Sthanik Swarajya Sanstha : राज्यातील महानगरपालिकांचं निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.. कारण नगरविकास विभागानं सुधारित जीआर काढलाय.. या जीआरमध्ये सर्व महानगरपालिकांना 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आलीय.. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांचं बिगुल दिवाळीनंतर वाजणार आहे.. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक घटना..लंडनहून मुंबईत येणा-या विमानातील घटना...पाच प्रवासी, दोन केबिन क्रू बेशुद्ध पडल्याची घटना...लंडनहून मुंबईत येणा-या विमानातील घटना
Uday Samant Will Meet Raj Thackeray : उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार...आठ ते दहा दिवसांत राज ठाकरेंची भेट घेणार...उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.. उदय सामंत राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा करणार?... पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार ?
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nashik : नाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररुप...गंगापूर धरणातून पाणी सोडलं...पाणी सोडल्यानं सोमेश्वर धबधबा प्रवहित
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sushma Andhare : महाराष्ट्र द्रोह्यांचे मनसुबे हाणून पाडू'...सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य..'युती होण्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न'...मराठीच्या हितापुढे टिका टिपण्णी शुल्लक - अंधारे
Medha Kulkarni on Pune Railway Station Name : पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करावं'...'पुणे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या'...भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी...थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई हारले नाहीत - मेधा कुलकर्णी शिवाय त्यांचा मोठा इतिहास असल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देण्यात यावे
Dharashiv : पूजा खेडकरपाठोपाठ बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता राज्यातील आणखी एक आयएएस अधिकारी अडचणीत आलाय...धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे...केंद्र सरकराने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत...सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत...
Manikrao Kokate : महायुतीने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं...परंतु शेतक-यांनी कर्ज भरलं पाहिजे...असं वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय...तसेच शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही कोकाटेंनी म्हटलंय... अहिल्यानगरच्या कोपरगावात मीडियाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय...
Mumbai High Court On Mahapalika : उच्च न्यायालयानं महापालिकांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढलेत. महापालिकेतले अधिकारी कायद्याचे रक्षक असतात पण त्यांच्या निष्क्रियतेमुळे बेकायदेशीर बांधकामं उभी राहतात, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयानं महापालिकांच्या कारभारावर भाष्य केलंय. बेकायदेशीर बांधकाम करणा-या विकासकांना सुरक्षा देण्याबाबतची राज्य सरकारसह महापालिकांची भूमिका चुकीची आहे, असंही न्यायालयानं म्हटलंय.. महापालिका कायद्याचं उल्लंघन करणा-यांना अधिकारी केवळ नोटिसा बजावतात पण पुढे कारवाई होत नाही त्यामुळे न्यायालयाला दखल घ्यावी लागते, अशी नाराजीही न्यायालयानं व्यक्त केली..बेकायदेशीर बांधकामाबाबत वसई-विरारमधल्या याचिकाकर्त्याच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयानं ही टिप्पणी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sanjay Raut : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय... गुजरातेत हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रावर का लादली जातेय, असा सवाल राऊतांनी केलाय...तसेच राज्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय...
Kalyan Ganja Seized : परराज्यातून रेल्वेने महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणा-या दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मेहताब आलम इर्शाद आलम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी अशी अटक केलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. या दोघांकडून चार लाख 17 हजार रुपये किमतीचा 20 किलोहून अधिक गांजा कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय... याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरुये...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Hemant Divate : हिंदी सक्तीविरोधात आता राज्यात वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळतंय.. हिंदी सक्तीविरोधात आता पुरस्कार वापसीला सुरुवात झालीय. कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केलीय.. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादली जात असल्याचं सांगत हेमंत दिवटे यांनी पुरस्कार सरकारला परत करणार असल्याचं जाहीर केलंय.. पॅरानोया या कवितासंग्रहासाठी मिळालेला पुरस्कार रकमेसह परत करणार असल्याची घोषणा हेमंत दिवटे यांनी सोशल मीडियावरुन केलीय.. हिंदी सक्तीबाबत सरकारनं निर्णय मागे घेतला तर आपण आपला पुरस्कार वापसीचा निर्णयही मागे घेऊ असंही हेमंत दिवटे यांनी जाहीर केलंय..
बामतीचा व्हिडीओ पाहा -
Pune-Singapore Air Service : अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएने प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.... एअर इंडियाच्या ताफ्यात असलेल्या बोइंग 787 विमानासह अन्य विमानांचीदेखील तपासणी सुरू आहे... परिणामी विमाने 'ग्राउंड' होत आहेत... याचाच थेट फटका आता पुणेकरांना बसत आहे... एअर इंडियाची पुणे-सिंगापूर ही विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही विमानसेवा दिल्ली-पुणे-सिंगापूर अशी होती... सिंगापूरची सेवा रद्द झाल्याने पर्यायाने पुणे - दिल्लीच्या सेवेलादेखील फटका बसत आहे... १५ जुलैपर्यंत पुणे-सिंगापूर-पुणे व पुणे-दिल्ली-पुणे विमानसेवा रद्द झाल्याचे एअर इंडियाने जाहीर केले...
पुणे-सिंगापूर एअर इंडियाच्या विमानाची सेवा आठवड्यातून पाच दिवस सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी आहे. ...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Airport Gold Seized : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी केल्याप्रकरणी मोठी कारवाई केलीय.... या कारवाईत 2 आरोपींकडून तब्बल 4 कोटी 24 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला... पहिल्या कारवाईत सीमा शुल्क विभागाने एका आरोपीकडून 6 कॅप्सूल जप्त केल्या.... त्या कॅप्सूलमध्ये सोन्याची पावडर होती .... या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी 81 लाख रुपये इतकी आहे... तर दुस-या कारवाईत आरोपीकडून 4 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून या कॅप्सूलमधील सोन्याची किंमत 1 कोटी 43 लाख रुपये इतकी आहे..... याप्रकरणी सोने तस्करी करणा-या या 2 कर्मचा-यांनाही अटक केली असून त्या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा
Mumbai Ganja Seized : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून 11 कोटींचा गांजा जप्त केलाय... बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय नागरिकांकडून 11 किलो 881 हायड्रोपोनिक गांजा जप्त केलाय...आरोपींनी ट्रॉली बॅगमध्ये हा गांजा लपवला होता..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
India Vs England First Test : लीड्समध्ये सुरू असलेली भारत आणि इंग्लंड टेस्ट सध्या रोमांचक वळणार येऊन ठेपलीय. टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहनं 5 विकेट्स घेतल्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग 465 रन्सवर संपुष्टात आलीय. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 6 धावांची निसटती आघाडी घेता आलीय.. दुस-या इनिंगमध्ये टीम इंडियाची सुरुवात अडखळती झालीय. ओपनर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शनला इंग्लंडनं झटपट माघारी धाडलं. तिस-या दिवसअखेर टीम इंडिया 2 बाद 90 रन्सवर आहे. सध्या टीम इंडियाकडे 96 रन्सची आघाडी आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
IRAN : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने तेलपुरवठा करणा-या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.... यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे व दरवाढीचे संकट येऊ शकते....इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल... 96 मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी 21 मैल रुंद आहे... ही होर्मुझची सामुद्रधुनी ओमानचे आखात, अरबी समुद्र यांना जोडते... येथूनच जहाजे पुन्हा हिंदी महासागराकडे वळतात... पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधनतेलाचे सध्या असलेले 75 डॉलर प्रति बॅरल हे दर थेट 120 ते 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Rain Update : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.... मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय....कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे...तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Water : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणातील जलसाठ्यात वाढ झालीय.. सात धरणांमुळे 3 लाख 88 हजार 523 दशलक्ष लिटर म्हणजे 27 टक्के इतका पाणीसाठा पोहोचलाय. गेल्या काही दिवसांत आटलेला पाणीसाठा 8 टक्क्यांवरून आता 27 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळलयं. गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात संततधार सुरू असल्यामुळे धरण क्षेत्रातही पुरेसा पाऊस झाल्यामुळे तुळशी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोडक सागरच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raksha Khadse On Hindi Language : एकीकडे राज्यात हिंदी भाषा सक्तीला विरोध होत असताना, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अजब दावा केलाय. हिंदी आपली राष्ट्रभाषा असून ती सर्वांना आलीच पाहिजे. असं म्हणत रक्षा खडसेंनी हिंदी सक्तीचं समर्थन केलंय. हिंदी भाषेला विरोध करून राजकारण करणं चुकीचं असल्याचंही त्या म्हणाल्या. रक्षा खडसेंच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यताय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.