Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
14 June 2025
14 June 2025 18:11 PM

आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न

 

Sanjay Kute Home Fire : आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न.. जळगावच्या जामोदमधील घर जाळण्याचा प्रयत्न.. संग्रामपूरच्या तरुणाकडून घर जाळण्याचा प्रयत्न.. घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल.

14 June 2025 17:48 PM

भिवंडीच्या वळपाडात केमिकल गोदामाला आग

 

Bhiwandi Godown Fire : भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील प्रितेश कॉम्प्लेक्स येथे केमिकलच्या गोदामाला भीषण आग.. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी  लाखोंचे नुकसान.. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल.. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साठवण केल्याची माहिती.

14 June 2025 14:38 PM

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित

 

Bachu Kadu : बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित....बच्चू कडूंचा राज्य सरकारला अल्टिमेटम....2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा...अन्यथा थेट मंत्रालयात घुसू- बच्चू कडू...आंदोलन थांबवत नाही केवळ पुढे ढकलत आहे- बच्चू कडू

 

14 June 2025 13:50 PM

देहूमध्ये आढळला एक कोरोना रुग्ण

 

Dehu Corona : आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आलीय.. मात्र वारीआधी एक चिंताजनक बातमी समोर आलीय.. देहूमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळलाय... कोरोना सदृश लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला आहे. देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा रुग्ण उपचार घेण्यासाठी आला होता. परंतु तपासणी नंतर डॉक्टरांना त्याची सर्व लक्षणे ही कोरोना ची आढळून आली. त्यामुळे या रुग्णाला तातडीने क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर त्याचे नमुने हे पुण्यात NIB ला पाठवण्यात आलेत. या कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांचेही नमुने घेण्यात आलेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

14 June 2025 13:19 PM

3 महिन्यात पुणेकरांनी घेतली 60 टक्के दूषित हवा 

 

Pune Air Quality : फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी तब्बल 57 दिवस प्रदूषित हवा श्वासाद्वारे शरीरात घेतल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘सीईआरए’ संस्थेच्या अहवालात मांडण्यात आला आहे... पीएम 10चे प्रमाण फेब्रुवारीत 127 आणि मार्चमध्ये 112 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके होते...ही पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त आहे. बायोमास ज्वलन, वाहतूक आणि रस्त्यांची धूळ हे प्रमुख कारण असून, 222 कोटी खर्च करूनही हवा सुधारली नाही, असा आरोप करण्यात आला आहे....दीर्घकाळ अशा हवेत राहिल्यास फुप्फुसांचे आजार, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 12:32 PM

पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ

 

Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ..बच्चू कडू यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी...बच्चू कडूंना न्याय द्या, कार्यकर्त्यांच्या घोषणा....गोंधळ घालणारे प्रहारचे कार्यकर्ते ताब्यात

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 11:54 AM

अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरण, गांधीनगरच्या 3 नागरिकांचे DNA नमुने मॅच

 

Ahmedabad  Plane Crash Case : अहमदाबाद विमान दुर्घटनेची आताची मोठी बातमी... या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी करण्यात आली.. या DNA चाचणीत तीन नागरिकांचे नमुने मॅच झाल्याची माहिती मिळतेय. हे तिन्ही नागरिक गांधीनगरचे असल्याचं समजतंय.. या तिन्ही नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह सोपवले जातील...
 

14 June 2025 11:13 AM

बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार

 

 DGCA ON Boing : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग 787 ड्रीमलाईनरच्या ताफ्याची तपासणी केली जाणार आहे....डीजीसीएने त्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे...सोबतच प्रत्येक उड्डाणापूर्वी विमानाची कसून तपासणी केली जाणार आहे...  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 10:49 AM

सोन्यानं गाठला सर्वात उच्चांकी दर, सोनं 1 लाख 2,400 रुपये प्रतितोळा

 

Gold : सोन्यानं गाठला सर्वात उच्चांकी दर...सोन्याचे दर अडीच हजारानं वाढले...तर चांदीच्या भावात सहा हजार रुपयांची वाढ..सोने 1 लाख 2 हजार 400 रुपये प्रतितोळा...तर चांदी एक लाख 9 हजार रुपये प्रतिकिलो

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 10:11 AM

इस्रायलकडून इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले

 

Israel Vs Iran War : इस्रायल आणि इराणचं युद्ध भडकलं...सलग दुस-या दिवशी इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले...इस्रायलकडून इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले...78 जणांचा मृत्यू तर 350 हून अधिक जखमी...इराणकडूनही इस्रायलवर हल्ले करत चोख प्रत्युत्तर...150 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे इराणकडून हल्ले...इराणकडून तेल अवीवमध्ये अनेक हल्ले....इराणच्या हल्ल्यात अनेक जण मारले गेल्याची भीती
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

14 June 2025 09:56 AM

तूर, हरभरा, मूग डाळ स्वस्त

 

Daal Rate : गृहिणींसाठी आनंदाची बातमी...डाळींच्या दरात किलोमागे 15 रुपयांची घट...तूर, हरभरा, मूग डाळ स्वस्त..उत्पादन वाढल्याने डाळींचे दर पडले...यंदा तुरीचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी वाढलं 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 09:07 AM

DGCAमधील 48 टक्के पदं रिक्त 

 

DGCA Employement : DGCAमधील 48 टक्के पदं रिक्त असल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये... अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राबाबत विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत 'डीजीसीए' सह विविध संस्था कार्यरत असतात. मात्र, या संस्थांमधील सरासरी 35 टक्क्यांहून विशेष अधिक जागा रिक्त आहेत.. DGCAमध्ये तर हा आकडा 48 टक्क्यांपर्यंत आहे. DGCAमध्ये 1 हजार 692 मंजूर पदे होती. परंतु, यातील 878 जागांवरच अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यमान अधिकारी आणि कर्मचा-यांवर कामाचा मोठा ताण आहे. या ताणामुळे हवाई प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मागील अनेक वर्षापासून या रिक्त जागा कायमस्वरूपी भरण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याचेच आकडेवारीतून समोर येत आहे.   

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 08:38 AM

अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमान उद्योग संकटात 

 

India Air Service : एकीकडे गेल्या दोन वर्षापासूनभारतीय विमान उद्योगात नवनव्या विक्रमांची नोंद होत असतानाच गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग गडद झाले आहेत.. या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटल्याने त्याचा फटका या उद्योगाला बसेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे....जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमानसेवा, असा लौकिक असलेल्या भारतीय विमान उद्योगाचे सध्या मूल्यांकन 16 अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 June 2025 08:06 AM

 राज्यात कोरोनाचा धोका वाढलाय

 

Corona : राज्यात कोरोनाचा धोका वाढलाय..राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 102 नवे रुग्ण आढळून आलेत... यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे.राज्यामध्ये काल कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. 

14 June 2025 07:51 AM

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

 

Rain Alert : राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय... रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More