Raj Thackeray : एकदा हातामध्ये सगळं द्या, मग बघा मी कसा हाणतो ते असं म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिलाय.. माझ्या हातामध्ये काही द्यायचे नाही. पण अपेक्षा माझ्याकडून फार ठेवायच्या अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केलीय.. सध्या पुण्याचा काय गेम चालूय मला माहिती नाही आणि ज्यांचे गेम चालूयत त्यांना सांगणं काही उपयोगाचं नाही असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय...लाख येथील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना चक्क आई-वडिलांना मलाच मतदान करायला सांगा...आणि आई वडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस तुम्ही जेऊ नका असं आगाऊ सल्ला दिलाय...बांगर यांनी चिमुकल्यांना दिलेल्या सल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, बांगर पुन्हा वादात सापडले आहेत. दरम्यान बांगर यांच्या या अजब सल्ल्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर टीका केलीये.. बांगर यांना मतांचा रोग झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sanjay Raut : वागळे,चौधरी,सरोदे हे सामाजिक कार्यकर्ते फडणवीसांना कुत्र्याची पिल्लं वाटले का असा तीव्र घणाघात राऊतांनी केलाय.. गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.. असं विधान करत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली होती.. त्यालाच राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Firing : पुण्यात गोळीबार झालाय. त्यानंतर आरोपीनं आत्महत्या केलीय. बाणेरमध्ये राहणा-या आकाश जाधव या तरुणावर गोळीबार झाला. आकाशच्याच ओळखीच्या असलेल्या अमित ढमाले यानं गोळीबार केला. औंध भागात जुपिटर हॉस्पिटल जवळच्या दुर्गा कॅफे परिसरात हा गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये आकाश जाधव जखमी झालाय. आकाशवर हल्ला करुन अमित रिक्षातून पळून जात होता... त्यानं रिक्षात बसलेलं असतानाच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पैशाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं समजतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Central Railway : मुंबईच्या मध्य रेल्वेर खोळंबा पाहायला मिळतोय.. मोटरमननी ओव्हरटाईम करण्यासाठी नकार दिल्याने लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय.. मुरलीधर शर्मा या मोटरमननी काल भायखळा येथे आत्महत्या केली होती.. सिग्नल तोडल्याने मोटरमनवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.. मात्र मानसिक तणावात असल्याने त्यांनी आत्महत्या केली.. या मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी मोटरमन गेले होते... मोटरमनच्या ओव्हरटाईमचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे..आताही ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेवर शंभरपेक्षा जास्त लोकल रद्द कराव्या लागल्या
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Baba Siddique : काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. तुमच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झिशानला घेऊन येतो असं प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी जाहीरच करुन टाकलं.. त्यामुळे झिशान सिद्दिकीही प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये राहणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत..
Journalist Nikhil Wagle Car Attack Case : पुण्यात पत्रकार निखिल वागळे हल्ल्याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आलीय. 10 आरोपींना पर्वती पोलिसांनी अटक केलीय. काल निखिल वागळे कार्यक्रमाला जाण्याआधी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित गटाच्या १० जणांना अटक करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : सरकारच्या विरोधात असंतोष...सबका साथ, मित्रों का विकास...संकटात तुमच्या मदतीला कोणी आलं होतं का?..वांद्रे रिक्लेमेशनचं टेंडरही अदानीला...धारावी गेली, मिठागरंही गेली..गुंडगिरीमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय..उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
Narayan Rane on Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना एक दिवस चोप देणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलाय.. भास्कर जाधवांचा भाडोत्री असाही उल्लेख राणेंनी केलाय. तसंच भास्कर जाधवला निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले त्याचा विसर पडल्याची आठवण राणेंनी जाधवांना करुन दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना पुन्हा एकदा सवाल केलाय.. आम्ही साठीच्या पुढे गेलो... आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता केलाय.. नवीन पिढी आल्यानंतर जुनी पिढी त्यांना तयार करुन संधी देते.. मग आम्ही कामात कुठे कमी पडलो... कुठे चुकलो का असा सवालही अजित पवारांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : 25 वर्षांच विकसित भारत बनवणार...25 वर्षात विकसित भारत हे सगळ्यांचं स्वप्न...पेपर लीकविरोधात कठोर कायदा तयार केला..तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले...भारत संशोधनाचं हब बनणार...समुद्र, अवकाश सायबरमध्ये सकारात्मक शक्ती निर्माण करू...नवा कायदा भावी पिढ्यांसाठी संधी...ट्रान्सजेंडर समाजाचंही जगणं सुकर केलं...छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेल प्रकार कमी केला...180 कायद्यांत बदल करून जनतेला ताकद...ट्रान्सजेंडराचा पद्म पुरस्कारानं गौरव केला...60 पेक्षा जास्त बेकायदा कलमं हटवली...निवडणुका देशाची लोकशाही शान वाढवणार...पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : पहिल्या सत्रात 30 बिलं पास, हा नवा रेकॉर्ड...17व्या लोकसभेनं अनेक रेकॉर्ड केले...स्वातंत्र्याची 75 वर्ष घरोघरी साजरी झाली...देशानं वेगानं प्रगती झाली ...अनेक पिढ्यांनी ज्याची वाट पाहिली ते काम झालं..17व्या लोकसभेतले रिफॉर्म्स हेमचेंजर्स ठरले...याच कार्यकाळात कलम 370 हटवलं...370.. हटवल्यानं सामाजिक न्याय मिळाला...एक संविधान हे देशाचं स्वप्न होतं...दहशतवादमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होणार...दहशतवादाविरोधात भारतानं कठोर कारवाई केली... नव्या संसदेचा शुभारंभ नारीशक्ती विधेयकानं ...नारीशक्ती अभिवादन विधेयक दूरगामी परिणाम करणार...3 तलाक मुक्तीचा महत्त्वाचा निर्णय याच कार्यकाळात...3 तलाकपासून मुस्लीम महिलांना मुक्ती...नव्या संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक...75 वर्षांपासून इंग्रजांचे कायदे होते...21 व्या शतकातील नव्या भारताचा पाया रचला... पंतप्रधान मोदी यांची माहिती
PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : ही 5 वर्ष मोठ्या आव्हानांची...कोरोना काळात सगळ्या सदस्यांचं योगदान कौतुकास्पद..कोरोना काळात सदस्यांच्या मानधनात 30% कपात...कोरोना काळात खासदारांकडून मानधनात कपात ...G20मुळे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन जगाला झालं...याच कार्यकाळात देशाला नवं संसद भवन मिळालं...सेंगोल मार्गदर्शकाच्या रुपात कायम राहील..भारताच्या लोकशाहीला जगभऱात प्रतिष्ठा मिळाली..संसदेच्या ग्रंथालयाचे दरवाजे सामान्यांसाठी खुले...भारताला जगभरातून सन्मान मिळाला...पेपरलेस पार्लमेंट, डिजिटल संसदेचं काम झालं...कामाकाजासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करुया...17व्या लोकसभेत 97% कामकाज..18व्या लोकसभेचं 100%कामकाज होणार.. पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य.
PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मची 5 वर्षे...रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म एकाच वेळी होणं दुर्मिळ...देशाच्या सेवेसाठी महत्त्वाचे निर्णय...17व्या लोकसभेतील सदस्यांचं अभिनंदन...लोकसभा अध्यक्षाचे विशेष आभार...देश 17व्या लोकसभेला आशीर्वाद देत राहील...लोकसभा अध्यक्षांचा चेहरा कायम हसरा..मोठ्या धैर्यानं सर्व परिस्थिती हाताळली..अध्यक्षांनी सर्व परिस्थितीचा उत्तम सामना केला..कोरोना काळात संसदेत येणं आव्हानात्मक होतं..कोरोना काळातही संसदेचं कामकाज सुरू राहिलं...संसदेच्या कँटीनमध्ये सगळ्यांसाठी समान दर केले...पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य.
Mumbai Police Action Mode : मुंबई-पुण्यात काही दिवसात झालेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आलेत.. बेकायदा शस्त्र बाळगणा-यांवर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत. यासोबतच परवानाधारक शस्त्र तपासण्याचे आदेशही देण्यात आलेत. मुंबईतील राजकीय व्यक्तींसोबत कुणाचं पूर्ववैमनस्य आहे याची माहिती घेण्याचे तोंडी आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना देण्यात आल्याचं समजतंय. पोलीस स्टेशनमधील गुप्तचर विभागाच्या कर्मचा-यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. मुंबईत 11,500 जणांकडे शस्त्र असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मात्र काही बिल्डर्स, तथाकथित समाजसेवक यांच्या सुरक्षारक्षकांकडे बेकायदा शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ajit Pawar : राज्यात घडलेल्या गोळीबारांमध्ये निष्पाप नागरिकाला कुणी मारलंय असं झालंय का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. जे गोळीबार झाले, ते आपसांतले व्यवहार होते, असं त्यांनी म्हटलंय.
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : घोसाळकरांच्या हत्येवरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जोरदार कलगितुरा रंगलाय. फडणवीस हे निर्ढावलेले, निर्दयीमनाचे, मनोरुग्ण गृहमंत्री आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय...गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील असं विधान फडणवीसांनी केलं होतं...त्यावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय...तर फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Amit Shah Live | Marathi News LIVE Today : देशाला भक्ती आंदोलनाची परंपरा आहे...राम मंदिरात अनेकांचा खारीचा वाटा उचलला...नेतृत्वगुण म्हणजे काय हे मोदींनी दाखवलं..विरोधकांनीही स्वागत करावं...प्राणप्रतिष्ठेआधी मोदींनी 11 दिवस कठोर व्रत केलं...राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवेळी आनंदाचे अश्रू...आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर...देश आनंदात आहे, त्याचं स्वागत करा...10 वर्षांआधी विरोधक खड्डा खणून गेले होते...नरेंद्र मोदी हे माझे नेते आहेत...कोरोना काळातही केंद्र सरकारचं अविरत काम...70 वर्षांनंतर देशाला चांगलं नेतृत्व मिळालं...जगाच्या इतिहासात राममंदिर उल्लेख होईल...भारताच्या गौरवशाली युगाची सुरुवात...गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य.
Amit Shah Live | Marathi News LIVE Today : 22 जानेवारीचा दिवस ऐतिहासिक...रामचरित्र हा भारताचा प्राण...विविध भाषा आणि संस्कृतीत रामायण...अनेक देशांमध्ये रामायणाचं भाषांतर...श्रीराम आपल्या मंदिरात विराजमान...330 वर्षांच्या लढ्याला मोठं यश...पंतप्रधान बोलतात ते करू दाखवतात...सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राममंदिर बनवलं...गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य.
Shirdi Sai Baba Murti : शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज होतेय, काळजी न घेतल्यास भविष्यात मूर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय. 1952 साली समाधी मंदिरात साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र इटालियन मार्बलची ही मूर्ती दिवसेंदिवस झिजत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय. मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करुन डेटा संरक्षित करण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Jalgaon Murder : जळगावच्या चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय...महेंद्र मोरे कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर 4 ते 5 अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून गोळीबार केला होता...गोळीबारात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते...गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते...मात्र, त्यांचाउपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला...मोरेंवर गोळीबार करणाऱ्या सात जणांचा पोलीस शोध घेत असून, तीन विशेष पथकं तैनात करण्यात आलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केलंय.. 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा आणि सगेसोय-यांसंबंधीचा कायदा पारित करा..सगेसोयरे कायदा संमत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच ठेवणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय.. सरकारनं आश्वासन देऊनही अजून गुन्हे मागे घेतलेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sanjay Raut Tweet : खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो ट्विट केलाय...फोटोत दिसणारी व्यक्ती हा नाशिक शहरातील गुंड असल्याचा दावा राऊतांनी केलाय...नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. असं ट्विट राऊतांनी केलंय...हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच म्हणत हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करा...यासाठी SIT स्थापन करा असं आव्हान राऊतांनी दिलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Police : मुंबई-पुण्यात काही दिवसात झालेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आलेत.. बेकायदा शस्त्र बाळगणा-यांवर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत. यासोबतच परवानाधारक शस्त्र तपासण्याचे आदेशही देण्यात आलेत. मुंबईतील राजकीय व्यक्तींसोबत कुणाचं पूर्ववैमनस्य आहे याची माहिती घेण्याचे तोंडी आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना देण्यात आल्याचं समजतंय. पोलीस स्टेशनमधील गुप्तचर विभागाच्या कर्मचा-यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. मुंबईत 11,500 जणांकडे शस्त्र असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मात्र काही बिल्डर्स, तथाकथित समाजसेवक यांच्या सुरक्षारक्षकांकडे बेकायदा शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Vidharbha Unseasonal Rain : पुढील तीन दिवसात विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.. सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलीये.. या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bihar Lalu Prasad Yadav : बिहार राजकारणातली मोठी बातमी.. लालूप्रसाद यादव याचे 12 आमदार नॉटरिचेबल असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीये.. बहुमतचाचणी आधीच आरजेडीला मोठा धक्का बसलाय.. जे आमदार संपर्कात आहेत त्यांच्यावरही संशय आहे.. संपर्कात नसलेले सर्वा 12 आमदार हे मुस्लीम-यादव समीकरणाच्या बाहेरील आहेत.. आनंद मोहन यांचा मुलगा चेतन आनंद आणि मोकामाच्या नीलम देवींनी आधीच आरजेडीची साथ सोडलीये.. त्यात आता डझनभर आमदारांचा संपर्क तुटल्यानं लालूंना मोठा धक्का बसलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार आहे...आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत...अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर बोलण्याची शक्यता आहे...तसंच राज्यातील घडामोडींबाबत ठाकरे बोलणार असल्याची माहिती मिळतेय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय.. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. कोपरगाव तालुक्यातील धोत्रा येथे हा अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गावर एक नादुरुस्त कंटेनर उभा होता दरम्यान शिर्डी कडे भरधाव वेगाने जाणारी कार कंटेनरवर जाऊन आदळली, यात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेतील जखमींना छत्रपती संभाजीनगरात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय..
Budget Session : संसदेच्या बजेट सत्राचा आज शेवटचा दिवस आहे, याचसोबत 17 व्या लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळही आज समाप्त होतोय.. त्याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं शेवटचं भाषण लोकसभेत करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मोदी लोकसभेतल निरोपाचं भाषण करतील. देशासमोरील आव्हानं तसंच भविष्यातील योजनांसंबंधीचा लेखाजोखा पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून मांडतील असं सांगितलं जातंय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनंही मोदींचं भाषण महत्त्वूपूर्ण मानलं जातंय. विरोधकांनी केलेल्या आरोपांना मोदी प्रत्युत्तरही देऊ शकतात..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Manoj Jarange Patil : मराठा बांधवांनी आपआपल्या आमदारांना फोन करावेत असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. सर्व आमदारांनी मराठा आरक्षण कायद्याच्या बाजूनं बोलावं यासाठी आग्रह धरा असं आवाहनही जरांगेंनी केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Manoj Jarange Patil : सग्या सोय-यांच्या कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही...त्यामुळेच आजपासून आमरण उपोषण करत असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय...अंतरवालीत बैठक घेतल्यानंतर जरांगे उपोषणाला बसणार आहेत...राज्य सरकारकडून होणारा दगा फटका मराठा समाजाला परवडणारा नसल्याचंही ते म्हणाले...15 फेब्रुवारीपासून राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरी मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.