Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
29 May 2024
29 May 2024 20:41 PM

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

 

Jitendra Awhad :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तसंच पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं. त्यामुळं आव्हाडांवर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

29 May 2024 20:13 PM

पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी होणार?

 

Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी होण्याची शक्यता...ड्रायव्हर तसेच डॉक्टरवर दबाव आणल्याची शक्यता...गुन्हे शाखेकडून होऊ शकते कारवाई...

29 May 2024 19:09 PM

'बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार', बच्चू कडूंचा इशारा

 

Bacchu Kadu : शेतक-यांना चढ्या दराने बियाणे विकली जात असून काळाबाजार करणा-यांना जेलमध्ये टाकणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय...त्याचबरोबर वेषांतर करून बियाण्यांचा काळाबाज करणा-यांना धडा शिकवणार असल्याचंही कडू म्हणालेत...कृषी केंद्र संचालकांनाही बच्चू कडूंनी इशारा दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 May 2024 18:37 PM

डोंबिवलीतील स्फोटप्रकरणी मलय मेहतासह स्नेहा मेहताला 31 मेपर्यंत पोलीस कोठडी

 

Dombivli Blast Case : डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरणी आरोपी मलय मेहतासह पत्नी स्नेहा मेहताला पोलीस कोठडी... दोघांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी..

 

29 May 2024 18:12 PM

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बेस्टची कारवाई, शिवाजी महाराज पुतळ्याचं वीज कनेक्शन कट

 

Dadar Shivaji Park : दादरच्या छ. शिवाजी महाराज पार्कमध्ये शिवाजी महाराज पुतळा आणि मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचे लाईट कनेक्शन कट करण्यात आलं आहे....मुंबई महापालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभिकरण म्हणून लायटिंग करण्यात आली होती...महापालिकेनं लाईट बील न भरल्यामुळे बेस्टने वीज कापली...बीएमसीला अनेकदा सांगूनही वीज बिल न भरल्याचा बेस्टचा आरोप...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 May 2024 17:37 PM

जितेंद्र आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त

 

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय...बाबासाहेबांचा फोटो मुद्दामून फाडलेला नाही, अनावधाने चूक घडली...मात्र, कुणाच्या भावना दुखावल्यास नतमस्तक होऊन माफी मागतो असं आव्हाडांनी म्हटलंय...बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आव्हाडांवर गंभीर आरोप करण्यात आलाय...त्याप्रकरणी आव्हाडांनी माफी मागितलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 May 2024 16:30 PM

'जितेंद्र आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडला', अमोल मिटकरींचा आव्हाडांवर आरोप

 

Amol Mitkari on Jitendra Awhad : राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलाय...स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय...त्यांनी तात्काळ देशाची माफी मागावी...त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मिटकरींनी केलीय...

29 May 2024 15:51 PM

जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल होणार?

 

Jitendra Awhad : महाड आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे... महाड येथील संदेश साळवी यांनी आव्हाडांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये...जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये...तर आचारसंहिता सुरू असताना विनापरवाना आंदोलन केल्याचाही आरोप आव्हाडांविरोधात करण्यात आलाय...तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणीही आव्हाडांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय...

29 May 2024 15:35 PM

मुख्यमंत्री शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली नोटीस

 

Eknath Shinde sent Notice to Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवली ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस....आपल्या वकीलांमार्फत पाठवली नोटीस....शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातील आपल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केला होता खळबळजनक दावा... तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा....फौजदारी आणि दिवाणी खटला तुमच्या विररोधात आणि सामना विरोधात दाखल करण्यात येईल....

29 May 2024 14:11 PM

ससून हॉस्पिटलचे डॉ. तावरे, डॉ. हळणोर निलंबित

 

Pune Sasoon Hospital : अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणा-या तीन जणांना निलंबित करण्यात आलंय... ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि हरणोरसह शिपाई अतुल घटकांबळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय...अजय तावरेंच्या सांगण्यावरून हरनोळ आणि घटकांबळेंनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं उघडकीस आलंय...त्यामुळे तिघांनाही ब्लड सॅम्पल बदलणे भोवलंय...

29 May 2024 13:33 PM

दुष्काळ पाहणीसाठी काँग्रेसकडून समिती

 

Congress Committee : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणचा पाहता दुष्काळ पाहणीसाठी काँग्रेसकडून समिती स्थापन करण्यात आलीय...ही समिती राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहे...त्या ठिकाणी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत का? यावर नजर काँग्रेसची समिती ठेवणार आहे...पटोले, वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि नसीम खान यांच्या नेतृत्त्वात दुष्काळ पाहणी केली जाणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 13:31 PM

उजनी धरण कोरडंठाक

 

Ujani Dam :  उजनी धरणाचा पाणीसाठा खालावलाय. गेल्या 44 वर्षांतला सर्वात निच्चांकी पातळीवर उजनीचा साठा गेलाय. धरणात सद्यस्थितीत उणे 59.41 टक्केच साठा उरलाय. त्यामुळे उजनीवर उवलंबून असणा-या सोलापूर करांसह इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची चिंता वाढलीय. ड्रोनची ही दृश्य विलास लोंढे यांनी टिपलियत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 12:43 PM

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

 

Delhi Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. केजरीवाल यांची तातडीची याचिका सूचीबद्ध करण्यास सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीनं नकार दिलाय. अंतरिम जामिनाला 7 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आलीय. केजरीवाल यांची याचिका सुनावणीस योग्य नाही. खंडपीठानं त्यांच्या मूळ याचिकेवरील निकाल आधीच राखून ठेवलाय. नवीन अर्जाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिलेलं असल्यानं ही याचिका सुप्रीम कोर्टात राखता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीनं म्हटलंय. त्यामुळे आता केजरीवालांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावंच लागणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 May 2024 12:18 PM

भाजप उमेदवाराच्या ताफ्यात अपघात

 

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशच्या गोंडाच्या कर्नलगंज भागात भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यात अपघात झालाय...करण भूषण यांच्या ताफ्याच्या वाहनाने 4 जणांना चिरडलंय...या अपघातात 2 जण ठार झालेत तर 2 जण गंभीर जखमी झालेयत...करण भूषण हे कैसरगंज येथील भाजप उमेदवार आहेत...त्यांच्या ताफ्यातील गाडीने 4 जणांना चिरडल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 11:37 AM

पुणे अपघात प्रकरणात पोलिसांचं हायटेक पाऊल

 

Pune Police : पुणे कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या  अर्थात AI च्या मदतीने प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी 'एआय'मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही' फुटेज,कारचा वेग रस्ता गाडीचे मॉडेल  हे सगळं हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 11:03 AM

मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका

 

Mumbai Metro 3 : कुलाबा-वांद्रे-कुलाबा मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याच्या चाचण्या आता पूर्णत्वास आल्यायत. त्या चाचण्या 31 मे पर्यंत पूर्ण होणारेत. आरडीएसओ प्रमाणपत्रासाठी लवकरच आरडीएसओना कळवलं जाणारेय. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणापत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत जुलैअखेर उजाडण्याची शक्यताय. त्यामुळे जैलअखेर किंवा ऑगस्टमध्ये आरे ते बीकेसी असा भुयारी मेट्रो प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 10:41 AM

अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा

 

Pune Hordings : पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारलाय.... पुणे शहरात सद्यस्थितीला एकूण 2200 होर्डिंग्स आहेत...त्यापैकी 700 ते 800 होर्डिंग्स अनधिकृत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिलीय...मात्र, ऐनवेळी नोटीस पाठवून कारवाई करू नका, अशी मागणी होर्डिंग व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिकेकडे केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 09:27 AM

कॅनॉलमध्ये कार कोसळली, 6 जणांचा मृत्यू

 

Sangli Accident : सांगलीत कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झालाय. तासगाव-मणेराजुरी मार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून हा अपघात झालाय. यात तासगाव कुटुंबीयाचा मृत्यू झालाय. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या कोकळे इथून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून तासगावला परत येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर एक मुलगी जखमी झालीय. मध्यरात्री हा अपघात झाला..सकाळच्या सुमारास चिंचणी गावातील काही लोक मॉर्निंग वॉक गेल्यानंतर हा अपघात उघडकीस आला.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 09:15 AM

डॉ. तावरे आणि डॉ. हळनोरचं निलंबन होणार?

 

Pune Sasaun Hospital Doctor : अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी ससूनचे डॉक्टर तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवण्यात आलाय... त्याचप्रमाणे त्यांच्यावरील गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ करण्यात आलीय...त्यामुळे त्यांची एसीबीकडूनही चौकशी होण्याची शक्यताय... या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाबाबत लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे...दरम्यान मंगळवारी डॉक्टर तावरेच्या घराची पोलिसांकडून झडती घेण्यात आली...कॅम्प परिसरातील गीता सोसायटीमध्ये डॉक्टर तावरे राहतो...त्याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य जत्त करण्यात आल्याचं कळतंय....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 09:11 AM

पुणे RTOकडून पोर्श कारची नोंदणी रद्द

 

Pune Car Accident Update : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील पोर्शे गाडीची नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आरटीओनं घेतलाय.अपघातग्रस्त गाडी अल्पवयीन आरोपी चालवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. बंगळूरहुन आणलेल्या गाडीला नंबर मिळण्यापूर्वीच ती 166 किलोमीटर चालवली गेल्याचं आरटीओच्या तपासणीत आढळून आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 09:09 AM

ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा डॉ.तावरेच मास्टरमाईंड

 

Pune Car Accident Update : पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय...अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याने अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत करायला सांगितलं होतं...यासाठी त्याने डॉक्टर तावरेला व्हॉट्स अ‍ॅप कॉल केल्याचं तपासात उघड झालंय...गुन्ह्याचा तपास भरकटवण्याच्या उद्देशाने डॉक्टर तावरेनेच ब्लडचे सॅम्पल बदलण्याचा कट रचला होता...त्यासाठी ससूनमधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे यांना डॉक्टर तावरेनेच 3 लाख रुपये दिल्याचं समोर आलंय...या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे...

बातमीचे व्हिडीओ पाहा -

29 May 2024 09:04 AM

रवींद्र धंगेकरांचे भाजपवर गंभीर आरोप

 

Pune Ravindra Dhangekar : भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी दिलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला पुण्याच्या रिंगरोडचं काम दिलं असून, पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैश्यांची दिवसा ढवळ्या लूट होतेय...असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय...पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार,  MSRDC चे अधिकारी आणि ठेकेदार लॉबीने इस्टीमेट रेटपेक्षा तब्बल 40 ते 45 टक्के जास्त दराने निविदा भरल्याचे निदर्शनास आल्याचं धंगेकरांनी म्हटलंय...त्यामुळे चंदा दो-धंदा लो असाच काहीसा प्रकार आपल्या रिंग रोडच्या कामात झाला असून, पुणे शहरातील नागरिकांचा कररुपी पैसा या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून दिला जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 09:00 AM

आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई

 

Buldhana Water : एकीकडे डिजिटल इंडियाचा गाजावाजा सुरू असतानाच दुसरीकडे याच इंडियाचं भविष्य केवळ हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात तब्बल दोन किलोमीटर पायपीट करतंय...बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या भिंगारा, चाळीसटाप्री या आदिवासी पाड्यांवर नेहमीचीच पाणीटंचाई आहे...उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात देखील इथल्या प्रत्येकाला हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करत जावं लागतंय...एक एक हंडा भरण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 08:58 AM

राजधानी दिल्लीत उच्चांकी तापमान नोंद

 

Delhi Temprature : राजधानी दिल्लीत उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. या तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीकर होरपळून निघत आहेत. त्यामुळे आज हवामान विभागानं उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर केलाय. नरेलामध्ये 49.9 अंश सेल्सिअस तर नजफगडमध्ये 49.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. आर्यानगर स्टेशनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. यामुळे 1988च्या तापमानाचा रेकॉर्ड मोडलाय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 May 2024 07:43 AM

मालगाडी घसरली, प्रवाशांचे हाल

 

Palghar : पालघर यार्डात मालगाडी घसरल्याने रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत आहे. दुपारपर्यंत असेच चित्र कायम राहील अशी शक्यताय. मुंबईकडे जाणारा अप मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरुयत. घसरले डबे आणि कॉइल लूप लाईन ट्रॅक नंबर तीन वर सरकविण्याचे काम सुरू आहे. दुपारपर्यंत काम सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगरीय सेवा बंद आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे देण्यात आलेत. मुंबईकडे जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर ते केळवा रोड दरम्यान मुंबई गुजरात दिशेच्या डाऊन ट्रॅकवरून नेण्यात येत आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

Read More