Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Chaundi Hunger Strike : चौंडीमधलं यशवंत सेनेचं आमरण उपोषण अखेर मागे

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Chaundi Hunger Strike : चौंडीमधलं यशवंत सेनेचं आमरण उपोषण अखेर मागे
LIVE Blog
26 September 2023
26 September 2023 17:36 PM

धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी बंडगर आणि रुपनवर यांचं उपोषण मागे

 

Chaundi Hunger Strike : अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडीत सुरू असलेलं यशवंत सेनेच्या आंदोलकांचं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. ग्रामविकासमंत्री गिरी महाजन यांच्या मध्यस्थीला यश आलंय. धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सुरेश बंडगर आणि आबासाहेब रुपनवर हे 21 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला. आणि गिरीश महाजनांना भेट घेण्यासाठी पाठवलं. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं. यावेळी त्यांनी 50 दिवसांत धनगर आरक्षणावर तोडगा काढणार असल्य़ाची ग्वाही गिरीश महाजनांनी आंदोलकांना दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

26 September 2023 16:50 PM

काँग्रेस सत्तेत असताना महिलांसाठीचे चांगले निर्णय- शरद पवार

 

Sharad Pawar : महिला आरक्षण आणि कांदा निर्यात शुल्काच्या मुद्यावर शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. महिला आरक्षणासाठी कुणीही काही केलं नाही हा मोदींचा दावा अयोग्य असल्याची टीका पवारांनी केली. महिला आरक्षणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र असून मुख्यमंत्री असताना आपण महिला धोरण राबवल्याचं पवारांनी सांगितलं. तर कांद्यावर निर्यात शुल्क मागे घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत पियूश गोयलांनी निर्णय घेण्याची मागणी पवारांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

26 September 2023 14:18 PM

वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

 

Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना सिनेसृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर ही माहिती दिलीय. वहिदा रहमान यांनी हिंदी सिनेसृष्टीत तब्बल पाच दशकांचं योगदान दिलंय. त्यांना यापूर्वीच पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. तसंच त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मान करण्यात आलाय. गाईड, प्यासा, कागज के फूलसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 13:43 PM

मराठवाड्यात 5 हजारांच्या आसपास कुणबी नोंदी

 

Maratha Reservation : मराठवाड्यात मराठा समाजाला निजामकालीन नोंदीनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली... त्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून महसूल प्रशासन कुणबी नोंदींच्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत.. त्यानुसार 65 लाख अभिलेखांची तपासणी करण्यात आली.. मात्र यात फक्त 5 हजारांच्या आसपास कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.. निजामकालीन काळात उर्दू भाषेचा प्रभाव जास्त असल्यानं कुणबी नोंदीबाबत अनास्था असल्याचं पाहायला मिळतंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 12:46 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांना बंदी

 

Mumbai Pune Express Way : उद्यापासून 29 सप्टेंबरपर्यंत पुणे-मुंबई हायवेवरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीये. उद्या मध्यरात्री 12 वाजेपासून ही बंदी लागू होणार आहे. गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे NH48 महामार्गावरून मुंबई शहर, नवी मुंबई, ठाण्यात प्रवेश बंदी असणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 12:43 PM

मराठी पाट्यांसाठी मनसेच्या संघर्षाला यश-राज ठाकरे

 

Raj Thackeray Reaction : मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वागत केलंय...'मराठी पाट्या ह्या मुद्द्यासाठी मनसेनं गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय...आता या निर्णयाचा दुकानदार, आस्थापनांनी आदर करावा...आणि दुकानावर ठळक मराठी भाषेतील पाटी लावायलाच हवी...आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे...इथलं सरकार लक्ष ठेवेलच...मात्र, मनसेचंही लक्ष असेल हे विसरू नका...असा इशाराच राज ठाकरेंनी दुकानदारांना दिलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 12:24 PM

राज्यातील 15 हजार शाळा कुलूप बंद होणार?

 

Maharashtra 15 Thousand School : राज्यातील झिरो ते वीस पटसंख्येच्या शाळा बंद करून निवडक ठिकाणी शाळा सुरू करण्याची प्रक्रिया महायुती सरकारने केलीय. त्यामुळे राज्यभरातील पंधरा हजार शाळा कुलूप बंद होणारेत. सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसणारेय. तर सर्वात कमी शाळा धुळे जिल्ह्यात बंद करण्यात येणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 11:55 AM

भाजप प्रदेश कार्यकारिणीची 3 ऑक्टोबरला बैठक

 

Mumbai BJP Meeting : भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत 3 ऑक्टोबरला होणार आहे...दादर वसंत स्मृती येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत...या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीवर, पक्षाचे धोरणात्मक कार्यक्रम आणि पक्ष संघटना बांधणीवर चर्चा होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 11:50 AM

बारामती निवडणुकीत नणंद वि. भावजय लढत?

 

Supriya Sule Vs Sunetra Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे... सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरूये...यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय...दिल्लीत काय दडपशाही चालते हे सगळा देश बघतोय...आपल्याकडे लोकशाही आहे...आपण सगळ्यांनी याचा मान सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 11:12 AM

ठाणे, मुंब्रा, कळव्यातील डीजे बंदी उठवा - जितेंद्र आव्हाड

 

Jitendra Awhad Tweet : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून ठाण्यातील डीजे बंदी उठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय...अख्ख्या महाराष्ट्रात डीजे वाजताना दिसतात...मोठी गणेश मंडळं डीजे समोर नाचत-गात असताना मग ठाणे, कळवा, मुंब्र्यामध्ये बंदी कशासाठी असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय...तसंच हिंदू सणांना कुठलाही निर्बंध असणार नाही. असे मुख्यमंत्री सांगत होते...याची आठवण करत मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा अशी मागणी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 11:10 AM

प्रशासकीय कारभारात प्रकल्पांचे खर्च दुप्पट

 

Mumabi Project Cost Price : मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रकल्पांचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेत. किंमत बदलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीकडे पाठवले जातायत. दहिसर-भाईंदर उन्नत रस्ता आणि गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता या प्रकल्पांचा खर्च दुपटीनं तर कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च बाराशे कोटी रुपयांनी वाढलाय. प्रकल्पांच्या खर्चात हजारो कोटींची वाढ झाल्यानं महापालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक ताण वाढणारेय. मात्र या खर्चवाढीबद्दल संशयही व्यक्त होतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 10:55 AM

मुंबई विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

 

Mumbai University Exam Time Table : मुंबई युनिव्हर्सिटीने आपल्या हिवाळी सत्रातील परीक्षांचं वेळापत्रक चक्क एक महिना आधीच जाहीर केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. परीक्षेतील गोंधळामुळे मुंबई युनिव्हर्सिटी कायम चर्चेत असते. मात्र यावेळी विद्यापीठाने 439 परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून 84 परीक्षांचं वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिध्द केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 10:49 AM

टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

 

Tomato Price Fall : राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. 200 रुपये किलोचा विक्रमी दर गाठलेल्या टोमॅटोचं दर गडगडलेत.कोल्हापुरात किरकोळ बाजारात टोमॅटोला 2 ते 3 रुपये किलो तर  पुण्यात 5 रुपये किलोचा दर मिळतोय. नाशिकच्या बाजारसमित्यांमध्येही टोमॅटोच्या क्रेटचे दर 2 हजारांवरुन थेट 90 रुपयांवर कोसळलेत. लागवडीचा खर्चही निघत नसल्यांन अखेर हाताश झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी शेतातील उभं पीक काढून टाकायला सुरुवात केलीये. अनेक शेतकरी तर रस्त्यावर टोमॅटो फेकून देतायत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 08:49 AM

मराठी पाट्या नसल्यास भुर्दंड

 

Supreme Court On Marathi Signboard : दोन महिन्यांत मराठी पाट्या लावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने व्यापा-यांना दिलेयत... दसरा-दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ आहे...असा सल्ला देत सुप्रीम कोर्टाने मुंबईसह राज्यातील व्यापा-यांना दोन महिन्यांत मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिलेयत... गेल्या वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश दिले होते....त्याला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोशिएशनने कोर्टात आव्हान दिलं...मात्र, उच्च न्यायालयाने व्यापा-यांना दणका दिला...त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली...मात्र, सुप्रीम कोर्टानेही व्यापा-यांना दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिलेयत...हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात पाठवल्यास तुम्हाला मोठा भुर्दंड सोसावा लागेल असं सांगत सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचा सल्ला दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 08:16 AM

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात

 

Central Railway Motorman : मध्य रेल्वेचं मोटरमन आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.. सिग्नल तोडणं, वेगावर नियंत्रण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणा आहेत. मात्र त्यावरुन दिल्या जाणा-या सूचनांमुळे लक्ष विचलतील होणार असल्याची तक्रार मोटरमन्सनं केलीये. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येईल असा दावा मोटरमन्सनं केलाय. मोटरमनला मार्गदर्शन द्यायचे असल्यास एका लोकलमध्ये दोन मोटरमन ठेवावेत अशी मागणी त्यांनी केलीय.. पुढील दोन दिवसांत सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव मागे न घेतल्यास अनंत चतुर्दशीनंतर आंदोलन केलं जाईल अशी भूमिका मध्य रेल्वेच्या मजदूर संघाकडून घेण्यात आलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 08:11 AM

कांदा कोंडी फुटणार?

 

Ajit Pawar : कांदा व्यापा-यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयात बैठक होणारेय. नाशिक जिल्ह्यातल्या 17 बाजार समित्यांच्या सभापतींनी पिंपळगाव बाजार समितीत बैठक घेतली. या बैठकीत व्यापा-यांच्या संपावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच शेतक-यांचा कांदा राज्य सरकारनं नाफेड मार्फत खरेदी करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यापा-यांनी संप मागे घेऊन कांदा खरेदी सुरू करण्याचं आवाहनही करण्यात आलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 September 2023 08:07 AM

खासगी बसचा अपघात, 25 जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर

 

Jalna Accident : संभाजीनगर- जालना मार्गावर एक खासगी बस पुलावरून खाली कोसळलीय. या अपघातात तब्बल 25 प्रवासी जखमी झालेत. तर चार जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात बदनापूरजवळीच्या मात्रेवाडी पुलावर घडलाय. पूजा ट्रव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. रात्री 12 वाजताच्या सुमारास बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पुलाखाली कोसळळी. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More