Aryan Khan Drug Case : आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणा-या एसआयटीला एनसीबी ऑफिसमधलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं नव्हतं. आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या चौकशी अहवालात धक्कादायक दावा करण्यात आलाय. यात आर्यन खान एनसीबी ऑफिसमध्ये असतानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
बातमी पाहा- आर्यन खानचं CCTV फुटेज गायब? काय आरोप केला?
Kalyan Crime : कल्याणमध्ये सोशल मीडियात धार्मिक भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला जमावानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. इतकच नाही तर या मुलाला अर्धनग्न करून त्याची धिंड काढण्यात आलीय. या जमावानं त्या मुलाला रस्त्यावर नाक घासून माफी मागायला लावलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 12 जणांना ताब्यात घेतलंय. कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय.
बातमी पाहा- अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला तालिबानी शिक्षा
Latur Lumpy Skin Disease : लातूर जिल्ह्यामध्ये लम्पी रोगानं पुन्हा डोकं वर काढलंय. मार्च महिन्यापासून जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. लातूरमध्ये शिरूर अनंतपाळ आणि उदगीर तालुक्यामध्ये लम्पीचा प्रभाव सर्वाधिक आहे. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात 1 हजार 236 जनावरांना लम्पीने ग्रासलंय. तर त्यापैकी 145 जनावरांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढलीये..लम्पीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जनावरांचं लसीकरण पुर्ण करावं घ्यावे असा आवाहन पशुतज्ञांनी केलय.
बातमी पाहा- लातुरात जनावरांना पुन्हा लम्पीचा विळखा,3 महिन्यात किती मृत्यू?
Bhagat Singh Koshyari met the CM : माजी राज्यपाल भगत सिंह कोशारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा.
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी रीजनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू झाल्याची सुत्रांची माहिती आहेत. आज सीबीआयमार्फत त्यांनी तब्बल 5 तास चौकशी झाली. पहिल्या सत्रात वानखेडेंची सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली.. त्यानंतर दुस-या सत्रात त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडेंनी शाहरुखकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे... सीबीआयने याआधी वानखेडेंच्या घरावरही छापा मारला होता. तसंच चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आगामी सुनावणीपर्यँत वानखेडेंना अटक करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिलेत.. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 मे रोजी होणार
बातमी पाहा- समीर वानखेडेंवर निलंबनाची कारवाई होणार?
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी रीजनल डायरेक्टर समीर वानखेडेंची आज तब्बल 5 तास चौकशी झाली. पहिल्या सत्रात वानखेडेंची सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली.. त्यानंतर दुस-या सत्रात त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडेंनी शाहरुखकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे... सीबीआयने याआधी वानखेडेंच्या घरावरही छापा मारला होता. तसंच चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आगामी सुनावणीपर्यंत वानखेडेंना अटक करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिलेत.. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 मे रोजी होणाराय.
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : देवस्थानात वेशभूषा कशाला? अजित पवार यांचा राज्य सरकारला सवाल. 'महापुरुषांचा वारंवार अपमान कशासाठी?','आम्ही काँग्रेसचे मोठे भाऊ', 'आरेला कारे म्हणायला शिका', अजित पवार यांचं वक्तव्य.
Cabinet Expansion : राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी... मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचं समजतंय... मे महिन्याच्या महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय... एकूण 12 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल.. तर सरकारला पाठिंबा दिलेल्या काही अपक्ष आमदारांनाही मंत्रिपद मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.... तेव्हा कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय..
बातमी पाहा - शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार महिनाअखेरीस होणार? कोणाची वर्णी लागणार?
Karnatak Government Oath Ceremony : कर्नाटकात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला... सिद्धरामय्या यांनी दुस-यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय...तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...या शपथविधी सोहळ्याला शरद पवार, राहुल गांधी, प्रियांका गांधींसह देशभरातील नेते उपस्थित होते... बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा
बातमी पाहा - सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली शपथ
Ajit Pawar On Dress Code : मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी घालण्याच्या निर्णयावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापलेत... हाफ पँट घालून दर्शनाला येऊ नको असं कोणत्या देवाने सांगितलं असा सवालही अजितदादांनी विचारलाय...
बातमी पाहा - 'हाफ पँट घालून दर्शनाला येऊ नको...' कपड्यांच्या बंदीवरून अजित पवार संतापले
Mhada, Cidco House : म्हाडा, सिडकोसह इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरं घर घेणं आता अशक्य होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी तुम्ही एकदाच होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणारेय. तसंच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या राज्य सरकारच्या 2019 च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी म्हाडाने करण्याचा निर्णय घेतलाय...
बातमी पाहा - म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Shirdi Sai Temple : देशात दोन हजारांची नोटबंदी झाल्यानंतर शिर्डीतलं साई संस्थान अलर्ट झालंय.. 30 सप्टेंबरनंतर साईभक्तांनी दानपेटीत दोन हजारांच्या नोटा टाकू नयेत असं आवाहन शिर्डी साई संस्थानने केलंय.. मागच्या नोटबंदीवेळी भक्तांनी कोट्यवधींच्या नोटा दानपेटीत टाकल्या होत्या.. तेव्हा यावेळी मात्र साई संस्थाननं आधीच भक्तांना आवाहन केलंय...
बातमी पाहा - मोठी बातमी, दानपेटीत 2000 हजार च्या नोटा टाकू नका साई संस्थानाची भाविकांना विनंती
Raj Thackeray On Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम बांधवांनी धूप दाखवल्याप्रकरणी वाद सुरु झालाय.. मात्र हा वाद निर्माण करणा-यांचे कान राज ठाकरेंनीच टोचलेत.. त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतचा निर्णय गावक-यांनीच घ्यावा, इतरांनी त्यात पडू नये असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय...
बातमी पाहा - त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज ठाकरेंनी टोचले राजकीय नेत्यांचे कान
Raj Thackeray On Notebandi : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोटबंदीचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय.. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घेतले पाहिजे होते असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय...
बातमी पाहा - राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'
Mantralay Jobs : मंत्रालयात जर कोणी नोकरी लावण्याचं आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका... कारण मंत्रालयात पुन्हा एकदा बोगस भरती करणारं रॅकेट उघडकीस आलंय... नोकरी मिळवून देण्याच्या नावाने चौघांच्या टोळीनं 20 लाख रुपये उकळले आहेत.. बोगस मुलाखती घेण्यात आल्या. बनावट मेडिकल सर्टिफिकेटही दिलं.. त्यानंतर उपसचिव दर्जाच्या अधिका-याच्या सहीचं बोगस नियुक्ती पत्रही देण्यात आलं.. पोलिसांनी याप्रकरणी मंत्रालयातल्या दोघांसह एकूण चौघांवर गुन्हा दाखल केलाय. यातला बापूराव जाधव हा मंत्रालयात कर्मचारी आहे. तर सचिन डोळस हा शिपाई आहे.. तर नितीन साठे हा सामान्य प्रशासन विभागात सचिव पदावर असल्याचं सांगत त्याच्या केबिनमध्ये मुलाखती घेण्यात आल्यात. सचिन डोळस आणि नितीन साठेवर याआधीही बोगस भरतीप्रकरणातच गुन्हा दाखल आहे...
बातमी पाहा - मंत्रालयातील नोकरीचे बोगस रॅकेट उघड, अधिकाऱ्यांचे नावाने दिले खोटे नियुक्तीपत्र
NCB Office CCTV Footage : आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय... ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणा-या एसआयटीला एनसीबी ऑफिसमधलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं नव्हतं.. आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या चौकशी अहवालात धक्कादायक दावा करण्यात आलाय. यात आर्यन खान एनसीबी ऑफिसमध्ये असतानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय..
बातमी पाहा - आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, 'हे' सीसीटीव्ही फुटेज गायब
Pandharpur Gautami Patil : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरण ठरलेलं आहे...या गर्दीला आवर घालणे पोलिसांसमोर एक कठीण काम असते...यासाठीच सांगोलामधील पठ्ठ्याने गोंधळ होऊ नये म्हणून फक्त पोलीस बंदोबस्तासाठी पाच लाख शुल्क भरलंय...सांगोला तालुक्यातील घेरडी गावात गौतमी पाटील आली होती...तरुणाईची गर्दी अनेक ठिकाणी होणारी हुल्लडबाजी पाहता गोंधळ होतो...गौतमीचा कार्यक्रम विना गोंधळ पार पाडावा यासाठी आबा मोटे यांनी 106 पोलिसांचा फौजफाटा घेरडीमध्ये बोलवला...गौतमीच्या मानधनावरून अनेकदा टीका झाली मात्र, त्यापेक्षा ही आता तिच्या कार्यक्रमात बंदोबस्त ठेवायचा असेल तर खिशात पाच लाख तयार ठेवावे लागणार आहेत...
बातमी पाहा - अरे बापरे! गौतमी पाटीलसाठी 106 पोलिसांचा बंदोबस्त, तरुणाने भरले 5 लाख
Salman Khan : सलमान खान लवकरच मुंबईत हॉटेल बांधणार आहे... वांद्रेतल्या कार्टर रोडवर सलमान खानचं हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे.. या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचं समजतंय. सलमानची आई सलमा खान यांच्या नावावर हा प्लॉट आहे... हॉटेलच्या प्लॉटवर आधी स्टारलेट सोसायटी होती.. जिथे सलमान खानच्या कुटुंबियांनी अपार्टमेंट खरेदी केली होती.. सुरुवातीला या इमारतीचा पुनर्विकास करण्याची योजना होती. मात्र कुटुंबाने नंतर तो बेत बदलल्याचं समजतंय..
बातमी पाहा - सलमान खान मुंबईत सुरु करणार अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल
Delhi Arvind Kejriwal : केंद्र सरकारने दिल्ली सरकारला मोठा झटका दिलाय...केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवला असून दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठी अध्यादेश काढलाय...केंद्र सरकारने हा अध्यादेश दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार यांना दिला असून केजरीवाल सरकारला मोठा धक्का दिलाय...गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने यासंबंधी निकाल देताना दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार हे दिल्ली सरकारला असल्याचा निर्णय दिला होता.मात्र, आता केंद्राने निर्णय़ बदलला असून बदल्या, पोस्टिंगचे अंतिम अधिकार नायब राज्यपालांकडे असणार आहेत...
Mumbai AC Local : मुंबईकरांची घामाच्या धारेतून सुटका होणार आहे. कारण मुंबईच्या सर्वच लोकल आता एसी होणार आहेत.. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर वंदे मेट्रोची बांधणी करण्यास मंजुरी दिलीय... रेल्वे मंत्रालयाने 238 एसी रेक खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 20 हजार कोटी रुपये आहे. एसी लोकल गाड्यांच्या देखभालीसाठी भिवपुरी आणि वाणगाव येथे नवीन कारशेड उभारण्यात येणार आहे. एकंदरच मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार होणार आहे...
बातमी पाहा - मुंबईकरांनो खूशखबर! सर्वच लोकल एसी होणार, प्रवास होणार गारेगार
State Government : राज्यातल्या सरकारी कार्यपद्धतीत आता आमुलाग्र बदल होणार आहे.. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुशासन प्रणाली 2023 ला मान्यता दिलीय.. तेव्हा सरकारी कार्यालयांचं कामकाज आता आणखी गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. तब्बल सहा दशकांनंतर म्हणजे 60 वर्षानंतर सरकारी कार्यालयांमध्ये हा मोठा बदल होणार आहे... सामान्यांच्या समस्या आणि सरकारी कार्यपद्धतीची सांगड घाला.. तसंच अन्य राज्यांसाठी आदर्श ठरणारी नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत...
बातमी पाहा - प्रशासकीय कामातील दिरंगाई जाणार, सरकारी कामे वेगाने होणार
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.