Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 July 2025: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन धनंजय मुंडे यांची एन्ट्री केली जाणार असल्याचा दावा विरोधक करतातयत. मुंबईत आज मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम दिसेल.म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स बांधणार आहे. राज्यातील महत्वाच्या घडमोडींचा आढावा घेऊया या लाईव्ह ब्लॉगमधून
प्रांजल खेवलकर यांच्याबाबत जी तांत्रिक माहिती माझ्यासमोर आली त्यात खेवलकर यांना ट्रॅप केलं आहे इथिकल हॅकर मनीष भंगाळेने हा खळबळ जनक दावा केला आहे. रेव पार्टीशी खेवलकर यांचा संबंध नाही त्यांना त्याठिकाणी बोलवलं गेलं आणि फसवलं गेलं आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही लोकांशी त्यांचा संबंध किंवा संपर्क नव्हता. याबाबत दोन दिवसात तांत्रिक गोष्टी मी पोलिसांसमोर सांगणार आहे पोलिसांनी जरी या प्रकरणात कॉल रेकॉर्डिंग तपासणी केली तर प्रांजल खेवलकर यांचा या पार्टीशी संबंध नव्हता हे समोर येईल. एकेकाळी एकनाथ खडसे यांचा विरोधात आरोप करणाऱ्या इथिकल हॅकर मनीष भंगाळेने खडसेंच्या जावयांबाबत खळबळजनक दावा केला आहे.
छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. घाडगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यानंतर अजित पवारांनी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना काही स्पष्ट सूचना दिल्या होत्या. यानंतर घाडगे पाटील हे लातूरला परतले आणि एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान आज पोलिसांनी त्यांच्या जवाब नोंदवला असून त्यांनी त्यांच्या जबाबात थेट राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी कट रचून आपला आणि सहकाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या विजयकुमार घाडगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शासकीय विश्रामगृहातील भेटीनंतर कार्यक्रम स्थळी दाखल होणार आहेत. अजित पवार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन पार पडणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाणी मुठा नदीच्या पात्राबाहेर गेले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने डेक्कन हद्दीतील नदी पात्रातील रस्त्यावर पाणी वाढलं असून वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. काही चारचाकी गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. सध्या खडकवासला धरणातून 18 हजार हून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरात पाऊस नसला तरी सध्या खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पाऊस असल्याने चार ही धरणांमध्ये 91 टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाणी मुठा नदीच्या पात्राबाहेर आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने डेक्कन हद्दीतील नदी पात्रातील पाणी रस्त्यावर आले आहे. वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे. काही चारचाकी पाण्यात अडकल्या आहेत. सध्या खडकवासला धरणातून 18 हजार हून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरात पाऊस नसला तरी सध्या खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पाऊस असल्याने चार ही धरणांमध्ये 91 टक्के पाणीसाठा आहे.
पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी पोलिसांकडून सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं आहे. एकनाथ खडसेंचें जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर 6 आरोपींना पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना आधीच कोर्टात हजर केलं आहे. यावेळी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तपास अधिका-यांची धावपळ झाली.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना आधीच कोर्टात हजर केले आहे. सहा आरोपींना घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयातून न्यायालयाच्या दिशेने रवाना झाले.
दोनशे दिवस मी शांत राहिलो संयमाने घेतलं. वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात धनंजय मुंडे पहिल्यांदाच आरोपांवर बोलले. मी काही केलं नाही तर मी प्रतिक्रिया कशाला देऊ धनंजय मुंडेंची भाषणात प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे वंजारी समाजासमोर भावनिक झाले.
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणाचा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सध्या मुठा नदीपात्रात सुरू असलेला ११,३१२ क्युसेक्स विसर्ग दुपारी ३ वाजता १५,३७६ क्युसेक्स करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना आणि पुणे शहरातील सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना देत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तारक सिन्हा यांचे २०२१ मध्ये कर्करोगाने निधन झाले, परंतु क्रिकेटमधील त्यांचे योगदान आणि नेहराची ही कहाणी अजूनही लोकांना प्रेरणा देते.
महावितरणच्या वाशीम मंडळातील कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होतं असल्याचा आरोप करत कंत्राटदाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी 16 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलंय. मात्र आज आंदोलनाचा 11 वा दिवस असूनही त्याची कोणतीही दखल महावितरण कडून आत्तापर्यंत घेण्यात आलेली नाही.
गोड बोलवून महिलांना जंगलात न्यायला अन् तिथेच...; जळगावच्या सिरीयल किलरचा भयानक पॅटर्न, दोघींना संपवलं तर तिसरीला....https://t.co/hIBwqHNBOO
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 27, 2025
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील आरसोली लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे.या प्रकल्पातुन भुम शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे भुम करांची पाण्याची चिंता देखील मिटली असुन प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे.
राज उद्धव यांची भेट आम्हाला अत्यंत आनंद झालाय. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या भेटीला गेला यातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सुखावले. सध्या राजकीय अर्थ काढण्याची घाई नाही आहे पण भाऊ भेटले यांचा आनंद असल्याची प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दिली.
प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. 25 ते २८ जुलै पर्यंत बुकिंग केलं होतं. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. १० हजार ३५७ रुपये असे या सूट चे भाडं होतं. एका रूम चे बुकिंग २५ ते २८ तारखेसाठी तरदुसऱ्या रूम चे बुकिंग २६ ते २७ तारखेसाठी करण्यात आलं होतं.
प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. 25 ते २८ जुलै पर्यंत बुकिंग केलं होतं. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. १० हजार ३५७ रुपये असे या सूट चे भाडं होतं. एका रूम चे बुकिंग २५ ते २८ तारखेसाठी तरदुसऱ्या रूम चे बुकिंग २६ ते २७ तारखेसाठी करण्यात आलं होतं.
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरवर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे, "चुप् बैठो नही तो रेड करुंगा...", असेही त्या म्हणाल्या.
विमानतळावर साडेदहा कोटींचा गांजा जप्त करण्यात आला असून यात एकाला अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून १०.४७ किलो ‘हायड्रोपोनिक वीड’ गांजा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने जप्त केला.
या अमली पदार्थाची बाजारभावातील किंमत सुमारे साडेदहा कोटी रुपये असून, अभिनय अमरनाथ यादव या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का चे सेवन सुरु होते. खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती.
रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश होता.
ऐन सणासुदीच्या तोंडावर चणाडाळ महागली.चणाडाळ प्रतिकिलो 80वरून 120 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे गृहिणींचं किचन बजेट कोलमडणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच चिखलदरा घाट रस्त्यामध्ये शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे एक पर्यटकाची गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने 600 फूट खोल दरीतून खाली पडून अपघात झाला या गाडीमध्ये एकूण सहा व्यक्ती होते यामध्ये 4 व्यक्ती व 2 मुलांचा समावेश होता.
परळ टीटी पुलाच्या मोठ्या संरचनात्मक दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. वारंवार खड्डे पडणाऱ्या या पुलाचे आता कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या पुलाच्या मोठ्या दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहेत. एक मार्गिका बंद ठेवून काम केले जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात पाच नवीन महाविद्यालये उघडण्यासाठी परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. त्यात दक्षिण मुंबई आणि दादर पश्चिम भागात प्रत्येकी एक महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचा मुंबई विद्यापीठाचा विचार आहे. त्यामुळे तब्बल १५ वर्षानंतर दक्षिण मुंबईत नवे कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे.
पत्नीला काळ्या रंगावरून टोमणे मारणे, भारतीय दंड संहितेच्या कलम 498 (अ) अंतर्गत क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका पतीची निर्दोष सुटका केली.
बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे कोकणसह राज्यभरातील मान्सून सक्रिय असून, श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मुसळधारेने मुंबईकरांना झोडपून काढले. रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान खात्याने रायगड, पुण्यासह साताऱ्यातील घाटमाथ्यावरील परिसराला ऑरेंज अलर्ट दिलाय.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या तब्बल १२८ कॉलेजांमध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित असल्याचे वास्तव समोर आले आहे, तर यातील सात महाविद्यालयांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी आहेत.
म्हाडाकडून पोलीस वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. पोलिसांनीही चांगली घरे मिळावीत यासाठी म्हाडा काम करीत आहे. त्यानुसार, म्हाडाकडून २७ पैकी १७पोलिस वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मेडिकल महाविद्यालयांमध्ये शेकणाऱ्या यूजी आणि पीजीच्य वेद्यार्थ्यांसाठी 'ई-लायब्ररी' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यत देण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाच्या शक्यतेमुळे विविध बंदरांत पाचव्यांदा धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा झळकविण्यात आला आहे. यामुळे शुक्रवारी दुपारपासूनच गेटवे एलिफंटा, गेटवे जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी
प्रवासी वाहतूक बंद केली आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.