Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Raj Thackeray : मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा

Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Raj Thackeray : मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा
LIVE Blog
22 March 2023
22 March 2023 21:26 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'नवं हाजी अली तयार करण्याचा घाट','समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला','दर्गा हटवला नाही तर गणपती मंदिर उभारणार', 'माझ्या हातात राज्य द्या सूतासारखं सरळ करेन','राजकारण्याचं प्रशासनाचं दुर्लक्ष','असले फाजील चाळे चालू देणार नाही', 'माझ्या हातात राज्य द्या, सूतासारखं सरळ करेन', 'कुणाची समाधी आहे ती, माशाची?', 'राज्यातल्या मुस्लीम समाजाला हे मान्य आहे?','येणारी रामनवमी जोरदार साजरी करा','6 जूनला शिवरायांच्या राज्यभिषेकाला 350 वर्ष','6 जूनला रायगडावर जाणार, तुम्ही पण या', राज ठाकरे यांचं वक्तव्य.

22 March 2023 21:11 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'महिला विद्यार्थी सरकारकडे बघतायत', 'सरकार कोर्टाकडे बघतंय निर्णय काय लागतोय', 'कोर्टवर अवलंबून असलेलं सरकार पाहिलं नाही', राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा. 'आताच विधानसभा निवडणूका लावा','निवडणुका घ्या, एकदाचा काय सोक्षमोक्ष लागू दे','धर्मांध हिंदू नको, धर्माभिमानी हिंदू हवाय','मला जावेद अख्तरांसारखी माणसं पाहिजेत', 'जावेद अख्तरांनी पाकिस्तानात जाऊन सुनावलं','कुरापती काढल्या तर जशास तसं उत्तर देऊ' राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक. 'प्रतापगडावरचं अनधिकृत बांधकाम तोडलं, अभिनंदन' ,'भोंग्यांसदर्भात 17000 हजार गुन्हे दाखल केले','मशिदीवरचे भोंगे काढा नाही तर आम्ही काढू','मागच्या सरकारनं मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले', मशिदीवरील भोंग्यावरून राज ठाकरे आक्रमक.

 

22 March 2023 21:03 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'हे महाराष्ट्रातून लूट करून सुरतेला गेले', 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं', 'उद्धव ठाकरेंच्या मागोमाग सभा घेत बसू नका', 'शेतकरी, संपकऱ्यांचे विषय मिटवा', 'शेतकऱ्यांना जाऊन भेटा सभा कसल्या घेता', 'मुंबई आहे की डान्स बार ते कळतच नाही', 'हे असं काय सुशोभीकरण असतं का?','सुशोभीकरणासाठी 1700 कोटी खर्च केले', 'महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन केलं','आज महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची वेळ', 'आज महाराष्ट्र चाचपडतोय', राज ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल.

22 March 2023 20:44 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'माझ्या महत्त्वाकांक्षा फार मोठ्या नव्हत्या', 'बाळासाहेब असते तर आज हे होऊ दिलं असतं का?','सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं','अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप एकत्र लढले', 'तुम्ही मतदान करता ते त्यांचा खेळ खेळतात','तुम्ही मतदान करता, ते त्यांचा खेळ खेळतात','ज्यांच्या विरोधात लढले, त्यांच्याबरोबर सरकार', 'पहाटेच्या शपथविधीनंतर काकांनी डोळे वटारले', 'लोकांनी युती म्हणून मतदान केलं त्याचं काय?','अलिबाबा आणि 40 जण सोडून गेले', 'त्यांना चोर म्हणणार नाही, कारण ते चोर नाहीत','कोविडमध्ये कुणालाही भेटायला तयार नव्हते', 'त्यांना कंटाळूनच 40 जण बाहेर पडले', राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल.

 

22 March 2023 20:36 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'बाळासाहेबांनी मला मिठी मारली','बाळासाहेबांनी उद्धवना बोलवालं','उद्धव ठाकरे बाहेर निघून गेले', 'पक्षातून माणसं कधी जातायत, याची वाट पाहायचे', 'राणेंबद्दल मी बाळासाहेबांना फोन केला', 'राणेंची शिवसेना सोडायची इच्छा नव्हती', 'बाळासाहेबांचा फोन आला, राणेंना बोलावू नकोस','बाळासाहेबांच्या मागून कुणीतरी बोलत होते', 'लहानपणापासून पाहिलेलं नाव टांगताना दिसलं', 'बाळासाहेबांचा फोन आला, राणेंना बोलावू नकोस', 'माणसं सेना सोडून जाण्याचा हा शेवट', राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. 

22 March 2023 20:29 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'माझा वाद विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी होता','कष्ट घेऊन, घामातून शिवसेना उभी राहिली', 'बाळासाहेब सोडून धनुष्य कुणाला पेलणार नाही', 'दुसऱ्याला धनुष्य झेपेल की नाही, माहित नाही', 'एकाला धनुष्य झेपलं नाही', 'मी उद्धव ठाकरेंकडे गेलो, गाडीच बसायला सांगितलं', 'उद्धव ठाकरे आणि मी ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो', 'जे व्हायचंय ते हो, मला सांगा माझं काम काय?','उद्धवना विचारलं तुम्हाला काय हवंय?','मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका', 'बाळासाहेबांना सांगितलं प्रॉब्लेम सोडवला', राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला. 

 

22 March 2023 20:23 PM

Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'पक्ष संपलाय म्हणाऱ्यांची अवस्था काय झाली?','गेल्या काही दिवसांत राजकारणाचा बट्ट्याबोळ', 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ बट्ट्याबोळ' ,'धनुष्यबाण, शिवसेना नाव खेचाखेचीच्या वेचना', 'शिवसेना हा पक्ष जगलो', राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला.

22 March 2023 16:34 PM

दिल्लीत पुन्हा एका 'महाआघाडी'चा प्रयोग?

 

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतील घरी उद्या विरोधकांची बैठक होणार. सत्ताधारी भाजप-एनडीएच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा पवारांचा प्रयत्न दिसतोय. महाराष्ट्रातला महाआघाडीचा प्रयोग दिल्लीतही राबवण्याच्या हालचाली पवारांनी सुरू केल्याचं समजतंय.. उद्या संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षाचे कोण कोण नेते उपस्थित राहणार, याची चर्चा दिल्लीत रंगलीय.

22 March 2023 16:12 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची बैठक 

 

 

PM Modi on Corona :  पुन्हा एकदा देशात कोरोनानं डोकं वर काढलंय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोनासंदर्भात तातडीची बैठक घेणार आहेत. कोरोना पुन्हा वाढला तर देशातल्या आरोग्य सुविधांबद्दल बैठक घेण्यात येणार आहे. देशात कोरोनाचे हजारच्या वर रुग्णांचं निदान होतंय. यासंदर्भात मोदी संध्याकाळी 4.30 वाजता बैठक घेणार आहेत.  

22 March 2023 13:48 PM

महिलांना खासगी बसमध्येही 50% सूट

 

Good News For Women : चंद्रपूरमध्ये खासगी ट्रॅव्हल्समध्ये ही आता महिला प्रवाशांना 50 टक्के सूट दिली आहे.... आज गुढीपाडव्यानिमित्ताने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणारेय... यामुळे महिला प्रवाशांना आता खासगी ट्रॅव्हल्समधल्या तिकीटांवरती 50 टक्केच रक्कम मोजावी लागणारेय.... राज्य सरकारने एसटी बसेसमध्ये महिलांना 50 टक्के सूट दिल्यानंतर खासगी बस चालकांना याचा मोठा फटका बसत होता.... त्यामुळे यावर उपाय म्हणून चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने या निर्णयाची घोषणा केलीय... या निर्णयानंतर महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय...

बातमी पाहा -  खासगी ट्रव्हल्समध्ये सुद्धा महिलांना तिकीट दरात 50 टक्के सूट

22 March 2023 13:38 PM

ओशो आश्रमात भक्तांवर लाठीमार

 

Pune Osho Aashram : ओशो आश्रमात आज भक्तांवर लाठीमार करण्याची वेळ पोलिसांवर आली. ओशो आश्रमाचे गेट तोडून भक्त आश्रमात शिरले. कोरेगाव पार्क परिसरात आज सकाळी तणावाचं वातावरण होतं. कालच ओशोचा संबोधी दिवस साजरा झाला.  काल सर्व भक्तांना माळेसहित आश्रमात सोडलं होतं. मात्र आज माळेसह सोडण्यास नकार दिल्याने भक्तगण संतापले. अखेर भक्तांनी गेट तोडून आत प्रवेश मिळवला. त्य़ानंतर ओशो आश्रमाबाहेर पोलिसांची गर्दी झालीय. पोलिसांनी अनेक भक्तांना ताब्यात घेतलंय. तर अनेकांवर लाठीमार केला. 

बातमी पाहा - पुण्याच्या ओशो आश्रमात राडा! पोलिसांकडून भक्तांवर लाठीचार्ज

22 March 2023 13:13 PM

शेतकऱ्यानं चक्क शेतात उभारली गुढी

 

Yeola Farmer Gudhi : येवल्यात एका शेतक-याने आपल्या कांद्याच्या शेतात अनोखी गुढी उभारली. पारेगावच्या वैभव खिल्लारे यांनी आपल्या शेतात गुढी उभारत त्याला कांदा, द्राक्ष, मिरचीच्या माळा घातल्या. कांद्याला हमीभाव द्या, शेतमालाला भाव द्या असे फलक गुढीला लावत या शेतक-याने आपल्या शेतात गुढी उभारत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.

बातमी पाहा - शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी

22 March 2023 12:06 PM

25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार - सत्तार

 

Abdul Sattar On Farmer Help : बळीराजाला दिलासा देणारी बातमी... अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना 25 मार्चपर्यंत मदत जाहीर होणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलीय. राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. 

बातमी पाहा - अब्दुल सत्तार यांची सर्वात मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मिळाणार मोठा दिलासा

22 March 2023 11:47 AM

अंबरनाथ-बदलापूर महापालिका निर्मितेला वेग

 

Ambernath-Badlapur Mahapalika : अंबरनाथ बदलापूर या दोन नगरपालिकांची महापालिका करण्याच्या हालचालींना वेग आलाय. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ दौ-यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. हे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे असताना यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेत या मुद्दय़ावर मतभेद असल्याने पुढे हा विषय मागे पडला. आता शिंदे हा विषय मार्गी लावण्यासाठी इच्छुक असल्याने दोन्ही शहरांच्या एकत्रित महापालिकेच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. विविध रस्ते प्रकल्पांमुळे या दोन्ही शहरात मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध विकासाला संधी आहे. त्यामुळे दोन्ही नगरपालिकांची एकत्र महापालिका करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने ठेवला होता. आता पुन्हा नगरपालिका निवडणुका घेण्याऐवजी थेट महापालिका घोषित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

22 March 2023 11:09 AM

राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेची बॅनरबाजी

 

Raj Thackeray : शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पाडवा मेळावा होणारेय. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवसेना भवनासमोर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतायत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा अशय असलेला मजकूर छापण्यात आलाय. 

बातमी पाहा - राज ठाकरे होणार मुख्यमंत्री?

22 March 2023 10:28 AM

दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागणार

 

SSC & HSC Result : दहावी, बारावीच्या निकालावर संपामुळे असलेली टांगती तलवार दूर झालीये.. असून मंगळवारपासून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झालीये.. यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल नियोजित वेळेतच लागणार आहेत..शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने दहावीच्या विविध पेपरच्या 70 लाखांहून अधिक तर बारावीच्या 20 लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. आता अधिक वेळ देऊन त्या तपासण्याची तयारी शिक्षकांनी दाखवलीये. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुटकेसा निश्वास टाकलाय.

 

22 March 2023 09:12 AM

गुढी आनंदाची...गुढी भरभराटीची

 

Nagpur Gudipadva 2023 : गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातही मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येतंय.. नागपुरात तरुण तरुणी पारंपरीक वेषशुभेत शोभायात्रेत सहभागी झालेत..तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आलीये.. गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात 51 फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती केली जाणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांनी विशेष उपस्थिती लावली. 

बातमी पाहा - गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित शोभायात्रेला तरुणाई उतरली रस्त्यावर

22 March 2023 09:10 AM

राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली, पाकिस्तानात भूकंपामुळं 9 जणांचा मृत्यू

 

Earthquake Update : राजधानी दिल्ली आणि एनसीआर भूकापानं हादरलंय... उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत.. या भूकंपाची तीव्रता ही 6.6 रिश्टर स्केल एवढी होती.. भूकंपाचं केंद्र हे अफगाणिस्तानातील हिंदूकूष पर्वतरांगांमध्ये होतं.. या भूकंपाचे हादरे उत्तर भारतासोबत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही जाणवलेत.. अफगाणिस्तानात भूकंपामुळे दोघांचा तर पाकिस्तानात 9 जणांचा मृत्यू झाला असन शेकडो नागरिक जखमी झालेत. 

बातमी पाहा - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हादरला, भूकंपाने 9 जणांचा मृत्यू

 

22 March 2023 08:26 AM

गुढी आनंदाची...गुढी भरभराटीची

 

Gudhipadwa 2023 : राज्यात आज गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही... साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं. गुढीपाडव्याला काढल्या जाणा-या शोभायात्रांना यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. डोंबिवलीत या शोभायात्रांना सुरूवात झाली होती. त्यामुळे यावर्षी डोंबिवलीतली शोभायात्रा वैशिष्ट्यपूर्ण अशी असणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीत गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. डोंबिवलीसह गिरगाव, ठाणे, गोरेगाव या भागातल्या शोभायात्रांही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा

बातमी पाहा - राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Read More