Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन बाल हक्क न्यायालयाचं फेटाळलाय...त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय...अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 75 हजार रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पित असलेले बारमधील सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर करण्यात आले. कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे एकूण 75 हजारचे बिल दिल्याची दारूचे बिल भरताना ऑनलाईन पेमेंट करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांनी कोर्टात दिलेयत...अल्पवयीन आरोपीकडून वकील प्रशांत पाटील हे हजर होते...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Yavatmal Poisoning : यवतमाळच्या आर्णी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बक-याचे शिळं मटण खाल्यानं 19 जणांना विषबाधा झालीये. यामध्ये म्हसोबा तांडामधील 16 जणांना विषबाधा झाली तर अंजीमधील तिघांची प्रकृती बिघडलीये.... त्यांच्यावर आर्णीच्य़ा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून 3 चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक आहे.... दोन्ही ठिकाणी पूजेनिमित्त काल बोकडबळी दिला होता, त्याचे सामूहिक जेवण झाले होते... त्यातील उरलेले शिळं मटण आज खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ असा त्रास झाला...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nashik Bogus FD : नाशिकमध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बोगस एफडीचा आरोप करत शेतक-यांनी गोंधळ घातल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती...त्यानंतर तातडीने पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय....आज दुपारी नाशिकमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये शेतक-यांचा गोंधळ पहायला मिळाला...एफडी बोगस निघाल्याचा आरोप करत शेतक-यांना गोंधळ घातला...बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगनमताने शेतक-यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येतोय...बँकेच्या प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिलाय...
Gajanan Kirtikar : शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिलीय... पक्षविरोधी वक्तव्यं केल्याबद्दल कीर्तिकरांनी हकालपट्टी करावी, त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंनी केली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनी तसं पत्र पाठवलंय. तर कुणीही उठतं आणि मागणी करतं हे वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केलीय... शिंदे गटामधील दोन शिलेदार एकमेकांना भिडल्याचं चित्र दिसतंय..
Chandrapur Boy Died : चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये 2 युवकांचा दारू सोडण्याचे औषध घेतल्यानं मृत्यू झाला तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे... वर्ध्याच्या शेळके महाराजाकडे दारू सोडवण्यासाठी हे तरूण आले होते...त्यांनी महाराजाकडील दारू सोडवण्याचं औषध प्राशन केलं.. त्यानंतर हे चौघं गुळगावा परतले. त्यानंतर यांचा प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल... यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे....भद्रावती पोलीस घटनेचा तपास करतायेत
Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालसह तिघांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.
Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल याला कोर्टात हजर करण्यात आलंय...सरकारी वकिलांनी विशाल अग्रवालच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलीये....त्याचबरोबर गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल फरार का झाले?असा सवालही विचारण्यात आलाय...विशाल अग्रवालला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी त्याच्या अंगावर शाईफेक करण्यात आलीये...वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केलीये...विशाल अग्रवालसह पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनाही कोर्टात हजर करण्यात आलंय...
Pune Accident Update : हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेनं कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पब वर कारवाई केलीये.. बुलडोजर जेसीपीच्या साह्याने पब चे बांधकाम पाडण्यात येत आहे... कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाई सुरू आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Devendra Fadanvis On Rahul Gandhi : पुणे अपघात प्रकरणी राजकारण करणं चुकीचं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीये.. या प्रकरणी पुणे पोलीसांनी केलेली कारवाई योग्य आहे.. मात्र प्रत्येक गोष्टीत राहुल गांधी मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bhandara : भंडा-यात बनावट सातबारे तयार करून शेतक-यांचे लाखो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक इथल्या सहकारी संस्थेत धान खरेद्री केंद्रात हा प्रकार घडलाय. धान खरेदी केंद्राच्या डाटा ऑपरेटर्सनी एकट्या पिंपळगावमध्ये 25 बोगस शेतकरी तयार केले आणि त्यांच्या नावाचे सातबारे तयार करून पैसे उचलल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Shishir Shinde On Gajanan Kirtikar : शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी अशी मागणी पत्राद्वारे शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केलीय...पक्षविरोधी कारवाई केल्याने कीर्तिकरांना पक्षातून निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शिशिर शिंदेंनी केलीय...लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकरांनी आणि त्यांच्या पत्नीने पक्ष विरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली...त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांनी पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Amravati : अमरावतीच्या PM किसान योजनेत मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय...शेतक-यांचे अनुदान थेट जम्मू काश्मीरच्या शेतक-यांना मिळत असल्याचं उघडकीस आलंय... अमरावतीच्या शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून जम्मू काश्मीरच्या शहापूर इथल्या शेतक-याकडं जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय...गेल्या 2 वर्षांपासून अनुदान मिळत नसल्यानं शेतक-यांनी संताप व्यक्त केलाय...आधी उद्योग गुजरातला पळवले...आता शेतक-यांच्या अनुदानाचे पैसे जम्मू काश्मीरला पळवले जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Heat Wave : मुंबईत उकाडा वाढला असून उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झालेत. कमाल तापमान 35 अंश इतकं आहे. आर्द्रताही वाढलीय. मुंबईसह कोकण, गुजरातमध्ये उष्णतेची लाट पसरलीय. तर पुढील 3 दिवस मुंबईत ढगाळ वातावरण असणारेय. तर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Ghatkpar Hording Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय.. राजू सोनावणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.. त्यामुळे आता घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17वर गेलीये.. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी SIT स्थापन करण्यात आलीय. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nilesh Lanke : निलेश लंके यांनी एक व्हीडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय...ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती पोहोचू कशी शकते?...त्रिस्तरीय सुरक्षा त्या व्यक्तीला का रोखू शकली नाही...? असा सवाल उपस्थित करत कुंपणच आता शेत खात असल्याचा आरोप लंकेंनी केलाय...नगर दक्षिण मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका व्यक्तीने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला असा आरोप लंकेंनी केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sonali Tanpure : पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा आणखीन एक कारनामा समोर आलाय... दुर्घटनेतील आरोपीच्या त्रासामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा बदलावी लागली होती.. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी सोशल मीडियावरुन हा दावा केलाय..
बातमी पाहा - Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..'
Sambhajinagar Accident : कर्नाटकाहून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकाच्या खासगी बसला भीषण अपघात झालाय. यात 20 भाविक जखमी झालेत. हा अपघात पुणे रस्त्यावरील ढोरेगावाजवळ घडली. बिअरने भरलेला कंटेनर CNG पंप समोर वळण घेत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसने त्या कंटेनरला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय. यात 4 जण गंभीर आहेत. सर्व जखमींना संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Water : येत्या शुक्रवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणारेय. जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती तसंच विद्युत विषयक कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारये. तर शनिवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणारेय. त्यानंतर शनिवारी संध्याकाळनंतर पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत केला जाईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Accident Update : पुण्यात कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणा-या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल आज येणं अपेक्षित आहे. अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केलं की नाही हे या अहवालातून स्पष्ट होणार आहे. तसंच अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दुस-या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला जयेश बोनकरलाही ताब्यात घेण्यात आलं. त्याला ही आज कोर्टात हजर करणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Accident Update : कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झालीय...सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर आलंय. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे. यात सुरेंद्र कुमार अग्रवालनं थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे...नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.