Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यात सध्या तिसऱ्या भाषेवरून वादंग उठलं आहे. राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्ती भाषा नसावी, यासाठी शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू 5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासंदर्भात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर आषाढी वारीचा उत्साह महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. या सर्व घडामोडींचा धावता आढावा, एका क्लिकवर
मराठीसाठी मोर्चे काढणाऱ्या नेत्यांची मुलं कोणत्या माध्यमात शिकतात? राऊतांनी केलं उघड, 'अनेक शिवसेना नेत्यांची मुलं इंग्रजी...'https://t.co/8Nw85l314y#SanjayRaut #Shivsena #MNS #RajThackeray #UddhavThackeray #Marathi #Hindi @kamleshsutar
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
'मुंबई, महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना...,' संजय राऊतांनी केली नव्या कायद्याची मागणी; 'परदेशात शिकून आलेल्यांची नावं...'https://t.co/2QJYNnbU2V#SanjayRaut #Shivsena #MNS #RajThackeray #UddhavThackeray #Marathi #Hindi@kamleshsutar
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
Shefali Jariwala Death: 'रात्री 11 वाजता अचानक शरीर थरथरु लागलं अन्....', पोलीस तपासात महत्त्वाचा उलगडा, 'दुपारी इंजेक्शनने...'https://t.co/0xCHspPstO#ShefaliJariwala #ShefaliZariwala #ShefaliJariwaladeath #Shefali #शेफालीजरीवाला #Bollywood
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
Kolkata Rape: 'मी आधी भारतीय, नंतर बाप,' आरोपीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं, 'जर माझा मुलगा दोषी आढळला तर...'https://t.co/50CQS49riE#Kolkata #KolkataRape
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
हाजी अलीजवळ समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मच्छिमारांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं. त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आलं, पण मृत्यू झाला. संतोष विश्वेश्वर, कुणाल कोकाटे आणि संजय सरवणकर अशी त्यांची नावं आहेत.
Exclusive : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राज ठाकरे- उद्धव ठाकरे युतीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, 'दोघा भावांनी याबद्दल...'#Maharashtra #SanjayRaut #Z24TAAShttps://t.co/9tmuM4kQ57
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
शेफालीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून घराची तपासणी... हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असताना फॉरेन्सिक तपासणी केल्यानं मृत्यूचं गूढ वाढलं#shefalijariwala #entertainmenthttps://t.co/VQ491DVW7b
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
बहुप्रतिक्षित इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची (Class 11 th Online Admission Process)गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी (First Entry Round) अंतर्गत 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत. त्यात कला शाखेच्या 1 लाख 49 हजार 791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1 लाख 39 हजार 602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3 लाख 42 हजार 801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती. मात्र,त्यावर रात्रंदिवस काम सुरू होते. अखेर प्रवेशाची गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष प्राप्त महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या प्रवेश फेरीसाठी 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी तर वाणिज्य शाखेच्या 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी 10 पर्याय उपलब्ध होते. त्यानुसार 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे.तर 77 हजार 99 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसरा पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला.
भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार भारताने पाकमध्ये असलेल्या ज्या दहशतवादी स्थळांना भारताने लक्ष्य केलं होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं केलं जात आहे. या संदर्भात पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत जैश, लष्कर, हिजबुल आणि टीआरएफसह इतर दहशतवादी संघटनांचे हेड कमांडर उपस्थित होते. या बैठकीत भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट केलेल्या दहशतवादी लाँच पॅड्सची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे लॉंच पॅड बांधण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय निधी देणार आहे
Maharashtra Breaking News Today: शेफाली जरीवालाचा मृतदेह रुग्णालयातून निवासस्थानी दाखल
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यानंतर आता तिचे पार्थिव शरिर तिच्या राहत्या घरी आणण्यात आले आहेत.
#WATCH | Maharashtra | Actress-model Shefali Jariwala's body brought to her residence in Mumbai. pic.twitter.com/K64AuLesch
— ANI (@ANI) June 28, 2025
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यानंतर आता तिचे पार्थिव शरिर तिच्या राहत्या घरी आणण्यात आले आहेत.
5 जुलैला दोन बंधू एकत्र येणार असल्याचं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टू द पॉईंट या मुलाखतीत केलंय. दोन भावांनी एकत्र यावं, एकत्र ताकद दिसावी म्हणून एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय. आमच्या शिवसेनेचा 7 जुलैला मोर्चा होता, आणि राज ठाकरेंनी आधी 6 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र यायला हवेत म्हणून आम्ही मोर्चाची तारीख 5 जुलै केल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय.
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असल्याचा आरोप असलेल्या साकिब नाचनचा मृत्यू. दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन व समन्वय समिती ची स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रसिद्धी, प्रसार माध्यमे यासाठी ही समिती कार्य करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
Maharashtra Breaking News Today: महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सेनेची गळती सुरुच, ठाकरेंचे माजी नागपूर शहरप्रमुख राजू तुमसरे शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसंत मोरे यांनी कात्रज चौकाच्या कामावरुन आंदोलन केलं होतं.. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मोरेंसह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या लक्षात घेणार, दोन्ही एनसीपी एकत्र येण्याबाबत सुळेंचं सूचक विधान. इच्छा ऐकून घेणं ही लोकप्रतिनिधीची ताकद, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय.. शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकनं आल्याचं सांगण्यात आलंय... मात्र त्यानंतर सकाळीच फॉरेन्सीकची टीम आणि पोलिसांचं पथक तीच्या घरी दाखल झालं.. फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली. जर शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगीतलं जात असेल तर फॉरेन्सिकची टीम आणि पोलीस तिच्या घरी का आले. त्यांनी तिच्या घरात का तपास केला. तिचा मृत्यू संशयास्पद आहे का असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतात..
आदिवासी मंञी अशोक उईके यांचा असाही मराठी बाणा....प्रेसमधे हिंदीत मागताच मला हिंदीत येत नाही मी मराठीतच बोलेन...हिंदीत नाही...!!! राज्यात सध्या हिंदी सक्तीचा आरोप होत असतानाच सत्ताधारी भाजपच्या मंञ्यानेच हा असा मराठी बाणा दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर कर्मचारी करत होते डान्स, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल; AISATS ने केली कारवाईhttps://t.co/3C8XXjhdmd#AirIndiaCrash #AirIndia #airindia171 #AISATS #AhmedabadPlaneCrash
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
Kolkata Rape: 'आता जर मित्रानेच मैत्रिणीवर बलात्कार केला तर...', तृणमूलच्या खासदाराचं विधान, 'पोलीस काय शाळेत...'https://t.co/X5Bu6xJEVg#Kolkata #KolkataRape
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
'माझ्यावर बलात्कार करताना हॉकी स्टिकने....,' पीडितेने उलगडला धक्कादायक घटनाक्रम; 'माझे कपडे उतरवले अन् उभं राहून...'https://t.co/KfqXRllP6D#Kolkata #KolkataRape
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय.. शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकनं आल्याचं सांगण्यात आलंय... मात्र त्यानंतर सकाळीच फॉरेन्सीकची टीम आणि पोलिसांचं पथक तीच्या घरी दाखल झालं.. फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली. जर शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगीतलं जात असेल तर फॉरेन्सिकची टीम आणि पोलीस तिच्या घरी का आले. त्यांनी तिच्या घरात का तपास केला. तिचा मृत्यू संशयास्पद आहे का असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतात..
Maharashtra Breaking News Today: वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या. काकू आणि चुलत भावाची केली कुऱ्हाडीने हत्या. तर आरोपीने स्वतः विष पिऊन केली आत्महत्या. घटनेने परिसरात खळबळ.
राज्य सरकार प्राप्तिकर विभागाशी करार करणार, सूत्रांची माहिती. लाडकीच्या माहितीबाबत गोपनीयतेसाठी निर्णय
बिग बॉस शापित? शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत #Shefalijariwala #entertainmentnews #himanshikhurana https://t.co/fF0tRAtKAt
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. बारामतीतील एआय संदर्भातील चर्चासत्रासाठी दोन्ही नेते एकत्र येणार असल्याची माहिती
राजकारणात आशिष शेलारांना ओळखते इतारांना नाही असं वक्तव्य आशाताई भोसले यांनी केलं होतं. त्यावर आता आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्या विधानाकडे राजकीय अँगलने पाहू नये असा सल्ला शेलारांनी दिलाय. कुणाला अपमानित करण्यासाठी आशाताईंनी ते विधान केलं नसल्याचं शेलारांनी म्हटलंय.
'सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल, भाजपाला विनंती आहे की...'; 'राज ठाकरेंना ताब्यात घ्यावं'वरुन मनसे आक्रमकhttps://t.co/fhG2WYYjzg < येथे वाचा सविस्तर वृत्त...#RajThackeray #MNS #UBT #Morcha #5July #Marathi #Hindi #avinashjadhav #warning #gunratnasadavarte
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
हिंदीच्या मुद्यावरुन 5 जुलैला मोर्चाची हाक देणा-या ठाकरे बंधूंनी युतीसाठी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे. त्यातच आता ठाकरे बंधू आगामी मनपा निवडणुका एकत्र लढणार का. राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार का याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. कारण संजय राऊतांनी मनपा निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलंय. या निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावं असं राऊतांनी म्हटलंय. तसंच शिवसेना UBT आणि मनसेचे नेते एकमेकांना भेटत नव्हते. एकमेकांना बघून रस्ते बदलायाचे. आता मात्र ते नेते एकमेकांना भेटतात असंही आवर्जून नमूद केलंय. त्यामुळे ही आगामी युतीची नांदी आहे का अशा चर्चा सुरु झाल्यात.
वांद्रे पश्चिम, ह्या उच्चभ्रू हिंदी बहुल मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे श्री. आशिष शेलार ह्यांना आपला मराठी भाषेबद्दलचा स्वाभिमान गहाण ठेऊन हिंदीचे पाय चाटावे लागतायत. त्यामुळे आम्ही त्यांची हतबलता समजू शकतो. त्यामुळे मी त्यांच्यासाठी एकच हिंदीतला डायलॉग समर्पित करेन
"बोलने दे, दर्द हुआ है बेचारे को, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचा शेलारांवर घणाघात
हिंदी सक्ती विरोधात पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना केले जाणारा आवाहन. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून थेट नागरिकांशी करणारे चर्चा. मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात १२ वाजता जाऊन नागरिकाना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत
अटकेनंतरही दाम्पत्याचा अघोरीपणा सुरूच, पोलिसांसमोरच मंत्र फुकले अन्...; भांडुप प्रकरणात हादरवणारा खुलासाhttps://t.co/WzQ1E1UvLE
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
Maharashtra Breaking News Today: मराठी भाषा शिकणं हे बंधनकारक आहेः दादा भुसे
पाकिस्तानातील रस्त्यांवर टीम इंडियाची जर्सी घालून निघाला विदेशी फॅन, लोकांनी दिली अशी रिअॅक्शन Video https://t.co/qFpmOtFdGW
— ZEE २४ तास (zee24taasnews) June 28, 2025
Maharashtra Breaking News Today: भंडा-यात धान खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत सापडलायं. उद्दिष्ट नसल्याने शेतक-यांचे धान तसेच पडून आहेत. त्यामुळे शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे अशी मागणी करण्यात आलीयं. मागणी मान्य न केल्यास कमी दरात व्यापा-याला धान विकण्याची वेळ शेतक-यांवर येणारेय.
Maharashtra Breaking News Today: 1 जुलैला कल्याण,डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी चार दरम्यान पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत,डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद असेल.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सचिव, उपनेतेपदी नवीन लोकांना संधी मिळणार असून मुंबईसाठी पक्षाकडून नव्या चेह-यांचा शोध सुरू आहे.
हिंदीविरोधात मविआत ऐक्य झालंय. 5 जुलैला होणा-या मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित मोर्चाला काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी (SP)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र प्रसिद्ध करुन याबाबत माहिती दिली. मोर्चानंतर पुढेही राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युतीत येऊ शकतात का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
संभाजीनगरमध्ये महापालिकेनं अनधिकृत बांधकांमांवर कारवाई सुरु केलीये.. जालना रस्ता अतिक्रमणमुक्त करून ६० मीटर करण्याची मोहीम मनपाने हाती घेतलीये.. मुकुंदवाडी आणि चिकलठाणा येथील अतिक्रमणे काढण्यासाठीची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे आजपासून पुन्हा अनधिकृत बांधकामावर जेसीबी चालणार आहे. निवासी घरांची अनधिकृत आणि बेकायदा बांधकामे काढण्यास १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.
महाराष्ट्र भाजपला अखेर नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.. सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे..
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आणि सध्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. 3 जूनला रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहेत. 1 जुलै रोजी याबबात मुंबईतील वरळी डोम इथं अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
---हिंदीविरोधी मोर्चासाठी मनसेची मुंबईकरांना साद
---मनसे मुंबईकरांना सहभागासाठी आवाहन करणार
--मनसे नेते लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन करणार
--दादर स्टेशनमधून मनसे करणार सुरुवात
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पाहिले मानाचे अश्व गोल रिंगण सोहळा पार पडला. बारामतीच्या बेलवाडी गावात पहिलं अश्व गोल रिंगण उत्साहात पार पडलं! या रिंगणात तुकोबांच्या पालखीतील मानाचा अश्व पारंपरिक पद्धतीने गोल पद्धतीने धावत वारकऱ्यांची भक्तिभावाने उस्तुकता वाढवतो. या क्षणासाठी खास तयारी केली जाते आणि अश्वाला विशेष साज चढवला जातो. या मानाच्या अश्वाची निगा राखण्याची जबाबदारी रनेल कुटुंबकडे आहे. आजही विशाल रनेल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही परंपरा जपत, मनोभावे सेवा केली.
गणेश मंडळांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन परंपरेनुसार व्हावे. याकरता पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाययोजनांसह न्यायालयात टिकेल असे धोरण आता राज्य सरकार आणणार आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधितांना दिले आहेत. काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत, यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री आशिष शेलार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव रविंद्र आंधळे आदी उपस्थित होते..
Maharashtra Breaking News Today: शाळेत पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच. भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत ठराव मंजूर. हिंदीबाबतचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
Maharashtra Breaking News Today: राज्यातील जनतेचे हित लक्षात ठेवून शिवसेना काम करत आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस याचे हित महत्त्वाचे आहे. दोन्ही पक्ष मोर्चा एकत्रीत काढणार आहेत. भाजप कडून विधानाचा पूर येतो आहे. मुख्यमंत्र्यांना मनसे प्रमुख भेटतात तेव्हा भाजपला चांगले वाटतात पण जेव्हा शिवसेनेसोबत मनसे मोर्चा काढला जातो त्यावेळेस भाजपला अनेक अर्थ असतात. दोन्ही पक्षाचे मनोमीलन भाजप ला रचलेले नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केल्या आहेत.
Maharashtra Breaking News Today: संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार आहे. दरम्यान पालखीचं पहिले गोल रिंगण बेलवाडीत पार पडत आहे..
Maharashtra Breaking News Today: कर्नाटकच्या नर महाडेश्वर हिल्स वन्यजीव अभयारण्यात पाच वाघ मृतावस्थेत आढळलेत. यात एक मादी आणि तिच्या चार बछड्यांचा समावेश आहे. वनमंत्री ईश्वर खांडेंनी वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण कळेल, असं वन विभागानं म्हटलंय.
नाशिकच्या चांदवडमधील तिवडे डोंगर परिसरात बिबट्या आढळून आलाय. या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने परिसरात धुमाकूळही घातलायं. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केलीयं.
Maharashtra Breaking News Today: ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान रथ ओढताना चेंगराचेंगरी झालीये. यात 600हून अधिक भाविक जखमी झाले. यातील काही भाविकांची प्रकृती गंभीर आहे. रथांना श्री गुंडिचा मंदिराकडे ओढताना हरि बोलच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या दरम्यान, उष्णता आणि दमट हवामानामुळे अनेक भाविक बेशुद्ध झालेत.
अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; रुग्णालयाबाहेरील Video समोरhttps://t.co/VstfKf1HyB < येथे वाचा सविस्तर...#shefali #Shefalijariwala #bollywoodnews #ShefaliJariwaladeath #entertainment #EntertainmentNews #bollywoodnews…
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2025
हिंदी भाषेच्या मुद्द्यावर 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत.. या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे आणि शिवसेना UBTच्या नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत संवाद सुरू केलाय.. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना सहभागी होण्यासाठी फोन केलाय.. त्यामुळे बच्चू कडू हे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे..
Uddhav Thackeray Adesh : हिंदीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात आंदोलन करण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसेना UBT च्या पदाधिकाऱ्यांना आदेश.. 5 जुलैच्या मोर्चाची रविवारी रंगीत तालीम.. 29 जूनला हिंदी भाषेच्या जीआरची होळी करण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश.. प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, तालुक्यात आंदोलन करण्याचे दिले आदेश.. भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध.. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईत मनसेच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली आहे. मोर्चाच्या आयोजनाच्या तयारी संदर्भात यात पदाधिका-यांना सूचना केल्या आहेत. दक्षिण मुंबईत 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मनसेचा मोर्चा निघणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.