Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
21 June 2025
21 June 2025 00:02 AM

'झी २४ तास'च्या बातमीनंतर पुणे महापालिकेची कारवाई

 

Pune 'Zee 24 Taas' Impact : बातमी झी २४तासच्या इम्पॅक्टची.. पुण्यातील धायरीमध्ये गटारीचं पाणी शिरलेली विहीर महापालिकेनं एका रात्रीत वॉशआऊट केलीये.. काल झालेल्या पावसामुळे गटारीचं सगळं पाणी या विहिरीत गेलं होतं.. या विहिरीतूनच धायरी, DSKभागात पाणीपुरवठा केला जातो.. विहिरीत गटाराचं पाणी, घाण, कचरा गेल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.. याबाबत 'झी २४तास'नं बातमी दाखवली.. त्यानंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग आली आणि मनपानं एका रात्रीत संपूर्ण विहिरीत साफ केली.. यानंतर स्थानिकांनी 'झी २४ तास'चे आभार मानलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 June 2025 23:37 PM

युतीचं माहिती नाही, एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray Diner Diplomacy : मुंबईत उद्धव ठाकरेंची खासदार, आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी.. 'युतीचं माहिती नाही मात्र, एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा', बैठकीत उद्धव ठाकरेंचा आमदार, खासदारांना कानमंत्र.. बीएमसीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदारांना दिल्या आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 June 2025 21:57 PM

अहिराणी गायक जगदीश संदानशिव यांना मारहाण

 

Dhule Marhan : अहिराणी गायक जगदीश संदानशिव आणि त्यांच्या सासरच्या मंडळींमधील फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वर्षी या गावातील ही घटना आहे. मुलीचा छळ सुरू असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी जगदीश संदानशिव यांना जाब विचारला. त्यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी त्यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या राड्यात दोन्ही कडचे पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेत. 

21 June 2025 16:03 PM

एअर इंडियाची दिल्ली-पुणे फ्लाईट रद्द

 

Delhi - Pune Flight Cancelled : एअर इंडियाची दिल्ली-पुणे फ्लाईट रद्द.. बर्ड स्ट्राईकमुळे दिल्ली-पुणे फ्लाईट रद्द करण्यात आली.. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.. तसंच विमानाची सर्वंकष तपासणी सुरू आहे. 

 

21 June 2025 15:33 PM

संत तुकारामांचा पालखी सोहळा बघण्यासाठी आलेली 16 वर्षांचा मुलगा पडला नदी पात्रात

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बघण्यासाठी आलेल्या 16 वर्षाचा मुलगा दापोडी पूलावरून नदी पात्रात पडला आहे. वेदांत बोत्रे असं 16 वर्षीय मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेदांत आणि त्याच्या मित्राची पैज लागली होती. पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणारा हँरिस ब्रिज ला समांतर असलेल्या पुला वरून उडी मारण्याची पैज लागली आणि ही पैज पूर्ण करण्यासाठी  मुलाने ह्या ब्रिजला समांतर असलेल्या उडी मारण्याचा प्रयत्न केला.  मात्र तो असफल ठरला आणि 16 वर्षीय मुलगा थेट नदीपात्रात पडला. सुदैवाने नदीपात्रात असलेल्या राडाराडामुळे तो वाचला नदीपात्रात पडतात जवळ असलेल्या राडाराडात तो जाऊन अडकला आणि त्या ठिकाणी जाऊन बसला. तात्काळ पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने त्याला रेस्क्यू करत बाहेर काढले. 

21 June 2025 15:00 PM

तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी

Tejaswi Ghosalkar : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपनं खेळी केलीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलीये... अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर मुंबै बँकेचं संचालक पद रिक्त होतं.. तेजस्वी घोसाळकर या पक्षात नाराज असून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. अशातच भाजपची सत्ता असलेल्या मुंबै जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आलीये...  त्यामुळं  त्या भाजपमध्ये जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.. 

21 June 2025 13:17 PM

रायगडमध्ये महायुतीत वाद पेटणार?

Raigad Mahayuti : रायगडमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगलीय.. आगामी मनपा, झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नको असा सूर शिवसेनेच्या बैठकीत उमटलाय... रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाने युती करावी मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये अशी भूमिका शिवसेनेच्या बैठकीत मांडण्यात आलीय.. कर्जत इथं रायगड जिल्हा शिवसेनेची आढाव बैठक पार पडली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 13:15 PM

राष्ट्रवादीमुळे आमचं पालकमंत्रिपद थांबलेलं नाही - भरत गोगावले

Raigad Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी महत्वाचं विधान केलंय... राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे आमचं पालकमंत्री पद थांबलं नाही तर एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून आदिती तटकरे यांना दिलेल्या पालकमंत्रिपदाला ब्रेक लागला आहे..असं गोगावले म्हणालेत...सोबतच आम्ही चांगलं काम केलं असेल तर आम्हाला पालकमंत्रिपद मिळेल असा विश्वासही गोगावलेंनी व्यक्त केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 12:51 PM

आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सायबर दरोडा

Cyber Attack : तुमचं फेसबुक, गुगल आणि अ‍ॅपल अकाऊंट हॅक तर झालं नाही ना.... कारण नुकताच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे, त्यानुसार 16 अब्ज लोकांचे पासवर्ड आणि लॉग-इन क्रेडेंशिअल्स चोरण्यात आले आहेत. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सायबर दरोडा आहे.. त्यामुळे गुगल, फेसबुक आणि अॅपल सारख्या कंपन्यांचे अकाऊंट खरोखर सुरक्षित आहेत की नाहीत ?, हा विचार करण्यास लोकांना आता यामुळे भाग पडलं आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 12:49 PM

मायक्रोसॉफ्ट कंपनीत पुन्हा कर्मचारी कपात?

Microsoft Cost Cutting : मायक्रोसॉफ्टकडून जुलैमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्याचे नियोजन सुरू आहे.. या वर्षातील कंपनीची ही तिसरी मोठी कर्मचारी कपात ठरण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टचे नवीन आर्थिक वर्ष हे 1 जुलैपासून सुरू होते आणि त्याची सुरुवात कर्मचारी कपातीने होणे अपेक्षित आहे. AIअर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेवर भर देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. यातील गुंतवणूक आणि खर्च याचा योग्य ताळमेळ राखण्यासाठी कंपनीकडून कर्मचारी कपातीचं पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. कंपनीने याआधी मे महिन्यात ६ हजार  कर्मचा-यांना कामावरुन काढलं होतं. त्यानंतर लगेचच आणखी ३०० कर्मचा-यांना नारळ दिला होता.. त्यानंतर आता पुन्हा कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यात हजारो तरुण बेरोजगार होणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 12:18 PM

स्वीस बँकेत भारतीयांचा पैसा वाढला

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढल्याची माहिती समोर आलीय. हा पैसा तिप्पट वाढून 37 हजार कोटी रुपये झालाय. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला असल्याचे बँकेने म्हटलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

21 June 2025 11:17 AM

बारवी धरण 43 टक्के भरलं

Badlapur Barvi Dam : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार बदलापूर जवळील बारवी धरण 43 टक्के भरलं आहे. बारवी धरणात मागील वर्षी पेक्षा या वर्षी जवळपास दुप्पट पाणीसाठा झालाय. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आतापर्यंत भावी धरणात 789 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये..

 

21 June 2025 10:52 AM

साताऱ्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास निर्बंध

Satara : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनाने 19 ऑगस्ट पर्यंत निर्बंध घातलेत. प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून गड किल्ले, धरण क्षेत्र, धबधबे तसेच इतर पर्यटन स्थळी जाण्यापासून पर्यटकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 10:27 AM

नागपुरात बाईक चोरणा-या भावंडांना अटक

Nagpur Bike : बाईक चोरणा-या दोन भावंडांना नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केलीये.. या दोघांनी तब्बल 31 बाईक चोरल्याचं उघडकीस आलंय.. यातील एकावर 40 गुन्हे दाखल आहेत.. या चोरट्या भावंडांची जोडी मध्य प्रदेशातील बैतुल येथील आहे.. राहुल ठाकरे आणि दिनेश ठाकरे अशी या दोघांची नावं आहेत. यातील मोठा भाऊ चोरी करायचा आणि धाटका भाऊ चोरलेल्या गाड्या बाजारात विकायचा.. या दोघांकडून पोलिसांनी 31 बाईक आणि 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊन ते चो-या करत होते.. नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोघांना अटक केलीये. 

21 June 2025 10:25 AM

मुंबईतील लोकल फे-या 3 वर्षांत दुप्पट करणार - अश्विनी वैष्णव

Mumbai Local : मुंबईतील लोकल फे-यांची संख्या तीन वर्षात दुप्पट केली जाईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय...मुंबईतील सर्व लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम सुरू झाले आहे... येत्या नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेतली जाईल... असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय...सोबतच महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा 81 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, एकट्या मुंबई  आणि एमएमआरमध्ये आजघडीला 16 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचंही सांगितलंय

बातमी पाहा - मुंबईकरांची रोजच्या गर्दीतून सुटका होणार, लोकलबाबत समोर आली मोठी अपडेट, केंद्रीय मंत्र्यांनीच दिली GOOD NEWS

21 June 2025 10:18 AM

दुष्काळ निवारण प्रकल्पासाठी 5 जिल्ह्यांची निवड

Drought Eradiction : केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत विज्ञान आधारीत दुष्काळ निवारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रायोगिक प्रकल्पासाठी राज्यातील सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि लातूर या पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन तसंच दहा तालुक्यांतील 90 गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी 174 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. देशातील बारा राज्यांत सर्वाधिक दुष्काळ पडतो. या राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या उपयोगासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या काळात तग धरून राहण्याची क्षमता वाढविणे आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे हे राष्ट्रीय दुष्काळ निवारण प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी विज्ञान-आधारित दृष्टिकोन वापरणारा हा देशातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा सरकारनं केला आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 08:44 AM

मुंबई विमानतळावर 24 कोटींचा गांजा जप्त

Mumbai Airport Ganja Seized : मुंबई विमानतळावर तब्बल 24 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय.. सीमाशुल्क विभागानं ही कारवाई केलीये. या प्रकरणी थायलंडहून मुंबईल आलेल्या तिघांना अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडून 24 किलो 96 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 24 कोटी 66 लाख रुपये आहे. आरोपींकडून भारतातून दुबईला नेण्यात येत असलेलं परकीय चलन आणि हिरेही जप्त करण्यात आलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 08:34 AM

अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरण, विमानाचा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार

Ahmedabad Plane Crash Case : अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवला जाणार आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी बोइंग 787-8 ड्रीमलाईनर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता. विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की, त्यातून डेटा रिकव्हर करणे कठीण झालंय. त्यामुळे तो अमेरिकेत तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अर्थात CVR आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर अर्थात FDR या ब्लॅक बॉक्सचे दोन भाग उष्णता आणि आगीमुळे खराब झालेत. देशात अशी कोणतीही लॅब नाही जिथे डेटा रिकव्हर करता येईल. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 08:31 AM

अहमदाबाद विमान अपघातातील 215 मृतांची ओळख पटली

Ahmedabad Plane Crash Case : अहमदाबादमध्ये 12 जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 270 लोकांपैकी, आजपर्यंत 215 मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील 198 मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आले आहेत...अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाचं विमान मेघानीनगर भागातील एका वसतिगृहावर कोसळलं होतं...या अपघातात विमानातील 241 प्रवाशांसह वसतीगृहातील 29 लोकांचा मृत्यू झाला होता..भीषण अपघातामुळे मृतदेहांची ओळख पटवणं अवघड झालं होतं..मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आली 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More