Vidhan Parishad Election : लोकसभेच्या निकालानंतर महायुती मोठी बिघाडी होण्याची शक्यता आहे.. विधान परिषद निवडणुकीसाठी 3 जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत.. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र या मतदारसंघातून भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केलीये... तर सध्या भाजपकडे असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातही शिंदे गटाचे सचिव संजय मोरे तसंच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव शेंडगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. त्यामुळे या तिनही जागांवरुन महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय...मोदी ब्रँड हा संपलाय...भाजपला बहुमत मिळालेलं नाहीये...आमच्याकडेही 250 जागा आहेत...मात्र,दोन बांबूवर बनणारं सरकार कधीही पडू शकतं...असं भाकीत राऊतांनी केलंय...तर चंद्राबाबू, नितीश कुमार तानाशाहीसोबत जाणार नाहीत, असं राऊतांनी म्हटलंय...
Raju Shetty : हातकणंगलेच्या जनतेनं पुन्हा एकदा राजू शेट्टींना नाकारलंय. मात्र, यातून झालेला पराभव राजू शेट्टींच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच लोकसभेत जायचं होतं... पण शेतकऱ्यांनीही साथ दिली नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. धार्मिक ध्रुवीकरण आणि पंतप्रधानपदाच्या मुद्द्याला जनता बळी पडल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. दरम्यान हातकणंगलेमधून शिवसेना नेते धैर्यशील माने यांनी आटातटीच्या लढतीत विजय मिळवलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Beed Manoj Jarange : मराठ्यांची दहशत आता दिल्लीनेही घेतलीय...मराठा समाज एकत्र आल्यावर मतात रूपांतर होतंय हे सर्वांनीच पाहिलंय...अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय...आठ तारखेला अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण होणार आहे...आणि जर सग्या सोयऱ्याची अंमलबजावणीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Heavy Rainfall : पुण्यातील धानोरीमध्ये जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे लक्ष्मी नगरच्या डोंगरावरून मुख्य धानोरी रस्त्यावर पाणी येतंय. या पाण्यामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलंय. वडगाव शेरीमध्येही एका तासात तब्बल 114 मिमी पाऊस झालाय. अनेक गाड्या पाण्यात अडकल्यात. दुकानांमध्येही पाणी शिरलंय. पहिल्याच पावसात नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
North West Mumbai Constituency Election Result : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे अखेरच्या निकालात आघाडीवर असताना फेर मतमोजणी घेण्यात आली आणि यामध्ये कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला...या निकालामध्ये गडबड झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाला संशय आहे, त्यामुळे या निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असून पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे...या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळतेय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
T-20 World Cup - India Vs Ireland Match : टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणारेय. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी मैदानावर हा सामना होणारेय. रात्री आठ वाजता मॅचला सुरुवात होईल. टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार, याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्यात. तर ओपनिंगला रोहित शर्मासोबत विराट कोहली की यशस्वी जैस्वाल येणार याकडंही सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान, आयर्लंडचा पराभव करून विजयाचा श्रीगणेशा गिरवण्यासाठी टीम इंडियानं कसून सराव केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Delhi India Aaghadi Meeting : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालेत.एकट्या भाजपनं बहुमत मिळवलेलं नसून त्यांना सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणारेय. अशातच इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात. त्यामुळे इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते. इंडिया आघाडीतील नेत्यांनीही अशा प्रकारचे संकेत दिलेत. त्यासंदर्भातच आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल. इंडिया आघाडीनं सर्वच्या सर्व 28 पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण दिलंय. उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहणारेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील बैठकीसाठी उपस्थित राहणारेत. यामुळं सरकार कुणाचं येणार? सत्ता परिवर्तन होणार की नेतृत्वबदल होणार? याबाबतची उत्सूकला शिगेला पोहोचलीय.
Delhi NDA Meeting : मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत ही बैठक संध्याकाळी 6 वाजता पार पडेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र एनडीएनं बहुमताचा जादूई आकडा गाठलाय. त्यामुळे, बहुमतासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच आता मोदींच्या पंतप्रधानपदाचं स्वप्न पूर्ण होणारेय. तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीशकुमार किंगमेकर बनलेत. त्यांच्या पाठिंब्याविना भाजपला केंद्रात सरकार स्थापन करता येणार नाही. त्यासाठीच आज एनडीएकडून बैठक बोलावण्यात आलीय. चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार आजच्या बैठकीसाठी उपस्थित राहणारेत. जीतन राम मांझी हे देखील आजच्या बैठकीसाठी उपस्थित असतील.
Pune Car Accident Update : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलीये. पुरावे नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचं रक्त न घेता त्याच्या आईचं रक्त घेतल्याचा आरोप या दोघांवर आहे.. आशपाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड अशी या दोघांची नावं आहेत. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना मुंबईतून ताब्यात घेतलं.. रक्ताचे नमुने चुकिचे देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याचं उघड झालंय.. या प्रकरणात दोन्ही आरोपींना 10जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर आलाय.. कारवार पार करुन मान्सून गोव्यात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीये.. त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. यंदा मान्सून वेळेत दाखल होत असल्यानं शेतक-यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.. दरम्यान आज सकाळपासून कोकणासह मुंबई तसंच पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे.. तळकोकणात तसंच मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची सुरुवातही झालीये.. त्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना थोडा दिलासा मिळालाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Saamana Editorial On Modi & Shah : सामना अग्रलेखातून राऊतांनी मोदी, शाहा, फडणवीसांवर हल्लाबोल केलाय...देशाच्या जनतेने अहंकारी मोदी आणि अमित शाहांना निरोप दिला...एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे...ते टेकूही डळमळीत आहेत. जनतेनं मोदी, अमित शाहांचा अहंकाराचा गाडा रोखलाय...शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केल्याची टीका राऊतांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.