Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : विमान दुर्घटनेत अकोल्याची तरुणी थोडक्यात वाचली

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : विमान दुर्घटनेत अकोल्याची तरुणी थोडक्यात वाचली
LIVE Blog
14 June 2025
14 June 2025 19:52 PM

Exclusive: शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत, मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा!

14 June 2025 19:04 PM

बच्चू कडूंची तब्येत खालावली, अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस

 

Bacchu Kadu on Strike :  बच्चू कडू यांची प्रकृती खालावलीये.. बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या झाल्यात.. मात्र तरिही उपार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिलाय.. कुठलीही सलाईन लावून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीये.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी  आमरण उपोषण सुरु केलंय.. यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

14 June 2025 13:32 PM

शनि देवस्थानातील 167 कर्मचाऱ्यांना नारळ

 

Shani Shingnapur : शनि शिंगणापूर देवस्थानातील 167 कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकण्यात आलंय.. या कर्मया-यांमद्ये 144 मुस्लीम कर्मचा-यांचा समावेश आहे.. अनियमितता तसंच शिस्तीचं पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय... दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शनि चौथ-यावर मुस्लीम लोकांच्या हाताने काम करण्यास सकल हिंदू समाजानं विरोध केला होता.. त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे कर्मचा-यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

14 June 2025 13:21 PM

अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी DVR मिळाला

 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी DVR मिळाला...दुर्घटनास्थळी ढिगाऱ्यातून DVR काढला...ATSच्या टीमने DVR ताब्यात घेतला

14 June 2025 12:19 PM

विमान दुर्घटनेवेळी मला काहीच कळलं नाही- रमेश विश्वासकुमार 

 

Ramesh Vishwaskumar on Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतून रमेश विश्वासकुमार हा आश्चर्यकारकरित्या बचावलाय... या दुर्घटनेत कसा बचावला हे खुद्द रमेश विश्वासकुमारनंच सांगितलंय.. या दुर्घटनेचा थरार रमेशनं सागितला.. मी विमानातून उडी मारली नाही असं म्हणत त्यानं ए टू झेड स्टोरी सांगितलीय... दुर्घटनेवेळी काहीच कळलं नसल्याचंही त्यानं सांगितलंय..

14 June 2025 11:50 AM

थायलंडमध्ये एअर इंडिया विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

 

Air India : थायलंडमध्ये  एअर इंडिया विमानाचं इमरजन्सी लँडिंग...बॉम्बच्या धमकीमुळे इमरजन्सी लँडिंग...फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या विमानात 156 प्रवासी...AI-379 विमानाचं इमरजन्सी लँडिंग

 

14 June 2025 11:33 AM

अहमदाबाद दुर्घटनेत बचावल्या भूमी चौहान

 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद दुर्घटनेत बचावल्या भूमी चौहान...10 मिनिटं लेट, भूमी चौहान यांचं विमान चुकलं...लंडनहून माहेरी अहमदाबादला आलेल्या भूमी...भूमी चौहान यांनी मानले देवाचे आभार

14 June 2025 10:45 AM

दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय.. या ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताचं गूढ उलगडणार आहे... जेव्हा एखादे विमान कुठेही कोसळते, तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधले जाते. विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचतात. विमान अपघातानंतर, त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते. अपघात कितीही मोठा असला तरी, ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही, कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो आणि अपघातादरम्यानही तो सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो. ब्लॅक बॉक्स उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करतो.. ही एक डिजिटल डायरी आहे, जी विमानात बसवली जाते आणि त्यात बरीच माहिती साठवली जाते आणि जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर, त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकते.

14 June 2025 10:17 AM

उद्योजक संजय कपूर यांचं निधन

 

Karishma Kapoor x husband Died : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं निधन झालंय...वयाच्या 53 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय...पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली.... मधमाशीने त्यांना चावा घेतला, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला...करिश्मा कपूर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला होता. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट संजय कपूर यांनी केली होती. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 09:22 AM

पालिका निवडणुका डिसेंबर, जानेवारीत?

 

Municipal Elections : अगामी पालिका निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने प्रभाग रचना हद्द निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला आहे... त्याअनुषंगाने 4 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर आरक्षण, मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे... त्यानंतर निवडणुकांची तारीख घोषित होईल... प्रशासकीय कार्यक्रमाची आखणी लक्षात घेता डिसेंबर 2025 अखेर किंवा जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली...राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर पुढील आठ दिवसांत आरक्षण काढले जाईल. त्यानंतर मतदार यादी तपासणीचा कार्यक्रम चाळीस दिवस चालेल. यात हरकती व सूचनांचाही समावेश राहील. कालावधी लक्षात घेता. ऑक्टोबर अखेरपर्यंत निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर निवडणुकांच्या तारखा घोषित

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

14 June 2025 08:16 AM

इतिहासातील सर्वात वाईट अपघातांपैकी एक- ट्रम्प

 

Trump On Ahmadabad Flight Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. अहमदाबाद विमान दुर्घटना इतिहासातील सर्वात वाईट दुर्घटनांपैकी एक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय... तसंच या दुर्घटनेप्रकरणी सर्वोतोपरी मदतीची ग्वाही ट्रम्प यांनी दिलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 08:15 AM

विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची DNA चाचणी होणार

 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची DNA चाचणी होणार आहे. नातेवाईकांचा DNA मॅच झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेमुळे मृतांची ओळख पटवण्यात अडचणी येतायत.. त्यामुळेच आता मृतांच्या नातेवाईकांची DNA चाचणी करण्यात येतेय.. आतापर्यंत जवळपास दोनशे जणांची DNA चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळतेय.. 

14 June 2025 07:43 AM

पंतप्रधान मोदी आज अहमदाबादला जाणार, विमान दुर्घटनेचा आढावा घेणार

 

Ahmedabad Plane Crash : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 8 वाजता अहमदाबादला पोहचणार आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा ते आढावा घेणार आहेत. यावेळी ते अहमदाबाद विमानतळा शेजारच्या अपघात स्थळाला भेट देणार असून सिव्हिल रुग्णालयातही जाणार आहेत.काल अपघात होताच पंतप्रधानांच्या निर्देशानंतर केंद्रीय उड्डयन मंत्री आणि केंद्रिय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह घटनास्थळाचा आणि सिव्हील रुग्णालयाचा आढावा घेतला होता 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 07:37 AM

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 265वर

 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत 265जणांचा मृत्यू झाला आहे... अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिती आहे... विमानामध्ये एकूण 242 जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटीश नागरिक चमत्कारीकरित्या बचावला आहे...
देसाई यांनी सांगितलेला आकडा हा विमानातील प्रवाशांपेक्षाही खूप जास्त आहे. यामुळे यात बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचान्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे...दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More