Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला लागणार आहेत.. मात्र 10 जूनला दिल्लीत महत्त्वाची घडामोड घडणार आहे का याची चर्चा सुरु झालीय.. कारण अजित पवारांनी केलेल्या सूचक विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.. 10 जूनला दिल्लीत काही वेगळं घडलं तर राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुढे जाण्याची शक्यता असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय.. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन 10 जून रोजी होणार होता. मात्र तो पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता अजित पवारांनी बोलून दाखवलीय. त्यामुळे 10 जूनला दिल्लीत मोदींचा शपथविधी होणार की काही वेगळं घडणार याचीच सध्या चर्चा सुरु आहे....
बातमी व्हिडीओ पाहा-
Ravindra Dhangekar : पुण्यात पब आणि बार मालकांकडून हप्तेवसुली केली जाते.. महिन्याला किती हप्ता गोळा केला जातो याची यादीच पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सादर केलीय. पुण्यात नाईट लाईफला पाठीशी घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांचा मोठा वाटा आहे. राजपूत यांना महिन्याला पैशाचं पाकीट पुरवलं जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी पुण्यात बार आणि पबमधून किती हप्ता वसूल केला जातो याची यादीच वाचून दाखवली..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Sasoon Doctor Cash Seized : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये जप्त करण्यात आलेत. तर अतुल घटकांबळे या ससूनच्या शिपायाकडून 50 हजार रुपये जप्त करण्यात आलेत.. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ही रक्कम डॉ. हळनोर आणि घटकांबळे यांना कुणी दिली, याचा शोध सुरू आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Car Accident Case : आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलणा-या ससूनमधल्या डॉक्टर्सच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन सदस्यीय समिती नियुक्त केलीय.. जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखालील ही समिती चौकशी करणार आहे.. डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरीही या चौकशी समितीत आहेत...समितीमधले अधिकारी पुण्यात येऊन या प्रकरणाची चौकशी करणार आहेत..
Rajkot Gaming Zone Fire Case : राजकोट आग प्रकरणी वरिष्ठ पोलीस पोलीस अधिका-यांसह महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आलीये...पोलीस आयुक्त राजू भार्गव आणि महापालिका आयुक्त आनंद पटेल यांची तात्काळ बदली करण्यात आलीये...अतिरिक्त पोलीस आयुक्त विधी चौधरी आणि झोन टू चे पोलीस उपायुक्त सुधीर देसाई यांचीही बदली करण्यात आलीये....राजकोटच्या टीआरपी गेमझोनमधील आगीत 27 जणांचा मृत्यू झालाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Anjali Damania on Ajit Pawar : पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत...अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा आरोप अंजली दमानियांनी केलाय...त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब खुलासा करावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये...अजित पवारांनी फोन केला असेल तर तातडीने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये....त्यावर आपण कोणालाही फोन केला नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय...त्याचबरोबर कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं अजित पवार म्हणालेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Car Accident Case : अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणी आणखी वाढताय...दोघांविरोधात आणखी एक नवीन तक्रार दाखल झालीये...अग्रवालनं कामाचं पैसे थकवल्यानं आर्थिक अडचणीत आलेल्या मुलानं आत्महत्या केली...वडगाव शेरीतील दत्तात्रय कातोरे यांनी ही तक्रार केलीये...ते खोदकाम कंत्राटदार आहेत...मुलगा शशिकांतने जानेवारी महिन्यात आत्महत्या केल्याचा आरोप ते करताय...तर मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या अग्रवालवर कारवाई व्हावी अशी मागणी पुणे शिवसेना नेते अजय भोसले यांनी पोलिस आयुक्तांकडे केलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Car Accident Case :पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांसह, एका शिपाईला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी...आरोपी डॉ श्रीहरी भीमराव हळनोर, डॉ अजय तावरे, आरोपी अतुल घटकांबळेला 4 दिवसांची पोलीस कोठडी...ससूनच्या डॉक्टर्सनी आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं.
Mumbai Unauthorized Pubs, Bars Raided : पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभाग, पोलिस आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाने मुंबईतील अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती सुरू केली आहे...दोन दिवसांत पोलिस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने १३१ ठिकाणी धाडी टाकून ४३ बारवर कारवाई केली..या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांशी फोन वरून केली चर्चा करून माहीती घेतली. या प्रकरणात आरोपी आणि त्याच्याशी संबंधीत इतर सह आरोपांवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश. आरोपींचा पूर्व इतिहास शोधून काढण्याचेही दिले आदेश.*
Pune Car Accident Case : डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी लिहिलं होतं...वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय..26 डिसेंबर 2023 रोजी हे पत्र लिहिण्यात आल्याचं समजतंय...
Pune Car Accident Case : येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या पोर्श कारची अधिका-यांनी पाहणी केलीये...आरटीओ अधिका-यांच्या टीमने या कारची पाहणी केलीय...विशाल अग्रवालच्या वकीलांनी न्यायालयात गाडीत तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं होतं...त्यानुसार आरटीओच्या टीमनं आज या कारची पाहणी केलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत...अशी मागणी नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केलीये...विधानसभेमध्ये 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत, आलो त्यावेळी त्यांनी 80-90 जागा देणार असं सांगितलं होतं...आता झाली तशी खटपट होता कामा नये, आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असंही भुजबळ म्हणालेत... ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते....भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आधीपासूनच त्याबाबत काळजी घेतली जाईल असं म्हटलंय... नाशिकमध्ये विलंबाचा फटका महायुतीला बसल्याचंही अजित पवारांनी यावेळी मान्य केलं...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Washim Water Shortage : वाशिम जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. 55 गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली. जिल्ह्यातील जलप्रकल्पात केळव 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे शहराला 10 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय. तर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी 53 ठिकाणी विहिर अधिग्रहण करण्यात आल्यात... तर 2 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. मान्सूनचा पाऊस जर लांबणीवर पडला तर.... पाणीसमस्या आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून मविआतही बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय...ठाकरे गटाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केलीय...विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मविआतील मित्र पक्षांची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Jalgaon 4 Death : जळगावात वादळी वा-याच्या तडाख्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. घर कोसळून एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी या आदिवासी पाड्यावर घटना घडलीय. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे. चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या चारही जागा शिंदे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...चारही जागांवर शिवसेना शिंदे गट उमेदवार देणार असून, आज दुपारी अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे...शिवसेना शिंदे गट चारही जागा लढण्यास इच्छुक असल्याने महायुतीत पेच निर्माण झालाय...मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ लढण्यास शिंदे गट इच्छुक असल्याची माहिती मिळतेय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mahasahtra Vidhansabha Election : राज्यात विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यताय...महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबरपर्यंत आहे...त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातेय...त्यामुळे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची चिन्हे आहेत...विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते...त्यामुळे मुदत संपण्याआधी निवडणूक होण्याची शक्यताय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Yavatmal Temprature : विदर्भात सूर्य कोपलाय... यवतमाळ हा राज्यातील सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय. यवतमाळमध्ये काल तब्बल 46 अंश तापमानाची नोंद झाली. पुढचे 2 दिवस विदर्भातील पारा चढाच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारीचा इशारा दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
MNS Abhijeet Panse : विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरलीय...कोकण विभाग पदवीधरमधून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...मनसेनं उमेदवारी जाहीर केल्याची माहिती अभिजीत पानसेंनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Teacher Recruitment : राज्यामध्ये सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा व्यत्यय आलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आलीये..लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र शिक्षण विभागाच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने विशेष बाब म्हणून भरतीसाठी सूट दिली होती.असं असताना राज्यात विधानपरिषदेच्या मुंबई कोकण आणि नाशिक विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या विभागात 24 मे पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे...दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जशी सवलत मिळाली होती तशीच सवलत विधान परिषद निवडणुकीच्या काळात मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊस इथं बैठक होणारेय. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची उपस्थिती असणारेय. तसंच सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असतील. पक्षाच्या बैठकीत आगामी विधानसभ, महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यताय. तसंच या बैठकीत काही पक्ष प्रवेश देखील होणारेत. प्रामुख्यानं या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धीरज शर्मा यांचाही पक्षप्रवेश होणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Malegaon Firing : गोळीबारानं मालेगाव शहर पुन्हा हादरलंय.. मालेगावचे माजी महापौर आणि MIMचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केलाय...मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये मलिक चहा पिण्यासाठी बसलो होते. त्यावेळी मोटारसायकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी मलिक यांच्यावर तीन गोळया झाडल्या आणि ते फरार झाले.. मलिक यांच्या हाताला, पायाला आणि छातीला गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर MIM चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी भेट दिली आणि आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली.. मालेगावात गुंडाराज सुरु असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Car Accident Update : अल्पवयीन आरोपीला गाडी चालवायला दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल अगरवालच्या अडचणीत आणखी वाढ होणाराय...ड्रायव्हरचे अपहरण आणि धमकी दिल्याच्या गुन्ह्यात पुन्हा अटक अग्रवालला अटक होण्याची शक्यता...अपघात झाल्यानंतर मुलाचा गुन्हा तू अंगावर घे अशी धमकी देऊन अग्रवालने ड्रायव्हरला घरात डांबलं होतं...त्यामुळे या गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी पोलीस न्यायालयात अर्ज करणार आहेत...त्यानंतर तपासासाठी ताबा मिळण्याची शक्यताय...तर अपघात प्रकरणातील पब आणि बारशी संबंधित न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यताय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
SSC Result : आज दहावीचा निकाल लागणाराय...दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे...सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष पत्रकार परिषद घेऊन निकालाबद्दल माहिती देतील...त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल पाहता येणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Remal Cyclone : रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलंय...वादळी वा-याचा वेग वेग ताशी 135 किमी पर्यंत पोहोचलाय..चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये - उत्तर आणि दक्षिण २४ परांगाना, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिवृष्टी होत आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. पश्चिम मेदिनीपूर, नादिया, पूर्व बर्दवान येथे सोमवारी मुर्शिदाबादमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.. या वादळामुळे कोलकाता विमानतळ सकाळी 9वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय.. NDRFच्या 14टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात ठेवण्यात आल्यात.. शिवाय बंगालच्या राज्यपालांनी तातडीची बैठकही बोलावलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sangli Rain : सांगलीत दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. उमदी, संख आणि बालगावसह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट झालीय. वादळी वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेलीत. संसार उघड्यावर पडलेत. रस्त्यावर झाडं उन्मळून पडलीत. तर विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर कोसळल्यानं वीजपुरवठा खंडित झालाय. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पचंनामे करून मदत द्यावी, अशी मागणी नागरिक करतायत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Buldhana Rainfall : बुलढाण्यात वादळी वा-यासह पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय...बुलढाणा, शेगाव, जळगाव, जामोद आणि मलकापूर शहरात विजांच्या कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला...या वादळी वाऱ्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्गावर दाताळा नजिक असलेला टोलनाका अक्षरशः उडून गेला...मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही...शिवाय वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली होती... अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्यात...त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय...तर ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झालीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.