Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
17 June 2025
17 June 2025 14:31 PM

नाशिकमध्ये शिवसेना UBTला धक्का, बडगुजरांचा भजपमध्ये प्रवेश

 

Badgujar Entry in BJP : नाशिकमध्ये शिवसेना UBTला भाजपनं धक्का दिलाय.. शिवसेना UBTचे माजी नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप  प्रवेश झालाय.. सुधाकर बडगुजर यांच्यासह बबनराव घोलप यांचाही भाजप प्रवेश झालाय.. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश केलाय. चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झालाय.. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 

 

17 June 2025 13:34 PM

इराणच्या सरकारी TV मुख्यालयावर हल्ला

 

Israel Vs Iran War Update : इस्त्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे... दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरात हवाई हल्ले करण्यात येत आहेत... त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे... दरम्यान सोमवारी इस्रायलने इराणच्या तेहरानमधील सरकारी टीव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला केला...यावेळी स्टुडिओत एक लाईव्ह शो करत होती...सुदैवाने या हल्ल्यात ती बचावली आहे... हल्ला झाल्याने अँकरला लाईव्ह शो सोडून पळण्याची वेळ आली...अँकर शो सोडून पळत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे..दरम्यान याचवेळी एक रिपोर्टर या हल्ल्याचं लाईव्ह रिपोर्टिंग करताना दिसतोय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 June 2025 13:15 PM

मोसादच्या मुख्यालयावर इराणचा मोठा हल्ला

 

Iran Attacks Mossad Headquarters : मोसादच्या मुख्यालयावर इराणचा मोठा हल्ला....मोसाद ही इस्त्रायलची गुप्तचर संस्था....इराण हल्ल्यात मोसादची महत्त्वाची भूमिका...मोसाद मुख्यालयावर हल्ला, इस्त्रायलला मोठा धक्का

17 June 2025 12:43 PM

एअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन विमान रद्द

 

Air India : एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान रद्द.... तांत्रिक बिघाड आढळल्याने विमानाचं उड्डाण रद्द...एअर इंडियाचं AI 159 विमान रद्द....एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

17 June 2025 12:21 PM

नागपुरात इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

 

Nagpur : नागपुरात इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग..कोची-दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग..विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर लँडिंग...पोलिसांकडून विमानाची कसून तपासणी 

17 June 2025 11:33 AM

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

 

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली...आता 24 जून रोजी होणार पुढील सुनावणी...न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलली...बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार होती सुनावणी

17 June 2025 11:04 AM

UPI व्यवहारात 16 जूनपासून मोठे बदल

 

UBI : यूपीआय व्य़वहार प्रक्रियेत 16 जूनपासून मोठे बदल झालेत. आता यूपीआय व्यवहार 66 टक्के जलद झालेत.. आतापर्यंत यूपीआय व्यवहार प्रक्रियेला 30 सेकंद लागायचे. आताच हीच प्रक्रिया 15 सेकंदात पूर्ण होणार आहे.. ट्रान्झॅक्शन फेल झालं तर रिफंड प्रक्रिया 10 सेकंदात होणार आहे.. रिफंडसाठी ग्राहकांना वाट पाहावी लागत होती. मात्र ही प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा जलद होणार आहे. हे सर्व बदल यूपीआयच्या सर्व अॅप्सवर लागू होणार आहेत..

17 June 2025 10:32 AM

HSRP लावण्यासाठी 30 जून अंतिम मुदत

 

HSRP : राज्यातील २३ लाख वाहनांवर हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे काम पूर्ण झालंय.... उर्वरित वाहनावर एचएसआरपी बसविण्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत असल्याने ती वाहनांवर बसविण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी वाहनधारकांकडे आहे. अशात मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 June 2025 10:04 AM

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सुनावणी

 

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case :  सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सुनावणी...बीडच्या विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी..विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहण्याची शक्यता...वाल्मिक कराडच्या अर्जावर युक्तिवाद होणार...मकोकातून दोषमुक्त करण्याची कराडची मागणी 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 June 2025 09:41 AM

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

 

State Cabinet Meeting Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक...दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार बैठक...मावळ पूल दुर्घटनेबाबत चर्चेची शक्यता...मंत्रिमंडळ बैठकीत कुठले मोठे निर्णय होणार याकडे लक्ष 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

17 June 2025 09:08 AM

धाराशिवमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देणं शिक्षकांना भोवणार

 

Dharashiv : झी 24 तासच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट...दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणा-या शिक्षकांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे... खोटं बोलणा-या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने काढलेत.. जिल्हांतर्गत बदली टाळण्यासाठी शिक्षकांकडून खोटी प्रमाणपत्रं सादर केली जात असल्याचा पर्दाफाश झी २४ तासनं केला होता.. बदलीसाठी शिक्षक झाले दिव्यांग या मथळ्याखाली झी २४ तासनं बातमी प्रसारीत केली होती. यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. याच बातमीची दखल घेत आता खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सवलत घेणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आलीय. इतकंच नव्हे तर अशा खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यां शिक्षकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 June 2025 08:39 AM

बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नाही- चंद्रशेखर बावनकुळे

 

Chandrashekhar Bawankule on Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत ट्विस्ट...'बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नाही'...चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य...बडगुजर मुंबईकडे रवाना, बावनकुळे अनभिज्ञ...बडगुजर यांच्या प्रवेशावरुन भाजपमध्ये संभ्रम

17 June 2025 08:15 AM

वॉटर मेट्रोचे काम लवकरच सुरु होणार

 

Water Metro : मुंबईकरांसाठी खूशखबर,आता वॉटर मेट्रो येणार...वॉटर मेट्रोचे काम लवकरच सुरु होणार...वॉटर मेट्रोचा आराखडा 3 महिन्यांत सादर करा...मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंच्या सूचना 
 

17 June 2025 07:43 AM

सुधाकर बडगुजर, बबनराव घोलपांचा आज भाजपमध्ये प्रवेश

 

Sudhakar Badgujar : शिवसेना UBT चे नेते सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडेल. चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल. नाशिकमधील स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बडगुजर यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना UBTमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 June 2025 07:37 AM

राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा

 

Rain : ब-याच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. मान्सूननं महाराष्ट्राचा 88 ते 90 टक्के भाग व्यापला असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय.. आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय....मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जगबुडी, अर्जुना व कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय..पुढचे दोन ते तीन दिवस पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय...कोकण, गोव्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.. मुंबई आणि पुण्यातही पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More