Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
07 June 2024
07 June 2024 22:41 PM

'शिंदेंचे आमदार, खासदार ठाकरेंच्या संपर्कात',खासदार संजय राऊतांचा दावा

 

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07 June 2024 21:38 PM

'EVM जिवंत आहे की मेलं?', पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सवाल

 

PM Modi on EVM : EVM जिवंत आहे की मेलं? असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावलाय.. सतत EVMविरोधात टीका करणा-या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं.. आता पुढील 5 वर्ष EVM बद्दल ऐकायला मिळणार नाही असा टोला मोदींनी विरोधकांना लगावलाय.. मोदींना नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय...आजही काँग्रेसची भावना तीच आहे...आम्ही जनतेबरोबर आहोत...जनतेला बॅलेटवर निवडणुका हव्या आहेत...असं पटोले म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07 June 2024 18:38 PM

प्रफुल्ल पटेलांना ईडीकडून मोठा दिलासा

 

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांना ईडीकडून मोठा दिलासा मिळालाय...वरळीतील फ्लॅटची जप्ती ईडीकडून रद्द करण्यात आलीय...गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप होता...PMLA कायद्यांतर्गत वरळीतील पटेलांच्या मालकीच्या 12 व्या आणि 15 व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती केली होती...मात्र, या प्रकरणीत इक्बाल मिर्चीचा संबंध नसल्याचा दावा करत जप्ती रद्द केलीय...जप्त केलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत 180 कोटी इतकी आहे...ED ने 2022 मध्ये पटेलांसह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते...याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा दावा करत जप्ती रद्द केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07 June 2024 18:08 PM

शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 मंत्रिपद?

 

Shivsena, NCP :  शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय..एकनाथ शिंदे, अजित पवारांची भाजप नेतृत्वाशी चर्चा...शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता..दोघांना सध्या प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती

07 June 2024 17:32 PM

'तूर्तास फडणवीसांनी राजीनामा देऊ नका' अमित शाहांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला-सूत्र

 

Amit Shah on  Devendra Fadnavis : तुर्तास राजीनामा देऊ नका, तुमचं काम सुरु ठेवा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. तसंच शपथविधीनंतर पुन्हा सविस्तर बैठक घेतली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशी दोन वेळा अमित शाह यांची भेट घेतली. कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुस-या भेटीत पूर्ण झाली. त्यावेळी अमित शाह यांनी त्यांना ही सूचना केली. सूत्रांकडून ही माहिती झी 24 तासला मिळालीये...

07 June 2024 17:12 PM

'मेलो तरी आता मागे हटणार नाही', मनोज जरांगे आंदोलन करण्यावर ठाम

 

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत...पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारलीय...मात्र, आंदोलनावर जरांगे ठाम आहेत....गोळ्या घाला, जेलमध्ये टाका, मला तुमच्या परवानगीची गरज नाही असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय...फडणवीसांनी आता काड्या करू नयेत, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल...आरक्षण द्या नाहीतर विधानसभेला तुम्हाला हद्दपार करू असा इशारा जरांगेंनी दिलाय...

07 June 2024 16:49 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटींतर फडणवीस शाह यांच्या भेटीला पोहोचलेत...दरम्यान फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं समजतंय. 
07 June 2024 16:16 PM

शिंदे गटाची विधानसभेची तयारी?

 

Shinde Group : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू झालीये....उद्या सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या सर्व नेत्यांची, आमदारांची आणि विधानपरिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आलीये...लोकसभेच्या कोणत्या आमदाराच्या मतदार क्षेत्रात चूक झाली, त्यासोबतच विधानसभेसाठीच्या तयारीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय...यावेळी विधानसभेच्या 288 जागांचा आढावा घेण्यात येणारे...

07 June 2024 15:27 PM

नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट 

 

Narendra Modi met LK Advani : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. NDA आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते, तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, मोदी दुपारी आधी अडवाणी आणि त्यानंतर जोशींच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी मोदींनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. 

07 June 2024 14:21 PM

मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड

 

Delhi NDA Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदींची NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आलीय...नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत...9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल...सेंट्रल हॉलमध्ये येताच मोदींनी संविधानावर डोकं टेकून वंदन केलं...यावेळी राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला...त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार, शिंदे, अजित पवारांनी अनुमोदन केलं...यावेळी नितीश कुमारांनी मोदींना पूर्ण समर्थन दिलं...आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत...लवकर शपथ घ्या असं नितीश कुमार म्हणाले...यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला...तर शिंदेंनी भाजप आणि शिवसेनेचा डीएनए एकच असल्याचं म्हटलं...यावेळी मंचावर NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना विशेष स्थान मिळालं... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 12:51 PM

शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात-सूत्र

 

Shinde Camp MLA : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...शिंदेंचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असून, लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय...लोकसभा निवडणुकीच्या निकालान ठाकरे गटाला चांगलं यश मिळालंय...त्यामुळे काही आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचं बोललं जातंय...त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा परतणारे ते आमदार कोण आहेत याचीच चर्चा सुरूये..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 11:23 AM

एकनाथ शिंदेंशी माझा प्रासंगिक करार - अब्दुल सत्तार

 

Abdul Sattar : एकनाथ शिंदेंशी माझा प्रासंगिक करार...जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा विश्वास माझ्यावर आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे...असं विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय...मी मंत्री आहे तेव्हापर्यंत माझ्या विश्वासाने त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घेतो असं सत्तार यांनी म्हटलंय...त्यामुळे सत्तारांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 11:21 AM

आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा

 

RBI Repo Rate : आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळालाय. आरबीआयकडून पतधोरण जाहीर करण्यात आलंय. यात रेपो रेटमध्ये जैसे थे ठेवण्यात आलाय. त्यामुळे आरबीआयचा रेपो रेट हा 6.50 टक्क्यांवर कायम आहे. रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न करण्यात आल्यानं कर्जदारांच्या ईएमआयमध्ये कुठलीही वाढ होणार नाही. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 09:42 AM

नीट परीक्षेत घोटाळा - रोहित पवार

 

Rohit Pawar On Neet Exam : NEET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय...पेपरफुटी आणि परीक्षांमध्ये होणा-या घोटाळ्यांचे लोण NEET परीक्षेपर्यंत पोहोचलंय...NTA सारख्या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणा-या परीक्षाही पारदर्शकपणे पार पडणार नसतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास तरी कुणावर ठेवावा?...मलिद्यासाठी युवांच्या भविष्याशी खेळणं सरकारला शोभतं का? युवांचा भवितव्याशी खेळणाऱ्या या सरकाराला आता ‘नीट’ रुळावर आणण्याची गरज आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 09:40 AM

नीट परीक्षेत गैरप्रकार?

 

Pune NEET Exam Issue : मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला...लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता निकालावरून वर्तवण्यात येतेय...यावर्षी तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय...त्यामुळे परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 09:16 AM

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार

 

Konkan Padvidhar Election : कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतलीये.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवत मनसेनं या निवडणुकीतून माघार घेतल्याचा माहिती मनसे नेते नितीन सरदेसाईंनी दिलीये.. मनसेचे अभिजीत पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होते... दरम्यान आज सकाळीच भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली... त्यानंतर मनसेनं माघार घेत असल्याचं घोषीत केलं.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 09:09 AM

अजित पवार एनडीए बैठकीला उपस्थित राहणार

 

Ajit Pawar : अजित पवार आज एनडीएच्या बैठकीला दिल्लीत उपस्थित राहणार आहेत...या बैठकीनंतर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची वेगळी भेट होण्याची शक्यता आहे...एनसीपीची लोकसभेतील कामगिरी संदर्भात या बैठकीत विचारमंथन होणार आहे...आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन रणनीती ठरवण्यात येणार आहे...तसंच एनसीपी तर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात कोण असणार यावर चर्चा होईल आणि नावावर निश्चिती होण्याची शक्यताय...मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 09:06 AM

अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्यात बदल

 

Kolhapur : अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याबाबत स्थानिकांनी सुचवलेल्या सूचनेनुसार बदल करण्यात आलाय.. हा आराखडा लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणारेय. अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडयासोबतच जोतिबा प्राधिकरणाचा आराखडा देखील तयार करण्यात आलाय., तो देखील शासनाला सादर केला जाणारेय. स्थानिकांचे योग्य पुनर्वसन, योग्य मोबदला याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 08:36 AM

बीड जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस

 

Beed Rain : बीड जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. तर शेतामध्ये देखील पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली बीड जिल्ह्यातील काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पेरण्या लवकर होतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 08:21 AM

टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की

 

T-20 World Cup - Pakistan Vs USA Match : पाकिस्तान क्रिकेट संघावर वेस्ट इंडिज-अमेरिकेत सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत नवख्या अमेरिकेविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवली. पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 159 धावांचीच मजल मारली. अमेरिकेनं शिस्तबद्ध खेळ करत 159 धावा केल्या आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं 18 धावा केल्या. पाकिस्तानला केवळ तेराच धावा करता आल्या. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 07:51 AM

मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक

 

Mumbai MNS Meeting : मनसेची आज सकाळी 9 वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीये.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलीये.. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ही मनसेची पहिलीच बैठक आहे.. मनसेचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थीत राहणार आहेत.. विधासभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे या बैठकीकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 

07 June 2024 07:49 AM

मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक

 

Mumbai Congress Meeting : मुंबईत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे.. टिळक भवन दादर इथे दुपारी 1 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व नवनियुक्त खासदारांची बैठक होणार आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 June 2024 07:47 AM

एनडीए संसदीय दलाची  बैठक

 

Delhi NDA Meeting : NDA आज सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे... सकाळी 11 वाजता NDAच्या घटकपक्षांची संसदीय दलाची बैठक होणारे...त्यात नरेंद्र मोदींची NDAचे नेते म्हणून निवड करण्यात येणार आहे... मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल...आणि एकमताने मोदींची नेतेपदी निवड करण्यात येईल....यावेळी भाजप आणि NDAतील घटकपक्षांचे नेतेही उपस्थित राहणारेत...मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल... तर संध्याकाळी NDAचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More