Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
28 May 2024
28 May 2024 22:10 PM

डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटप्रकरणी मलय मेहताच्या पत्नीला अटक

 

Dombivli Blast Case : डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी मलय मेहताची पत्नी स्नेहा मेहताला अटक...उल्हासनगर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलीये....कंपनीत मलयसोबत पत्नी स्नेहा देखील भागीदार ...दोघांनाही उद्या कल्याण न्यायालयात हजर करणार..

28 May 2024 21:27 PM

पुण्यात ससूनच्या चौकशी समितीची बिर्याणी मेजवानी

 

Sassoon Hospital Blood Sample Tampering Case : ससून रुग्णालयातल्या ब्लड सॅम्पलची हेराफेरी केल्याप्रकरणी तीन सदस्यीय समिती चौकशी करतेय.. आधीच या समितीच्या अध्यक्षा आणि जेजे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळेंवर विरोधकांनी आरोपांच्या फैरी डागल्यात. मात्र ही चौकशी आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आलीय.. ससून रुग्णालयात दाखल झालेल्या चौकशी समितीने बिर्याणीवर ताव मारत चौकशी केल्याचं समोर आलंय. पुण्यात ब्ल्यू नाईल या रेस्टॉरंटची बिर्याणी प्रसिद्ध आहे... याच बिर्याणीच्या बॅगा ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांच्या केबिनमध्ये नेत असल्याचा फोटो समोर आलाय.. तेव्हा चौकशी समितीच्या या बिर्याणी मेजवानीची पुण्यातच नाही तर राज्यातही जोरदार चर्चा आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 May 2024 20:15 PM

मुंबई शिक्षकाची जागा अजित पवार गटाकडे, शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी 

 

Shivajirao Nalawade : महायुतीतील अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय...शिवाजीराव नलावडे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलीये...सुनील तटकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 May 2024 19:10 PM

जायकवाडी धरणातील जलसाठ्यात घट

 

Jayakwadi Dam :  जायकवाडी धरणाचा पोट आता खपाटीला गेलाय धरणात अवघात पाच टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे असलेलं हे धरण आता उघड पडलाय आणि त्यामुळे या धरणाच्या पोटात सामावलेले कित्येक गाव आणि त्यांचे भग्न अवशेष सुद्धा उघडे पडलेत.

28 May 2024 18:35 PM

पुणे अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या 2 मित्रांचा जबाब नोंदवणार

 

Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या 2 मित्रांचाही जबाब नोंदवणार..पुणे पोलिसांनी मित्र, पालकांना केलं पाचारण...पार्टीच्या दिवशी काय घडलं? पुणे पोलीस करणार चौकशी...गाडीत सोबत असलेल्या मित्रांचा जबाब नोंदवणार
 

28 May 2024 18:04 PM

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

 

Jarandeshwar Factory : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी संर्दभातील पत्र जारी केलं गेलंय. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच कारखाना चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे हा ⁠अजित पवार यांना मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ⁠आहे. तसंच महायुतीत सर्व आलबेल नसल्याची चर्चाही सुरु झाली आहे. EDने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवारांचं नाव वगळलं होतं. मात्र आता पुन्हा ACBने चौकशी सुरु केल्यानं खळबळ उडाली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 May 2024 17:20 PM

पुणे कार अपघात प्रकरण, रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई

 

Pune Car Accident Case : पुण्यातील हिट अँड रन अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलवणा-या डॉक्टरांविरोधात आता महाराष्ट्र मेडिकल कॉऊन्सिलनं कारवाई सुरु केलीय. डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हळणोर या दोघांना महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलनं नोटीस बजावत 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर मागितलंय. दोन्ही डॉक्टरांची कृती वैद्यकीय व्यवसायांच्या तत्वांविरोधात असल्याचं मत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलनं व्यक्त केलंय. 

28 May 2024 16:30 PM

 पुणे कार अपघात प्रकरण, रॅपर चौकशीला गैरहजर

 

Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी इन्स्टाग्रामवर वादग्रस्त रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर राहिलाय. पोलिसांनी पुन्हा या तरुणाला नोटीस बजावलीय. कार अघातानंतर या तरुणानं वादग्रस्त रॅप साँग तयार केलं होतं. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर चौकशीसाठी त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. मात्र या तो गैरहजर असल्यानं त्याला पुन्हा नोटीस पाठवलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 May 2024 16:16 PM

'झी २४ तास'च्या बातमीचा इम्पॅक्ट, मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी

 

Mumbai Coastal Road : बातमी झी २४तासच्या इम्पॅक्टची.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी केली...कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागली होती.. झी २४तासनं सर्वात प्रथम ही बातमी दाखवली होती.. या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडची पाहणी केली...कोस्टल रोड गळतीप्रकरणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी आणि कोस्टल रोडशी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली...यावेळी काही एक्सपर्टची मत देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली...

बातमीचा व्हिडीओ  पाहा-

28 May 2024 15:54 PM

पुणे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला 31मे पर्यंत कोठडी

 

Pune Car Accident Case : विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला एकत्रित पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये...31मे पर्यंत दोघांनाही एकत्रित पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय.....ड्रायव्हरला डांबल्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालची पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं...उर्वरीत प्रकरणात आणखी लोक सहभागी असण्याचा संशय व्यक्त करत त्याचा तपास करण्याची गरज असल्याचं सरकारी वकीलांनी म्हटलं...त्याचबरोबर ड्रायव्हरचा मोबाईल हस्तगत करायचाय...घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकी छेडछाड कोणी केली याचा तपास करायचाय...यासाठी दोघांच्या पोलीस कोठडी पाहिजे अशी मागणी सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली त्यानुसार दोघांनाही एकत्रित कोठडी सुनावण्यात आलीये......

28 May 2024 14:18 PM

सोनिया दुहान यांचा सुप्रिया सुळेंवर आरोप

 

Sonia Duhan On Supriya Sule : शरद पवार पक्षाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी आत्ताच पक्ष सोडणार नसल्याचं जाहीर केलंय...मात्र भविष्यात पक्ष सोडण्याबाबतही त्यांनी यावेळी सांगितलंय...त्याचबरोबर सुप्रिया सुळेंमुळेच लोकं शरद पवार पक्ष सोडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 13:15 PM

सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर घणाघात

 

Saamana Editorial : सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आलीय. मोदी मनाने कमजोर पडले आहेत, स्वयंप्रभू अवस्थेला पोहचूनही मोदी एकाकी आहेत अशी टीका सामनातून करण्यात आलीय. मोदींची प्रकृती बरी नाही असा टोला मोदींना लगावण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 12:43 PM

पेरणीपूर्वीच कपाशीच्या बीटी बियाणांची टंचाई

 

Amravati BT Biyane : विदर्भात मान्सूनपूर्व कपाशीच्या पेरणीपूर्वीच बीटी बियाण्यांची टंचाई निर्माण झालीये. कंपनी कडून याचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय.. त्यमुळे कृषी सेवा केंद्रात बियाण्यांचा तुटवडा निर्माण झालाय. सर्व शेतक-यांना बियाणं मिळावं यासाठी कृषी विभागाच्या देखरेखीत  एका शेतक-याला दोन पाकीटं देण्यात येत आहेत. त्यामुळे या बियाणांच्या पाकिटावर 867 एवढी किंमत असतानाही बाजारात हे बियाणं 900 ते बाराशे रुपयांना विकलं जात आहे. यामुळे शेत-यांनी नापेरराजी व्यक्त केलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 12:29 PM

EVMसाठी बांधलेलं गोदाम वादात

 

Pimpri EVM : पिंपरीतील EVMसाठी बांधलेलं गोदाम वादात सापडलंय.. रावेत परिसरात हजारो झाडं असलेल्या मेट्रो इको पार्कमध्ये हे गोदाम उभारण्यात आलंय. त्यामुळे इथल्या झाडांना धोका निर्माण झालाय. याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत मेट्रो इको पार्कमध्ये गोदाम बांधलंच कसं? असा सलाव हायकोर्टानं महानगर पालिका आणि निवडणूक आयोगाला विचारलाय.. 10 जूनपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश  कोर्टानं दिलेत.. मेट्रो कार्पोरेशनने तीन कोटी रुपये खर्चून हे मेट्रो इको पार्क उभारलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 10:38 AM

पिंपरीत तरुणाला कारनं चिरडलं

 

Pimpri Crime : पिंपरीत मैत्रिणीसोबत बोलणा-या तरुणाला कारनं चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.. पिंपरीच्या शंकर चौधरी चौकात ही घटना घडलीये. या घटनेत निलेश शिंदे नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय.. या प्रकरणी सशील काळे या आरोपीला ताब्यात घेतलं असून तो दारुच्या नशेत असल्याचं उघड झालंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 10:23 AM

Ambadas Danve : राज्य सरकारनं पुण्यातील ससून रुग्णायातील डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंकडे दिलंय. त्यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हल्लाबोल केलाय. डॉ. सापळेंवर कमिशनचे आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी केला होता याची आठवण करुन देत दानवेंनी टीका केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 10:21 AM

मानवी तस्करी प्रकरणात NIAची मोठी कारवाई

 

NIA Raid : मानवी तस्करी प्रकरणी NIAची मोठी कारवाई केलीये.. देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत NIAनं 5 जणांना अटक केलीये.. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 15 ठिकाणी NIAनं ही छापेमारी केली.. यादरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून डीजिटल उपकरणं आणि बोगस पासपोर्ट जप्त करण्यात आलेत.. हे आरोपी तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून लाओस, व्हिएतनाम आणि  कंबोडिया सारख्या देशांमध्ये पाठवत होते.... या टोळीनं आतापर्यंत किती तरुणांची तस्करी केलीये... आणि ही टोळी कुठेकुठे कार्यरत होती.. याचा तपास सुरु आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 10:11 AM

रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई

 

Nagpur : पुण्यातील हिट अँड रन अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलवणा-या डॉक्टरांविरोधात आता महाराष्ट्र मेडिकल कॉऊन्सिलनं कारवाई सुरु केलीय. डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हळणोर या दोघांना महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलनं नोटीस बजावत 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर मागितलंय. दोन्ही डॉक्टरांची कृती वैद्यकीय व्यवसायांच्या तत्वांविरोधात असल्याचं मत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलनं व्यक्त केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 09:16 AM

संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती?

 

Sambhajinagar Hit and Run : संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.. पैठण तालुक्यातील ढोरकीन लोहगाव रोडवर भरधाव  कारनं एका दुचाकीला धडक दिली.. यादुर्घटनेत दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झालेत.. मुलानी वडगाव फाट्यावर हा अपघात झाला.. अपघातानंतर कार चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र कारचा टायर फुटल्यानं गाडी जागीच थांबली.. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.. या प्रकरणी बिटकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 09:06 AM

नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

 

Nashik Attack : नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला करण्यात आलाय. नाशिकरोडच्या मोरया पार्क परिसरात काही तरुण वाढदिवस साजरा करत असताना उच्छाद मांडत होते. त्यांना माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांनी हटकले. यामुळे मोठा वाद झाला. तरुणांनी तलवार आणि इतर धारदार शस्त्रांनी नितीन खर्जुल यांच्यासह दोघांवर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 08:59 AM

कस्टम विभागानं 11 किलो सोनं पकडले 

 

Gold Seized : मुंबईत कस्टम विभागानं तब्बल 11 किलो सोनं पकडलंय.. या सोन्याची किंमत 9 कोटींच्या घरात आहे.. इस्त्रीमधून या सोन्याची तस्करी केली जात होती.. या प्रकरणी कस्टम विभागानं तिघांना अटक केलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 08:41 AM

मुंबईत पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज

 

Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरांत पुढील 4 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे मुंबईकर हैराण झालेत. आता तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही होतेय. काल देखील मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटे पावसाचा शिडकावा देखील झाला. तसंच संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवत होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 08:38 AM

5 दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

 

Monsoon Update : पुढील 5 दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत हा पाऊस होणार आहे... भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. उत्तर-पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 08:35 AM

ट्रकनं महाविद्यालयीन तरुणांना चिरडले, 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

 

Pune Accident : पुण्यात ट्रकने महाविद्यालयीन तरुणांना चिरडलय.. या अपघातात दोघाचा जागीच मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी आहे...पुण्यातील खराडी बाय पास जवळ रात्री ही दुर्घटना घडलीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 07:36 AM

मुंबई हायकोर्टाकडून सिडकोची कानउघाडणी

 

Mumbai Highcourt On Cidco : मुंबई हायकोर्टानं बेकायदा होर्डिंग्सवरुन सिडकोची कानउघडणी केलीय. बेकायदेशीर फलकांबाबत माहिती असूनही त्यावर कारवाई झाली नाही, मात्र घाटकोपर दुर्घटनेनंतर आता तुमच्या नजरेस हे फलक पडतायत.. तुम्हाला कारवाईबाबत आता जाग आली का? अशा शब्दात हायकोर्टानं सिडकोला खडेबोल सुनावलेत.. बेकायदा फलक हटवण्याबाबत सिडकोनं बजावलेल्या नोटीसला एका जाहिरात कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं, त्यावर हायकोर्टानं सिडकोला फटकारलंय. फलकांच्या स्थिरतेची पाहणी करण्याचे आणि आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 May 2024 07:25 AM

शिफारस पत्रावर आमदार सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण

 

Pune MLA Sunil Tingre Clarification : डॉ. अजय तावरेंना अधीक्षकपदासाठी शिफारसपत्र देण्यावरुन आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलंय. लोकप्रतिनिधी असल्यानं अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात असं टिंगेंनी म्हटलंय. डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी लिहिलं होतं...वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय..26 डिसेंबर 2023 रोजी हे पत्र लिहिण्यात आल्याचं समजतंय...त्यावर टिंगरेंनी आता स्पष्टीकरण दिलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More