Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: कोकण म्हाडा लॉटरीला मुदतवाढ

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 10 August 2025: महाराष्ट्रातील राजकारण, पावसाचे वातावरण तसेच विविध शहरातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News Today LIVE:  कोकण म्हाडा लॉटरीला मुदतवाढ
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 August 2025: राज्यात सध्या अनेक मुद्दे चर्चेत असून, त्यासंबंधीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर जाणून घ्या. दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकारणातील आणि ग्रामीण भागासोबत इतर क्षेत्रातील बातम्या येथे वाचा.

11 August 2025
11 August 2025 20:36 PM

कोकण म्हाडा लॉटरीला मुदतवाढ

म्हाडा, किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने, जुलै मध्ये गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. यावेळी, कोकण बोर्ड एकूण ५,२८५ फ्लॅट्स आणि ७७ निवासी भूखंड विक्रीसाठी देत आहे. आज कोकण म्हाडा मुदत वाढ 26 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे.

11 August 2025 19:05 PM

मुंबई पोलिसांकडून कॉमेडियन कपिल शर्माला सुरक्षा

मुंबई पोलिसानी कॉमेडियन कपिल शर्माला सुरक्षा पुरवली आहे.कॅनडामध्ये कपिलच्या कॅफेवर बिश्नोई गँगकडून गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आलंय.

11 August 2025 18:23 PM

मुंबई पोलिसांची बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात धडक मोहीम

मुंबई पोलिसांची बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात धडक मोहीम सुरु झाली आहे. जवळपास १ हजार बांगलादेशींना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यात आलंय. वेगवेगळ्या हद्दीत लपून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर मुंबई पोलिसांची कारवाई पाहायला मिळालीय 
आतापर्यंतच्या माहितीनुसार एक हजारहून अधिक बांग्लादेशी नागरिकांना कायदेशीर कारवाईनंतर डिपोर्ट (प्रत्यार्पण)  करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

11 August 2025 17:28 PM

'राहुल गांधी यांची 'मतचोरी' वरील विशेष पत्रकार परिषद मुंबईतील चौकाचौकात दाखवली जाणार'

राहुल गांधी यांची 'मतचोरी' वरील विशेष पत्रकार परिषद मोठ्या स्क्रीन लावून मुंबईतील चौकाचौकात दाखवली जाणार आहे.मुंबई काँग्रेस कडून लोकसभा, विधानसभा मतदार संघात आणि मुंबईच्या वॉर्ड मध्ये ही पत्रकार परिषद दाखवली जाणार आहे.राहुल गांधींची विशेष पत्रकार परिषद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी   राहुल गांधींची  'मतचोरी'ची विशेष पत्रकार परिषद मोठ्या TV/LED वर दाखवण्याची व्यवस्था करण्याच्या सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी यांना पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत.

11 August 2025 17:01 PM
11 August 2025 15:58 PM

जिवंत असताना मुंडे साहेब यांनी मला वारस घोषित केलं- पंकजा मुंडे 

जिवंत असताना मुंडे साहेब यांनी मला वारस घोषित केलं. संघर्ष कोण करू शकतो पाठीचा कणा ताठ आहे.बेरजेचं राजकारण करायच ही बाबांची शिकवण असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

11 August 2025 15:53 PM
11 August 2025 14:16 PM

शिक्षण, आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat : शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरचा आहेर दिलाय.. देशातील महागडे शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पूर्वी ही क्षेत्रे सेवेचे साधन मानली जात होती, परंतु आता त्यांचे पूर्णपणे व्यापारीकरण झाल्याचं सरसंघचालकांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 August 2025 14:16 PM

भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी, शिवसेना ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन

राज्यातील महायुती सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाची हाक दिलेय. महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटातर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. काही मंत्र्यांच्या कार्यप्रणाली विरोधात सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून अश्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.

11 August 2025 13:41 PM

मुंबईतील कबुतरखान्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईतील कबुतरखान्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशात कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. त्यामुळे 'हायकोर्टात जाऊन आदेशात दुरुस्ती मागू शकता' असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे या पुढे मुंबईतील कबुतरखाने बंदच राहणार आहेत

11 August 2025 13:06 PM

आता महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा व्हावी, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

दादर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून महायुती सरकारच्या कलंकीत आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणात बोलताना यापुढे महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा व्हावी असं म्हणत थेट भाजपवर निशाणा साधला आहे. 

11 August 2025 12:55 PM

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आंदोलनस्थळी दाखल

मुंबईतील दादर या परिसरात जनआक्रोश आंदोलन पार पडत आहे. महायुती सरकारच्या कलंकीत आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी आज आंदोलनाच्या माध्यमातून केली जातेय. आंदोलनास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील आंदोलन स्थळी पोहोचले आहेत. 

11 August 2025 12:24 PM

दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा, पोलिसांनी राहुल गांधींना घेतलं ताब्यात 

निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली आज इंडिया आघाडीने मोर्चा काढला आहे. यावेळी काही खासदारांनी मोर्चा अडवल्यामुळे बॅरिगेटवर चढून आंदोलन केलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधीसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. 

11 August 2025 12:14 PM

ठाकरेंच्या शिवसेनेचे आज महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन

ठाकरेंच्या शिवसेनेचे आज महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन. महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी आंदोलनातून मागणी केली जात आहे. ठाकरेंची शिवसेनेचा राज्यभर सरकारवर हल्लाबोल.  नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून शालिमार येथे निदर्शने. 

11 August 2025 11:55 AM

 इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला, बॅरिकेटवर चढून खासदारांचं आंदोलन

दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी मोर्चा सुरू झालाय. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात संसद भवनापासून हा मोर्चा सुरू झालाय. मोर्चात जवळपास 300 खासदार सहभागी झाले आहेत. संसद भवनापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. निवडणूक मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

11 August 2025 11:55 AM

दिल्लीतील इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

राजधानी दिल्लीत मतचोरीविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार. संसद भवन ते EC कार्यालयापर्यंत मोर्चा. राहुल गांधी, प्रियांका गांधींसह शरद पवारांसह 300 खासदारांचा सहभाग. इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

11 August 2025 11:39 AM

मुलांना Day Care मध्ये ठेवण्याआधी विचार करा! 15 महिन्याच्या बाळाची काय अवस्था झाली पाहा; संपूर्ण अंगभर जखमा

11 August 2025 11:38 AM

उपराष्ट्रपती अचानक कुठे गायब झाले? संजय राऊतांचं गृहमंत्री अमित शाहांना पत्र, '21 जुलैला खरगेंशी बाचाबाचीनंतर...'

11 August 2025 11:37 AM

भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पतीने बाईकला बांधून नेला मृतदेह; सर्वांपुढे हात जोडूनही मिळाली नाही मदत

11 August 2025 11:35 AM

ऑपरेशन सिंदूरनंतर हात जोडणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! अमेरिकेतून धमकी, म्हणाले 'भारतासह अर्धे जग बुडवून....'

11 August 2025 11:09 AM
11 August 2025 11:05 AM

दिल्लीत आज इंडिया आघाडीचा मोर्चा तर राज्यात शिवसेना UBTचा मोर्चा

दिल्लीत आज इंडिया आघाडीचा मोर्चा निघतोय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे.तर राज्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभर आंदोलन सुरु केलंय. महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येनं सामील होण्याचं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं आहे.

11 August 2025 10:21 AM

कोस्टल रोडवर वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या चालकांना दणका

कोस्टल रोडवर वेगमर्यादेचं उल्लंघन करणा-या वाहनचालकांना आरटीओनं दणका दिलाय. 7 महिन्यांत चार हजारांहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केलीय. या कारवाई आरटीओने तब्बल 82 लाखांचा दंड वसूल केलाय. 

11 August 2025 09:47 AM

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयाची हंडी आम्हीच फोडणार - महेंद्र दळवी

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार असा दावा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. अलिबागमध्ये साई क्रीडा मंडळ आयोजित गोविंदा पथकांच्या सराव शिबिरादरम्यान ते बोलत होते. दिलीप भोईर आणि मी एकत्र आल्याने आमची ताकद वाढली आहे. विरोधकांकडे केवळ आरोप करण्याचं काम उरल्याचं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत दिलीप भोईर यांनी दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश करून महेंद्र दळवी यांची साथ दिली आहे. 

11 August 2025 09:30 AM

सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. येत्या काळ्यात आणखी दोन तीन घटना घडणार असल्याचा दावाही चंद्रकांत पाटलांनी केलाय. त्यामुळे कोणता बडा नेता भाजपच्या गळाला लागला याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्यात.

11 August 2025 09:23 AM

महादेवी हत्तीनी प्रकरणी आज कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तीनीचा ताबा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाला मिळावा यासाठी नांदणी मठ,वनतारा आणि राज्य सरकारच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे. मुंबईमध्ये आज राज्य सरकारचे वकील, वनतारा आणि नांदणी मठाचे वकील यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये पुनर्विचार याचिकेचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे.

11 August 2025 08:57 AM

इगतपुरीत सीबीआयचे छापे, बेकायदा कॉल सेंटरच्या रॅकेटचा पर्दाफाश

नाशिकच्या इगतपुरीत सीबीआयने रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर धाड टाकली. या धाडीत 1 कोटी 20लाखांची रोकड, 500 ग्रॅम सोने, 7 कार, 44 लॅपटॉप जप्त करण्यात आलेत. रिसॉर्टमध्ये  बेकायदेशीर कॉल सेंटर सुरु होतं यासाठी 60 ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती. स्थानिक पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ होते.  ईगतपुरीतील या रिसॉर्टसवर नियंत्रण कोणाचं ? असा सवाल आता उपस्थित होतोय. 

11 August 2025 08:04 AM

मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेने कबुतरखान्यावर रात्री ताडपत्री टाकली

दादर येथील कबूतरखान्यावरून राजकारण होताना दिसून येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने कबूतरखाना येथील कबुतरांना धान्य दिल्यास गुन्हा दाखल होईल असे आदेश सर्वोच्च न्यायालय दिले आहे.  त्यानंतर जैन समाज आक्रमक झालेला आपल्याला दिसून आलं. मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकली होती. मात्र, जैन समाजाने ताडपत्री काढण्याचं काम केलं. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने रात्री पुन्हा एकदा ताडपत्री कबूतरखाण्यावर टाकलेली आहे. त्यामुळे जैन समाज आक्रमक होऊ नये यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

11 August 2025 07:37 AM

पुण्यात काँग्रेसचं मंथन शिबिर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे दोन दिवसीय राज्यव्यापी कार्यशाळेला आज पुण्यात सुरुवात होणार आहे. आज आणि उद्या होणाऱ्या या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून 300 हून अधिक काँग्रेसचे कार्यकर्ते, माजी मंत्री, खासदार आणि आमदार सहभागी होणारेत. पक्ष संघटन बळकटीकरण, आगामी निवडणूक रणनीती आणि जनसंपर्क मोहिमेवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांमधील संवादाद्वारे पक्षाची दिशा ठरविण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जातेय.

11 August 2025 07:01 AM

 हिंगोली- औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची श्रावनातील तिसऱ्या सोमवारी मोठी गर्दी झालीय. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांचे लवकर दर्शन व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून बम बम भोले,नागनाथ प्रभू कज जयच्या घोषणांनी मंदिर दुमदुमून गेले आहे.

11 August 2025 06:38 AM

मॅरेथॉननंतर हृदयविकाराच्या झटक्याने स्पर्धकाचा मृत्यू 

ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवाती बेन्नी असे मृत्यू झालेल्या स्पर्धकाचे नाव आहे.स्पर्धेत धावून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाण्यातील हॅपी वॅली परिसरात राहणारे देवाती बेन्नी हे दरवर्षी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत होते. विशेष म्हणजे ते दररोज व्यायाम शाळेतही जात होते. वर्षा मॅरेथॉनसाठी त्यांनी विशेष मेहनतही घेतली होती. ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या 31 व्या वर्षा मॅरेथॉन मध्ये 21 किमी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता.

11 August 2025 06:34 AM

इंडिया आघाडीचा आज दिल्लीत मोर्चा   

इंडिया आघाडीचा आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण चांगलच तापलं असून घोटाळ्याविरुद्ध संसद आणि बाहेरही लढा उभारण्याचा निर्णय सर्वच विरोधी पक्षांनी घेतला आहे. इंडिया आघाडी आज मोर्चा काढणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणूक मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या एकमत झालंय. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन उद्या दिल्लीत मोर्चा काढणार आहेत.

11 August 2025 06:29 AM

भीमाशंकर येथे तिसऱ्या सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर  येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली असून बम बम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय होऊन गेला  आहे. मंदिर परिसर हा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे. 

Read More