Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JUNE 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
09 June 2025
09 June 2025 16:54 PM

मुंब्रा रेल्वे दुर्घटना, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

 

Mahajan on Mumbra Railway Accident : मुंब्राजवळ लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू, दोन लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागल्यानं 13 प्रवासी रुळावर पडले.. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर.. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत.. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार.. कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांची माहिती.

09 June 2025 14:17 PM

सर्व नव्या लोकलला स्वयंचलित दरवाजे असणार 

Automatic Door For Locals : मुंब्रा लोकल अपघातानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला अखेर जागी आली असून आता सर्व नव्या लोकलला स्वयंचलित दरवाजे असतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिलीय..... स्वयंचिलत दरवाज्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल... दुर्घटनेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांनी ही माहिती दिलीय... 

09 June 2025 12:48 PM

भंडा-यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी 

Bhandara Zee 24 Tass Impact : भंडारा जिल्ह्यात खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळविली होती...काहींनी बदलीत सूट तर काहींनी पदोन्नती मिळविली आहे... ही बातमी झी २४ तासाने प्रसिद्ध केली होती... त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली होती... आता या विषय पालकमंत्री संजय सावकारे यांनी एका महिन्यात संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत... तर दिव्यांगाच्या प्रवर्गात बोगस दिव्यांग असतील तर त्याची गय केली जाणार नसल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09 June 2025 12:45 PM

पुणे विमानतळ पावसाळ्यासाठी सज्ज

Pune Airport : पुणे विमानतळ प्रशासनाने पावसाळ्यासाठी कंबर कसलीये...प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी विमानतळ प्रशासनाने जय्यत तयारी केलीये...यात ड्रेनेजलाइन आणि टर्मिनलच्या छताच्या स्वच्छतेपासून ते धावपट्टीच्या डांबरीकरणापर्यंत अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत....

09 June 2025 12:43 PM

नवी मुंबई महापालिकेच्या व्यायामशाळेत ओली पार्टी

Navi Mumbai : नवी मुंबईतील सानपाडा येथील मनपाच्या व्यायामशाळेत वाढदिवसाची ओली पार्टी रंगल्याची संतापजनक घटना समोर आलीय....सानपाडा सेक्टर 5 मधील मनपाच्या मालकीच्या व्यायामशाळेत हा प्रकार घडलाय...व्यायामशाळेच्या जिन्यावर पार्टीबाजांनी मटण शिजवलंय...या ओल्या पार्टीचा व्हिडिओ मोबाईल कॅमे-यात कैद झालाय... दरम्यान व्यायामशाळेत पार्टी होत असताना मनपाचे सुरक्षा रक्षक कुठे होते असा सवाल उपस्थित होतोय...

09 June 2025 11:16 AM

कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Konkan & Madhya Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळतोय. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेले काही दिवस पाऊस पडलेला नाही. परिणामी तिथल्या तापमानात वाढ झालीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09 June 2025 10:43 AM

राजा रघुवंशी हत्या प्रकरण, सोनम रघुवंशीला अटक

Sonam Raghuvanshi : इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठी बातमी... राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात.. उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमधील एका ढाब्यावरुन सोनमला अटक करण्यात आलीय. इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशी हे दाम्पत्य हनीमूनसाठी मेघालयला गेलं होतं.. मात्र अचानक हे दाम्पत्य बेपत्ता झालं. त्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राजा रघुवंशीचा शिलाँगमध्ये मृतदेह आढळला.. मात्र सोनम बेपत्ता असल्याने पोलीस तिचा शोध घेत होते... अखेर 17 दिवसांनंतर सोनमला पोलिसांनी अटक केलीय.. अटकेनंतर सोनमला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलंय.. या हत्येप्रकरणी आणखी तिघांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आलीय. तर एकजण फरार असून त्याचा शोध सुरु आहे... सोनमनंच पती राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी दिलीय.. त्यामुळे सोनमच्या अटकेनंतर राजा रघुवंशीच्या हत्येचं गूढ उकलण्याची शक्यता आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09 June 2025 10:32 AM

डोनाल्ड ट्रम्प यांचा नेपाळला मोठा झटका

Donald Trump On Nepal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा दर्जा काढून घेतला आहे... या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या 7 हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा लागणार आहे...2015 साली नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अमेरिकेने या देशाला टीपीएस दर्जा दिला होता..नेपाळला दिलेला टीपीएस दर्जा 24 जून रोजी संपणार आहे... मात्र, त्यानंतर टीपीएसची मुदत वाढवली जाणार नसल्याचे अमेरिकेचे गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी म्हटले आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09 June 2025 08:22 AM

तहव्वूर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Tahawwur Rana : टियाला हाऊस न्यायालयाने २६/११ चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची न्यायालयीन कोठडी ९ जुलैपर्यंत वाढवली. तो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजर होता. यावेळी त्याच्या वकिलांनी आरोग्याच्या समस्या मांडल्या.  न्यायालयाने तिहार अधिकाऱ्यांना आज स्थिती अहवाल दाखल करण्यास सांगितलंय

 

09 June 2025 08:17 AM

शिवसेना UBT चं 'मिशन मुंबई' 

Aaditya Thacekray : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना UBT नं मिशन मुंबई हाती घेतलंय.. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यांवरून आमदार आदित्य ठाकरे आज एल्गार पुकारणार आहेत.. मुंबईतल्या मुलुंडमध्ये आज संध्याकाळी 'लढा आपल्या मुंबईचा' हा मेळावा पार पडेल. यात नागरिक, इतर सामाजिक संस्था आणि पदाधिका-यांना आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. धारावी पुनर्विकासात काय त्रुटी आहेत, या प्रकल्पाचा मुंबईवर काय परिणाम होणार आहे, याबाबत आदित्य ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई लुटली जातेय, असा आरोप शिवसेना UBT पक्षाकडून केला जातोय त्याबाबतही ते पक्षाची भूमिका स्पष्ट करतील.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

09 June 2025 08:14 AM

सोलापूर-गोवा विमानसेवा आजपासून सुरु होणार

Solapur-Goa Air Service : सोलापूरकरांचे विमानसेवेचे स्वप्न अखेर पूर्ण झालंय....सोलापूर ते गोवा विमानसेवेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे....यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ , ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे...आजपासून सोलापूर ते गोवा आणि 1 ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More