Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

NDA Govt. Cabinet's Formula : एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचे सूत्र ठरलं?

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

NDA Govt. Cabinet's Formula : एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचे सूत्र ठरलं?
LIVE Blog
06 June 2024
06 June 2024 18:16 PM

भाजप महत्त्वाची 4 खाती स्वतःकडे ठेवणार?

 

NDA Govt. Cabinet's Formula : एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचे सूत्र ठरलं? भाजप महत्त्वाचे 4 खाते स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती.. प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रिपद. मोदी तीन-सरकारमध्ये भाजपला मित्र पक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार..  नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला तीन मंत्रिपद. 
राष्ट्रीय लोकजन शक्ती पक्ष राम विलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद. 
जिंतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चा यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद. 
चंदाबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रिपद
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद
अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद
आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट...
जनसेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षाला 1 मंत्रिपद.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

06 June 2024 13:58 PM

उत्तर महाराष्ट्रातील 2 आमदार शरद पवार गटात जाणार?

 

Sharad Pawar Group : उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद तिथं वाढल्याचा परिणाम दिसून येतोय. स्थानिक राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने पवार गटात जाण्याचा अजित पवार गटातील एका आमदाराचा निर्णय जवळपास निश्चित मानला जातोय. तर दुसरीकडं काँग्रेसचा आमदार पक्षात नाराज असल्यानं शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती मिळतेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 13:45 PM

मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक

 

Stone Pelting on Police in Powai : पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आलीये.. पवईमधील जयभीम नगर झोपडपट्टीवर बीएमसीकडून तोडक कारवाई करण्यात आलीये.. या कारवाईविरोधात संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली.. जय भीमनगरमध्ये काही वर्षापूर्वी आग लागली होती.. त्यामुळे अनेक जण बेघर झाले होते.. हे सर्वजणं पुन्हा त्याच ठिकाणी झोपड्यांमध्ये राहु लागले... मात्र ही जागा सरकारी असल्याचा दावा करत बीएमसीनं या सर्व झोपडपट्ट्यांना नोटीस बजावली होती.. दरम्यान आज या झोपडपट्टीवर कारवाई करताना संतप्त नागरिकांनी पोलीस तसंच बीएमसीच्या कर्मचा-यांवर तुफान दगडफेक केली..

06 June 2024 12:36 PM

 नारायण राणे घेणार राज ठाकरेंची भेट

 

Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विजयी उमेदवार नारायण राणे आज राज ठाकरेंची भेट घेणारेत. संध्याकाळी 4च्या सुमारास ते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राणे राज ठाकरेंना भेटणारेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी कोकणात सभाही घेतली होती. त्याचा फायदा राणेंना झालाय. या विजयानंतर राणे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

06 June 2024 12:12 PM

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सोडण्यावर ठाम?

 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सोडण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती...सरकारमध्ये राहून पक्षासाठी विधानसभेची तयारी करण्यावर मर्यादा येतील, त्यामुळे पद सोडण्यावर फडणवीस ठाम...फडणवीस यांनी निर्णय बदलावा यासाठी काल अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली, फडणवीस यांचा निर्णय बदलण्यास नकार...लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपची राज्यातील संघटनात्मक ताकद मजबूत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांचे मत

06 June 2024 11:33 AM

भाजप 5 मंत्रिपद गमावणार?

 

BJP : नवीन सरकारमध्ये भाजपला 5 कॅबिनेट मंत्रिपद गमवावी लागण्याची शक्यताय. नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांना पाच मंत्री पदं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला असल्याचं समजतंय. चंद्राबाबू नायडूंना 3 कॅबिनेट मंत्रिपदं, नितीश कुमारांना 2 कॅबिनेट मंत्रिपदं दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

06 June 2024 11:12 AM

लोकसभा निकालांनी महायुतीची धाकधूक वाढवली

 

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का बसलाय. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित आघाड्यांची मोठी पीछेहाट झाल्याचं दिसतंय. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं तर दुसरीकडे मविआची मात्र 30 जागांवर विजय मिळाला. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाल्याचं दिसून येतंय. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास महायुती पुन्हा सत्तेत येणं कठीण असल्याचं दिसतंय. येत्या 4 महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्यायत. त्यावेळी मतदारांचा कौल असाच राहिल्यास मविआला 150 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मजल 125 जागांपर्यंत जाऊ शकते. राज्यात बहुमताचा जादूई आकडा 145 एवढा आहे. त्यामुळे 150 जागांवर विजय मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत राज्यात मविआ सहजपणे सत्तेत येऊ शकते असंच लोकसभेच्या आकडेवारीवरुन दिसतंय.

06 June 2024 10:32 AM

'फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक', संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

 

Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलीये.. त्यांच्या सुडाच्या राजकारणामुळे मोदी, शाहांवर जेवढा जनतेचा राग आहे तेवढाच राग फडणवीसांवर असल्याची टीका संजय राऊतांनी केलीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 10:12 AM

शरद पवारांची मुंबईत महत्त्वाची बैठक

 

Sharad Pawar :  शरद पवारांची मुंबईत महत्त्वाची बैठक...लोकसभा निकालानंतर शरद पवार गटाची चर्चा.... बैठकीत नेत्यांना करणार मार्गदर्शन आणि सूचना....लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा 10 पैकी 8 जागांवर विजय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 09:58 AM

'भाजप हा मिठाला, शब्दाला जागणार पक्ष नाही', सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल

 

Saamana on BJP : भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही... अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मोदींवर पुन्हा टिकेची झोड उठवलीये.. पाहुयात सामनाच्या आजच्या अग्रलेखात काय आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 09:36 AM

पुण्यात EVMचा डेटा 45 दिवस ठेवण्यात येणार

 

Pune EVM Data : पुण्यातील चारही मतदारसंघातील EVMचा डेटा 45 दिवस ठेवण्यात येणार आहे.. 45 दिवसाच्या आत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आल्यास फेर मतमोजणी केली जाईल.. 45 दिवसानंतर मात्र जिल्हा प्रशासनाकडून EVMमधील सर्व डेटा नष्ट केला जाणार आहे.. तोपर्यंत सर्व EVM या कडक पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 08:55 AM

देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार?

 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला जाण्याची शक्यताय. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांची ते आज भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. या भेटीत उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होणार का याकडे लक्ष असेल. कालच फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि विधानसभेच्या तयारीसाठी सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला केली होती. दरम्यान उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांनाही दिल्लीत बोलावण्यात आलंय. योगी आदित्यनाथ आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होतील. या बैठकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पराभवाबाबत मंथन केलं जाणारेय. 

06 June 2024 08:06 AM

नितीश कुमार दिल्ली मुक्कामी

 

Nitish Kumar : एनडीए सरकारचा शपथविधी होईपर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार दिल्लीतच असणारेत. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर ते बिहारमध्ये परततील. आज दिल्लीत त्यांची जेडीयूच्या खासदारांसोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एनडीएच्या नेत्यांसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनातही जाणार असल्याचं समजतंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 07:55 AM

मुंबईत आज काँग्रेसची बैठक

 

Mumbai Congress Party Meeting : मुंबईत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे.. काँग्रेस मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आलीये. या बैठकीला काँग्रेसचे सर्व 13 नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहे.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या खासदारांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 12च्या सुमारास ही बैठक होणार असून.. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आज नाना पटोले काँग्रेस खासदारांपुढे काय भूमिका मांडणार याकडे सा-यांच लक्ष लागंलय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

06 June 2024 07:45 AM

अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक

 

Ajit Pawar :  लोकसभा पराभवानंतर अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर आलेत... आज ते मुंबईत दोन बैठका घेणार आहेत.. त्यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ अशा कोअर गटाच्या नेत्यांचा समावेश असेल.. सकाळी 10 वाजता देवगिरी निवासस्थानी ही बैठक होईल.. त्यानंतर संध्याकाळी ते सर्व आमदांची बैठक घेणार आहेत.. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगीरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे... तसंच लोकसभेतील पराभवावर चर्चा केली जाणार आहे.. संध्याकाळी 5 वाजता हॉटेल ट्रायडंटमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलीये. 

Read More