Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
21 June 2025
21 June 2025 22:12 PM

'संजय राऊत गुवाहाटीला येणार होते', शहाजी बापू पाटलांचा गौप्यस्फोट

 

Shahajibapu Patil on Sanjay Raut : संजय राऊत एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला येण्यास तयार होते, असा गौप्यस्फोट शहाजी पाटील यांनी केलाय.. संजय राऊतांच्या मनात उद्धव ठाकरेंबाबत राग असल्यानं ते गुवाहाटीला येण्यास तयार होते.. मात्र, त्यांना शिंदेंच्या सोबत गेलेल्या आमदारांनी विरोध केल्याचं देखील शहाजी बापु पाटील यांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 June 2025 19:23 PM

शरद पवारांची साथ सोडणं मोठी राजकीय चूक- भास्कर जाधव

 

Bhaskar Jadhav On Sharad Pawar : झी 24 तासच्या टू द पॉईँट मुलाखतीत भास्कर जाधवांनी आणखी एक मोठी कबुली दिलीय.. शरद पवारांची साथ सोडणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचं मोठं विधान भास्कर जाधवांनी केलंय, त्यामुळे मविआत असताना त्यांनी मला विरोध केला तर तो विरोध योग्यच होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी मला
तारायला हवं होतं असंही जाधव यांनी म्हटलय.. शरद पवारांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं तसंच कॅबिनेट मंत्रिपदही दिलं होतं. मात्र, तरीही शरद पवारांची साथ सोडल्याची खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 June 2025 18:22 PM

'2009च्या निवडणुकीत कदमांची अघोरी पूजा', भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर आरोप

 

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : शिंदेंच्या शिवसनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेच्या आरोपांची चर्चा असतानाच.. भास्कर जाधवांनी टू द पॉईंट या मुलाखतीमधून शिंदेंच्या आणखी एका नेत्यावर अघोरी पूजेचा आरोप केलाय.. 2009च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदमांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय.. मतदानाच्या दिवशी घरासमोर मंतरलेले पिशवीभर लिंबू रामदास कदम यांनी टाकले होते. तरीही रामदास कदमांचा पराभव झाल्याचं भास्कर जाधव यांनी म्हंटलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 June 2025 17:12 PM

भास्कर जाधवांचे राजकीय निवृत्तीचे संकेत, टू द पॉईंट मुलाखतीत जाधवांची मोठी घोषणा

 

Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात सर्वात मोठी घोषणा केलीये. भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही भास्कर जाधवांनी व्यक्त केलीय. पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हंटलंय....

21 June 2025 16:22 PM

'उद्धव-राज ठाकरे दोनच समविचारी नेते', संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

 

Sanjay Raut : राज्यात दोनच समविचारी पक्ष...उद्धव आणि राज ठाकरे दोनच समविचारी नेते...खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य...-उद्धव-राज यांच्यातल्या संवादावरून भूमिका ठरतील-राऊत...तेव्हा महाराष्ट्राची गरज म्हणून काँग्रेससोबत गेलो- राऊत....मराठी माणसाची एकजूट राहावी , ही ठाकरेंची भूमिका-राऊत

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 June 2025 15:27 PM

भांडुपमधील गुरुनानक शाळेत दिली पंजाबी पुस्तकं

 

Bhandup MNS : महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार नाही मनसेची ठाम भूमिका....भांडुपच्या गुरुनानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व पंजाबी भाषेची पुस्तके दिली....मनसेच्या कार्यकर्त्यांची शाळेत धडक....अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तके परत घेण्यात येणार याचे आश्वासन...शाळेच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 June 2025 14:15 PM

नाशिकचं गंगापूर धरण 68% भरलं

Nashik Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील  पाणीसाठा 48 टक्क्यांवर पोहोचलाय शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 68% च्या जवळपास पोहोचलंय. गंगापूर धरण हे मातीचे धरण असल्यामुळे कुठलाही धोका उद्भवू नये यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय....

21 June 2025 13:16 PM

भिवंडीत दोन भावांचा बुडून मृत्यू

Bhiwandi Drown : भिवंडीतील कामवारी नदीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय... शुक्रवारी संध्याकाळी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोघे भाऊ बुडाले होते... 15 तासांच्या शोधकार्यानंतर दोघांचे मृतदेह हाती आले आहेत...दोघांच्या मृत्यूमुळे गोरसाई गावावर शोककळा पसरलीय...

 

21 June 2025 13:13 PM

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेऊ - फडणवीस

Devendra Fadanvis On Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेऊ...असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय...सोबतच जनतेला दिलेला एकही शब्द आपण फिरवणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिलीय...पुण्यात वारक-यांसोबत भक्तीयोग केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय... 

21 June 2025 12:55 PM

रेल्वेकडून तिकीट बुकिंगची मर्यादा निश्चित

Railway Booking : रेल्वेच्या तिकीट बुकींगची मर्यादा निश्चित केली जाणार आहे....एकूण तिकीटांच्या केवळ 25 टक्के तिकीटांनाच वेंटिगसाठी ठेवले जाणार आहे.... त्यामुळे आता तिकीट कन्फर्म होणार की नाही प्रवास करायचा की नाही या अनिश्चितेतून प्रवाशांची सुटका होणार आहे... तिकीटांना मर्यादीत वेटींग दिल्याने तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक असणार आहे.... रेल्वेच्या नव्या नियमानुसार AC फर्स्ट क्लास, सेकेंड आणि थर्ड, स्लीपर आणि चेअर कार- अशा प्रत्येक श्रेणीत एकूण सीटच्या कमाल 25 टक्के हिस्सा वेटिंग तिकीटाच्या स्वरुपात बुक केला जाऊ देणार आहे.... म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये जर 800 सीट असतील तर केवळ 200 तिकीटच वेटींगमध्ये जातील त्यानंतर त्या क्लासाची तिकीट बुक होणार नाही.....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 12:51 PM

मुंबईत सर्वशिक्षा अभियानाचा खेळखंडोबा

Mumbai : गाव खेड्यात एकाच वर्गात अनेक वर्ग भरवल्याचं  चित्र तुम्ही अनेकदा पाहिलं असेल.. पण एकाच हॉल मध्ये पहिली ते आठवी शाळा भरवली जात आहे. मुंबईतल्या मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील बीएमसीच्या शाळेत शिक्षणाचा हा खेळखंडोबा सुरु आहे. अशा गोंधळात विद्यार्थ्यांचं लक्ष नेमकं कोणत्या वर्गाला शिकवणा-या शिक्षका कडे आहे याचा मेळच लावता येत नाही..

 

21 June 2025 11:45 AM

भंडाऱ्यातील कारागृहात कैद्याचा मृत्यू

Bhandara : भंडारा कारागृहात कैद्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये..मागील तीन वर्षांपूर्वी भंडा-यातील अण्णाभाऊ साठे चौक येथील वाचनालय येथे घरघुती वादातून एका तरुणाची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.. त्या आरोपीखाली अटकेत असलेल्या आरोपीची हृदय विकाराच्या झटक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये...गंगाधर निखाडे असं मृत आरोपीचं नाव आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 June 2025 11:01 AM

'निवडणुकीचे फुटेज 45 दिवसांत नष्ट करा'

Election Commission : निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसांत नष्ट केलं जाणार आहे... मतदान प्रकियेशी संबंधित व्हिडीओ, बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो निवडणुकीनंतर ४५ दिवसांत नष्ट करा, असे आदेश राज्यांच्या निवडणूक अधिका-यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेत.. निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग आणि छायाचित्रणाचा गैरवापर करण्याच्या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर कोणताही संदर्भ न देता, चुकीच्या पद्धतीने हे फूटेज प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणुक आयोगानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का, लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदार संख्या संशयाच्या भोव-यात असताना फुटेज 45 दिवसांत नष्ट  करण्याच्या सूचनेमुळे विरोधकांनी निवडणुक आयोगावर टीकेची झोड उठवलीये. 

21 June 2025 10:16 AM

IIT मुंबईत सुरक्षेचं उल्लंघन

IIT Mumbai : भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईमध्ये एका अज्ञात व्यक्तीने १४ दिवस कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचं समोर आलंय... कर्नाटकातील मंगळुरू इथला २२ वर्षाचा संशयित तरुण बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला १७ जूनला कॅम्पस सिक्युरिटीने अटक केली आणि नंतर पवई पोलिसांकडे सुपूर्द केलं. सुरक्षेला टाळून हा तरुण संस्थेच्या कॅम्पसमध्ये कसा घुसला आणि रात्री तो कुठे राहिला हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. त्याने या 14 दिवसांत कोणाशी संपर्क केला....कॅम्पसमध्ये येणाचा त्याचा उद्देश काय या सगळ्याची आता कसून चौकशी केली जातेय..... 

21 June 2025 10:14 AM

लोकसभा निवडणूक खर्चात भाजपचा वाटा सर्वाधिक 

Loksabha Election : देशात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सर्वाधिक म्हणजे जवळपास 1हजार 494  कोटी रुपये खर्च केले अशी माहिती एडीआर या संस्थेने दिलीय... या निवडणुकीत सर्व पक्षांनी मिळून केलेल्या खर्चापैकी हे प्रमाण 45 टक्के इतके होते... या निवडणुकीतील सहभागी 32 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी जाहीर केलेल्या खर्चाचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे....भाजपखालोखाल प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सर्वाधिक पैसे खर्च केले.... त्यांनी 620 कोटी रुपये खर्च केले असून हे प्रमाणात 18.5 टक्के इतके होते.... 

21 June 2025 08:55 AM

मुंबई हायकोर्टानं रेल्वेला फटकारलं

Mumbai High Court On Railway : रेल्वे प्रवासादरम्यान, दिवसाला दहा प्रवाशांचा मृत्यू ही चिंताजनक बाब आहे, हे रोखायला काय उपाययोजना केल्या ते स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वेला दिलेत. मध्य रेल्वेवर मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ 9 जूनला लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयानं गंभीर चिंता व्यक्त केली. लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या गेल्या १५ वर्षांत ४६ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रेल्वेनं केला.पण दिवसाला 10 मृत्यू रोखणार कसे आणि त्याची अमलबजावणी कधीपर्यत करणार, हे स्पष्ट करण्याचे आदेश देत न्यायालयानं रेल्वेला फटकारलं. उपनगरीय रेल्वेतल्या प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरच्या यतीन जाधव यांनी गेल्या वर्षी जनहित याचिका दाखल केली होती. 

21 June 2025 08:53 AM

खडकी मेट्रो स्टेशन आजपासून प्रवासी सेवेत 

Pune Metro : स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मेट्रो मार्गिकेअंतर्गत असलेले खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.... हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे आणि या मेट्रो स्थानकातून प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झाले आहे.... हे स्थानक सुरू होणार असल्याने या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे सुलभ होईल, असा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनकडून करण्यात आला आहे.

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More