Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
08 June 2024
08 June 2024 22:38 PM

कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

 

Rain Alert : मुंबईसह उपनगरांत पुढील 24 तासांसाठी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये... 

 

08 June 2024 21:37 PM

'मराठा आंदोलनाचा निवडणुकीत फटका बसला', देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

 

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचं बोललं जातंय...याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुजोरा दिला...मात्र, जास्त काळ हे टिकणार नसल्याचंही ते म्हणाले...तर मविआच्या पारड्यात मराठा मतं गेल्याचंही त्यांनी सांगितलं....त्याला उत्तर देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुती आणि मविआ दोघांमुळेही मराठा समाजाचं नुकसान झाल्याचं म्हणत...निवडणुका ही आकडेमोड नसते अशा शब्दांत फडणवीसांना सुनावलंय...आणि आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देऊ असा इशाराही जरांगेंनी दिलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

08 June 2024 20:37 PM

'मविआच्या संकुचित वृत्तीचा वंचितला फटका', प्रकाश आंबेडकरांचा मविआवर गंभीर आरोप

 

Prakash Ambedkar on MVA : लोकसभा निवडणुकीतील पराभव स्वीकार करत डॉ. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत....महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलं नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय...वंचित बहुजन आघाडीचा झालेला अपमान आणि महाविकास आघाडीकडून वंचितला मिळालेली संकुचित वागणून हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडल्याचंही आंबेडकर म्हणालेत...त्यांनी यासंदर्भात एक पत्र प्रकाशीत करत त्यांना मविआचा समाचार घेतलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

08 June 2024 19:36 PM

'रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यास टोपी काढणार', अब्दुल सत्तारांचं वक्तव्य

 

Abdul Sattar on Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यास टोपी काढणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले होते..त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते...आता हा प्रश्न विचारला असता त्यांनी विधानसभेनंतर कार्यक्रम घेऊन टोपी काढणार असल्याचं ते म्हणालेत...तर सत्तारांनी बोलावल्यास त्यांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं दानवे म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

08 June 2024 19:11 PM

पुण्यामध्ये जोरदार पाऊस

 

Pune Rain : पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलीये...अनेक ठिकाणी गेल्या दीड तासापासून जोरदार पाऊस बरसतोय... त्यामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालीये.. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले.... तर काही भागात पावसामुळे वाहतूक कोंडी झालीये... यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतायेत....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

08 June 2024 18:14 PM

'पुन्हा उठून उभा राहणार आणि लढत राहणार', लोकसभा पराभवानंतर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

 

Ravindra Dhangekar : आज यश मिळालं म्हणून उद्याही मिळेलच या भ्रमात भाजपने राहू नये. माझा पराभव झाला असला तरी पुन्हा उठून उभा राहणार आणि लढत राहणार अशी प्रतिक्रिया पुण्यातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिलीय.आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

08 June 2024 17:34 PM

राहुल गांधी लोकसभा विरोधी पक्षनेते?

 

Rahul Gandhi :  दिल्लीमध्ये काँग्रेस संसदीय समितीची बैठकी सुरु. यामध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुल गांधी यांची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी असा ठराव, काँग्रेस कार्यकारिणीध्ये दुपारी एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच राहुल गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं, असं मतही अनेक सदस्यांनी यावेळी मांडलं. तर याबाबत विचार करायला वेळ द्यावा अशी विनंती राहुल यांनी केली. 

08 June 2024 16:11 PM

'झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत', सुप्रिया सुळेंची टीका

 

Supriya Sule : नेतृत्त्वात बदल करा किंवा नका करु.. झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत.. असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.. संघानं नेतृत्त्वात बदल करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिलीये.. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

08 June 2024 15:47 PM

'विधानसभेत महायुती 130 जागांवर आघाडीवर', देवेंद्र फडणवीस यांचा दावा

 

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर आणलं....भाजपनं मराठा समाजाला सवलती दिल्या...गुजरातहून जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात...आपलं राजकीय गणित चुकलं...मराठी माणसानं ठाकरे गटाला मत दिलं नाही...उद्धव ठाकरेंना सहानुभूती असा नरेटिव्ह...ठाणे ते कोकणपर्यंत ठाकरेंना जागा नाही...विशिष्ट समाजाच्या मतांवर ठाकरे निवडून आले...ठाकरेंना लोकांनी हद्दपार केलं...ठाकरेंना असलेली सहानुभूती दिसली नाही...देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका...पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका...विधानसभेत महायुती 130 जागांवर आघाडीवर...देवेंद्र फडणवीस यांचा दावा

08 June 2024 15:25 PM

'पडलेले किल्ले आम्ही पुन्हा जिंकणार', देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

 

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही....नव्याने रणनीती ठरवणार...अपयशाची कारणं आपण शोधून काढू...फडणवीस पळणारा व्यक्ती नाही...अपयशाची जबाबदारी माझी...पडलेले किल्ले आम्ही पुन्हा जिंकणार...देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास...विधानसभेच्या तोंडावर माझ्याकडे रणनीती...आम्ही कुठे तरी कमी पडलो...आंध्र प्रदेश, ओडिशात भाजप सरकार आलं...आपण 3 पक्षांशी लढत नव्हतो...खोटा नरेटिव्हशीही आपण लढत होतो...मोदींवर लोकांनी विश्वास दाखवला...संविधान बदलणार असं पसरवलं गेलं...भारताचं  संविधान सर्वात महत्त्वाचं...राज्यातील उद्योग पळवण्याचाही नरेटिव्ह...देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.

 

08 June 2024 14:44 PM

मंत्रिपदासाठी पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब?

 

Praful Patel : केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती मिळतेय...उद्या प्रफुल्ल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 14:09 PM

रक्षकच बनला भक्षक?

 

Bhandara : रक्षकच भक्षक बनल्याचं भंडा-या जिल्ह्यातून समोर आलंय. प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडेच भंडारा उपविभागीय पोलीस अधिका-याने शरीर सुखाची मागणी केली...अधिकाऱ्याविरोधात या तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर अधिका-यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...लाखनी तालुक्यातील तरुणी नागपुरात इंजिनियरिंगचं शिक्षण घेत असताना एका तरुणाच्या प्रेमात पडली. मात्र प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ केल्यामुळे तरुण तक्रार करण्यासाठी केली...मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली...या प्रकरणी चौकशी सुरु झाली असून हा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 13:23 PM

ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेंच्या संपर्कात-म्हस्के

 

Delhi Naresh Mhaske : ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत...उद्धव ठाकरेंचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी केलाय...अपात्रतेचा मुद्दा असल्यामुळे ते 2 खासदार थांबलेयत...6 जण मिळून एकत्र येतील असा खळबळजनक दावा म्हस्केंनी केल्यानं खळबळ उडालीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 12:25 PM

खासदारांचं मेरिट बघून मंत्रिपदाचा निर्णय घेणार - शिंदे

 

CM Eknath Shinde : मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय खासदारांचं मेरिट बघून मंत्रिपदाचा निर्णय घेईन अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'झी 24 तास'ला दिलीय...शिंदे गटात अनेक नावांची चर्चा आहे...श्रीकांत शिंदे, बारणे, प्रतापराव जाधवांच्या नावाची चर्चा आहे...त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे आता लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 12:05 PM

खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करावं - धैर्यशील माने

 

Dhairyasheel Mane On Shrikant Shinde : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केलीय...गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर श्रीकांत मंत्री करावं...केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून डावलू नये असं मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलंय...यावेळी धैर्यशील माने यांनी 2 मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 11:36 AM

मोदींच्या मंत्रिमंडळात बारणे, प्रतापराव जाधवांना संधी?

 

State Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधवांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय...शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे...तर राष्ट्रवादीच्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत आहे...भाजपकडून गडकरी, पियुष गोयल, उदयनराजेंचं नाव चर्चेत? असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 11:13 AM

विशाल अग्रवालच्या MPG क्लबवर हातोडा

 

Mahabaleshwar Vishal Agrawal : महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लब हॉटेलवर अखेर प्रशासनानं बुलडोजर चालवलाय...महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांचं अनधिकृत हॉटेल जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सील केलं होतं...त्यांनतर आज सकाळपासून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं प्रशासनाने अनधिकृत बांधकामे तोडायला सुरुवात केलीय...पुण्यातील कार अपघात प्रकरणानंतर विशाल अग्रवालचा हा क्लब अनधिकृत असल्याचं समोर आलं होतं...त्यानंतर आता यावर कारवाई करण्यात आलीय...

08 June 2024 10:27 AM

मोदींच्या रोडमॅपला JDU आणि TDPचा खोडा?

 

JDU & TDP On Modi Plan : केंद्रात NDA सरकार सत्तेत आले असले तरी JDU आणि TDP किंगमेकर बनले. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं रोडमॅप तयार केला होता. ज्यात 100 दिवसांचा प्लॅन होता. मात्र, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी जुळवून घेताना हा रोडमॅप गुंडाळून ठेवावा लागणारेय, असंच चित्र आहे. मोदींनी घेतलेले अनेक निर्णय JDU आणि TDPला मान्य नाहीत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 09:56 AM

राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार?

 

Delhi Rahul Gandhi : राहुल गांधींना विरोधी पक्षनेता केले जाण्याची शक्यता आहे...काँग्रेस कार्यसमितीची दिल्लीत आज बैठक होणार आहे...या बैठकीत विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे...बैठकीसाठी काँग्रेस नेते आणि खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यायत...काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यांसह सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संसदीय पक्षाचे नेते, त्याचबरोबर सर्व महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलंय...काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत कोणकोणते ठराव पास केले जातात याकडे लक्ष आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 09:04 AM

मोदी 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला-सूत्र

 

Modi 3.0 Cabinet Minister : मोदी 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...भाजपला 18 आणि घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपद देणार असून, घटक पक्षांना 7 कॅबिनेट, 11 राज्यमंत्रिपद दिली जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय...TDP आणि जेडीयूला प्रत्येकी 2-2 मंत्रिपद, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी 1 मंत्रिपद, एलजेपी, जेडीएस, एचएएममधून प्रत्येकी एक मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 08:49 AM

रायगडमध्ये वादळी पावसाचा बळी

 

Raigad : रायगडमध्ये वादळी पावसाचा एक बळी गेलाय. पेण तालुक्यात सापोली इथे शुक्रवारी संध्याकाळी झाड अंगावर पडल्यामुळे एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. यश चंद्रकात नाईक असं या तरुणाचे नाव आहे. तो पानेड आदिवासी वाडी इथला रहिवाशी आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने तो एका झाडाखाली आडोशाला उभा होता. मात्र वादळी वाऱ्यांमुळे हे झाड त्याच्या अंगावर पडले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यश याचा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 08:19 AM

माथेरानची मिनी ट्रेन 4 महिने बंद

 

Matheran Mini Train : पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन आज पासून 4 महिन्यांच्या पावसाळी सुटीवर जाणार आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानची सेवा आज पासून बंद करण्यात आली आहे. मात्र अमन लॉज ते माथेरान ही सेवा सुरू राहणार आहे. दरवर्षी 15 जून पासून पावसाळी कालावधीसाठी ही सेवा बंद होते मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन लवकर असल्याने एका आठवडा आधीच ही सेवा बंद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. 15 ऑक्टोबर नंतर माथेरानची राणी पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

08 June 2024 08:17 AM

मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण

 

Manoj Jarange : आजपासून मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सकाळी 10 वाजता जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होईल. जरांगे यांचं वर्षभरातलं हे चौथ आमरण उपोषण असेल. दरम्यान जरांगेंच्या या आंदोलनामुळे त्रास होत असल्याची 3 गावांची तक्रार तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आलीय. त्यामुळे गोंदी पोलिसांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी नाकारलीय. मात्र तरीही जरांगे उपोषणावर ठाम आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More