकणासह आज मुंबई, पुणे, साताऱ्यात पावसाचा इशारा

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणारेय. मुंबईला आज यलो तर पुण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर पुण्यासह साता-यातही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

 

Read More