Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
12 June 2024
12 June 2024 21:09 PM

'4 महिन्यात सरकार बदलायचंय', शरद पवारांनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग

 

Sharad Pawar : 4 महिन्यात सरकार बदलायचंय... तुमची साथ हवी... अशी साद शेतक-यांना घालत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे... शरद पवार आज इंदापूरमधल्या निरवांगी इथे दुष्काळ पाहणी दौ-यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले.. तेव्हाच ग्रामस्थांसोबत संवाद साधताना पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.. त्यासोबतच दुधाला अनुदान न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धारही पवारांनी बोलून दाखवलाय..

 

12 June 2024 20:38 PM

बच्चू कडू विधानसभा स्वबळावर लढणार

 

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा...बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणारेत...महायुतीतून बच्चू कडू निवडणूक लढवणार नाहीयेत...नागपूरमध्ये ते बोलत होते...बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

12 June 2024 20:17 PM

 पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन हत्या प्रकरण, पुट्टेवार जादूटोणा करत असल्याचा सूनेचा आरोप

 

Nagpur Hit and Run Case : पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन हत्या प्रकरण अर्चना पुट्टेवार यांनी मोठा आरोप केलाय... सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार खूप धार्मिक वृत्तीचे होते, ते अति जास्त पूजा पाठ करायचे, ते जादूटोणाचाही वापर करायचे असा संशय अर्चना यांनी व्यक्त केलाय...अर्चना पुट्टेवार यांचा एक भाऊ आणि बहीण या दोघांचे काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला असे ही अर्चना यांनी पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती आहे..

12 June 2024 19:16 PM

'आमदार संदीप धुर्वेंनी मिशी काढावी', खासदार  प्रतिभा धानोरकरांकडून धुर्वेंचा समाचार

 

Prathibha Dhanorkar on Sandeep Dhurve : आमदार संदीप धुर्वे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मिशा काढावी, असा चिमटा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काढला. काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकरांचं आर्णी विधानसभेतील विकासकामं दाखवली तर मिशी काढू, असं विधान भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वेंनी केलं होतं. या विधानाची आज खासदार धानोरकरांनी आठवण करून दिलीय

12 June 2024 18:07 PM

'मुख्यमंत्र्यांचे ओएसडी षडयंत्र रचतायत', मनोज जरांगेंचा आरोप

 

Manoj Jarange on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय... थोड्याच दिवसात त्यांचं षडयंत्र उघडं पाडण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण स्थगित करणार.. जर सरकार असंच खेळवत राहिल तर मात्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 June 2024 17:39 PM

द. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

 

Kuwait Fire: Kuwait Fire : दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला भीषण आग लागलीय.. यात 41 लोकांचा दुर्देवी मृत्यू झालाय.. मृतांमध्ये बहुतांश भारतीयांचाही समावेश आहे.. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत भारतीय मजूर राहत असल्याची माहिती मिळतेय. मंजफ शहरात ही घटना घडलीय. आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे... या आगीत 50 पेक्षा जास्त जण जखमी झालेत..

12 June 2024 16:31 PM

'मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?', बजरंग सोनावणेंचा अमोल मिटकरींना टोला

 

Bajrang Sonwane on Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं होतं.त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच बजरंग सोनवणे यांनी ‘अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?’, असा सणसणीत टोला लगावला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 June 2024 16:15 PM

ठाकरे गट विधानसभा स्वबळावर लढणार?

 

Thackeray Group : आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीनं लढवली जाणार असली तरी 288 जागांच्या तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्यात. शिवसेना भवनात आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. महाविकास आघाडीमध्ये ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. विधानसभा संपर्कप्रमुखांनी आठवडाभरात आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिल्या. विधानसभानिहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेलं मताधिक्य याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे.

 

12 June 2024 13:54 PM

सत्ता डोक्यात गेली की जनता निर्णय घेते - शरद पवार

 

Sharad Pawar : सत्ता डोक्यात गेली तर देशातील लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावलाय. लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यानं शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केलीय. तर आज आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू आणि बिहारचे नितीश कुमार नसते तर भाजप सत्तेत आली नसती, असा टोला पवारांनी भाजपला लगावलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 13:33 PM

मनसेनं महायुतीकडे 20 जागा मागितल्या?

 

MNS : महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी 20 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरातील आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 13:01 PM

रामटेकमध्ये ठाकरे गट-काँग्रेस आमनेसामने

 

Ramtek : रामटेक विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पुन्हा आमने-सामने आलेत... काँग्रेसने रामटेकवर दावा केल्यानंतर लगेच ठाकरे गटाने तातडीने पदाधिका-यांचा मेळावा घेत रामटेकवर आपला दावा सांगीतलाय. महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही, तरिही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विशाल बरबटे विधानसभेच्या तयारीला लागलेय. त्यांनी रामटेक विधानसभा लढण्याचा निर्धार केलाय तर लोकसभा निवडणूक निकालानंतर रश्मी बर्वेंनी रामटेक निधानसभा काँग्रेस लढणार असल्याचा दावा केला... त्यानंतर ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरें भेट घेतलीये.

12 June 2024 12:04 PM

डोंबिवलीत पुन्हा आगडोंब

 

Dombivli Fire : डोंबिवली एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीत आग लागल्याची घटना घडलीय. MIDC फेज 2 मधील इंडो अमाईन्स या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलीय. त्यात कंपनीचे तीनही प्लांट जळून खाक झालेत. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरुय. मात्र कंपनीत केमिकल असल्यानं आग पसरत चाललीय. शेजारच्या मालदे कंपनीलाही आगीनं वेढलंय. तसंच अभिनव शाळेजवळच ही कंपनी असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसलीय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेच्या वाहनांनी देखील पेट घेतलाय. 

बातमी पाहा - Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

12 June 2024 11:24 AM

संंघाच्या मुखपत्रातून भाजपची खरडपट्टी

 

RSS Organiser Critizes On BJP : सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा नारा देणारा भाजप 240 जागांवरच अडखळला. याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचीच हवा असल्याच्या अतिआत्मविश्वासात असलेले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ‘ग्राउंड रिऍलिटी’पासून अनभिज्ञ राहिले. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला. त्यामुळे पदरी अपयश आले, अशा शब्दांत ऑर्गनायझरमधून खडे बोल सुनावण्यात आलेत. संघाचे स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय. यासोबतच भगव्या दहशतवादाचे आरोप करणा-या, 26/11 ला संघाचे कटकारस्थान म्हणणा-या आणि संघाला दहशतवादी संघटना असं संबोधणा-या काँग्रेस नेत्याला भाजपत प्रवेश देण्यात आला. यामुळे संघ स्वयंसेवकांची मनं दुखावली याकडेही लेखात लक्ष वेधण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 10:14 AM

प्रतापराव चिखलीकरांचा रोख कुणावर?

 

Nanded Prataprao Chikhalikar : नांदेडमधून झालेला पराभव माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. औकात नसलेल्यांना पक्षानं मोठं करण्याचं काम केल्याचा आरोप चिखलीकरांनी केलाय.. एक दोन लोकं आहेत, ज्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असा इशाराच चिखलीकरांनी दिलाय... काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 09:47 AM

नागपूर मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध

 

Nagpur Jail Rada : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये टोळीयुद्ध भडकलंय... दोन्ही गटातील कैद्यांनी एकमेकांवर हल्ला केला.. यामध्ये तीन कैदी जखमी झालेत.. या प्रकरणी सात कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका कैद्यानं दुस-या कैद्याच्या प्रेयसीबाबत अपशब्द वापरल्यानं हा वाद सुरु झाला.. यानंतर झालेल्या हाणामारीत 
सुरज कार्लेवार ,मोहम्मद शाकिब अन्सारी आणि वृषभ कावळे हे कैदी जखमी झालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 09:33 AM

रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार

 

Teacher Recruitment : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू होणारेय. शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिल्याचं स्पष्ट केलंय. मात्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रक्रिया राबवताना घ्यावी लागणारेय. 25 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणारेय. दरम्यान समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 09:31 AM

शालेय पोषण आहारात बदल होणार

 

School Mid Day Meal : लवकरच शालेय पोषण आहारात बदल होणारेय. विद्यार्थी पोषण आहारातील खिचडी खाऊन कंटाळलेत. त्यामुळे त्यांच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. यानुसार पोषण आहारात 15 वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात येणारेय. मात्र त्यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद न केल्यानं प्रत्यक्षात या सूचना कागदावरच राहण्याची शक्यताय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 08:59 AM

ले.जनरल उपेंद्र द्विवेदी नवे लष्करप्रमुख

 

Upendra Dwivedi : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. जनरल द्विवेदी 30 जूनला जनरल मनोज पांडेंकडून पदभार स्वीकारतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्यानं वाढवण्यात आला होता. आता ते 30 जूनला निवृत्त होतायेत.जनरल द्विवेदी सध्या जम्मू-काश्मीर राइफल्सचे अधिकारी आहेत. त्यांची फेब्रुवारी महिन्यात उपलष्करप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 08:21 AM

पूर्व विदर्भात मान्सूनची अद्याप प्रतीक्षा

 

No Rain In Purva Vidharbha : एकीकडे मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावलीय मात्र पूर्व विदर्भात अजूनही मान्सूनची प्रतीक्षा आहे. पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनचा सकारात्मक प्रवास नसल्यानं मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झालाय. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात मान्सून बरसतोय. मात्र पूर्व विदर्भात मान्सून बरसण्याची अजूनही प्रतीक्षा आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात सामान्य वातावरण असलं तरी नागपूरसह काही जिल्ह्यात तापमान जास्त आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 08:07 AM

राजस्थानच्या सांवलिया मंदिराला 17 कोटींचं दान

 

Rajasthan : राजस्थानच्या चित्तौडगडमधील सांवलिया सेठ मंदिराला भक्तांनी भरभरून दान दिलंय. एका महिन्यात या मंदिराला तब्बल 17 कोटी रुपये, सोन्या-चांदीचे दागिने दान करण्यात आलेत. यावेळी पैशांच्या ढिगा-यात अनेक कर्मचारी पैसे मोजताना दिसून येत आहेत. सांवलिया सेठच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक याठिकाणी दाखल होत असतात. तर आपल्यापरीनं जेवढं होईल तेवढं श्रद्धेपोटी भक्त दान करतात. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 June 2024 07:29 AM

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

 

IMD Rain Alert : पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.... आज दिवसभर आकाश ढगाळ राहील असं हवामान विभागानं  सांगीतलंय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी त हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सिंधुदुर्गातही पावसाचा जोर वाढणार असून जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

12 June 2024 07:26 AM

रिक्षावर दरड कोसळली, 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी

 

Malshej Ghat Landslide : कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळलीय. रिक्षा वरती दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी..अपघातात चुलता पुतण्या दोघांचा मृत्यू....भालेकर कुटूंबीय रिक्षा ने कल्याण कडून नगर कडे जात असताना टोकाडवडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा वरती दरड कोसळल्याने झाला अपघात..मुलूंड मुंबई येथून चंदनापुरी संगमनेर येथे आपल्या गावी जात असताना झाला अपघात.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More