Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
22 June 2025
22 June 2025 22:28 PM

'औरंगजेब पवित्र व्यक्ती होती', माजी आमदार आसिफ शेख यांची मुक्ताफळं

 

Asif Shaikh : औरंगजेब पवित्र व्यक्ती होती. टोपी शिवून औरंगजेबनं आपला उदरनिर्वाह केला. औरंगजेब सर्वधर्म समभावाचा पुरस्कर्ता होता, अशी मुक्ताफळं माजी आमदार आसिफ शेख यांनी तोडली आहेत. केवळ राजकारणासाठी औरंगजेबचं नाव घेऊन त्याला बदनाम केलं जात असल्याचा आरोपही आसिफ शेख यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. 

22 June 2025 20:17 PM

मुंबईत महाविकास आघाडीत बिघाडी

 

Abu Azmi on BMC Elections : मुंबईत महाविकास आघाडीत बिघाडी...मुंबई पालिका निवडणुका सपा स्वतंत्र लढणार...सपा आमदार अबू आझमींची घोषणा...उर्वरित जिल्ह्यात स्थानिकांनी निर्णय घ्यावा - आझमी

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

22 June 2025 19:15 PM

पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन

 

PM Modi Call Iran President : पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन...इराण-इस्रायल तणावावर व्यक्त केली चिंता...दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचं आवाहन...पंतप्रधान मोदींची एक्स पोस्टद्वारे माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

22 June 2025 17:18 PM

भास्कर जाधवांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये- छगन भुजबळ 

 

Chhagan Bhujbal on Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय. भास्कर जाधवांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये. असं भुजबळ म्हणालेत. राजकारणात चढ-उतार होत असतात, मात्र त्यामुळे राजकारण सोडून देणं हे पटत नसल्याचं ते म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

22 June 2025 16:25 PM

मराठी भाषा हा मनसेसाठी अस्मितेचा विषय- यशवंत किल्लेदार 

 

Yashwant killedar on Abu Azmi : मराठी भाषा हा मनसेसाठी अस्मितेचा विषय आहे. मनसे मराठीच्या सन्मानाबाबत आग्रही आहे. समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी नाहक राजकारण करु नये असा इशारा, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी अबू आझमी यांना दिलाय. 

22 June 2025 15:22 PM

तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

 

Tejashwi Ghosalkar met Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट...मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट...मुंबै बँकेवर संचालकपदी निवड झाल्यानंतर भेट...गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याच्या चर्चा...उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे त्यांनी नाराजी दूर होणार का?, याकडे लक्ष

 

22 June 2025 14:37 PM

मनसेवर टीका करताना अबू आझमी बरळले

Abu Azmi : मनसेवर टीका करताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी बरळलेत.. मराठीचा मुद्दा हा काय मुद्दा आहे का असं अबू आझमी म्हणालेत.. मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करु नका असंही ते यावेळी म्हणालेत.. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलाताना त्यांनी हे विधान केलंय. 

22 June 2025 13:59 PM

हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार

MNS On Hindi Language : हिंदी सक्तीविरोधात मनसे उद्यापासून थेट रस्त्यावर उतरणार आहे.... मनसे उद्यापासून पालकांच्या सह्यांची मोहीम सुरू करणार आहे... मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिलीय...तसेच मनसेच्या शांततेच्या चुकीचा अर्थ राज्य सरकारने काढू नये असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलंय... 

22 June 2025 13:56 PM

संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका

Sanjay Raut On Devendra Fadanvis : राज्यातलं सरकार जनतेला फसवतंय असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय...योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलेल्या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांनी फडणवीसांवर टीका केलीय...दहा हजार शेतक-यांच्या आत्महत्या झाल्यावर की 1 लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर.... फडणवीसांची योग्य वेळ नक्की कधी येणार? असा सवाल उपस्थित केलाय.

22 June 2025 12:31 PM

पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

NIA Action : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने बटकोटमधून दोघांना अटक केलीय... दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय... बशीर अहमद जोथर आणि परवेझ जोथर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत... दोन्ही आरोपींच्या चौकशीतून तीन दहशतवादी पाकिस्तानी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 June 2025 12:16 PM

महिलेसह कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला

Beed : शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेसह कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय...बीडच्या वडवणी तालुक्यात संतापजनक प्रकार समोर आलाय.. देवळा ते कोरडे वस्ती दरम्यानच्या पायवाटेवर असलेल्या शेताच्या बांधावरील तब्बल 80-90 वर्षे जुनी लिंबाची झाडं तोडली जात होती. महिलेनं झाड तोडण्याचा जाब विचारताच, तिला मारहाण करण्यात आली. यावेळी तिचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचताच, हातातील काट्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी बालकृष्ण शिंदे याच्यासह 16 जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

22 June 2025 11:06 AM

इराणविरोधात बळाचा वापर चिंतेचा विषय - UN

UN On USA Attack : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघाने निषेध केलाय...इराणविरोधात बळाचा वापर करणे चिंतेचा विषय असल्याचा मत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गुटरेस यांनी व्यक्त केलंय... तसेच या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांततेला धोका निर्माण होऊ शकतो असंही गुटेरस यांनी म्हटलंय...सोबतच अमेरिकेसह इराण आणि इस्रायलला त्यांनी शांततेचा सल्ला दिलाय... 

22 June 2025 11:03 AM

इराणकडून इस्रायलवरील हल्ले अधिक तीव्र

Israel Attack : अमेरिकेच्या युद्धातील अलर्टनंतर इराणने इस्रायलवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत... इस्रायलच्या तेल अवीव आणि हायफा शहरावर जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत...इराणने तेल अवीव शहरावर 40 क्षेपणास्र डागल्याची माहिती आहे... 

22 June 2025 10:44 AM

अकोलेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

Akola Rain :

अकोल्यात 7 दिवसांनी पाणीपुरवठा
काटेपूर्णा प्रकल्पात 13.9 टक्के पाणीसाठा शिल्ल्क
पावसाळ्यातही अकोलेकरांवर पाणीटंचाईचं संकट
अकोलेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

22 June 2025 10:26 AM

संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 165 गावांमध्ये टंचाई

Sambhajinagar : मराठवाड्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तरीही मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवत आहे. विभागातील 376 गावे आणि वाड्यांमध्ये अद्यापही 470 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही टंचाईचे प्रमाण कमी असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाहीये....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 June 2025 10:19 AM

जूनमध्येच राज्यातील धरणं 37 टक्के भरली 

State Water : यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने दरवर्षी मे-जूनमध्ये तळाला जाणा-या धरणांत गत वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट जलसाठा दुप्पट झाला आहे... राज्यातील धरणांमध्ये आजघडीला 37 टक्के जलसाठा झाला आहे....गेल्यावर्षी जूनमध्ये सरासरी 20 टक्क्यांच्या खाली असणारी धरणे यंदा 37 टक्के भरल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.... नागपूर विभागात पावसाने ओढ दिली असली तरी विभागातील जलसाठे 30 टक्के भरलेले आहेत...कोकण विभागात सर्वाधिक 44 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 June 2025 08:22 AM

हॉट एअर बलूनला आग, 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Brazil : दक्षिण ब्राझीलच्या सांता कॅटरिना प्रदेशात पर्यटकांच्या हॉट एअर बलूनला आग लागून तो कोसळल्याची घटना घडलीय.. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत..

22 June 2025 08:18 AM

राज-उद्धव ठाकरेंचे सूर जुळणार?

Dadar Banner : दादर इथल्या शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय....या बॅनरवर सूर जुळणार...महाराष्ट्राचं चित्र बदलणार...महाराष्ट्रात काही वर्षात समिकरण बदलणार ...महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आलीय शिवसेना UBT पक्षाचे शिवसैनिक महेश जाधव यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलाय... शिवसैनिक आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यावेळशी ते महाराष्ट्रात ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं घालणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More