Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
03 June 2024
03 June 2024 18:35 PM

'केंद्रीय निवडणूक आयोग ही भाजपची शाखा', संजय राऊतांची टीका

 

Sanjay Raut : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाचं संजय राऊत यांनी स्वागत करतानाच, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. निवडणूक आयोग ही भाजपची स्वतंत्र शाखा असून, 4 जूनच्या संध्याकाळ नंतर कोण कोणावर कारवाई करतं हे स्पष्ट होईल असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

03 June 2024 17:37 PM

कोल्हापुरात कारने अनेक गाड्या उडवल्या, अपघातात 3 जणांचा मृत्यू

 

Kolhapur Accident : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. सेंट्रो कारने 8 जणांना चिरडत अनेक गाड्यांना उडवलं. यात 3 जण ठार झालेत. ही जीवघेणी कार स्वतः शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरु व्ही एम चव्हाण चालवत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. विशेष म्हणजे तब्येत बरी नसतानाही ते गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तर या भयंकर अपघाताची अंगावर शहारे आणणारी दृश्यं CCTVमध्ये चित्रित झाली आहेत. यातूनच भीषण अपघाताचा थरार दिसून येत आहे. तर याच CCTV फुटेजमध्ये 3 मुली बचावल्याच दिसून येतंय. तसंच दुचाकीवरचं लहान मूलही बचावल्याचं पाहायला मिळतंय. 

03 June 2024 16:51 PM

'उद्धव ठाकरेंवर कारवाई करा',निवडणूक आयोगाचे आदेश

 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करा असे आदेश, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत... 20 मे रोजी मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. मुंबईत मतदानात दिरंगाई होत असल्याचा आरोप उद्धव यांनी या पत्रकार परिषदेत केला होता... तर मतदान सुरू असतानाच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्याची तक्रार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती... त्यावर आयोगानं हे आदेश दिलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

03 June 2024 13:20 PM

IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या

 

IAS Officer Daughter Suicide : आयएएस अधिकारी विकास आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केलीय.  मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये हे आयएएस दाम्पत्य राहतं. त्यांच्या मुलीने राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. पहाटे 4 वाजता ही घटना घडलीय. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत. आत्महत्येनंतर त्यांच्या मुलीला तत्काळ जीटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्याठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आलं. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. हरियाणातील सोनिपत इथं एल.एल.बी. अभ्यासक्रमाचं ती शिक्षण घेत होती. मात्र, शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसल्यानं ती चिंतेत होती. तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवलीय.मृत्यूसाठी तिनं कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. त्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 12:54 PM

भाजप विधानपरिषदेच्या 3 जागा लढवणार

 

Vidhan Parishad Election : भाजप विधान परिषदेच्या तीन जागा लढणारेय. त्यात कोकण पदवीधर मध्ये निरंजन डावखरेंना पुन्हा संधी देण्यात आलीय. मुंबई शिक्षकमध्ये शिवनाथ दराडे तर मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 12:52 PM

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीत तिढा

 

Vidhan Parishad Election : कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीत तिढा वाढलाय...शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय...तर या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरेंना भाजपकडून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...भाजपासोबत युती असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या जागेवर दावा केलाय...तर दुसरीकडे मनसेच्या अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...त्यामुळे मुंबई पदवीधर प्रमाणे आता कोकण पदवीधर मतदारसंघातही महायुतीमधील विसंवाद समोर आलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 12:12 PM

संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा

 

Sanjay Raut : संजय राऊतांनी मोदींच्या ध्यानावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय... प्रधानमंत्री निवडणुकांच्या काळात ध्यान करतात आणि सगळे कॅमेरे त्यांच्याकडे जातात...हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे...तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री दीडशे कलेक्टरांना निर्देश देतायत हेदेखील आचारसंहितेचं उल्लंघन आहे...मात्र, निवडणूक आयोग भाजपच्या एका शाखेप्रमाणे काम करतंय...विरोधकांचं म्हणणं ऐकून घेत नाहीयेत, असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 11:13 AM

जळगावमध्ये जलवाहिनी फुटली

 

Jalgaon Water : जळगावच्या रामेश्वर कॉलनीत महापालिकेची जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलंय. जलवाहिनी फुटून तब्बल दहा ते पंधरा फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. महापालिकेचे कर्मचारी न आल्यामुळे नागरिकांनीच वाया जाणा-या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला. दगड, फरशी लावत नागरिकांनी पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र सकाळी आठ वाजल्यापासून जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू होती त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 10:23 AM

सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर निशाणा

 

Saamana Editorial : सामना अग्रलेखातून राऊतांनी मोदींवर जोरदार निशाणा साधलाय...4 जूनला मतमोजणी झाल्यावर हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल...मोदींनी ध्यान केले आणि सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात...मात्र, मोदींनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत...त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे...एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे...त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही...असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 09:29 AM

मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात

 

Mumbai Water Cut : मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणारेय. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांतील पाणीसाठा वेगानं कमी होतोय.काल हा पाणीसाठा 8 टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. त्यामुळे आता पाण्यासाठी राखीव साठ्यावरच मुंबईकरांची भिस्त आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात येणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 08:49 AM

राज्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

 

Vegetable Price Hike : राज्यात पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झालीय. कोथिंबिरीसह अन्य पालेभाज्यांची आवक घटल्यानं दरात वाढ झालीय. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला 50 ते 60 रुपये मोजावे लागतायेत. पुण्याच्या मार्केट यार्डातील नाशिक आणि लातूरमधून कोथिंबिरीची 80 हजार जुडी दाखल झाली. पालेभाज्यांचे हे दर तेजीत राहणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 08:11 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

 

Election Commission Press Conference : केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणारेय. दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल. लोकसभा निकालाच्या मतमोजणीबाबत माहिती देणार असल्याची माहिती मिळतेय. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी काल निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यानंतर आज आता पत्रकार परिषद होईल. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 08:09 AM

टोलच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ

 

Toll Price Hike : दरवर्षीप्रमाणेच यंदाही टोल दरात मोठी वाढ झालीय.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल दराबाबत मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार आजपासून देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर 5 टक्के अधिक टोल आकारला जाणारेय. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. देशभरात जवळपास अकराशे टोलनाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ केली जाणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

03 June 2024 08:07 AM

अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ

 

Amul Price Hike : अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. आजपासून नवीन दर लागू झालेत. अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल शक्ती दुधाचे दर वाढलेत. उत्पादन खर्च वाढल्यानं दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मात्र यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More