Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
19 June 2025
19 June 2025 20:39 PM

उंची पेग्विनची, चाल बदकाची,आवाज कोंबडीचा- उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray on Nitesh Rane : उंची पेग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा-ठाकरे...उद्धव ठाकरेंची नितेश राणेंवर सडकून टीका...'हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावायचं काम करतो'...त्याच्याकडे तेवढंच काम दिलंय-उद्धव ठाकरे

19 June 2025 18:20 PM

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता- रवींद्र चव्हाण

 

Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील...ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता...प्रशासनाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालीय..निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू आहे...भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड ज्या दिशनं जाण्यास सांगेल त्या दिशनं जाऊ असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 June 2025 17:45 PM

'पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी अघोरी पूजा', सूरज चव्हाणांचा भरत गोगावलेंवर आरोप

 

 

Suraj Chavan on Bharat Gogavale : पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी भरत गोगावलेंनी अघोरी विद्या केली. असा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गोगावलेंचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. यावर मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलंय. अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, आम्ही लढणारे मावळे आहोत. असं गोगावले म्हणालेत.
तर अघोरी विद्या माहित असती तर आतापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो. असं गोगावले म्हणाले.

19 June 2025 17:17 PM

गुणरत्न सदावर्तेंना मनसैनिकांकडून धमकी

 

MNS on Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना मनसैनिकांकडून धमकी...सदावर्तेंना फोन करुन कार फोडण्याची धमकी... राज ठाकरेंवर टीका केल्यानं सदावर्तेंना धमकी... राज ठाकरे विरुद्ध सदावर्ते सामना

19 June 2025 16:53 PM

...उद्धव ठाकरेंचं दुकान बंद झालंय- नारायण राणे

 

Narayan Rane : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे असून उद्धव ठाकरेंचं दुकान बंद झालंय. अशी टीका भाजप खासदार नारायण राणेंनी केलीय. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सांभाळता आली नाही. त्यांनी पदासाठी विचारांशी तडजोड केली. अशी टीकाही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. तर शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त एकनाथ शिंदेंना त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

19 June 2025 16:42 PM

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 

Central Railway Traffic Disrupted : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.कांजूर मार्ग स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज स्थानाकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकलच्या पेंटोग्राफ मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.या बिघाडामुळे लोकल ट्रेन अर्धातास उशिराने धावत आहेत.

19 June 2025 15:19 PM

नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात कार बुडाली

 

Nashik Rain : नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात कार बुडाली...गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ...पात्रातून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न

 

19 June 2025 14:19 PM

शहापुरात पावसामुळे नदी आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ

Shahapur Rain : शहापूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.. या  पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीये.. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये अशा सूचना  स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्यात.. 

19 June 2025 12:47 PM

मे महिन्यातील पावसाचा पुण्याला मोठा फटका

Pune Rain Loss : पुणे जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे 16 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे...बारामती आणि दौंड तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय...884 गावांमधील 50 हजार 588 शेतक-यांचं नुकसान झालंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 June 2025 12:12 PM

पुणे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं

Pune : पुणे शहरात मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालंय. त्याचा मोठा पुण्यातील अनेक भागांना बसला आहे....सिंहगड रोड, मध्यवर्ती पेठा, स्वारगेट, कोंढवा आणि खडकवासला भागात पावसाची सकाळपासूनच बॅटिंग सुरूये...मुसळधार पावसामुळे पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पाणी शिरलं आहे...तसेच कोथरुडच्या गणंजय सोसायटीत देखील पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली....

19 June 2025 11:25 AM

केदारनाथची हेलिकॉप्टर सेवा 23 जून पासून होणार बंद 

Kedarnath : चारधाम यात्रेपैकी एक असलेल्या  केदारनाथची  हेलिकॉप्टर सेवा 23 जूनपासून बंद केली जाणारेत... केदारनाथ हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या 9 कंपन्यांनी यानंतरच्या तारखांसाठी बुकिंग बंद केलीय... साधारणता पावसाळ्यात किमान दोन कंपन्या केदारनाथ यात्रेसाठी बुकिंग घेत असतात... मात्र यंदा संपूर्ण ही सेवा बंद केली जाणारेय.... गेल्या 12 दिवसात झालेल्या 2  अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टर सेवा बंद केली जाणारेय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -

19 June 2025 10:23 AM

इचलकरंजीतील कोचिंग सेंटर तोडफोड प्रकरण, 15 जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur: इचलकरंजीत एका कोचिंग सेंटरमध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती...त्यानंतर संतप्त जमावाने कोचिंग सेंटरची तोडफोड केली होती...या हल्ल्यात अकॅडमीचं मोठ नुकसान झालं आहे...आता याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी आमदार पुत्राचा समावेश आहे.... 17 जून रोजी अकॅडमीत शिक्षण घेणा-या यश अजित यादव याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 June 2025 09:59 AM

वाहनधारकांनो, 15 ऑगस्टपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा

HSRP Number Plate : जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी धावपळ करणा-या वाहनधारकांना राज्य सरकारने आता तिसरी मुदतवाढ दिली आहे... 1 एप्रिल 2019पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP बसवण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येणार आहे... ही शेवटची संधी असून, यानंतर HSRP नसलेल्या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे....राज्यात सुमारे 2 कोटी जुनी वाहने आहेत. सद्यस्थितीत 23 लाख जुन्या वाहनांना HSRP बसवण्यात आले आहेत...40 लाख वाहनधारकांनी ‘HSRP साठीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे... जवळपास सव्वा कोटी वाहने अद्याप ‘एचएसआरपी’च्या कक्षेबाहेर आहेत. एप्रिल 219नंतर नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांना डीलरकडून ‘एचएसआरपी’ बसवण्यात येत आहेत.

19 June 2025 09:46 AM

मुंबई विद्यापीठ टॉप 20 शिक्षण संस्थांत

Mumbai University : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20  शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळाले आहे.... विद्यापीठाने या यादीत 17 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर IIT-मुंबईची घसरण झाली असून, ते दुस-या स्थानी गेले आहे... IIT-दिल्लीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.. जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षी मुंबई विद्यापीठ 711 ते 720 च्या क्रमवारीत होते... यंदा मुंबई विद्यापीठाने 664 व्या स्थानी झेप घेतली आहे, तर राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे.. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये मुंबई विद्यापीठाच्या संशोधन पेपर्सची 156 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 June 2025 09:23 AM

अहमदाबाद विमान दुर्घटनेत सापडलं 70 तोळं सोनं

Ahmedabad Plane Crash Update : अहमदाबाद विमान दुर्घनेत 70 तोळं सोनं सापडलंय..विमान दुर्घटनेनंतर या परिसरात राहणारे राजेश पटेल मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी आणि इतर स्वयंसेवकांनी मृतदेह बाहेर काढण्यात आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात प्रशासनाला मदत केली. त्यांनी ढिगाऱ्यातून ७० तोळे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये आणि काही अमेरिकी डॉलर गोळा करत पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रत्येक मौल्यवान वस्तू तसेच सामानाची तपशीलवार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. ही यादी पूर्ण झाल्यानंतर ते मृतांच्या नातेवाईकांना दिलं जाणार आहे. 

19 June 2025 08:09 AM

सोनं आणि चांदीच्या दरात वाढ

Gold & Silver Price Hike : सराफ बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी उसळी घेतली असून, गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे सोन्याचा दर प्रतीतोळा 1 लाख एक हजार आठशे रुपये प्रतितोळे इतके झालीये...दरवाढीचा फटका ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात बसणार असल्याची चिन्हं आहेत. तर चांदी एक लाख 13 हजार 300 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे...इसराइल आणि इराणच्या युद्धाचा जळगावच्या सुवर्ण बाजारावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय....

19 June 2025 08:01 AM

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत पैशांचा खेळ? 

Baramati Bank : बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेची शाखा बुधवारी रात्री 11 वाजता उघडी होती....सोबतच बँकेत सध्या सुरू असलेल्या  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या  देखील सापडल्या असल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलाय... रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली होती असा सवालही सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते विचारत आहेत... या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप देखील  केला जातोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 June 2025 07:59 AM

2 शिवसेना, 2 वर्धापन दिन

Shivsena Vardhapan Din : दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आज मुंबईत पार पडणार आहे.. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.., तर वरळी डोमममध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे... मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत पोहोचलेत... विधानसभा निवडणुकांनंतरचा दोन्ही शिवसेनेचा हा मेळावा साजरा होतोय. त्यातच येत्या काही महिन्यात मुंबई मनपा आणि राज्यभरातील मनपा, झेडपींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडं लक्ष लागलंय...

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More