Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Modi 3.0 Cabinet : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Modi 3.0 Cabinet : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
LIVE Blog
10 June 2024
10 June 2024 22:38 PM

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती भाजपकडे

 

Modi 3.0 Cabinet : एनडीए सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय.. मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती ही भाजपकडेच ठेवण्यात आली आहेत.. अमित शाह यांना पुन्हा केंद्रीय गृहमंत्री, राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री तर निर्मला सीतारमन यांना पुन्हा अर्थमंत्री बनवण्यात आलंय.. तर नितीन गडकरींना रस्ते वाहतूक मंत्रालय आणि आश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आलंय. याआधीही मोदी मंत्रिमंडळात या मंत्र्यांकडे हीच खाती होती.. जेडीयू रेल्वे मंत्रालयासाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं. मात्र रेल्वेमंत्रीपद भाजपने स्वत:कडेच ठेवलंय. तर शिवराज सिंह चौहान हे देशाचे कृषीमंत्री असतील.. जीतनराम मांझी यांना सुक्ष्म आणि लघू उद्योग मंत्रिपद देण्यात आलंय.. हे मंत्रालय गेल्या वेळेसे नारायण राणे यांच्याकडे होतं. अमित शाहांच्या खात्याचं राज्यमंत्रिपद मुरलीधर मोहोळांना देण्यात आलंय. तर रक्षा खडसेंना क्रीडा खात्याचं राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

10 June 2024 17:55 PM

अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने अमोल काळे यांचं निधन

 

Amol Kale Death : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय.. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला... 2022 च्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळेंनी माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा पराभव करत अध्यक्षपद पटकावलं होतं. रविवारी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान मॅच पाहिली होती..  त्यांच्यासोबत या मॅचला एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि पदाधिकारी सूरज सामंत उपस्थित होते. अमोल काळेंच्याच काळात वानखेडेवर 2023 च्या वन डे वर्ल्ड कप मॅचचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. अमोल काळेंच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरलीय. 

 

10 June 2024 13:18 PM

7 राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक जाहीर 

 

Vidhansabha By Poll Election : 7 राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालीय...7 राज्यांमध्ये 13 विधानसभा मतदारसंघात 10 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे...या पोटनिवडणुकीत महाराष्ट्रातील जागेचा समावेश नाहीये...बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा पोटनिवडणूक होणाराय...

10 June 2024 12:16 PM

राज्यात सत्ता मिळवणं एकच लक्ष्य - शरद पवार

 

Pune Sharad Pawar : लोकसभेतील यशानंतर विधानसभा जिंकण्यासाठी शरद पवारांनी निर्धार केलाय...आता राज्यातील सत्ता मिळवणं एकच लक्ष्य आहे...त्यासाठी कामाला लागा, सत्तेचा उपयोग अधिक लोकांना, शेवटच्या घटकापर्यंत कसा होईल हे सूत्र मनात ठेवून काम करा असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

 

10 June 2024 12:11 PM

केंद्रातील मंत्रिपदावरून अजित पवार आणि शिंदेंवर विरोधकांचा निशाणा

 

Vijay Wadettiwar, Sanjay Raut On Eknath Shinde & Ajit Pawar : केंद्रातील मंत्रिपदावरून अजित पवार आणि शिंदेंवर विरोधकांनी निशाणा साधलाय...मानसन्मान हा संख्याबळावर मिळतो...अजित पवारांकडे सन्मान करण्यासारखं राहिलंय काय...? त्यांची बार्गेनिंग पॉवर संपलीय अशी टीका वडेट्टीवारांनी केलीय...तर अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला असून, नकली शिवसेनेच्या तोंडावर राज्यमंत्रिपद फेकलंय असा टोला राऊतांनी लगावलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 12:08 PM

किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मंजूर

 

Kisan Sanman Nidhi : नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारलाय...पदभार स्वीकारताच मोदींनी शेतक-यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतलाय...किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मोदींनी मंजूर केलाय...कालच मोदींनी पंतप्रधानपदाची तिस-यांदा शपथ घेतली...त्यानंतर मोदी कामाला लागलेयत...पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेत 9.3 कोटी शेतक-यांना दिलासा दिलाय...

10 June 2024 11:43 AM

जम्मूत लष्कराकडून सर्च ऑपरेशन

 

Jammu Update : जम्मूच्या रियासीमध्ये झालेल्या भाविकांच्या बसवर 4 दहशतवादी संघटनेनं हल्ला केल्याची माहिती आता समोर येतीय. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर अबू हमजा, फौजी आणि दहशतवादी आदून या  दहशतवाद्यांचाही या हल्ल्यात सहभाग असल्याची माहिती समोर आलीय. राजौरी, थानामंडी आणि सुरनकोटमध्ये झालेल्या हल्ल्यातही अबू हमजाचा सहभाग होता. दहशतवाद्यांनी इंसास रायफलने भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याचीही माहिती मिळतेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 11:22 AM

बोगस वाण विक्रीची तक्रार नोंदवा-मुंडे

 

Dhananjay Munde : बोगस बी-बियाणं विक्रीची तक्रार शेतक-यांना व्हॉट्सऍपवर नोंदवता येणारेय. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी शेतक-यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बी-बियाण्यांची चढ्या दरानं विक्री, बोगस वाण विक्री, खरेदीसाठी होणारी सक्ती टाळण्यासाठी कृषी विभागानं व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय. शेतक-यांनी पुढं येऊन तक्रार करावी असं आवाहन धनंजय मुंडे यांनी शेतक-यांना केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 10:18 AM

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची आज बैठक

 

Mumbai Shinde Camp Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज आमदार, खासदारांची बैठक होणाराय... येणा-या विधानसभा निवडणुकीत कसे सामोरे जायाचे, कोणत्या मुद्यावर लक्ष केंद्रित करायचे यावर चर्चा केली जाणार आहे...तर लोकसभेत किती मतदान कोणाला झाले याचादेखील आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...लोकसभेप्रमाणे विधानसभेला उमेदवारी उशीरा घोषित न करता लवकर उमेदवारी घोषित करण्यासाठी तयारी सुरू आहे...तसंच विधानसभेला खासदारांची कशी मदत होईल याचंही प्लानिंग केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 09:11 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन

 

NCP Foundation Day : राष्ट्रवादीचे दोन्ही गट आज 25 वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत...राष्ट्रवादी शरद पवार गट नगरमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे तर अजित पवार गट मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा करणार आहे...तर शरद पवार गटाचा वर्धापन दिन यावेळी खास असणार आहे...कारण, पक्षफुटीनंतर शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालंय...त्यामुळे यंदाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचं कळतंय...अहमदनगरच्या न्यू आर्ट कॉलेजच्या मैदानात हा कार्यक्रम होणार...संध्याकाळी 5 वाजता शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील सर्व आमदार नेते कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत...दोन्ही वेगवेगळ्या मेळ्यात अजित पवार आणि शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 09:09 AM

ठाकरे गट खासदार-आमदारांची आज बैठक

 

Mumbai Thackeray Camp Meeting : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मुंबईत महत्त्वाची बैठक होणारेय. सेनाभवनात होणा-या या बैठकीला आमदार आणि नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत. लोकसभेचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 09:06 AM

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार

 

Maharashtra Cabinet Expansion Soon : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे...लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जणाराय...अनेक महिन्यांपासून रखडलेला विस्तार लवकरच केला जाणार असून, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी केलीय...यावेळी तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे...तसंच नवीन चेह-यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 08:48 AM

सोलापुरात पावसाचा हाहाकार

 

Solapur Rain : सोलापूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावलीये....पावसामुळे गणेश पेठ, मंगळवार बाजारात कमरेपर्यंत पाणी साचलंय... रस्त्यावर उभ्या गाड्याही पाण्याखाली गेल्यात....सैफुल, गुरुवार पेठ भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय..... काल संध्याकाळपासून हा पाऊस सुरूये...ग्रामीण भागातही जोरदार पाऊस पडलाय...त्यामुळे धूळ पेरणी केलेल्या शेतक-यांना दिलासा मिळालाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -

10 June 2024 08:45 AM

पुण्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद

 

Pune Record Break Rain : पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झालीय.  जून महिना संपायच्या आतच वार्षिक सरासरीच्या 41 टक्के पाऊस पुण्यात झाला. त्याचप्रमाणे यंदाच्या पावसानं शहरातील जून महिन्याची सरासरीही ओलांडलीय. पुण्यात आत्तापर्यंत 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुण्यात जून मध्ये सरासरी 184 मिलीमीटर पाऊस पडतो. यावर्षी आतापर्यंत 209 मिलिमीटर पाऊस पडला आहे. इतकच नाही तर शनिवारी झालेल्या पावसानं एका दिवसातील पावसाचा विक्रम साधला आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये पुण्यात 117.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तब्बल 33 वर्षांनी एका दिवसात इतका पाऊस पडला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 07:29 AM

टीम इंडियाचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय

 

T-20 World Cup - India vs Pakistan : टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवलाय...गोलंदाजांनी पाकिस्तानला 113 धावांवरच रोखण्यात यश मिळवलं...जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताचा शानदार विजय झालाय...टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर रोखलं. टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बुमराहने 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा 1 विकेट घेतली. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांचं आव्हान राहिलं. अर्शदीपने या 18 धावांचा बचाव करत फक्त 12 धावा दिल्या आणि टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला...भारताने पाकिस्तानला लोळवल्याने क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 June 2024 07:27 AM

मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता

 

IMD Heavy Rainfall Alert : मुंबईत गडगडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय...पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...तर ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे...सिंधुदुर्गासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी केलाय...त्यामुळे मुंबईसह कोकणात आज तुफान पावसाची शक्यताय...दरम्यान काल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पहायला मिळाली. सायन, माटुंगा, दादर, परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More